एकाच वेळी अनेक लिस्टिंग्ज कशा अपडेट कराव्यात

तुम्ही फक्त एका पायरीने शुल्क आणि चार्जेस, सुविधा आणि बरेच काही अपडेट करू शकता.
Airbnb यांच्याद्वारे 13 डिसें, 2018 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • ज्या गोष्टी त्याच पेजवरून बदल करणे सर्वात उपयोगी ठरेल अशा गोष्टी ओळखण्यात आमच्या होस्ट कम्युनिटीने आमची मदत केली

  • यामध्ये उपलब्धता, सुविधा, लोकेशन, कॅन्सलेशन धोरणे आणि बरेच काही समाविष्ट आहे

  • एकाच कृतीने अनेक लिस्टिंग्ज अपडेट करून, तुम्ही वेळ वाचवू शकता

प्रत्येक टूल आणि वैशिष्ट्यासह, प्रॉपर्टी मॅनेजर्स, बुटीक हॉटेल्सचे मालक आणि बेड आणि ब्रेकफास्ट्स आणि विशेष बिझनेस गरजा असलेल्या इतर होस्ट्ससाठी Airbnb प्लॅटफॉर्म सुधारणे हे आमचे ध्येय आहे. लिस्टिंग्ज अपडेट करण्यासाठीच्या पायऱ्यांचे एकत्रीकरण करून, आम्ही एकाधिक लिस्टिंग्ज मॅनेज करणार्‍या होस्ट्ससाठी अधिक कार्यक्षमता निर्माण करू शकलो आहोत. सुधारित वर्कफ्लोसह, होस्ट्स त्यांच्या सर्व प्रॉपर्टीज एकाच वेळी पाहू शकतात आणि विविध बदल करू शकतात.

एकाच ठिकाणी अनेक लिस्टिंग्ज अपडेट करा

पूर्वी, प्रत्येक वैयक्तिक लिस्टिंगद्वारे अपडेट्स करणे आवश्यक होते. लिस्टिंग्ज पेजवरून, आता तुम्ही शोधत असलेल्या लिस्टिंग्ज सर्च करू शकता, त्यांची क्रमवारी लावू शकता आणि त्या फिल्टर करू शकता, त्यानंतर डावीकडील बॉक्सेसमध्ये चेकमार्क करून तुम्हाला जी लिस्टिंग अपडेट करायची आहे ती निवडा. येथून, स्वच्छता शुल्क* आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स यांसारख्या अतिरिक्त शुल्कांमध्ये आणि फीजमध्ये, तसेच सुविधा आणि चेक इन पद्धती यांसारख्या लिस्टिंगच्या तपशिलांमध्ये बदल करा. सर्वात अलीकडील वैशिष्ट्य म्हणजे होस्ट्सची एकाधिक लिस्टिंग्जमध्ये कॅन्सलेशन धोरणे आणि घराचे नियम अपडेट करण्याची क्षमता.

सुरुवातीला, होस्ट्स एकाच वेळी फक्त प्रॉपर्टीचे प्रकार आणि काही सुविधा अपडेट करू शकत होते. जेव्हा त्यांनी त्वरित वेळेची बचत होण्याचे परिणाम सांगितले, तेव्हा आम्हाला समजले की आता आम्हाला इतर प्रकारचे अपडेट्सदेखील करणे आवश्यक आहे. आमच्या होस्ट कम्युनिटीच्या मदतीने, आम्ही प्राधान्य असलेले आयटम्स शोधून काढले ज्यांना त्याच पेजवरून बदल करणे अत्यंत उपयोगी ठरेल. आता, सुविधा आणि अतिरिक्त शुल्क ते घराचे नियम आणि चेक इन पद्धती या सर्व गोष्टी एकाच दृष्टीक्षेपातून अपडेट केल्या जाऊ शकतात. सॉफ्टवेअरद्वारा जोडलेले होस्ट्स मर्यादित सिंकवर सेट केलेल्या कोणत्याही लिस्टिंगमध्ये अपडेट्स करू शकतात.

तुमच्या लिस्टिंग्ज झटपट अपडेट करा

एका पायरीसह अपडेट कसे करावे ते येथे जाणून घ्या. तुम्ही अपडेट करू शकता अशा फील्ड्समध्ये हे समाविष्ट आहे:

  • भाडे
    • शुल्क आणि चार्जेस
    • वास्तव्याच्या कालावधीनुसार सवलती
  • लिस्टिंगचे तपशील
    • सुविधा
    • Open Homes
    • लोकेशन
    • प्रॉपर्टीचा प्रकार
    • चेक इन पद्धत
  • बुकिंगची सेटिंग्ज
    • कॅन्सलेशन धोरण
    • घराचे नियम
    • ट्रिपचा कालावधी
  • स्वच्छता
    • सुधारित स्वच्छता प्रोटोकॉल
  • उपलब्धता सेटिंग्ज
    • बुकिंग बफर

प्लॅटफॉर्मला अर्थपूर्ण मार्गांनी विकसित करण्यात आणि व्यावसायिक टूल्स आणि वैशिष्ट्यांचा एक मोठा संच विकसित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही आमच्या होस्ट्सशी भागीदारी कशी करतो यात फीडबॅक हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तुम्हाला लिस्टिंग्ज पेजवर इतर कोणते अपडेट्स पहायला आवडतील ते आम्हाला सांगण्यासाठी हे पेज वापरा.

सुरुवात करण्यास तयार आहात?

तुमच्या लिस्टिंग्ज मॅनेज करणे सुरू करण्यासाठी साईन इन करा. किंवा प्रोफेशनल टूल्सबद्दल येथे अधिक जाणून घ्या.

*मेनलँड चीनमध्ये निवासस्थाने ऑफर करणारे होस्ट्स वगळता. अधिक माहिती मिळवा

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

हायलाइट्स

  • ज्या गोष्टी त्याच पेजवरून बदल करणे सर्वात उपयोगी ठरेल अशा गोष्टी ओळखण्यात आमच्या होस्ट कम्युनिटीने आमची मदत केली

  • यामध्ये उपलब्धता, सुविधा, लोकेशन, कॅन्सलेशन धोरणे आणि बरेच काही समाविष्ट आहे

  • एकाच कृतीने अनेक लिस्टिंग्ज अपडेट करून, तुम्ही वेळ वाचवू शकता

Airbnb
13 डिसें, 2018
हे उपयुक्त ठरले का?