होस्टिंग बिझनेस प्लॅन तयार करणे
हायलाइट्स
सुरुवात करण्यासाठी मिशन स्टेटमेंट तयार करा
स्थानिक लिस्टिंग्जपासून प्रेरणा घ्या
तुमच्या होस्टिंग लक्ष्यांसह ट्रॅकवर राहण्यासाठी बजेट बनवा
तुमच्या पहिल्या गेस्टच्या आगमनापूर्वी फीडबॅक घेण्यासाठी एखाद्या मित्राला वास्तव्य करण्यास सांगा
होस्टिंगमध्ये मदत होण्यासाठी ॲप्स आणि स्मार्ट लॉक्स यांसारखे तंत्रज्ञान एक्सप्लोर करा
निक आणि सारा रुसोस-काराकायन हे पती-पत्नी एक सुपरहोस्ट्सची टीम आहेत (@नेस्टर्स) ज्यांनी कोलंबस, ओहायोमध्ये होस्टिंगला एक पूर्ण वेळेचा व्यवसाय बनवले आहे. २०१२ मध्ये त्यांचे न्यूयॉर्क सिटी मधील बेसमेंट Airbnb वर लिस्ट केल्यानंतर त्यांना होस्टिंगची आवड लागली. तेव्हापासून हे त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नातले काम बनले आहे. सारा "थॅंक्स फॉर व्हिजिटिंग" या पॉडकास्टची को-होस्ट देखील आहे; हे अनुभवी तसेच नवीन होस्ट्ससाठीचे एक संसाधन आहे. येथे, ते Airbnb बिझनेस कसा सुरू करावा याबद्दलचे त्यांचे ज्ञान आणि टिप्स शेअर करतात.
सारा: "आमच्यासाठी, हे क्वीन्स, न्यूयॉर्कमध्ये सुरू झाले. मी एक अभिनेत्री होते. मी बारटेंडर म्हणून देखील भरपूर काम करत होते.”
Nick: "आणि मी आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स डिग्री असलेला एक इंटर्न होतो, जो जेमतेम स्वतःचे पोट भरण्यापुरते कमवत होता..."
सारा: "आणि आम्हाला दोघांनाही मनापासून आमच्या मालकीची प्रॉपर्टी हवी होती; पण हे कसे करायचे ते माहित नव्हते. एके दिवशी, मी हे छोटेसे घर पाहिले—ते ब्लॉकवरील सर्वात लहान घर होते आणि ते आमच्यासाठी महाग होते—परंतु मी ते मिळवण्याचा मार्ग शोधण्याचा निश्चय केला."
निक: "योग्य आर्थिक शिक्षण, बचत आणि कुटुंबाकडून मिळालेल्या सपोर्टमुळे आम्हाला कर्ज मिळू शकले."
सारा: "आणि हे सर्व होत असताना, मला कळले की माझा मित्र त्याच्या अपार्टमेंटमधील एक रूम Airbnb वर लिस्ट करत होता, ज्यामुळे त्याला न्यूयॉर्क सिटीमध्ये त्याचे भाडे देण्यास मदत होत होती—हे माझ्यासाठी खूप भन्नाट होते. त्यावेळी फारशा लोकांना Airbnb बद्दल माहिती नव्हती. मी निकला आमची प्रॉपर्टी लिस्ट करण्याच्या संभाव्यतेबद्दल सांगितले; त्याची द्विधा मनस्थिती झाली होती—पण मला उत्सुकता वाटत होती. आम्ही उडी घेतली आणि ती या सर्व गोष्टींची सुरुवात ठरली.”
निक: "मला टॉयलेट्स साफ केल्याचे आणि ते करताना आनंद झाल्याचेही आठवते. त्यातून आमचे कर्ज फेडले जात होते, म्हणून मी विचार केलाः "वाह, हे मस्त आहे! आम्ही हे अधिक कसे करू शकतो?'"
सारा: “मी माझ्या लक्झरी हॉटेल्समध्ये काम करतानाच्या आदरातिथ्याच्या अनुभवाचा भरपूर उपयोग करून घेऊ शकले—आणि मला ते आवडले. एनवायसीमध्ये चार वर्षांच्या होस्टिंग आणि घराच्या मालकीनंतर, आमच्या नशिबाने एका डेव्हलपरने आमच्याशी संपर्क साधला, जो आमच्याकडून जागा, फर्निचर आणि सर्व काही विकत घेऊ इच्छित होता.”
निक: "थोडे आत्मपरीक्षण केल्यानंतर, आम्ही पुढे जाऊ शकू अशा ठिकाणांची एक लांबच्या लांब स्प्रेडशीट बनवल्यानंतर आणि स्थानिक लोकांशी बोलत देशभरात रोड ट्रीप्स केल्यानंतर, आम्ही कोलंबस, ओहायोला पोहोचलो.”
सारा: “डिझाइन, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेटचे मिश्रण करण्यास सक्षम असणे—आणि आमचे स्वत:चे सर्जनशील निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणे—हे एक साकार झालेल्या स्वप्नासारखे आहे. म्हणूनच आम्ही इतरांना होस्टिंग कसे करावे हे शिकण्यासाठी मदत करण्याबद्दल इतके पॅशनेट आहोत."
1. मिशन स्टेटमेंटसह सुरुवात करा
सारा: "सुरुवात करण्यापूर्वी, आम्ही शिफारस करतो की तुम्ही स्वतःसाठी एक मिशन स्टेटमेंट तयार करावे. हे स्टेटमेंट म्हणजे तुमची मूल्ये आणि तुमचा ध्रुवतारा असेल, जे अशा क्षणांमध्ये विशेषतः उपयुक्त ठरते जेव्हा तुम्हाला दिशा किंवा निर्णयाबद्दल अनिश्चितता वाटू शकते. तुमचे मिशन स्टेटमेंट तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाण्यात मदत करू शकते. त्यातून हे देखील कळेल की तुम्ही तुमची जागा कशी बनवता आणि कशी तयार करता."
निक: "मिशन स्टेटमेंट तयार करताना, स्वतःला काही प्रश्न विचारण्यासाठी वेळ काढा:
- तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळते?
- तुमची मूल्ये काय आहेत?
- तुम्हाला कसे ऑपरेट करायचे आहे?
- तुमची व्हिजन काय आहे?
- तुमची उद्दिष्टे काय आहेत?"
सारा: "आमच्यासाठी, आमचे मिशन आहे जीवनात बदल घडवून आणणार्या जागांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे. आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीमध्ये हे लक्षात ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो."
2. मार्केटचे सर्वेक्षण करा
निक: "उडी घेण्यापूर्वी, तुम्ही तुमचे संशोधन करणे आणि तुमच्या भागातील स्पर्धात्मक लँडस्केपकडे पाहणे महत्वाचे आहे. हे प्राथमिक संशोधन तुम्हाला तुमची स्वतःची जागा कशी डिझाइन, ब्रँड आणि मार्केट करायची ते सांगेल.
- तुमच्या लोकसंख्येचा विचार करा. कुणी तुमच्याकडे वास्तव्य बुक करण्याची शक्यता आहे? उदाहरणार्थ, कोलंबस हे एक महाविद्यालयीन शहर आहे म्हणून आम्ही भेट देणार्या पालकांसाठी आमची जागा तयार केली आहे.
- तुमच्या सुविधांचे मूल्यांकन करा. तुम्ही पाळीव प्राण्यांना परवानगी देता का? तुमच्याकडे पार्किंग किंवा पूल आहे का? तुमच्या जागेत अनोखी सजावट केलेली आहे का? तुमच्या जागेला थोड्या वरच्या पातळीवर नेणारी कोणतीही गोष्ट अधिक भाडे आकारण्याची शक्यता देखील निर्माण करते.
- ऑनलाइन शोधा आणि जवळपासच्या इतर Airbnb लिस्टिंग्ज, हॉटेल्स आणि अल्पकालीन रेन्टल्स पहा. काय उपलब्ध आहे? ते काय भाडे आकारतात? तुमच्याकडे स्वतःला वेगळे दाखवण्याचा काही मार्ग आहे का?
- प्राईसिंग स्ट्रॅटजी बनवा. तुम्ही नुकतीच सुरुवात करत असताना तुमचे ऑक्युपन्सी दर वाढवण्यात मदत करण्यासाठी, Airbnb चे स्मार्ट प्राइसिंग टूल वापरा, जे तुम्हाला आठवड्यातील इतर दिवस आणि शनिवार-रविवारमध्ये तुमचे दर आपोआप बदलू देते."
3. नफा देणारे भाडे ठरवा
सारा: "बजेट तयार करणे हे जरी फारसे सेक्सी नसले तरी ते खूप महत्वाचे आहे. आम्ही स्प्रेडशीट वापरण्याची आणि तुमच्या खर्चाचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्याची शिफारस करतो:
आगाऊ खर्चः कोणत्याही इतर व्यक्तीने तुमच्या जागेचा अनुभव घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जागेत ओतलेली ही प्रारंभिक गुंतवणूक आहे, जसे की नूतनीकरण, सजावट, फर्निचर आणि फोटोग्राफी.
- तुमच्या आवडत्या सजावटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ घ्या. तुम्हाला सर्वात महागड्या किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुमच्याकडे सर्वकाही सर्वात जास्त आलिशान असण्याची गरज नाही. ते फक्त स्वागतार्ह बनवा. थ्रिफ्ट स्टोअर ब्राउझ करा किंवा क्रिएटिव्ह व्हा आणि रंग किंवा एखाद्या थीमसह काहीतरी वेगळे करा—हे लोकांना तुमच्या लिस्टिंगकडे आकर्षित करून घेणार आहेत.
- पहिल्यांदा होस्ट करणार्यांना आम्ही नेहमीच आरामदायक गाद्या, काउचेस आणि शीट्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगतो. पहिल्यांदा हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश केल्यावर प्रत्येकजण स्वतःला बेडवर झोकून देतो—म्हणून तुमचा बेड चांगला आहे याची खात्री करा. कधीकधी तुम्हाला फक्त बेडमुळे 5-स्टार रिव्ह्यू मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचा ऑक्युपन्सी दर वाढवण्यात मदत होईल.
चालू खर्चः गेस्ट्सनी वापरलेल्या मूलभूत वस्तू ज्या पुन्हा भरण्याची गरज पडते, जसे की टॉयलेट्रीज, टॉयलेट पेपर, पेपर टॉवेल्स, बॅटरीज आणि लाइटबल्ब्सचा.
- तुम्ही पाण्याच्या बाटल्या किंवा कॉफीसारख्या अतिरिक्त गोष्टींचा समावेश करता का?
- तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची यादी बनवा आणि तुम्हाला मिळत असलेल्या किंमतींबद्दल तुम्ही खुश आहात याची खात्री करा
- एका वेळी सहा महिन्यांचे सामान बल्कमध्ये खरेदी करा आणि एका स्प्रेडशीटमध्ये तुमच्या प्रमाणाचे ट्रॅकिंग करा
- शीट्ससारख्या वस्तूंच्या बाबतीत, तुम्ही वर्षभरात किती वेळा त्या खरेदी करू इच्छिता हे लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या गेस्ट्ससाठी नेहमीच छान, स्वच्छ शीट्स पुरवल्याची खात्री करायची आहे.
देखभाल आणि व्यवस्थापन खर्चः ह्यामध्ये लॉन, आऊटडोअर आणि बाह्य जागांसह, तुमची जागा सुरक्षित, उबदार आणि राहण्यायोग्य ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. पुढचे गेस्ट्स येणार असतील त्यावेळी मदत करण्यासाठी तुम्ही एखाद्या साफसफाई करणार्या व्यक्तीची किंवा एखाद्या को-होस्टची नेमणूक करणार आहात का?
ह्या संख्यांची बेरीज करा आणि तुमच्या गुंतवणुकीच्या रकमा आणि तुमच्या वास्तववादी उद्दिष्टांबद्दल तुम्ही समाधानी आहात याची खात्री करा. जर तसे नसेल, तर कदाचित तुम्हाला थोडी अधिक आगाऊ बचत करण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही तुम्हाला अभिमान वाटेल अशी जागा तयार करू शकाल.
4. एका गेस्टप्रमाणे विचार करा
सारा: "होस्ट्सबरोबर शेअर करण्यासाठी माझ्या आवडत्या टिप्सपैकी ही एक आहे आणि ती म्हणजे तुमच्या जागेवर राहण्यासाठी एका प्रामाणिक, थेट बोलणार्या मित्राची/मैत्रिणीची निवड करणे. तुम्ही सतत त्या जागेच्या इतके जवळ असता की तुम्ही एखाद्या प्रवाशाला आवश्यक असलेल्या गोष्टी विसरू शकता—जसे की टूथब्रश किंवा टूथपेस्ट— किंवा तुमच्याकडून दुर्लक्षित झालेला डिझाइनमधील एखादा दोष. एखादा मित्र/एखादी मैत्रीण त्या त्रासदायक परंतु महत्त्वपूर्ण तपशीलांवर फीडबॅक देण्यास मदत करू शकतो/शकते. पैसे देऊन येणार्या एखाद्या गेस्टने ह्या गोष्टी दाखवून देणे तुम्हाला आवडणार नाही."
निक: "आम्हाला एक ‘तुम्ही काही विसरलात का?' बास्केट समाविष्ट करायला आवडते, ज्यामध्ये गेस्ट्सना शेवटच्या मिनिटाला आवश्यक असलेल्या टॉयलेट्रीज आणि आयटम्स असतात. यशस्वी होण्यासाठी, आदरातिथ्य करण्याची मानसिकता तुमच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. लोक त्यांना आवडलेल्या वेगवेगळ्या ब्रँड हॉटेल्समध्ये जाण्यामागचे हेच कारण आहे— कारण त्यांना काय अपेक्षा करायची हे माहित असते: अशी जागा जी तिथे पोहोचणारे ते पहिलेच लोक आहेत असे भासवते, जिथे टॉवेल्स काळजीपूर्वक दुमडलेले असतात आणि जिथे त्यांना माहित असते की ते बेडसाइड टेबलच्या शेजारी फोन चार्जर असण्यासारख्या सर्व तपशीलांवर विसंबून राहू शकतात. तुम्हाला तुमच्या गेस्ट्ससाठी सर्व्हिसची हीच ऊंची गाठायची आहे, जेणेकरून त्यांना पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल."
5. हे स्वयंचलित करा
निक: "होस्टिंग आव्हानात्मक आहे; परंतु Airbnb पहिल्यांदा आले तेव्हापेक्षा हा आता एक वेगळा खेळ आहे. तुम्हाला प्रक्रिया आयोजित करण्यात आणि होस्ट म्हणून तुमचे आयुष्य थोडे सुकर करण्यात मदत करण्यासाठी बरेच तंत्रज्ञान, साधने, संसाधने आणि सपोर्ट उपलब्ध आहेत."
सारा: "होस्ट्स जेव्हा सुरुवात करत असतात, तेव्हा आम्ही प्रत्येक वास्तव्याची प्रक्रिया अथपासून इतिपर्यंत करण्याची शिफारस करतो: अगदी सुरुवातीच्या बुकिंग मेसेजपासून ते तुमच्या गेस्ट्सचे स्वागत करण्यापर्यंत, तसेच साफसफाई आणि टर्नअराउंड करण्यापर्यंत. एकदा तुम्हाला ही प्रक्रिया पूर्णपणे समजली की तुम्ही ती बर्याच वेगवेगळ्या मार्गांनी स्वयंचलित करू शकता, उदाहरणार्थ:
- वेब-आधारित ॲप्स:इव्हेंट ट्रिगर प्रोग्राम करण्यासाठी आणि डिजिटल टूल्स कनेक्ट करण्यासाठी तुम्ही ॲप्स वापरू शकता (जसे की IFTTT). उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल इनबॉक्समध्ये बुकिंग कन्फर्मेशन मिळते, तेव्हा ते तुम्हाला, तुमच्या भागीदाराला किंवा साफसफाई करणाऱ्या व्यक्तीला एक स्वयंचलित कॅलेंडर रिमाइंडर पाठवू शकते.
- स्मार्ट लॉक्स हा एक गेम चेंजर आहे. गेस्ट्सना एक युनिक कोड पाठवला जाऊ शकतो जो केवळ त्यांच्या ट्रिपच्या कालावधीदरम्यानच टिकतो. यामुळे गेस्ट्सना स्वतःहून चेक इन करता येते, याचा अर्थ असा की आम्हाला त्यांना अपार्टमेंटमध्ये प्रवेश देण्यासाठी वेळेचे कोओर्डिनेशन करण्याची आवश्यकता नाही. आम्ही फक्त त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधला तरी चालते.
- जुन्या पद्धतीची यादीः मी प्रत्येक घरासाठी एक तिमाही चेकलिस्ट बनवली आहे ज्यात सुरक्षा आणि देखभालीसाठी कराव्या लागणार्या गोष्टी आहेत, जसे की फर्नेसचे फिल्टर्स तपासणे, फायर अलार्ममधील बॅटरी कार्यरत आहेत याची खात्री करुन घेणे, बेडच्या खाली सफाई करणे. मी यादी प्रिंट करते आणि ती एका साइड क्लोझेटमध्ये लटकवते—जेणेकरून जेव्हा मी एखाद्या प्रॉपर्टीला भेट देत असेन, तेव्हा मी वर्षासाठी तिची स्थिती जाणून घेऊ शकते.
निक: "Airbnb व्यवसाय उभा करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. परंतु आम्ही लोकांना हे दाखवण्याची आशा करतो की घराचे मालक असणे आणि पूर्ण वेळ Airbnb करणे शक्य आहे—आणि ते करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत."
सारा: "तुम्हाला माहित आहे का की मी करिअर बदलले आणि मला भीती वाटत होती की मला परफॉर्म करायला जितके आवडायचे तितके आवडणारे मला कधी काही सापडणारच नाही. पण Airbnb ने आमचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. आम्ही आमचे स्वतःचे सर्जनशील निर्णय घेऊ शकतो, आमचे स्वतःचे बॉस बनू शकतो—आणि यामुळे हे अधिक खास आहे."
निक: "यामुळे आम्हाला फ्लेक्सिबल राहता येते आणि आयुष्याचा थोडासा जास्त आनंद घेता येतो. आम्ही आशा करतो की तुम्ही एक Airbnb व्यवसाय सुरू करण्याचा आणि तो तुमच्यासाठी उभा करण्याचा मार्ग शोधू शकाल. तुम्हाला आणखी काही सल्ला हवा असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता."
तुम्हाला होस्टिंगसाठी शुभेच्छा!
निक + सारा, नेस्टर्स
हायलाइट्स
सुरुवात करण्यासाठी मिशन स्टेटमेंट तयार करा
स्थानिक लिस्टिंग्जपासून प्रेरणा घ्या
तुमच्या होस्टिंग लक्ष्यांसह ट्रॅकवर राहण्यासाठी बजेट बनवा
तुमच्या पहिल्या गेस्टच्या आगमनापूर्वी फीडबॅक घेण्यासाठी एखाद्या मित्राला वास्तव्य करण्यास सांगा
होस्टिंगमध्ये मदत होण्यासाठी ॲप्स आणि स्मार्ट लॉक्स यांसारखे तंत्रज्ञान एक्सप्लोर करा