तुमच्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी अपेक्षेच्या पलीकडे जाणे

वैयक्तिक नोट्सपासून ताज्या फुलांपर्यंत, गेस्ट्सचे स्वागत करण्याचे काही सर्जनशील मार्ग पहा.
Airbnb यांच्याद्वारे 10 फेब्रु, 2020 रोजी
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • गेस्ट्सबद्दल सद्भाव व्यक्त करणारी एखादी छोटीशी कृती गेस्ट्सना आपण खास आहोत हे वाटण्यात महत्त्वाची ठरू शकते

  • पर्सनल टच म्हणून स्वतः लिहिलेली नोट ठेवून पहा

  • तुम्ही फुले, पेये, स्नॅक्स आणि इतर खाऊ ठेऊन आणखी बरेच काही करू शकता

  • स्थानिक उत्पादने तुमच्या कम्युनिटीला सपोर्ट करू शकतात—आणि गेस्ट्सना आपलेपणाची भावना वाटू देऊ शकतात

गेस्ट्ससाठी हस्तलिखित नोट किंवा ताज्या फुलांचा पुष्पगुच्छ असला की त्यांना खूप स्वागत केल्यासारखे वाटते. आणि जेव्हा गेस्ट्सचे वास्तव्य संस्मरणीय असते, तेव्हा ते खूप चांगले रिव्ह्यूज देण्याची, तुमच्या जागेबद्दल त्यांच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटूंबाला सांगण्याची आणि पुन्हा भेट देण्याची अधिक शक्यता असते.

तुमच्या गेस्ट्सचे स्वागत प्रेमाने केले तर त्यांना विशेष वाटू शकते आणि त्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. विचारपूर्वक लिहिलेल्या नोट्सपासून ते ताज्या बेक केलेल्या पदार्थांपर्यंत, जगभरातील काही होस्ट्सनी त्यांच्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी कसे अधिक प्रयत्न केले आहेत ते येथे आहेः

1. एक मैत्रीपूर्ण वेलकम नोट लिहा

जेव्हा गेस्ट्स प्रवास करत असतात, तेव्हा वैयक्तिकृत स्वागतामुळे त्यांना घरच्या वातावरणात असल्यासारखे वाटू शकते अन्यथा त्यांना घरापासून दूर असल्यामुळे उदास वाटू शकते. “माझ्याकडे प्रत्येक रूममध्ये गेस्ट्सचे स्वागत करणारे एक छोटेसे फळा आहे आणि मी प्रत्येक वेळी त्यांची नावे लिहिते,” लंडनच्या होस्ट हुमा म्हणतात. “ही एक छोटीशी गोष्ट आहे, परंतु त्यांना हे खरोखर आवडते.

तुम्ही त्याच भावना हस्तलिखित नोटमध्ये व्यक्त करू शकता. “मी अलीकडेच स्वागतासाठी कार्डसह थोडासा खाऊ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,” स्वीडनमधील एड्सबर्गचे होस्ट ट्रूड म्हणतात. तुमच्या नोटमध्ये, तुम्ही कॉफी घेण्यासाठी तुमच्या आवडत्या जागेबद्दल किंवा तुमच्या प्रदेशाबद्दल एखादे मजेदार तथ्य सांगू शकता.

2. तुमच्या गेस्ट्सना तुमच्या शहराचा परिचय करून द्या

तुमच्या गेस्ट्सना सेटल होण्यास मदत करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांना तुमच्या आसपासच्या परिसरातील सर्वोत्तम ठिकाणांची ओळख करून देणे. टेक्सासच्या सॅन अँटोनियोचे होस्ट डेव्हिड म्हणतात, “आमच्याकडे एक स्थानिक बेकरी आहे जी सीनॅमन क्रीम केक बनवते. तो केक मला आवडतो आणि मी पहिल्या गेस्टसाठी तो आणला होता.” ते आता त्यांच्या सर्व गेस्ट्सना त्याच्या आवडत्या केकची मेजवानी देतात.

3. तुमच्या बेकींग कौशल्यांचा वापर करा

जर तुम्ही स्वतः चांगले बेकिंग करता, तर तुमच्या गेस्ट्ससाठी तुमचे खास पदार्थ तयार करा आणि तुमच्या आदरातिथ्याला अधिक आकर्षक करा. रोराइमा, ब्राझील येथील बेथ सांगतात, "मी काही घरी तयार केलेल्या बिस्किटांपासून सुरुवात केली." "काही गेस्ट माझ्याकडे पुन्हा-पुन्हा येतात आणि या बिस्किटांबद्दल मला अनेक कॉमेंट मिळाली आहेत."

4. तुमच्या गेस्ट्सना सहभागी करून घ्या

टेक्सासच्या सॅन अँटोनियोचा होस्ट डेव्हिड, मिठाई ऑफरकरण्याव्यतिरिक्त, त्यांच्या गेस्ट्ससाठी वाईन ठेवतो. "एक हॅशटॅग आहे: #takeabottleaveabottle," डेव्हिड म्हणतात. गेस्ट्सनी एका वाईन बाटलीचा आनंद घेतला आहे तर त्याऐवजी दुसरी एक बाटली ठेऊन जाण्यास ते गेस्ट्सना प्रोत्साहित करतात. अनेक वर्षांच्या कालावधीत, संग्रह वाढला: “आमच्याकडे पाच वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन बाटल्यांनी सजवलेली भिंत आहे,” ते म्हणतात. या एक-घ्या, एक-द्या कल्पनेमुळे हा एक परवडणारा पर्याय बनतो. तुम्ही हे पुस्तकांसह देखील करून पाहू शकता!

5. स्नॅक बास्केट तयार करा

अटलांटामधील होस्ट जेरी सांगतात, "आम्हाला माहीत आहे की लोक येथे मजा करण्यासाठी येतात." "अनेकदा घरी परतल्यावर त्यांना थोडी-फार भूक लागलेली असते." त्यामुळे आता जेरी त्यांच्या किचनमध्ये मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, बिस्किटे, बटाट्याचे चिप्स आणि प्रेटझेल्स यांसारख्या वस्तू एका बास्केटमध्ये ठेवतात.

6. तुमची ट्रीट कस्टमाईझ करा

तुमच्या गेस्ट्सना जाणून घ्या आणि त्यांच्या गरजांबद्दल जागरूक रहा. “आम्ही चेक इनच्या वेळेस एक ट्रीट ठेवत असतो,” फ्रेडरिक, मेरीलँड येथील होस्ट लॉरा सांगते. “कधीकधी ते स्थानिक चीज, चॉकलेट किंवा बेक्ड पदार्थ असतात. “तर कधीकधी स्थानिक बिअर किंवा वाईनची बाटली ठेवतो.” ती तिच्या गेस्ट्सना आधी मेसेज पाठवून आहाराचे काही निर्बंध असल्यास त्याबद्दल विचारत असते: “प्रत्येकजण ड्रिंक्स घेत नाही किंवा चीज खाऊ शकत नाही, म्हणून मी आधीच विचारून घेते.”

तुमच्या गेस्ट्सना मुले असल्यास स्टिकर्सचे पॅकेट किंवा ज्यूसचे काही बॉक्स हे जास्त योग्य सरप्राईझ असू शकते. “मुले असल्यास, मी लॉलिपॉप किंवा कँडीजची एक लहान बॅग आणि कलरिंग बुकसह क्रेयॉन्सचा एक लहान बॉक्स ठेवत असते,” न्यूयॉर्क शहरातील होस्ट अ‍ॅन सांगते. आणि तुमचे गेस्ट्स पाळीव प्राण्यांबरोबर प्रवास करत असल्यास त्यांच्या केसाळ मित्रांना देता येतील अशी डॉग ट्रीट्स जवळ ठेवण्याबद्दल जरूर विचार करा.

7. तुमच्या स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन करा

तुमचा प्रदेश ज्यासाठी ओळखला जातो असे काही स्वस्त असल्यास— जसे की हवाईमध्ये लेईस—चेक इन करताना तुमच्या गेस्ट्सना प्रफुल्लीत करण्यासाठी अशा काहीतरी लहान भेटवस्तू ठेवण्याचा विचार करा. “आम्ही येथे देत असलेल्या सर्वात मोठ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मार्डी ग्रास मणी,” न्यू ऑर्लीयन्सचे होस्ट जॉर्डन म्हणतात. गेस्ट्सना ही स्मृतिचिन्हे आवडतात, ती चेक आऊटनंतर बराच काळ त्यांना त्यांच्या वास्तव्याची आठवण ठेवण्यास मदत करू शकतात.

8. निसर्गाची थोडी मदत घ्या

ताज्या फुलांपासून घरीच वाढवलेल्या भाज्यांपर्यंत, गेस्ट्सना निसर्गाच्या कुशीत राहणे आवडते. मेक्सिकोतील सयुलिता येथील होस्ट सारा सांगते, “माझ्या बागेतून गेस्ट रूमसाठी मी एक गोड पुष्पगुच्छ निवडते.” बागेतून ताजी फळे किंवा भाज्या देखील चालू शकतात. तुमच्याकडे बाग नाही? किराणा दुकानातील किंवा स्थानिक बाजारातील स्वस्त फुले तुमच्या गेस्ट्सचे स्वागत करण्याचा एक रंगीबेरंगी मार्ग असू शकतो.

9. मोठ्या प्रमाणात खरेदी करून पैशांची बचत करा

वारंवार लागणारे सामान अधिक प्रमाणात खरेदी केल्याने तुमच्या वेळेची आणि पैशांची बचत तर होतेच, तुम्ही यातसुद्धा खास तुमचा असा टच आणू शकता. पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिकेतील होस्ट कॅरन बिस्किटे घाऊक खरेदी करतात, "याने यावर आमचा खर्च खूप कमी होतो," त्या सांगतात. त्यांना पर्सनलाइझ करण्याचा त्यांनी एक सोपा मार्ग शोधून काढला आहे: "आम्ही एक सीलर विकत घेतला आणि आम्ही त्या बिस्किटांना पॅकेज करतो आणि आमचे सील त्यावर लावतो."

10. विशेष प्रसंग साजरे करा

गेस्ट्स वाढदिवस, ॲनिवर्सरी किंवा सुट्टीच्या वेळी भेट देत असोत, तुम्ही त्यांचे वास्तव्य आणखी संस्मरणीय करण्यात मदत करू शकता. अटलांटा येथील होस्ट डेमन म्हणतात, “आमच्याकडे एक जोडपे नवीन वर्षासाठी आले होते, म्हणून आम्ही त्यांना शॅम्पेनची बाटली दिली.” कॅनडातील ऑन्टारियोची होस्ट जेनिफरदेखील असे प्रसंग लक्षात ठेवतात. “जर एखादा गेस्ट एखाद्या विशिष्ट उत्सवासाठी येथे असेल—वाढदिवस, हनिमून—मी त्या उत्सवाशी साजेशी अशी छोटीशी भेटवस्तू ठेवते,” त्या म्हणतात.

तुमच्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी अपेक्षेच्या पलीकडे जाणे नेहमीच कौतुकास्पद असते परंतु लक्षात ठेवा: आदरातिथ्य करण्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही. एका हस्तलिखित नोटमधून दिसून येते की तुम्ही तुमच्या गेस्ट्सविषयी विचार करत आहात, त्यामुळे गेस्ट्सना त्यांच्या घरापासून दूर असतानाही विशेष वाटू शकते.

हायलाइट्स

  • गेस्ट्सबद्दल सद्भाव व्यक्त करणारी एखादी छोटीशी कृती गेस्ट्सना आपण खास आहोत हे वाटण्यात महत्त्वाची ठरू शकते

  • पर्सनल टच म्हणून स्वतः लिहिलेली नोट ठेवून पहा

  • तुम्ही फुले, पेये, स्नॅक्स आणि इतर खाऊ ठेऊन आणखी बरेच काही करू शकता

  • स्थानिक उत्पादने तुमच्या कम्युनिटीला सपोर्ट करू शकतात—आणि गेस्ट्सना आपलेपणाची भावना वाटू देऊ शकतात

Airbnb
10 फेब्रु, 2020
हे उपयुक्त ठरले का?