तुमच्या अनुभव लिस्टिंगमध्ये अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडा
हायलाइट्स
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये विविध प्रकारच्या गेस्ट्सना तुमचा अनुभव बुक करण्यात मदत करू शकतात
- गेस्ट्स त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींनुसार (उदा. ॲक्सेसिबल बाथरूम, साइन लँग्वेज) त्यांचा सर्च फिल्टर करू शकतात
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये अपडेट्सच्या रिव्ह्यू प्रोसेसला एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो
प्रत्येकाला सर्वत्र आपलेपणा वाटू शकेल असे जग निर्माण करण्यास मदत करण्याकरता तुम्ही उत्सुक आहात का? तुमच्या लिस्टिंगमध्ये अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडण्याचा विचार करा. ही शोध वैशिष्ट्ये ॲक्सेसिबिलिटी आवश्यकता असलेल्या गेस्ट्सना त्यांच्या गरजांसाठी योग्य असलेले अनुभव शोधण्यात मदत करू शकतात, मग ते वृद्ध प्रवासी असो की जखमी किंवा दिव्यांग लोक. तुम्ही तुमचे अनुभव यावर जाऊन, बदल करा निवडून आणि नंतर बुकिंगच्या अटी वर जाऊन ही वैशिष्ट्ये चालू करू शकता.
Airbnb होम्स होस्ट्सकडे काही काळापासून ही ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आहेत आणि संशोधनातून हे समजते की, गेस्ट्स जेव्हा त्यांचा शोध मर्यादित करत असतात तेव्हा ही वैशिष्ट्ये त्यांच्यासाठी किती उपयुक्त असतात. जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत, 3,00,000 हून अधिक गेस्ट्सनी घराच्या लिस्टिंग्जसाठी त्यांचा शोध मर्यादित करण्याकरता ॲक्सेसिबिलिटी फिल्टर्सचा वापर केला.
तुमच्या अनुभव पेजवर अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये जोडून, सोयीस्कर राहून आणि संभाव्य गेस्ट्सना ॲक्सेसिबिलिटीच्या कोणत्याही समस्यांसह तुम्हाला मेसेज पाठवण्यासाठी प्रोत्साहित करून, तुम्ही गेस्ट्सना काय अपेक्षित आहे हे कळवू शकता आणि त्यांना आपलेपणा जाणवण्यासाठी मदत करू शकता.
या लेखात दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यकता, दिव्यांगता तज्ञांच्या सल्ल्याने विकसित केल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या लिस्टिंगच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे तपशीलवार वर्णन Airbnb च्या ठरवलेल्या स्टँडर्ड्सनुसार असण्यासाठी तुम्हाला मदत होईल.
प्रत्येक वैशिष्ट्यासाठी वर्णने जोडणे
तुमच्या लिस्टिंगचा ॲक्सेसिबिलिटी विभाग तीन ग्रुप्समध्ये विभागलेला आहे: कम्युनिकेशन वैशिष्ट्ये, मोबिलिटी वैशिष्ट्ये आणि सेन्सरी वैशिष्ट्ये. तुम्ही निवडलेल्या प्रत्येक वैशिष्ट्यासाठी तुम्हाला अधिक माहिती (वर्णनाच्या स्वरूपात) देणे आवश्यक असेल, जेणेकरून गेस्ट्स त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार तुमचा अनुभव त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवू शकतील.
वर्णन जोडण्यासाठी आवश्यकता
- तुम्ही देत असलेली माहिती संबंधित, स्पष्ट आणि पुरेशी तपशीलवार असल्याची खात्री करा. हे विशेषतः ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित असले पाहिजे, केवळ तुमच्या अनुभवाच्या सामान्य सुविधांबद्दलची माहिती नव्हे. विशिष्ट वैशिष्ट्य प्रकारांविषयी तपशील देण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.
- तुम्ही कोणत्या प्रकारची माहिती समाविष्ट करण्याचा विचार केला पाहिजे हे पहाण्यासाठी दिलेले प्रॉम्प्ट आणि सूचना वापरा. तुम्हाला त्यात काय समाविष्ट आहे याबद्दल खात्री नसल्यास हे तपशील तुम्हाला हे वैशिष्ट्य समजून घेण्यात मदत करू शकतात.
- तुमचा अनुभव एकापेक्षा जास्त लोकेशन्सवर होत असल्यास, तुम्ही केवळ एका लोकेशनच्या नव्हे तर संपूर्ण अनुभवाबद्दल ॲक्सेसिबिलिटी माहिती द्यावी.
तुम्ही निवडलेल्या प्रत्येक वैशिष्ट्याचे तपशीलवार वर्णन जोडणे अतिशय महत्वाचे आहे. तुमचे वर्णन पुरेसे स्पष्ट आणि तपशीलवार नसल्यास किंवा ते चुकीचे असल्यास, संबंधित वैशिष्ट्य तुमच्या लिस्टिंगमधून काढून टाकले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे अस्पष्ट किंवा चुकीच्या वर्णनामुळे गेस्ट त्यांच्या ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा पूर्ण होत नाही असा अनुभव बुक करू शकतात.
सामान्य चुका
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याचे वर्णन करण्यासाठी सामान्य अटी वापरणे, उदा. “रस्ता व्हीलचेअरने ॲक्सेसिबल आहे.” त्याऐवजी, अधिक स्पष्ट होण्याचा प्रयत्न करा आणि व्हीलचेअर वापरकर्त्यांना ज्या जागा आणि ग्रेडिएंटचा सामना करावा लागेल त्याचे वर्णन करा, जसे की “मार्ग मोकळा आहे आणि समतल आहे, परंतु पार्किंगच्या ठिकाणी रेव आहे.”
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याचे वर्णन करण्यासाठी प्रादेशिक मानके किंवा स्थानिकीकृत अटी वापरणे, उदा. “बाथरूम ADA अनुरूप आहे.” हे इतर देशांतील गेस्ट्सना समजणे कठीण असू शकते. त्याऐवजी, विशिष्ट ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करा.
मोबिलिटी वैशिष्ट्यांच्या वर्णनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
मोबिलिटी वैशिष्ट्ये तुमचा अनुभव ज्या लोकेशनवर आहे त्याच्याशी संबंधित आहेत.
- अनुकूल उपकरणे
तुम्ही स्पोर्ट्स व्हीलचेअर्स, होइस्ट्स किंवा होयर लिफ्ट्स सारखी कोणतीही सुधारित किंवा विशेष उपकरणे प्रदान केल्यास हे वैशिष्ट्य निवडा जे ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या व्यक्तींसाठी पूर्ण सहभाग सक्षम करू शकेल. उपलब्ध असलेल्या विशिष्ट उपकरणांविषयी आणि ते मोबिलिटीच्या गरजा असलेल्या गेस्ट्सना कशी मदत करेल याबद्दलची माहिती समाविष्ट करा. - ॲक्सेसिबल बाथरूम
गेस्ट्ससाठी बाथरूम उपलब्ध आहे की नाही याविषयी माहिती प्रदान करा ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या नाहीत आणि अतिरिक्त ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये असू शकतात जसे की रुंद दरवाजा किंवा व्हीलचेअरसाठी पुरेशी वळण्याची जागा. टॉयलेटसाठी ग्रॅब बार्स, इमर्जन्सी पुल कॉर्ड किंवा बर्न टाळण्यासाठी सिंक पाईप्स झाकले गेले असल्यास कोणतीही अतिरिक्त वैशिष्ट्ये हायलाईट करा. - ॲक्सेसिबल पार्किंग स्पॉट
किती ॲक्सेसिबल पार्किंग स्पॉट्स (कमीतकमी 8 फूट रुंद किंवा 2.5 मीटर्स) उपलब्ध आहेत आणि तेथे ॲक्सेसिबल पार्किंगचे चिन्ह (अनेकदा व्हीलचेअर आयकॉनद्वारे दर्शविले जाते) आहे की नाही याची माहिती द्या. अनुभवाच्या मीटिंग पॉईंटपासून पार्किंग स्पॉट्स किती दूर आहेत हे गेस्ट्सना कळू द्या. शटल्स किंवा सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असल्यास, ही वाहने व्हीलचेअरने ॲक्सेसिबल आहेत का ते गेस्ट्सना कळवा. - मुख्यतः सपाट किंवा समतल जमीन
तुमचा अनुभव ज्या ठिकाणी आहे तिथल्या मनोरंजन सुविधा आणि मार्ग ॲक्सेस करा. दरवाजे आणि हॉलवेज किमान 32 इंच (82 सेंटीमीटर) रुंद असल्यास आणि टणक, न घसरणारा असल्यास, पायऱ्या नसल्यास आणि थोडा किंवा अजिबात उतार नसल्यास हे वैशिष्ट्य निवडा. तुमचा अनुभव एकापेक्षा जास्त लोकेशन्सवर होत असल्यास, प्रत्येक लोकेशनच्या भूप्रदेशाबद्दल माहिती जोडण्याची खात्री करा. - पायऱ्या किंवा जिने नाहीत
तुमच्या संपूर्ण अनुभवामध्ये पायऱ्या, जिने किंवा मोठ्या मर्यादा किंवा अडथळे नसल्यास हे वैशिष्ट्य निवडा. तुमच्या अनुभवाचे लोकेशन किंवा रस्ता आणि त्या रस्त्याला पायऱ्यांशिवाय बनवणारे (रॅम्प्स किंवा लिफ्ट्स यांसारखे) काही बदल किंवा उपकरणे आहेत का याचा तपशील द्या. ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या काही गेस्ट्ससाठी ही उच्च-प्राधान्य आवश्यकता असू शकते, म्हणून तुम्हाला त्यांच्या गरजेबद्दल आगाऊ माहिती हवी असल्यास किंवा लिफ्ट्सचा आकार किंवा वजन यावर निर्बंध असल्यास गेस्ट्सना तसे खात्रीपूर्वक कळवा. - 32 इंच (82 सेंटीमीटर) पेक्षा जास्त रुंद प्रवेशद्वार
अनुभवामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रवेशद्वार आणि दरवाजे किमान 32 इंच (82 सेंटीमीटर) रुंद असल्यास तुम्ही हे वैशिष्ट्य जोडू शकता, जेणेकरून व्हीलचेअर किंवा इतर मोबोलीटी डिव्हाईसेसवर प्रवेश प्रदान केला जाईल. - रेफ्रिजरेटर
गेस्ट्सना सहजपणे ॲक्सेसिबल रेफ्रिजरेटर असल्यास तसे कळवा—हे विशेष आहार किंवा औषधे असलेल्या गेस्ट्ससाठी उपयुक्त ठरू शकते, जे थंड तापमानात ठेवणे आवश्यक आहे. फ्रीजचे लोकेशन आणि गेस्ट्स ती जागा कधी ॲक्सेस करू शकतील याचे वर्णन करा.
कम्युनिकेशन वैशिष्ट्याच्या वर्णनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
तुमच्या अनुभवाच्या वेळी तुम्ही देऊ शकता अशा कम्युनिकेशनच्या पद्धतींसाठी पर्यायांचे वर्णन करतात.
- तपशीलवार ऑडिओ किंवा मौखिक माहिती
अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या गेस्ट्सच्या फायद्यासाठी तुम्ही विशिष्ट कम्युनिकेशन पद्धती देऊ शकत असल्यास शेअर करा. - d/कर्णबधिर असलेल्यांबद्दल जाणीव
कोणतीही वैशिष्ट्ये किंवा कम्युनिकेशन पद्धती हायलाईट करा (जसे की स्पष्टपणे बोलणे, बॅकग्राऊंडचा आवाज कमी करणे, लीप रीडिंगसाठी चांगला उजेड असणे) जे तुम्हाला d/कर्णबधिर किंवा ऐकू न येणाऱ्या गेस्ट्सशी संवाद साधण्यास सक्षम करतील. - साईन लँग्वेज
जेथे गेस्ट्ससाठी मूलभूत किंवा अस्खलित साईन लँग्वेजेस उपलब्ध आहेत, तेथील अस्खलितपणाचा स्तर आणि कोणती भाषा (अमेरिकन साईन लँग्वेज, ब्रिटिश साईन लँग्वेज इ.) निर्दिष्ट करा. तुम्ही साईन लँग्वेज इंटरप्रिटर देऊ शकत असल्यास, तुम्हाला याची व्यवस्था करण्यासाठी ॲडव्हान्स नोटिस हवी असल्यास गेस्ट्सना तसे कळवा. - पर्यायी स्वरूपातील माहिती
तुमच्या अनुभवापूर्वी किंवा त्यादरम्यान मोठ्या प्रिंट किंवा ब्रेल सारख्या पर्यायी स्वरूपात गेस्ट्सना माहिती किंवा चिन्ह प्रदान केले असल्यास हे वैशिष्ट्य निवडा. गेस्ट्सना माहिती कुठे आणि कशी उपलब्ध करून दिली जाईल, तसेच ज्या विशिष्ट फॉरमॅटमध्ये माहिती सादर केली जाईल ते कळवा. अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या गेस्ट्ससाठी हे विशेषतः उपयुक्त ठरू शकते. - नियुक्त दृष्टीदर्शक गाईड
नेव्हिगेट करण्यास अंध किंवा कमी दृष्टी असलेल्या गेस्ट्सना मदत करण्याचा अनुभव असलेला एखादा नियुक्त गाईड जाणार असल्यास, हे वैशिष्ट्य निवडा. गाईडच्या अनुभवाच्या स्तराबद्दल आणि त्यांच्यासाठी आधीच विनंती करणे आवश्यक आहे का याबद्दल तपशील द्या.
सेन्सरी वैशिष्ट्याच्या वर्णनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
येथे इतर ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये आहेत जी तुमच्या अनुभवाशी संबंधित असू शकतात.
- कोणतेही तीव्र संवेदनात्मक उत्तेजन टाळा
अनुभव जिथे आयोजित होतो त्या वातावरणाचा विचार करा आणि संवेदी पैलूंचे मूल्यांकन करा. तुमच्या अनुभवामध्ये प्रखर दिवे, मोठा आवाज, तीव्र वास आणि मोठी गर्दी यांचा कमी संपर्क असेल तर हे वैशिष्ट्य निवडा. प्रकाश व्यवस्था, गोंगाट आणि वास आणि त्या एरियात किती गर्दी असू शकते याबद्दल तपशील द्या. - विश्रांतीच्या नियुक्त वेळा
बसण्याच्या सोयीसह नियुक्त केलेल्या विश्रांतीच्या वेळा दिव्यांगता असलेल्या गेस्ट्सना काय चालले आहे हे प्रोसेस करण्यात, ताण हलका करण्यात आणि विश्रांती घेण्यात मदत करू शकते. जर गेस्ट्स अनुभवादरम्यान, संपूर्ण अनुभवाच्या कालावधीशी किंवा इतर गेस्ट्सच्या सहभागाशी कोणतीही तडजोड न करता विश्रांती घेऊ शकत असतील तरच हे वैशिष्ट्य निवडा. विश्रांतीच्या ब्रेक्सचे वर्णन करताना, ते कधी होतील, ते किती काळ असतील आणि सीटिंग उपलब्ध असेल की नाही हे नक्की नमूद करा. - कमीत कमी प्रतीक्षा/रांगेतील वेळ
तुमच्या संपूर्ण अनुभवामध्ये रांगेत उभे राहण्याचा कालावधी अगदी कमी आहे किंवा बिलकुल नाही हे दर्शवण्यासाठी हा फिल्टर निवडा. रांगेत उभे राहणे काही गेस्ट्ससाठी थकवणारे किंवा असह्य असू शकते, म्हणून जर तुमच्या अनुभवाच्या काही इंस्टंसेसमध्ये इतरांपेक्षा कमी रांगेत उभे राहावे लागण्याची शक्यता असेल, तर हे केव्हा असतील याबद्दल माहिती जोडण्याचा विचार करा. - एकांत असलेली शांत जागा
अनुभवादरम्यान गरज असल्यास गेस्ट्स वापरू शकतील असे खाजगी किंवा कमी आवाजाचे ठिकाण असल्यास हे वैशिष्ट्य निवडा. त्या जागेचे लोकेशन, आजूबाजूचा परिसर आणि गेस्ट्स ती जागा कधी ॲक्सेस करू शकतील यासारखे तपशील द्या.
तुमची ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये अपडेट करणे
हायलाइट्स
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये विविध प्रकारच्या गेस्ट्सना तुमचा अनुभव बुक करण्यात मदत करू शकतात
- गेस्ट्स त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींनुसार (उदा. ॲक्सेसिबल बाथरूम, साइन लँग्वेज) त्यांचा सर्च फिल्टर करू शकतात
- ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये अपडेट्सच्या रिव्ह्यू प्रोसेसला एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो