Airbnb ची 5-स्टेप स्वच्छता प्रक्रिया व्यवहारात कशी आणायची

5-स्टेप स्वच्छता प्रक्रियेच्या अंमलबजावणीबद्दल मार्गदर्शन मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 4 जून, 2020 रोजी
वाचण्यासाठी 6 मिनिटे लागतील
4 जून, 2020 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • स्वच्छतेच्या प्रक्रियेमध्ये पाच पायऱ्या आहेत: तयारी करा, स्वच्छ करा, सॅनिटाइझ करा, पाहणी करा आणि रीसेट करा

  • आम्हाला कळते की स्वच्छतेसाठी नवीन पद्धत वापरणे कठीण असू शकते, त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्स टॅब मधील स्वच्छता सेक्शनमध्ये तुम्हाला अधिक सल्ले, कस्टमाइझ केलेल्या चेकलिस्ट आणि अशा आणखी उपयोगी वस्तू सापडतील

    • 5 पायऱ्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेतील कामे करण्यासाठी तुम्ही Airbnb च्या तज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या स्वच्छता हँडबुक ची मदत घेऊ शकता

    स्वच्छता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची असल्यामुळे, निवासस्थानांच्या होस्ट्सनी Airbnb च्या 5-पायऱ्यांच्या वर्धित स्वच्छता प्रक्रियेसाठी वचनबद्ध असणे आवश्यक आहे - आणि ही प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही हजर आहोत. हा लेख तुम्हाला त्या 5 पायऱ्या, तसेच अतिरिक्त मार्गदर्शन, सल्ले आणि सर्वोत्तम पद्धती समजावून सांगेल ज्या तुम्हाला स्वच्छतेच्या मानकांचे सतत पालन करण्यास मदत करतील. या सर्वोत्तम पद्धती वर्धित स्वच्छतेच्या हँडबुकवर आधारित आहेत, जी आरोग्य आणि आदरातिथ्य तज्ञांच्या मदतीने तुमचे कुशलक्षेम लक्षात घेऊन विकसित केली गेली होती.

    स्वच्छतेची कामे सुरू करण्यापूर्वी, तुम्ही किंवा तुमच्या व्यावसायिक क्लीनर्सनी जागेत प्रवेश करण्याआधी वाट पाहण्याच्या योग्य कालावधीसंबंधी गाईडलाइन्स जाणून घेण्यासाठी तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन असे सुचवते की गेस्ट निघून गेल्यानंतर जागेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शक्य तितका वेळ (किमान अनेक तास) प्रतीक्षा करावी, कारण यामुळे तुमचा जंतूंशी संपर्क कमी होण्यास मदत मिळते. स्वच्छतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी, तुम्ही तयारीच्या वेळेसाठी तुमच्या सेटिंग्ज अपडेट करून रिझर्व्हेशन्स दरम्यान बुकिंग बफर जोडण्याचा देखील विचार करू शकता.

    तुम्हाला सुरुवात करण्यात मदत करण्यासाठी, आम्ही स्वच्छतेच्या प्रक्रियेच्या 5 पायऱ्यांविषयी सर्वोत्तम पद्धती शेअर करत आहोत: तयारी करा, स्वच्छ करा, सॅनिटाइझ करा, तपासा आणि रीसेट करा.

    पायरी 1: अधिक सुरक्षित स्वच्छतेची तयारी करा

    • रूम्स स्वच्छ करण्यापूर्वी आणि स्वच्छ करत असतानाहवेशीर ठेवा.  जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) सारख्या नियामक संस्था स्वच्छता आणि सॅनिटाइझ करण्यापूर्वी बाहेरील दारे आणि खिडक्या उघडे ठेवण्याची आणि मोकळ्या जागेत हवेचे अभिसरण वाढविण्यासाठी व्हेंटिलेशनचे पंखे वापरण्याची शिफारस करतात. स्वच्छता करण्यापूर्वी आणि करताना शक्य तितका वेळ जागेत वारा खेळता राहील याची काळजी घ्या.
    • योग्य स्वच्छता उपकरणे गोळा करा. आम्ही फक्त अशी जंतुनाशके आणि सॅनिटायझर वापरण्याची शिफारस करतो, जी तुमच्या संबंधित शासकीय एजंसीकडे रजिस्टर असतील (उदा. युरोपियन केमिकल एजंसी किंवा अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण एजंसी).
    • तुमच्या रासायनिक पदार्थांसाठी असलेल्या सुरक्षा गाईडलाइन्स रिव्ह्यू करा. तुमच्या उत्पादनांवरील लेबल वाचून त्यांतील सक्रिय तत्त्वांची आणि त्यांना कसे वापरावे याची माहिती घ्या.
    • हात साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद धुवा. जर ते शक्य नसेल, तर असे सॅनिटायझर वापरा ज्यात किमान 60% अल्कोहल असेल, तसेच नवीन गाईडलाइन्ससाठी तुमच्या स्थानिक शासकीय एजंसीकडून माहिती घ्या.
    • संरक्षक उपकरणे वापरा. तुमच्या जागेमध्ये शिरण्यापूर्वी,  एकदाच वापरले जाणारे हातमोजे आणि मास्क किंवा चेहरा झाकण्यासाठी कापडी कव्हर यासारख्या संरक्षक वस्तू वापरण्याचा विचार करा.
    • सर्व कचरा बाहेर काढा. सुरुवातीलाच हे काम केल्याने स्वच्छ केलेल्या जागेवर पुन्हा घाण कचरा जाऊन ती जागा दूषित होत नाही. सर्व कचरा पेट्यांमध्ये नवीन पिशव्या लावा, अशाने टिशूज आणि इतर कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोपे होईल.
    • संपूर्ण जागेतील सर्व गलिच्छ चादरी गोळा करा. आम्ही होस्ट्सकडून ऐकले आहे की कपडे धुणे ही उलाढालीदरम्यान सर्वात जास्त वेळ घेणारी क्रिया आहे. तुम्ही जागेत शिरल्याबरोबर घाणेरड्या चादरी गोळा करा आणि त्यांना झटकू नका, ज्यामुळे जंतूंचा प्रसार वाढू शकेल.
    • स्वच्छता करण्यापूर्वी अनप्लग करा. तुमच्या सुरक्षेसाठी आणि विजेच्या उपकरणांना सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वच्छता करण्यापूर्वी सर्व उपकरणांचे प्लग काढून ठेवा. उपकरणांवरील बटणे "बंद" केल्यानंतरसुद्धा प्लग लागलेला असेपर्यंत उपकरणांना विजेचा प्रवाह मिळत असतो. तुम्ही ब्रेकरवरून देखील पॉवर बंद करू शकता.

    सुरक्षेचे रिमाइंडर: तुम्ही जागेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ संरक्षणात्मक उपकरणे वापरण्याचा विचार करा. सर्व सुरक्षा लेबलांचा संदर्भ घेतल्यास तुम्हाला समजेल की स्वच्छता रसायनांचा योग्य वापर कसा करावा.

    पायरी 2: धूळ आणि कचरा साफ करा

    जेव्हा तुम्ही पृष्ठभागावरील जंतू आणि घाण काढता तीच स्वच्छता असते - उदाहरणार्थ, स्वयंपाकघरातील काउंटर किंवा स्टोव्हटॉप पुसण्यासाठी साबणाच्या कपड्याचा वापर करणे. तुमची जागा सॅनिटाइझ करण्यापूर्वी ही पायरी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

    •   निर्मात्याने शिफारस केलेल्या सर्वात जास्त उष्णता सेटिंगवर कपडे धुवा.  तुम्ही कोणतेही स्वच्छ कपडे हाताळण्यापूर्वी आपले हात धुण्यास विसरू नका.
    • सर्व डिशेस धुवा आणि डिशवॉशर रिकामे करा.  स्वच्छताविषयक मानकांची खात्री करण्यात मदतीसाठी गेस्ट्सनी वापरलेल्या डिशेस धुणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्याकडे डिशवॉशर नसेल, तर डिशला गरम पाणी आणि जीवाणुरोधक साबणाने धुवा. जागेवर एका बाजूने चालण्यास सुरूवात करा आणि प्रत्येक रूममधून डिशेस गोळा करा म्हणजे संसर्गाचा प्रसार होणार नाही.
    • जागेवरील धूळ स्वच्छ करा आणि जमिनीला स्वच्छ करा किंवा व्हॅक्यूम करा.धूळ स्वच्छ करताना, कुठलीही दृश्यमान चिन्हे शिल्लक नसल्याची खात्री करण्यासाठी वरून खालच्या बाजूला सुरू करा. सर्व कठीण पृष्ठभाग फ्लोअर झाडून टाका आणि कारपेट व्हॅक्यूम करा.
    •   साबण आणि पाण्यानेकठीण पृष्ठभाग स्वच्छ करा. प्रत्येक पृष्ठभाग पुसून टाका म्हणजे घाण, चिकटपणा, धूळ आणि जंतू स्वच्छ होतील. कठीण पृष्ठभागांमध्ये ओटा, टेबल, सिंक, कॅबिनेट्स आणि फरशी हे सर्व आले. मॉपिंग करताना, रूमच्या मागच्या कोपऱ्यापासून पुढे या आणि घाण झालेले पाणी अशा सिंकमध्ये टाका ज्याला तुम्ही अजून स्वच्छ केले नसेल.
    •   निर्मात्याच्या सूचनांनुसार नरम पृष्ठभाग स्वच्छ करा. कारपेट, बिछाने आणि अपहोल्स्ट्री अशा गोष्टी म्हणजे नरम पृष्ठभाग होय. ते घाण झालेले असल्यास, दिसत असलेली घाण किंवा माती काळजीपूर्वक काढा, नंतर त्यांना योग्य साहित्य वापरून स्वच्छ करा. शक्य असल्यास, निर्मात्याच्या सूचनांनुसार मशीनने आयटम धुवा.

    सुरक्षेचे रिमाइंडर: जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून स्वच्छता करताना चेहऱ्याला हात लावू नका.

    पायरी 3: जंतुनाशकाने सॅनिटाइझ करा

    सॅनिटायझिंग म्हणजे जेव्हा तुम्ही जंतू आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी रसायनांचा वापर करता. या पायरी दरम्यान, होस्ट्सनी सर्व वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या भागांना सॅनिटाइझ करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, होस्ट्स या पृष्ठभागांवर रासायनिक जंतुनाशक फवारणी करून दाराचे नॉब, लाइटचे स्विचेस आणि कॅबिनेट्स सॅनिटाइझ करू शकतात.

    • कठीण पृष्ठभाग स्वच्छ झाल्यावर त्यावर जंतुनाशकाचा फवारा करा.  जागेतील सर्व वारंवार स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांवर (जसे की दाराचे नॉब आणि लाइट स्विच) सॅनिटाइझ करण्यावर लक्ष केंद्रित करा). इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्वच्छता त्यांच्या निर्मात्यांच्या सूचनांनुसार केली जाते याची खात्री करा.
    • सूचनांमध्ये सांगितलेल्या वेळेपर्यंत जंतुनाशक ओले राहू द्या. एखाद्या पृष्ठभागाला योग्यप्रकारे सॅनिटाइझ करण्यासाठी त्यावर ओली रसायने किती वेळ राहू द्यायची याची माहिती उत्पादनाच्या लेबलवर असते. यामुळे शक्य तितके जंतू मारण्याचा वेळ त्या रसायनाला मिळतो.
    •  पृष्ठभागांना वाऱ्याने वाळू द्या. जर पृष्ठभाग ओला राहू द्यायच्या वेळेआधीच कोरडा झाला, तर लेबलवर सांगितल्याप्रमाणे ते उत्पादन त्या किटाणूंचा नाश करेलच याची हमी नसते.

    सुरक्षा रिमाइंडर: सर्व सुरक्षा लेबलांचा संदर्भ घेतल्यास तुम्ही स्वच्छता रसायनांचा योग्य वापर करत आहात याची खात्री करण्यात मदत होते.


    पायरी 4: एक-एक करत तुमची प्रत्येक रूमची चेकलिस्ट तपासा

    तुम्हाला तुमच्या लिस्टिंगच्या तपशिलांप्रमाणे स्वच्छतेच्या कस्टम चेकलिस्टचा अॅक्सेस असेल. प्रत्येक रूमसाठी असलेल्या चेकलिस्टमध्ये दिलेल्या सर्वात योग्य पद्धती जाणून घेणे आणि त्यांना तुमच्या होस्टिंग टीम किंवा व्यावसायिक स्वच्छता करणाऱ्यांसोबत शेअर करण्याची खात्री करा.

    • जास्त स्पर्श केली जाणारी ठिकाणे सॅनिटाइझ झाली आहेत याची पुन्हा खात्री करून घ्या. तुमच्याकडून सुटू शकतील अशा कोणत्याही गोष्टीचा मागोवा घ्या.
    • कोणत्याही मेंटेनन्स समस्या किंवा संपलेल्या वस्तूंकडे लक्ष द्या. स्वच्छता पूर्ण झाली आहे किंवा नाही हे पाहताना अशा वस्तू नोट करा ज्यांना बदलावे लागेल, भरून ठेवावे लागेल किंवा ज्यांचा स्टॉक करून ठेवावा लागेल.

    पायरी 5: रूम पुन्हा सेट करा

    संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, पुढील गेस्ट्ससाठी एखाद्या रूमला रीसेट करण्यापूर्वी त्या रूमची स्वच्छता आणि सॅनिटाइझ करणे पूर्ण करा.

    • तुमच्या स्वच्छता सामग्रीची विल्हेवाट लावा आणि धुवा.  जंतुनाशक वाइप्स सारखी डिस्पोजेबल उत्पादने फेकून द्या. तुम्ही वापरत असलेल्या इतर साधनांची देखील स्वच्छता केली आहे याची खात्री करा. स्वच्छतेचे कापड त्यांना धुण्यासाठी योग्य तेवढ्या जास्त गरम पाण्याने धुवा.
    • स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर स्वच्छतेचे कोणतेही उपकरण सुरक्षितपणे काढून टाका. त्यांच्या वापराच्या सूचनांनुसार कोणत्याही संरक्षणात्मक गियरची विल्हेवाट लावा किंवा धुवा. 
    • हात साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद धुवा. जर ते शक्य नसेल, तर असे सॅनिटायझर वापरा ज्यात किमान 60% अल्कोहल असेल, तसेच नवीन गाईडलाइन्ससाठी तुमच्या स्थानिक शासकीय एजंसीकडून माहिती घ्या.
    • प्रत्येक रूमची स्वतः पाहणी करा म्हणजे याची खात्री होईल की पुढील गेस्ट्ससाठी जागा तयार आहे. कल्पना करा की तुम्ही एक गेस्ट म्हणून पहिल्यांदाच या जागेत प्रवेश करत आहात.
    • तुमच्या गेस्ट्ससाठी स्वच्छतेचे साहित्य काढून ठेवा.अनेक गेस्ट्स आम्हाला सांगतात की तुमच्या जागेमध्ये राहताना त्यांना स्वतः स्वच्छता करण्याची सोय पाहिजे असते. हातांचे सॅनिटायझर, कागदी टॉवेल, जंतुनाशक स्प्रे किंवा वाइप्स आणि हातांचा साबण अशासारख्या वस्तू गेस्ट्ससाठी काढून ठेवा म्हणजे त्यांना स्वच्छता करता येईल.
    • तुमच्या स्वच्छतेच्या वस्तू पुन्हा भरून ठेवा. कालबाह्यतेच्या तारखा तपासा आणि तुम्ही वापरलेले सर्व साहित्य पुन्हा भरून ठेवा म्हणजे तुम्ही पुढच्या उलाढालीसाठी तयार असाल.

    सुरक्षा रिमाइंडर: रासायनिक उत्पादनांना नेहमी लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवा.

    स्वच्छतेच्या अधिक उच्च स्टँडर्ड्सशी वचनबद्ध व्हा

    आता तुम्हाला 5-पायऱ्यांची स्वच्छता प्रक्रिया माहीत असल्यामुळे, तुमचा सध्याचा नित्यक्रम अपडेट करण्याची आणि तुमच्या जागेतल्या प्रत्येक खोलीत ही तंत्रे लागू करण्याची वेळ आली आहे. आम्हाला माहित आहे की स्वच्छतेसाठी नवीन नियमित पद्धती वापरणे कठीण असू शकते, म्हणून आम्ही सर्वसमावेशक स्वच्छतेसाठी हँडबुक तयार केले आहे ज्यात तज्ञ-समर्थित मार्गदर्शन, सुरक्षा सल्ले आणि चेकलिस्टचा समावेश आहे जेणेकरून तुम्हाला Airbnb ची 5-पायऱ्यांची वर्धित स्वच्छता प्रक्रिया प्रत्यक्षात आणण्यात मदत होईल. होस्ट्सने प्रत्येक वास्तव्यादरम्यान Airbnb च्या 5-पायऱ्यांच्या वर्धित स्वच्छता प्रक्रियेचे पालन करणे आमच्यासाठी आवश्यक आहे.

    एकदा होस्ट्स 5-पायऱ्यांच्या स्वच्छतेच्या प्रक्रियेचे अनुसरण करण्यास वचनबद्ध झाल्यावर, वर्धित स्वच्छतेची त्यांची वचनबद्धता त्यांच्या लिस्टिंग पेजवर दाखवली जाईल जेणेकरून गेस्ट्सना कळू शकेल की त्यांनी सतत स्वच्छतेच्या मानकांचे पालन करण्यास सहमती दर्शविली आहे.

    कृपया लक्षात घ्या की तज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये बदल झाल्यामुळे स्वच्छतेच्या गरजा कालांतराने अपडेट केल्या जाऊ शकतात. विकसित होणाऱ्या विज्ञानाच्या आधारे, Airbnb ची 5-पायऱ्यांची वर्धित स्वच्छता प्रक्रिया आणि सविस्तर स्वच्छता हँडबुकचे उद्दीष्ट होस्ट आणि गेस्ट्सचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देणे हे आहे.

    आम्हाला माहीत आहे की तुमच्या नित्यक्रमात नवीन प्रक्रिया सादर करण्यास वेळ लागतो, म्हणून आम्ही तुम्हाला ही स्वच्छता मानके कार्यक्षमतेने आणि अचूकपणे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी शिक्षण आणि उत्पादन वैशिष्ट्ये विकसित करत आहोत. शिक्षण, सल्ले आणि कस्टम चेकलिस्टसाठी इनसाइट्स टॅबमधील स्वच्छता विभाग पहा. तपशीलवार मार्गदर्शनासाठी, आपण स्वच्छतेचे हँडबुक देखील डाउनलोड करू शकता.
    प्रकाशित झाल्यापासून या लेखात असलेली माहिती बदललेली असू शकते. 5 पायऱ्यांच्या वर्धित स्वच्छता प्रक्रियेमध्ये तुमच्या लिस्टिंगला स्वच्छ करण्यासाठी काही सोपी अनिवार्य कामे दिलेली आहेत. त्या पायऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया संपूर्ण Airbnb स्वच्छता हँडबुक पहा. होस्ट असल्यामुळे, तुम्हाला स्वतःचे, तुमच्या टीम्सचे आणि तुमच्या गेस्ट्सचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलावी लागू शकतात आणि तुम्ही नेहमी सर्व संबंधित स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे. या स्वच्छतेच्या प्रक्रियेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही जखमांसाठी किंवा आजारांसाठी Airbnb जबाबदार नाही. तुम्ही जिथे होस्टिंग करता त्या प्रदेशामधील स्वच्छतेच्या विशिष्ट गाईडलाइन्स आणि नियमांसाठी, कृपया या मदत केंद्रातील लेख ला बुकमार्क करा.

    हायलाइट्स

    • स्वच्छतेच्या प्रक्रियेमध्ये पाच पायऱ्या आहेत: तयारी करा, स्वच्छ करा, सॅनिटाइझ करा, पाहणी करा आणि रीसेट करा

    • आम्हाला कळते की स्वच्छतेसाठी नवीन पद्धत वापरणे कठीण असू शकते, त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्स टॅब मधील स्वच्छता सेक्शनमध्ये तुम्हाला अधिक सल्ले, कस्टमाइझ केलेल्या चेकलिस्ट आणि अशा आणखी उपयोगी वस्तू सापडतील

      • 5 पायऱ्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेतील कामे करण्यासाठी तुम्ही Airbnb च्या तज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या स्वच्छता हँडबुक ची मदत घेऊ शकता

      Airbnb
      4 जून, 2020
      हे उपयुक्त ठरले का?