तुमच्यासाठी योग्य कॅन्सलेशन धोरण निवडा

तुमच्या आणि तुमच्या होस्टिंगच्या गरजा पूर्ण करणारे धोरण शोधा.
Airbnb यांच्याद्वारे 5 फेब्रु, 2020 रोजी
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
19 जाने, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • योग्य कॅन्सलेशन धोरणामुळे तुम्हाला पाहिजे असलेल्या बुकिंग्ज मिळण्यात मदत होऊ शकते

  • धोरण निवडताना तुमच्या गरजा, उद्दिष्टे आणि आदर्श गेस्ट्सचा विचार करा

  • तुम्ही तुमचे धोरण कधीही अपडेट करू शकता

कॅन्सलेशनचे धोरण निवडणे तारेवरची कसरत असू शकते. गेस्ट्सना आकर्षित करत असताना तुम्ही कॅन्सलेशन टाळू इच्छिता—आणि आजकालच्या गेस्ट्सना प्रवासाचे प्लॅनिंग करताना सोयीस्करपणा पाहिजे असतो.

प्रत्येक होस्टच्या गरजा निराळ्या असल्यामुळे आम्ही कॅन्सलेशनसाठी अनेक धोरणे तयार केली आहेत. तुम्ही तुमच्यासाठी योग्य असे स्टँडर्ड आणि दीर्घकालीन धोरण निवडू शकता.*

स्टँडर्ड धोरणे

तुमचे स्टँडर्ड कॅन्सलेशन धोरण कमी कालावधीच्या रिझर्वेशन्ससाठी आहे. हे 28 पेक्षा कमी सलग रात्रींच्या सर्व बुकिंग्जवर लागू होते.

  • सोयीस्कर कॅन्सलेशन धोरण: पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी गेस्ट्स चेक इनपूर्वी 24 तास आधीपर्यंत कॅन्सल करू शकतात आणि तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. त्यांनी चेक इनपूर्वी 24 तासांपेक्षा कमी वेळेत कॅन्सल केल्यास आणि चेक इन नाहीच केल्यास, तुम्हाला पहिल्या रात्रीचे भाडे मिळेल. त्यांनी चेक इनच्यानंतर कॅन्सल केल्यास, तुम्हाला त्यांनी राहिलेल्या प्रत्येक रात्रीचे तसेच 1 अतिरिक्त रात्रीचे पेमेंट मिळेल.
  • मध्यम कॅन्सलेशन धोरण: पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी गेस्ट्स चेक इनच्या 5 दिवस पूर्वीपर्यंत कॅन्सल करू शकतात आणि तुम्हाला पेमेंट मिळणार नाही. त्यांनी त्यानंतर, म्हणजे पाचपेक्षा कमी दिवसांपूर्वी कॅन्सल केल्यास, तुम्हाला त्यांनी राहिलेल्या प्रत्येक रात्रीचे, तसेच 1 अतिरिक्त रात्रीचे आणि न वापरलेल्या सर्व रात्रींचे 50% पेमेंट मिळेल.
  • ठाम कॅन्सलेशन धोरण: पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी, गेस्ट्सना चेक इनच्या किमान 30 दिवस आधी कॅन्सल करावे लागेल. त्यांनी चेक इनच्या किमान 14 दिवस आधी आणि बुकिंग केल्याच्या 48 तासांच्या आत कॅन्सल केल्यासदेखील त्यांना पूर्ण रिफंड मिळू शकतो. त्यांनी चेक इनपूर्वी 7 ते 30 दिवसांच्या दरम्यान कॅन्सल केल्यास, तुम्हाला सर्व रात्रींसाठी 50% पेमेंट मिळेल. त्यांनी चेक इनच्या 7 दिवसांपेक्षा कमी दिवस आधी कॅन्सल केल्यास, तुम्हाला सर्व रात्रींसाठी 100% पेमेंट मिळेल.
  • कठोर कॅन्सलेशन धोरण: पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी, गेस्ट्सनी बुकिंगपासून 48 तासांच्या आत कॅन्सल करणे गरजेचे आहे आणि हे कॅन्सलेशन चेक इनच्या किमान 14 दिवस आधी झाले पाहिजे. त्यांनी चेक इनपूर्वी 7 ते 14 दिवसांच्या दरम्यान कॅन्सल केल्यास, तुम्हाला सर्व रात्रींसाठी 50% पेमेंट मिळेल. त्यांनी त्यानंतर कॅन्सल केल्यास, तुम्हाला सर्व रात्रींसाठी 100% पेमेंट मिळेल.

दीर्घकालीन धोरणे

तुमचे दीर्घकालीन कॅन्सलेशन धोरण सलग 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या रिझर्व्हेशनवर लागू होते. हे तुमच्या स्टँडर्ड धोरणाला ओव्हरराइड करते.

  • दीर्घकालीन ठाम कॅन्सलेशन धोरण: पूर्ण रिफंड मिळवण्यासाठी, गेस्ट्सना चेक इनच्या किमान 30 दिवस आधी कॅन्सल करावे लागेल. गेस्टने त्यानंतर कॅन्सल केल्यास, तुम्हाला वापरलेल्या सर्व रात्रींसाठी 100%, तसेच 30 अतिरिक्त रात्रींचे पेमेंट मिळेल. गेस्टने कॅन्सल करतेवेळी रिझर्व्हेशनमध्ये 30 पेक्षा कमी रात्री उरलेल्या असल्यास, तुम्हाला उरलेल्या सर्व रात्रींसाठी 100% पेमेंट मिळेल.
  • कठोर दीर्घकालीन कॅन्सलेशन धोरण: रिझर्वेशन कॅन्सल करणाऱ्या गेस्ट्सना पूर्ण रिफंड तेव्हाच मिळेल जेव्हा ते बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत आणि चेक इनच्या तारखेच्या किमान 28 दिवस आधी रिझर्वेशन कॅन्सल करतील. गेस्टने त्यानंतर कॅन्सल केल्यास, तुम्हाला वापरलेल्या सर्व रात्रींसाठी तसेच कॅन्सल केल्याच्या तारखेपासून 30 अतिरिक्त रात्रींसाठी पेमेंट मिळेल. गेस्टने रिझर्व्हेशनमध्ये 30 दिवसांपेक्षा कमी दिवस उरले असताना कॅन्सल केल्यास, तुम्हाला उरलेल्या सर्व रात्रींसाठी 100% पेमेंट मिळेल.

टीप: गेस्टने चेक इनच्या आधी कॅन्सल केल्यास स्वच्छता शुल्क नेहमीच रिफंड केले जाते, मग होस्टचे कॅन्सलेशन धोरण कसेही असो. Airbnb च्या गेस्ट सेवा शुल्काचे रिफंड अनेक घटकांवर अवलंबून असते. शुल्काच्या रिफंडबद्दल आणखी माहिती घ्या

गेस्ट्स चेक इनच्या किती आधी कॅन्सल करून रिफंड मिळवू शकतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे धोरण केव्हाही अपडेट करू शकता.

माझ्यासाठी कोणते धोरण योग्य आहे?

एखाद्या कॅन्सलेशनचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या होस्टिंगच्या बिझनेसवर कसा पडेल यावर हे अवलंबून असते. तुमच्या गरजांचा आणि उद्दिष्टांचा, तसेच तुमच्या आदर्श गेस्टचाही विचार करा आणि या सर्वांसाठी योग्य असे धोरण निवडा.

सोयीस्कर धोरण निवडण्याचा विचार करा जर:

  • या हंगामात फार गेस्ट्स येत नाहीत आणि तुम्हाला अशा गेस्ट्सना आकर्षित करायचे आहे ज्यांच्या प्रवासाच्या प्लॅनमध्ये बदल होऊ शकेल.
  • या हंगामात फार गेस्ट्स येतात आणि तुम्हाला विश्वास वाटतो की एखाद्या गेस्टने कॅन्सल केले तरीही तुमची जागा पुन्हा बुक होईल.
  • तुमची लिस्टिंग अशा ठिकाणी आहे जिथे स्पर्धा फार आहे आणि तुम्हाला उशीरा कॅन्सलेशनची काळजी नाही.

मध्यम धोरण निवडण्याचा विचार करा जर:

  • तुम्हाला शेवटच्या क्षणी होणारे कॅन्सलेशन नकोत.
  • एखाद्या गेस्टने कॅन्सल केल्यास तुम्हाला पुढील बुकिंगच्या आधी थोडा वेळ पाहिजे.
  • तुम्हाला अजूनही अशा गेस्ट्सना आकर्षित करायचे आहे ज्यांच्या प्लॅनमध्ये अधिक समन्वयाची गरज असते, जसे की बिझनेस प्रवाशांना असे रिझर्वेशन करणे गरजेचे असते ज्यात रिफंड मिळेल.

ठाम धोरण निवडण्याचा विचार करा जर:

  • तुम्हाला कॅन्सलेशन टाळायचे आहेत, पण पुरेसे ॲडव्हान्स नोटिस मिळाल्यावर तुम्ही ते हाताळू शकता.
  • एखाद्या गेस्टने कॅन्सल केल्यास तुम्हाला पुढील बुकिंगच्या आधी जास्त वेळ पाहिजे.
  • तुमच्या जागेची मागणी वर्षभर असते.

ठाम धोरण आणि कठोर धोरण यांमध्ये फरक असा आहे की ठाम धोरणात चेक इनच्या 30 दिवसांपूर्वी कॅन्सल केल्याने गेस्ट्सना पूर्ण रिफंड मिळू शकतो.

कठोर कॅन्सलेशन धोरण निवडण्याचा विचार करा जर:

  • तुम्हाला कॅन्सलेशन टाळायचे आहेत आणि रिप्लेसमेंट बुकिंग्स शोधण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही.
  • तुम्ही स्वतः होस्टिंगची सर्व कामे करता आणि शेवटच्या क्षणी कॅन्सलेशन झाल्याने तुमच्या शेड्यूलमध्ये खूप व्यत्यय यतो.
  • तुमच्या जागेला खूप मागणी आहे आणि कठोर धोरणामुळे गेस्ट्स बुक करणार नाहीत असे नाही.

काही होस्ट्स त्यांच्या कॅन्सलेशन धोरणात रिफंड मिळण्यासाठी पात्र नसलेला पर्याय जोडून जास्त कमाई करतात. या पर्यायामध्ये गेस्ट्स अधिक कठोर कॅन्सलेशन पॉलिसी निवडून सवलतीचे भाडे मिळवू शकतात, साधारणपणे ही सवलत तुमच्या किमान भाड्यावर 10% असते. त्यांनी तसे निवडले आणि नंतर रिझर्वेशन कॅन्सल केले, तर बुक केलेल्या सर्व रात्रींचे संपूर्ण पेआऊट तुम्हाला मिळते.

कॅन्सलेशन पॉलिसी निवडण्याचा अर्थ आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या गेस्ट्ससाठी सर्वात योग्य काय आहे हे शोधणे. फक्त लक्षात ठेवा की बऱ्याच लोकांना प्रवास करताना सोयीस्कर धोरण पाहिजे असते. त्यांचे रिझर्वेशन मिळवण्यासाठी, सुरुवातीला असे सर्वात सोयीस्कर धोरण निवडा जे तुमच्या होस्टिंगच्या कामाला सपोर्ट करू शकेल.

यशस्वी लिस्टिंग सेट अप करण्यासाठी असलेल्या आमच्या गाईडमध्ये आणखी माहिती मिळवा

*जर्मनी, इटली आणि दक्षिण कोरिया मधील रिझर्व्हेशन्ससाठी निराळी धोरणे लागू होतात.

या लेखात दिलेल्या माहितीमध्ये प्रकाशनानंतर बदल होऊ शकतो.

हायलाइट्स

  • योग्य कॅन्सलेशन धोरणामुळे तुम्हाला पाहिजे असलेल्या बुकिंग्ज मिळण्यात मदत होऊ शकते

  • धोरण निवडताना तुमच्या गरजा, उद्दिष्टे आणि आदर्श गेस्ट्सचा विचार करा

  • तुम्ही तुमचे धोरण कधीही अपडेट करू शकता
Airbnb
5 फेब्रु, 2020
हे उपयुक्त ठरले का?