आपलेपणाच्या आदरातिथ्याचा सराव करणे आणि पक्षपातीपणाचा सामना करणे
Airbnb चा असा विश्वास आहे की प्रवासाने लोक एकमेकांशी जोडले जाण्यात आणि अधिक खुले आणि सर्वसमावेशक जग तयार करण्यात मदत होऊ शकते. ते साध्य करण्यात भेदभाव हा खरा अडथळा आहे, म्हणूनच तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे इतके महत्त्वाचे आहे.
होस्ट्स आणि गेस्ट्सना भेदभाव आणि त्याला कारणीभूत असलेले पूर्वग्रह समजून घेण्यात मदत करण्यासाठी, Airbnb ने हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रमुख सामाजिक मानसशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट डब्ल्यू. लिव्हिंगस्टन आणि लॉरेन्स युनिव्हर्सिटीचे डॉ. पीटर ग्लिक यांच्याबरोबर काम केले. या लेखातील मार्गदर्शक तत्त्वे आणि सर्वोत्तम पद्धती त्यांच्या संशोधन आणि ज्ञानामुळे प्रेरित झाल्या आहेत.
पक्षपात विरुद्ध भेदभावः फरक काय आहे?
“पूर्वग्रह” म्हणजे वंश, धर्म, मूळ देश, वांशिकता, दिव्यांगता, लिंग, लिंग ओळख, लैंगिक अभिमुखता किंवा वय यासारख्या वैशिष्ट्यांवर आधारित एखाद्या व्यक्तीबद्दलच्या भावना किंवा गृहितके. “भेदभाव” म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे वागता. पूर्वग्रहातून नेहमीच भेदभाव घडतो असे नाही पण साधारणपणे तिथूनच भेदभावाला सुरुवात होत असते.
अप्रत्यक्ष पक्षपात म्हणजे काय?
पूर्वग्रह जास्त करून मनात सुप्तपणे असतो आणि अनेकदा त्याला “निहित पूर्वग्रह” असे म्हटले जाते. आपण लोकांशी कसे वागतो यावर निहित पूर्वग्रह प्रभाव टाकू शकतो, ज्यामुळे आपण भेदभाव करतो—कधी कधी तर अजाणतेपणाने करतो.
लिंग-आधारित आणि LGBTQ पक्षपात
लैंगिक भूमिका समाजात खोलवर रुजलेल्या आहेत आणि—आपल्याला त्याची जाणीव असो—आपल्यापैकी बहुतेक जण 'लोकांनी कसे वागावे असे आपल्याला वाटते' हे निर्धारित करण्यासाठी त्यांचा वापर करतात. LGBTQ (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वेस्चनिंग, क्विअर) लोकांची ओळख सामाजिक निकषांना आव्हान देणारी असल्यामुळे लैंगिक स्टिरिओटाईप्सचे त्यांच्यावर होणारे अप्रत्यक्ष परिणाम खूप गंभीर असतात.
लिंग आणि LGBTQ विष्यक समस्यांवर तुमची मते काहीही असोत, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की इतरांचे आदरातिथ्य प्रेमाने करण्यासाठी त्यांची मते किंवा जीवनशैली आत्मसात करण्याची आवश्यकता नसते.
साचेबंद कल्पनांची भूमिका
पूर्वग्रह ज्या गोष्टींमधून दिसून येतो त्यापैकी एक म्हणजे स्टिरिओटायपिंग अर्थात साचेबंद प्रतिमांमधून. स्टिरिओटाईप म्हणजे बहुतांशी मान्य केली गेलेली पण अतीढोबळ किंवा अतिशयोक्तीपूर्ण प्रतिमा अथवा विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीची कल्पना असते. प्रत्येकजण काही प्रमाणात स्टिरिओटाईप्स वापरतो—कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणे. लोकांच्या समूहांना स्टिरिओटाईप केल्यामुळे अनेकदा भेदभावपूर्ण वर्तन होऊ शकते, अगदी अहेतूक अपमानापासून ते पराकोटीच्या अन्यायाच्या घटनांपर्यंत.
तुम्हाला कारवाई कशी करता येईल
भेदभाव हा Airbnb च्या आधारभूत मूल्यांच्या विरोधात आहे आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित आहे. तो अप्रत्यक्ष पक्षपातातून येत असला तरी नियंत्रित केला जाऊ शकतो आणि टाळला जाऊ शकतो.
पूर्वग्रहांचा सामना करण्यासाठी आणि एक अधिक सर्वसमावेशक कम्युनिटी निर्माण करण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक होस्ट काही पावले उचलू शकतो:
- स्पष्टपणे बोला. तुमचे दार सर्वांसाठी खुले आहे असे सांगणारा एक मेसेज तुमच्या प्रोफाईलमध्ये जोडा. यातून गेस्ट्सना त्यांचे स्वागत आहे असा संकेत तर दिला जातोच शिवाय इतर होस्ट्सना देखील विविधता आणि समावेशकतेची मूल्ये स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते.
- प्रत्येकासाठी समान मापदंड वापरा. प्रत्येक वेळी, प्रत्येक संभाव्य गेस्टचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही वापरत असलेल्या वस्तुनिष्ठ निकषांचा एक संच तयार करा. उदाहरणार्थ, तारखा तुमच्या सोयीच्या आहेत का? तुम्ही वास्तव्याच्या जागी येणाऱ्या सर्व गेस्ट्सची राहण्याची सोय करू शकाल का? तुमचे निकष परिस्थितीनुसार बदलत असल्यास तुमच्या निर्णय प्रक्रियेत पक्षपात नकळत येऊ शकतो.
- सजगतेने निर्णय घ्या. गेस्ट स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी, तुम्ही हा निर्णय का घेतला आहे ते ठरवा आणि तुम्ही निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे कठोर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतःला आव्हान द्या. स्वतःला विचारा की गेस्ट्सना का नाकारले गेले याचे कारण त्यांना समोरासमोर सांगताना तुम्हाला बरं वाटेल का?
- स्टिरिओटाईप्स पुसून टाका. मनातील छुपे पूर्वग्रह दूर करण्याच्या काही सिद्ध झालेल्या उपायांपैकी एक म्हणजे स्टिरिओटाईप्सच्या विरोधात जाणारे अनुभव घेणे आणि माहिती मिळवणे. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि विविध पार्श्वभूमी किंवा समुदायांमधील लोकांना भेटा. वेगवेगळ्या क्षेत्रातील Airbnb गेस्ट्सना स्वीकारा. सकारात्मक संपर्क आणि सामाजिक भेटीगाठींमधून पूर्वग्रह कमी होऊ शकतात.
प्रत्येक गेस्टला आपले स्वागत होते आहे असे वाटण्यात मदत करण्यासाठी टिप्स मिळवा
या लेखात दिलेली माहिती पब्लिकेशन झाल्यानंतर कदाचित बदललेली असू शकते.