यांमुळे तुमचे प्रति रात्र भाडे वेगळे दिसू शकते
हायलाइट्स
आम्ही Airbnb सर्च रिझल्ट्समध्ये भाडे दाखवण्याच्या नवीन पध्दती तपासत आहोत
याचे उद्दीष्ट इतर फॉरमॅट्स बुकिंग्ज वाढवू शकतात की नाही हे ओळखणे आहे
या चाचणीचा गेस्ट पेमेंट रकमेवर किंवा होस्ट पेआऊट्सवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही
सप्टेंबरच्या शेवटी आम्ही लिस्टिंगच्या सर्च रिझल्ट्समध्ये सर्व शुल्कांसह वास्तव्याचे भाडे दाखवण्याचे वेगवेगळे मार्ग तपासणे सुरू करणार आहोत. गेस्ट्ससाठी सुलभ, वेगवान आणि अधिक स्पष्ट असलेला बुकिंग अनुभव तयार करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. या भाडे प्रयोगाबद्दल तुम्हाला काय माहीत असणे आवश्यक आहे आणि फीडबॅक कसा द्यावा ते येथे आहे.
ही भाडे चाचणी कशी काम करते?
ही चाचणी गेस्ट्सना भाडे माहिती वेगवेगळ्या फॉरमॅट्समध्ये दाखवण्याचा प्रकार स्वैरपणे निवडते. हे फॉरमॅट सर्च रिझल्ट्समध्ये प्रति रात्र भाडे किंवा ट्रिपचा एकूण खर्च दाखवतील ज्यामध्ये स्वच्छता शुल्क आणि Airbnb सेवा शुल्क समाविष्ट असेल. चेक आऊट पेजवर कर स्वतंत्र लाईन आयटम म्हणून दाखवले जाईल.
ही चाचणी जगभरातील काही लोकेशन्समध्ये वास्तव्याच्या जागा शोधत असलेल्या गेस्ट्ससाठी असणार आहे. या चाचणी दरम्यान, लिस्टिंग्जमध्ये वेगवेगळ्या आकाराचे बॅनर्स दिसू शकतात, त्याद्वारे गेस्ट्सना बदलाबद्दल अलर्ट केले जाईल.
या भाडे चाचणीचा माझ्या पेआऊटवर परिणाम होतो का?
नाही. गेस्ट पेमेंट्स आणि होस्ट पेआऊट्सवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही.
तुमच्या जागेसाठी तुम्ही सेट केलेल्या भाड्यावर तुमचे नेहमीच नियंत्रण असते. या चाचणी दरम्यान, तुम्ही तरीही तुमच्या लिस्टिंग तपशीलांच्या भाडे आणि उपलब्धता विभागामध्ये तुमचे प्रति रात्र भाडे ॲडजस्ट करू शकता.
प्रति रात्र भाडी वेगळी दाखवणे आवश्यक का आहे?
आम्ही आमची सध्याची सेवा विविध शुल्क आणि करांची विभागणी करण्यासाठी डिझाईन केली आहे जेणेकरुन गेस्ट्सना पैसे देण्यापूर्वी संभाव्य शुल्क पूर्णपणे समजेल. गेल्या वर्षभरात आम्ही पाहिले आहे की Airbnb वर प्रवास पुन्हा सुरू झाला आहे आणि तो महत्त्वपूर्णरित्या सुरू झाला आहे, तसेच जरी आमचा विश्वास आहे की आमचे सध्याचे फॉरमॅट चांगले काम करते तरी आम्ही प्रत्येकाचा अनुभव सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.
लिस्टिंग्जमधील भाडे वेगवेगळ्या पध्दतीने दाखवण्याची चाचणी करून, आम्ही हे ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत की नवीन फॉरमॅट होस्ट बुकिंग्जला चालना देऊ शकेल का आणि आमच्या जागतिक कम्युनिटीला अधिक चांगली सेवा देऊ शकेल की नाही.
या चाचणीला सपोर्ट करण्यासाठी मला काय करता येईल?
तुमची लिस्टिंग प्रयोगात सामील असलेल्या लोकेशनमध्ये असेल किंवा नसेल, तरीही तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या जागेबद्दल काय खास आहे हे प्रदर्शित करण्यासाठी तुमच्या लिस्टिंगचे वर्णन नेहमी अपडेट करू शकता—आणि तुम्ही कोणत्या खास सुविधा ऑफर करता हे दाखवू शकता.
लिस्टिंगच्या सर्च रिझल्ट्समध्ये भाडे कसे दाखवले जाते यासह आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्या फीडबॅकचे आम्ही स्वागत करतो.
हायलाइट्स
आम्ही Airbnb सर्च रिझल्ट्समध्ये भाडे दाखवण्याच्या नवीन पध्दती तपासत आहोत
याचे उद्दीष्ट इतर फॉरमॅट्स बुकिंग्ज वाढवू शकतात की नाही हे ओळखणे आहे
या चाचणीचा गेस्ट पेमेंट रकमेवर किंवा होस्ट पेआऊट्सवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही