लॉस एंजेलिसमधील वणवे

एशेले आणि ब्रेडन यांना वणव्यांनंतर आशेचा किरण सापडतो

एशेले कामावर असताना तिचा 11 वर्षांचा मुलगा ब्रेडनने तिला फोन केला आणि अल्टाडेना, CA येथील त्यांच्या घराजवळल वणवा पेटला असल्याची वॉर्निंग दिली. ती ज्या ऑफिसमध्ये मॅरेज आणि फॅमिली थेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते तिथून ती तडक बाहेर पडली आणि घरी ब्रेडन आणि त्यांचा चिहुआहुआ, किंग टुट यांच्याजवळ पोहोचली.जेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या अगदी पूर्वेला असलेल्या ईटनमध्ये आगीचा लाल प्रकाश दिसला तेव्हा त्यांनी घर रिकामे केले. “आम्ही परत येणार नाही असं तेव्हा वाटलंच नाही”, एशेले म्हणाली. अल्टाडेनामध्ये जन्म झालेली आणि लहानाची मोठी झालेली एशेले तिच्या आई आणि बहिणींपासून काही ब्लॉक्सच्या अंतरावर राहत होती. त्यांची सर्वांची घरे वणव्यांमध्ये नष्ट झाली.

निरभ्र आकाश आणि डोंगराच्या पार्श्वभूमीवर एका जळालेल्या घराच्या अवशेषांमध्ये एक चिमणी आणि अनेक बीम्स उभे असलेले दिसत आहेत.

एशेले आणि ब्रेडन ज्या घरात 17 वर्षे राहत होते त्या घराच्या राखेतून त्यांना आठवण म्हणून ठेवण्यासाठी काही दागिने आणि ब्रेडनचे जळून गेलेले डान्स मेडल्स यांच्यासह काही गोष्टी कशाबशा सापडल्या.

एशेलेला Airbnb.org च्या माध्यमातून आपत्कालीन घरांची माहिती मिळाली आणि तिने Airbnb.org चे भागीदार 211 LA यांच्या मार्फत या कार्यक्रमासाठी अर्ज केला. ती, ब्रेडन आणि किंग टुट जवळच्या ग्लेंडेल येथे इनेसाने होस्ट केलेल्या Airbnb मध्ये रहायला गेले. तिथे ते एक महिन्याहून थोडा अधिक काळ राहिले. याच दरम्यान, ब्रेडन 11 वर्षांचा झाला आणि त्याने त्याचा वाढदिवस Airbnb मध्ये त्याच्या मित्र आणि कुटुंबासह स्लीपओव्हर करून साजरा केला.

हिरवा स्वेटर आणि जीन्स घातलेली लांब, गडद केस असलेली एक महिला सूर्यप्रकाशाने न्हालेल्या आणि एक हिरवी खुर्ची असलेल्या खोलीत खिडकीसमोर टेबलावर हात ठेवून उभी आहे.

“या जागेत असल्यामुळे मला श्वास घेता आला, विसावा मिळाला आणि ही जाणीव झाली की माझे रक्षण करणारे आणि काळजी घेणारे लोक आहेत,” एशेले म्हणाली. इनेसा आणि तिचे कुटुंब ड्राईव्हवेच्या पलीकडे राहते आणि ते सर्व त्यांच्या गेस्ट्सची खूप काळजी घेतात. “माझे स्वतःचे कुटुंब विखरून गेले असताना, मला गरज लागल्यास माझ्याजवळ असे लोक आहेत जे माझी खूप काळजी घेतात यामुळे खूप बरे वाटते,” एशेले म्हणाल्या.

एका गॅरेजच्या दारासमोर गडद रंगाची जीन्स, काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि बॅले शूज घातलेल्या आणि पायांचे अंगठे हवेत उंचावलेल्या एका मुलाच्या साईड-बाय-साईड इमेजेस.

“या जागेत असल्यामुळे मला श्वास घेता आला, विसावा मिळाला आणि ही जाणीव झाली की माझे रक्षण करणारे आणि काळजी घेणारे लोक आहेत.”

सर्वत्र खडक आणि वेगवेगळी शिल्प असलेल्या बागेत जीन्स आणि स्वेटर घातलेली एक महिला लाल ड्रेस घातलेल्या एका दुसऱ्या महिलेशी बोलत बेंचवर बसली आहे.

होस्ट इनेसा आणि तिचे कुटुंब त्यांच्या Airbnb च्या समोर, ड्राईव्हवेच्या पलीकडे राहते आणि त्यांनी एशेले आणि ब्रेडनच्या संपूर्ण वास्तव्यादरम्यान त्या दोघांची खूप काळजी घेतली.

एशेलेने तिच्या Airbnb. org मधील वास्तव्यादरम्यान, तिच्या थेरपी क्लायंट्सना मदत करणे सुरूच ठेवले. त्यांच्यापैकी अनेकांनीदेखील त्यांची घरे गमावली होती. डेबी ॲलन डान्स ॲकॅडमीमध्ये कुशल डान्सर असलेल्या ब्रॅडेनने डान्स प्रॅक्टिस सुरू ठेवली आणि त्याने फेब्रुवारीमध्ये ॲकॅडमीसाठी निधी उभारणीच्या कार्यक्रमात डान्ससुद्धा केला. त्यानंतर थोड्याच वेळात, ते इनेसाच्या Airbnb प्रॉपर्टीमधून जवळच्याच एका दीर्घ-कालीन घरात रहायला गेले.

सहभागी व्हा

संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणाऱ्या एका जागतिक कम्युनिटीत सामील व्हा.

अधिक जाणून घ्या

प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते

आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.