ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या गेस्ट्सना होस्ट करण्यासाठी टिप्स

गेस्ट्सना आत्मविश्वासाने बुक करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या घराची विशिष्ट वैशिष्ट्ये जोडा.
Airbnb यांच्याद्वारे 7 एप्रि, 2021 रोजी
5 मिनिटांचा व्हिडिओ
2 डिसें, 2024 रोजी अपडेट केले

ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या गेस्ट्सना एखादी जागा त्यांच्यासाठी किती योग्य आहे हे बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्यायचे असते. पायऱ्यांशिवाय ॲक्सेस आणि दिव्यांगांसाठी पार्किंग स्पॉट यासारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी ते Airbnb सर्च रिझल्ट्स फिल्टर करू शकतात.

व्हीलचेअर युजर्ससाठी योग्य असल्याचे कन्फर्म केलेली घरेदेखील सुलभ कॅटेगरीमध्ये हायलाईट केली जातात. पात्र होण्यासाठी, तुमच्या जागेमध्ये एका प्रवेशद्वारासाठी, किमान एका बेडरूमसाठी आणि ग्रॅब बार्स किंवा शॉवर सीट यासारख्या बदलांसह एका बाथरूमसाठी पायऱ्यांशिवाय ॲक्सेस असणे आवश्यक आहे.

तुमच्या घराबद्दलची स्पष्ट आणि अचूक माहिती देणे महत्त्वाचे आहे. ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेले गेस्ट्स आत्मविश्वासाने बुक करू शकतील अशी आकर्षक जागा तयार करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत.

तुमच्या लिस्टिंगमध्ये अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडा

तुमची जागा नजरेत भरण्यास मदत करू शकणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • दिव्यांगांसाठी पार्किंग स्पॉट
  • गेस्टच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी प्रकाशित मार्ग
  • गेस्टच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांशिवाय ॲक्सेस
  • रूम्ससाठी पायऱ्यांशिवाय ॲक्सेस
  • 32 इंचांपेक्षा (81 सेंटीमीटर्स) जास्त रुंद प्रवेशद्वारे
  • पायऱ्यांशिवाय शॉवर
  • टॉयलेट आणि/किंवा शॉवर ग्रॅब बार्स
  • शॉवर किंवा बाथ चेअर
  • सीलिंग किंवा मोबाईल हॉईस्ट
  • स्विमिंग पूल किंवा हॉट टब हॉईस्ट

तुमच्या लिस्टिंगवर पब्लिश करण्यापूर्वी, सर्व ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचा Airbnb च्या ॲक्सेसिबिलिटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आढावा घेतला जातो. एखादे वैशिष्ट्य मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत नसल्यास किंवा फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत नसल्यास, आम्ही तुम्हाला वेगळा फोटो अपलोड करण्यास किंवा तुमच्या लिस्टिंगमधून हे वैशिष्ट्य काढून टाकण्यास सांगू शकतो.

प्रत्येक रूमचे अनेक फोटोज शेअर केल्याने गेस्ट्सना तुमचे घर त्यांच्या गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवण्यात मदत होते.

  • प्रत्येक इमेजसाठी एक वर्णनात्मक कॅप्शन लिहा. उदाहरणार्थ, बाथरूमच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये पुढील तपशील जोडले जाऊ शकतात: “पायऱ्यांशिवाय ॲक्सेस असलेले हे घरातील एकमेव बाथरूम आहे. टॉयलेट आणि शॉवरमध्ये ग्रॅब बार्स लावलेले आहेत.”

  • वेगवेगळ्या अँगल्समधून फोटोज काढा. उदाहरणार्थ, बाथरूमचे फोटोज प्रत्येक ग्रॅब बारचे लोकेशन आणि टॉयलेट आणि शॉवरपर्यंत जाण्यासाठीचा जमिनीवरचा रुंद, सपाट मार्ग दाखवू शकतात.

अ‍ॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांची फोटोग्राफी करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

गेस्ट्सना आपलेपणा वाटण्यासाठी मदत करा

जेव्हा गेस्ट्स तुमच्या घराच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला मेसेज करतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधा. फक्त काही प्रश्न विचारणे—आणि काही प्रश्नांची उत्तरे देणे—यामुळे मोठा फरक पडू शकतो.

संभाषण सुरू करण्याच्या उपयुक्त मार्गांची उदाहरणे:

  • तुम्हाला घराविषयी कोणते विशिष्ट प्रश्न आहेत?
  • तुमचे वास्तव्य अधिक आरामदायक करण्यासाठी मी काय करू शकतो?

तुमच्या जागेमध्ये हालचाल करणे सोपे करण्यासारख्या वाजवी विनंत्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. छोटे-छोटे बदल गेस्ट्सना आपलेपणा वाटण्यासाठी मदत करू शकतात का याचा विचार करा. काही कल्पना:

  • रूम्स आणि इतर जागांमधून विस्तृत मार्ग तयार करण्यासाठी फर्निचर हलवा.
  • टॉवेल्स आणि डिशेससारखे घरगुती आयटम्स सहज पोहोचू शकणाऱ्या ठिकाणी ठेवा.
  • पॉवर आऊटलेट्समधील अडथळे दूर करा.

लक्षात ठेवा की सर्व जागा सर्व गेस्ट्ससाठी योग्य असणार नाहीत, मग त्यांना ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असोत किंवा नसोत. तथापि, आमच्या भेदभाव-विरोधी धोरणामध्येनमूद केल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीला दिव्यांगता असल्यामुळे तुम्ही रिझर्व्हेशन नाकारू शकत नाही. पाळीव प्राणी न मानल्या जाणाऱ्या मदतनीस प्राण्यांसाठी तुम्ही पाळीव प्राणी शुल्कदेखील आकारू शकत नाही.

सर्वसमावेशक गाईडबुक तयार करा

स्थानिक सल्ले शेअर करून तुमचे आदरातिथ्य आणि तुमचे शहर दाखवण्याची संधी म्हणजे तुमचे गाईडबुक. तुम्ही जेवण, साईटसीईंग आणि बाहेरच्या ॲक्टिव्हिटीजसाठी शिफारसी जोडू शकता.

तुमचे गाईडबुक तयार करताना, ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या प्रवाशांना काय हवे असेल याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही रॅम्प असलेली रेस्टॉरंट्स, पक्क्या मार्गांचे वॉकिंग ट्रेल्स आणि ॲक्सेसिबल सीट्स असलेली आकर्षणे ओळखू शकता. तुम्ही सार्वजनिक वाहतुकीबद्दलची माहितीदेखील शेअर करू शकता.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदलली असू शकते.

Airbnb
7 एप्रि, 2021
हे उपयुक्त ठरले का?