सुरळीत आगमनांसाठी स्वतःहून चेक इन कसे करावे
स्वतःहून चेक इन ही Airbnb वरील टॉप 10 सुविधांपैकी एक आहे. गेस्ट्स अनेकदा ही सुविधा ऑफर करणाऱ्या जागांसाठी त्यांचे सर्च रिझल्ट्स फिल्टर करतात.* स्मार्ट लॉकसारखी चेक इन पद्धत जोडल्यास तुमची लिस्टिंग नजरेत भरण्यास मदत होऊ शकते.
गेस्ट्सना स्वतःहून आत येण्याचा एक सोपा मार्ग ऑफर केल्याने तुमचा वेळ आणि गेस्ट्सना होणारा त्रास वाचू शकतो तसेच तुम्हाला चांगले रिव्ह्यूज मिळू शकतात.
चेक इनची पद्धत निवडा
स्वत:हून चेक इन करण्याच्या सर्वात लोकप्रिय पद्धती आहेत: स्मार्ट लॉक, कीपॅड आणि लॉकबॉक्स. तुम्ही कोणतीही पद्धत निवडली तरी प्रत्येक बुकिंगच्या गेस्टना एक युनिक ॲक्सेस कोड देणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही तुमच्या जागेत स्मार्ट लॉक, कीपॅड किंवा लॉकबॉक्स इन्स्टॉल केल्यानंतर, तुमची लिस्टिंग अपडेट करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आगमन गाईड मध्ये तुमची चेक इन पद्धत जोडू शकता किंवा त्यात बदल करू शकता.
चेक इनच्या सूचना जोडा
आत कसे जायचे यासाठी सल्ले शेअर करा. गेस्ट्सना ऑटोमॅटिक पद्धतीने तुमच्या सूचना चेक इनच्या 24 ते 48 तासांपूर्वी मिळतात.
तुमचे स्मार्ट लॉक, कीपॅड किंवा लॉकबॉक्स कुठे मिळेल आणि ते कसे उघडायचे आणि बंद करायचे ते समजावून सांगा. स्पष्टपणे समजावे यासाठी तुम्ही फोटोज जोडू शकता.
झटपट उत्तरे सेट अप करा
सामान्य चेक इन प्रश्नांची उत्तरे देण्याचा वेळ वाचवण्यासाठी या लहान मेसेज टेम्पलेट्सचा वापर करा. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा गेस्ट ड्रायव्हिंग दिशानिर्देश किंवा पार्किंगचा सल्ला विचारतो तेव्हा तुम्ही पाठवण्यासाठी एखादी तयार करू शकता.
तुम्ही गेस्ट्सना मेसेज करत असताना कधीही तुमची झटपट उत्तरे सहजपणे बदलू करू शकता आणि पाठवू शकता.
*1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जगभरातील गेस्ट्सनी सर्वाधिक सर्च केलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.