तुमची जागा Airbnb वर का आणावी?
हायलाइट्स
तुमच्या अटींवर अतिरिक्त पैसे कमवा
गेस्ट्सशी कनेक्ट करा आणि तुमच्या स्थानिक कम्युनिटीच्या विविध पैलूंचा सन्मान करा
वाटचालीच्या प्रत्येक पायरीवर सहाय्य आणि संरक्षण मिळवा
तुमची उद्दिष्टे काहीही असोत, Airbnb वर होस्टिंग केल्याने ती पूर्ण करण्यासाठी मजेशीर, सोयीस्कर मार्ग मिळतो. तुम्ही जगभरात कुठेही, कुठल्याही प्रकारच्या जागेमध्ये गेस्ट्सचे स्वागत करू शकता, तुम्हाला पाहिजे तेवढ्या कमी किंवा जास्ती वेळा तुम्ही तसे करू शकता.
यातून मिळालेल्या पैशातून तुम्ही घरचा खर्च भागवू शकता, एखाद्या मोठ्या कामासाठी बचत करू शकता किंवा तुमच्या पुढील सुट्टीच्या प्रवासाचा खर्च काढू शकता. जादा कमाई करण्याच्या व्यतिरिक्त, घरची दारे उघडी करून दिल्यामुळे तुम्हाला जगभरातील प्रवाशांसोबत कनेक्ट करण्याची आणि तुमच्या स्थानिक कम्युनिटीला सपोर्ट करण्याची संधी मिळते.
तुमच्या अटींवर Airbnb करा
Airbnb वर होस्टिंग करताना तुम्ही पाहुण्यांचे स्वागत कसे आणि केव्हा करता ते तुम्हीच ठरवता. तुम्ही शेअर केलेली किंवा खाजगी जागा ऑफर करू शकता, तुम्ही घरीच असलात तरीही, नसलात तरीही.
काही होस्ट या आदरातिथ्याकडे बिझनेस म्हणून बघतात, तर काहींसाठी हे कधीमधी करायचे काम असते. तुम्ही फक्त तुमच्या प्रदेशातील एखाद्या विशेष प्रसंगासाठी होस्टिंग करू शकता किंवा तुम्ही सुट्टी घालवण्यासाठी बाहेर गेलेले असता जागेचा उपयोग व्हावा म्हणून होस्टिंग करू शकता.
"मला स्वतःचा बॉस व्हायला आवडते," ईस्ट वेनाची, वॉशिंग्टनमधील सुपरहोस्ट मॅगाली म्हणतात. "हा मनासारखे जगण्याचा एक चांगला मार्ग आहे—मुख्यतः माझ्या मुलांकडे लक्ष देण्यासोबतच माझ्या इतर कामांमध्ये संपूर्ण मेहनत घेण्यासाठी हा अगदी योग्य समतोल आहे."
अतिरिक्त पैसे कमवा
नुकत्याच झालेल्या एका सर्व्हे मध्ये अनेक Airbnb होस्ट्सने सांगितले की त्यांनी Airbnb वर त्यांची जागा पैसे कमावण्यासाठी ठेवली होती. या अतिरिक्त कमाईचा उपयोग ते वाढते खर्च भागवण्यासाठी करतात, म्हणजे निरनिराळी बिले भरण्यासाठी किंवा खर्चासाठी पैसे हातात असावे म्हणून.
सिंगापूरमधील सुपरहोस्ट युआन म्हणतात, "माझ्या स्वतःच्या घरात राहायला आल्यावर मी होस्टिंग सुरू केले. "Airbnb वर माझ्या घरातील अतिरिक्त बेडरूम लिस्ट केल्यामुळे होणाऱ्या कमाईमुळे माझा रोजचा खर्च निघतो, कारण मी शिक्षण पुन्हा सुरू केले आहे आणि आता मला संपूर्ण वेळेची नोकरी नाही."
2021 मध्ये जगभरातील नवीन होस्ट्सची कमाई एकूण 1.8 अब्ज डॉलर्स एवढी झाली होती, हा आकडा 2019 च्या तुलनेत 30% पेक्षा अधिक मोठा आहे. 2021 मध्ये अमेरिकेतील होस्ट्सचे सरासरी उत्पन्न 13,800 डॉलर्स होते, जे 2019 च्या तुलनेत 85% जास्त आहे. आणि 2022 मध्ये होस्टिंगच्या संधी—एखाद्या वीकेंडपासून वर्षभरापर्यंत—वाढतच आहेत.
"आम्ही Airbnb वर लिस्टिंग केल्यापासून मागे वळून पाहिलेले नाही," असे म्हणणे आहे माउंट बार्कर, ऑस्ट्रेलिया येथील सुपरहोस्ट रॉबिन यांचे. "आम्हाला दरमहा संपूर्ण बुकिंग मिळते आणि होस्ट्स म्हणून आमच्या कमाईमुळे, आमचे पेन्शन आणि इतर गुंतवणूकी मिळून, आमची जीवनशैली खरोखरच चांगली झालेली आहे."
तुमच्या कम्युनिटीच्या विविध पैलूंचा सन्मान करा
तुमची जागा शेअर करण्याचे रिवॉर्ड्स फक्त तुमच्या बँक अकाऊंटमध्येच दिसतात असे नाही. होस्ट्स आम्हाला सांगतात की इतर महत्त्वाच्या बाबी आहेत आमच्या कम्युनिटीसोबत मजा करणे, तसेचअशा रंगतदार व्यक्तींना भेटणे ज्यांना अन्यथा आम्ही भेटू शकलो नसतो.
होलटाऊन, बारबेडसमधील सुपरहोस्ट जेम्स आणि रॉक्सेन त्यांच्या गेस्ट्ससाठी स्थानिक वस्तू आणून ठेवतात—उदा. पलंगाजवळील नाईटस्टँडवर ठेवलेल्या ताज्या कुकीज़—या वस्तू ते त्याच प्रॉपर्टीवरील एका लहानशा दुकानात विकतातसुद्धा. जेम्स म्हणतात, "गेस्ट्ससाठी त्यांच्या रूममध्ये येथील स्थानिक केन डॉग कॉफी ठेवलेली असते, त्याची चव पाहिल्यानंतर गेस्ट ही कॉफी खरेदी करतात."
लास पाल्मास डे ग्रॅन कॅनेरिया, स्पेन येथील हॅलो हाऊस हॉस्टेलचे सुपरहोस्ट ब्रायन म्हणतात की त्यांनी घरीच राहून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी होस्टिंग सुरू केले होते. "आम्हाला नेहमी छानच पाहुणे भेटले," ते सांगतात, "आणि त्यांच्या गोष्टी ऐकणे आणि पुन्हा-पुन्हा त्यांचे स्वागत करणे आम्हाला फार आवडते."
झटपट काम सुरू करा
तुम्ही अक्षरशः कोणतीही जागा Airbnb वर ठेवू शकता. होस्टिंग करण्याचे तुमचे कारण काहीही असो, सुरुवात करणे अगदी सोपे आहे.
- तुमच्या लोकेशनवर तुमची कमाई किती असू शकते याची माहिती घ्या किंवा संकटातील लोकांना राहण्याची जागा देण्यासाठी साइन अप करा
- आमचे Airbnb Setup तुम्हाला एखाद्या सुपरहोस्टकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवण्याची, तुमच्या पहिल्या रिझर्वेशनसाठी अनुभवी गेस्टचे स्वागत करण्याची आणि कम्युनिटी सपोर्ट एजंट्सच्या प्रशिक्षित टीमसाठी त्वरित ॲक्सेस मिळवण्याची संधी देते
- होस्ट्ससाठी AirCover तुमचे संरक्षण कसे करते त्याची माहिती घ्या
Airbnb वर तुमची जागा ठेवल्याने तुम्ही तुमचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करू शकता, जगभरातील लोकांशी कनेक्ट करू शकता आणि स्वतःच्या अटींवर उद्योजक बनू शकता. तुम्ही गेस्ट्सना राहण्याची जागा देण्यासाठी तयार असाल, तेव्हा आम्ही पावलोपावली तुमची मदत करू.
होस्टिंगचे जग उघडे करून दाखवणाऱ्या आमच्या गाईडमध्ये आणखी माहिती घ्या
हायलाइट्स
तुमच्या अटींवर अतिरिक्त पैसे कमवा
गेस्ट्सशी कनेक्ट करा आणि तुमच्या स्थानिक कम्युनिटीच्या विविध पैलूंचा सन्मान करा
वाटचालीच्या प्रत्येक पायरीवर सहाय्य आणि संरक्षण मिळवा