रिव्ह्यूज महत्त्वाचे का असतात
रिव्ह्यूज आणि रेटिंग्जमुळे गेस्ट्सना तुमची जागा त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यात मदत होते. चांगले रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज मिळाल्यास अधिक बुकिंग्ज मिळू शकतात आणि जास्त कमाई होऊ शकते.
रिव्ह्यूज कसे काम करतात
तुमच्याकडे आणि वास्तव्य बुक करणाऱ्या गेस्टकडे एकमेकांवरील रिव्ह्यू देण्यासाठी चेक आऊटनंतर 14 दिवसांचा वेळ असतो. तुम्ही दोघांनी रिव्ह्यूज सबमिट केल्यानंतर किंवा 14 दिवसांचा रिव्ह्यू कालावधी संपल्यानंतर, जे आधी होईल तेव्हा रिव्ह्यूज पोस्ट केले जातात.
गेस्ट्स त्यांचा फीडबॅक इथे शेअर करू शकतात:
- सार्वजनिक रिव्ह्यू. त्यांचे रिव्ह्यूज तुमच्या लिस्टिंगवर आणि प्रोफाईलवर दिसून येतात. तुम्ही सार्वजनिक रिव्ह्यूला उत्तर दिल्यास, तुमचा प्रतिसाद त्याच्या खाली दिसेल.
- होस्टसाठी टीप. त्यांची टीप तुमच्या लिस्टिंगवर दिसत नाही.
सर्वात संबंधित असलेले रिव्ह्यूज डिफॉल्टनुसार प्रथम दिसतात. गेस्ट्स रिव्ह्यूज शोधूसुद्धा शकतात आणि सर्वात अलीकडील, सर्वाधिक रेटिंग असलेले किंवा सर्वात कमी रेटिंग असलेले यानुसार क्रमवारी लावू शकतात.
गेस्टच्या फीडबॅककडे तुम्ही जे ऑफर करता त्यात सुधारणा करण्याची संधी म्हणून पहा. प्रत्येक रिव्ह्यू वाचा आणि तुम्ही तो फीडबॅक गांभीर्याने घेता हे दाखवण्यासाठी रचनात्मक प्रतिसाद द्या.
स्टार रेटिंग्ज कसे काम करतात
गेस्ट्सना 1-5 स्टार वापरून त्यांचा एकंदरीत अनुभव आणि 6 कॅटेगरीजना रेटिंग देण्यास सांगितले जाते. एकंदरीत अनुभव हा इतर कॅटेगरीजची सरासरी नाही.
कॅटेगरीज खालीलप्रमाणे आहेत:
- चेक इन. जागा शोधून आत जाणे किती सोपे होते?
- स्वच्छता. गेस्ट्स येण्यापूर्वी घर किती चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेले होते?
- अचूकता. लिस्टिंगच्या आधारे गेस्ट्सच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का?
- कम्युनिकेशन. बुकिंगपासून ते चेक आऊटपर्यंत, होस्ट्सनी किती चांगल्या प्रकारे संवाद साधला?
- लोकेशन. गेस्टना तो एरिया आणि आसपासचा परिसर कसा वाटला?
- मूल्य. भाड्याच्या तुलनेत जागेचे मूल्य कसे होते?
प्रत्येक गेस्टचे एकंदरीत स्टार रेटिंग त्यांच्या रिव्ह्यूच्या बाजूला दिसते. तुमच्या लिस्टिंगला 3 गेस्ट्सनी रेटिंग दिल्यानंतर, तुमचे एकंदरीत सरासरी स्टार रेटिंग सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंगमध्ये दिसून येते.
रेटिंग्जमुळे Airbnb ला सुपरहोस्ट प्रोग्रॅम आणि गेस्ट फेव्हरेट्ससह टॉप होस्ट्स आणि लिस्टिंग्ज ओळखण्यात आणि त्यांना सन्मानित करण्यात मदत होते.
सुपरहोस्ट्सना उत्कृष्ट आदरातिथ्याच्या त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डसाठी सन्मानित केले जाते. सुपरहोस्ट्सनी किमान 4.8 स्टार्सचे सरासरी रेटिंग कायम राखले पाहिजे आणि इतर निकषांची पूर्तता केली पाहिजे.
गेस्ट फेव्हरेट्स म्हणजे गेस्ट्सच्या मते Airbnb वरील सर्वात पसंतीच्या घरांचे कलेक्शन असते. गेस्ट फेव्हरेट्स ओळखण्यात विविध घटकांची मदत होत असते, ज्यामध्ये सरासरी 4.9 स्टार्सपेक्षा जास्त उत्कृष्ट रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज तसेच सर्व 6 कॅटेगरीजसाठी उच्च गुणांचा समावेश आहे.गेस्ट्सबद्दल रिव्ह्यू लिहिणे
गेस्ट्सनी तुम्हाला रिव्ह्यू द्यावा ह्याची त्यांना आठवण करून देण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना रिव्ह्यू देणे. ज्या गेस्ट्सनी बुक केले होते आणि ज्या गेस्ट्सनी त्या रिझर्व्हेशनची आमंत्रणे स्वीकारली होती, त्यांच्या प्रोफाईल पेजेसवर तुमचे रिव्ह्यूज दिसून येतात. खालील गोष्टी करण्याचा प्रयत्न करा:
- कृतज्ञता दाखवा. हे असे एखादे साधे वाक्य असू शकते: “आमचे गेस्ट झाल्याबद्दल धन्यवाद!”
- तपशील पुरवा. तुम्ही असे लिहू शकता: “या गेस्टने आमच्या चेक आऊट सूचनांचे उत्तम प्रकारे पालन केले.”
- आदराने वागा. संवेदनशील मुद्द्यांबाबत थेट मेसेज पाठवण्याबाबत विचार करा.
तुम्हाला गेस्ट्सना स्वच्छता, कम्युनिकेशन आणि तुमच्या घराच्या नियमांचे पालन करण्याबाबत रेटिंग देण्यास सांगितले जाईल. तुमच्या फीडबॅकमुळे गेस्ट्ससाठी असलेले मूलभूत नियम पाळले जातात याची खात्री करण्यात मदत होते, ज्यानुसार गेस्ट्सनी तुमच्या घराची स्वतःच्या घरासारखी काळजी घेणे आणि तुमच्या घराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.