उत्तम गुणवत्ता असलेल्या अनुभवाचे 3 स्तंभ
हायलाइट्स
असे काहीतरी ऑफर करा जे गेस्ट्स स्वतःहून सहजपणे करू शकत नाहीत
- तुमचे कौशल्य आणि अनोखा दृष्टीकोन विचारात घ्या
- अर्थपूर्ण मानवीय संबंध बनवण्यात गेस्ट्सना मदत करा
अनुभवांसाठी Airbnb च्या गुणवत्ता स्टँडर्ड्स आणि आवश्यकता जाणून घ्या
तुमच्या जगाबद्दल अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असलेल्या प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या कम्युनिटीशी संपर्क साधण्यास तयार आहात का? पहिली पायरी: Airbnb ची गुणवत्ता मानके आणि आवश्यकता चांगल्या प्रकारे समजून घ्या. ते सर्व होस्ट्सनी पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण त्यांनी तसे केल्यावरच त्यांचा अनुभव पब्लिश केला जाईल. आता तुम्ही मूलभूत गोष्टी हाताळल्या आहेत, म्हणून चला आता उच्च गुणवत्तेच्या अनुभवासाठी Airbnb चे 3 स्तंभ तपासू आणि तुमच्या सबमिट केलेल्या अनुभवात तुमचे अद्वितीय कौशल्य दाखवण्याचे मार्ग जाणून घेऊ.
गुणवत्तेचे 3 स्तंभ
अनुभवी होस्ट प्रवाशांना त्यांच्या जगात घेऊन जातात आणि काही तासांसाठी का असेना पण ते त्या जगाचा एक भाग असल्याची भावना त्यांच्यात निर्माण करतात. सबमिट केलेल्या अनुभवाला हे दाखवावे लागेल की त्यात गुणवत्तेचे हे 3 स्तंभ आहेत: कौशल्य, विशेष ॲक्सेसआणि संबंध. हे स्तंभ अनुभवांना ठराविक टूर्सपेक्षा वेगळे बनवते आणि त्यामुळे हे सुनिश्चित होते की मार्केटमध्ये अनुभवाच्या ज्या लिस्टिंग्ज आहेत त्या उच्च गुणवत्तापूर्ण असून जाणकार, आदरातिथ्यशील होस्ट्स चालवतात.
तुम्ही या स्तंभांबद्दल अधिक वाचत असताना आणि तुमच्या अनुभवाच्या कल्पनेबद्दल विचार करत असताना, या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात:
- तुम्हाला तुमच्या विषयात केवळ कौशल्यच असायला नव्हे तर तुम्ही या विषयात किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये अनोखा दृष्टीकोन कसा आणू शकता त्याबद्दल विचार करा.
- तुमच्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव द्या; अनुभवांनी असे काहीतरी ऑफर केले पाहिजे जे गेस्ट्स स्वतःच सहजपणे करू शकत नाहीत. सामान्य पर्यटन ॲक्टिव्हिटीजपासून तुमचा अनुभव वेगळा असल्याचे दाखवा.
- सर्वोत्कृष्ट अनुभव अर्थपूर्ण मानवी संबंध तयार करतात—तुमच्या गेस्ट्सच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण झाल्याची खात्री तुम्ही कशी कराल?
तज्ञता
तुम्हाला एखाद्या कलेबद्दल, ॲक्टिव्हिटी आणि/किंवा तुमच्या कम्युनिटीबद्दल आवड आहे का? तुमच्या अनुभवाची कल्पना डिझाईन करताना आणि रिव्ह्यूसाठी सबमिट करताना, प्रारंभ करण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे! ॲक्टिव्हिटीच्या मुख्य विषयाबद्दल उत्साह असण्याव्यतिरिक्त, तज्ज्ञ होस्टने त्यांच्याकडे त्या विषयाबद्दल काय युनिक कौशल्य, पात्रता किंवा दृष्टीकोन आहे याचा विचार केला पाहिजे. तुमचा अनुभव सबमिट करताना हे स्पष्ट करा.
यशाच्या वेगवेगळ्या स्तरांसह तुम्ही एखाद्या विषयावरील तुमचे कौशल्य कसे स्पष्ट करू शकता याची तीन उदाहरणे येथे दिली आहेतः
टाळा:“मला कॅलिग्राफी आवडते!” या विधानात हे स्पष्ट होत नाही की तुम्ही या कलेचे तज्ज्ञ कसे किंवा का आहात.
चांगले: “मी पाच वर्ष कॅलिग्राफीचा अभ्यास केला असून अलीकडेच माझ्या मित्र-मैत्रिणींना शिकवायला सुरुवात केली आहे.” या विधानात थोडी उपयोगी माहिती दिली आहे की तुम्हाला हे अनुभव सादर करण्यासाठी पात्र का मानले जावे.
उत्तम: “मी SF एशियन आर्ट्स सेंटरमध्ये कॅलिग्राफी शिकवतो. मी अलीकडेच आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी कॉन्फरन्समध्ये डिजिटल युगात कॅलिग्राफी या विषयावर बोललो आहे.” हे विधान तुमच्या विषयात तुमचे कौशल्य चांगल्या प्रकारे दाखवते.
ॲलियोनॉरा आणि अश्रफ, कुकिंग विथ आर्ट! चे होस्टआहेत. त्यांनी तुमचा परिचय असा एक विभाग तयार केला आहे जो त्यांचे कौशल्य उत्तम प्रकारे हायलाईट करतो:
उदाहरण 1: ॲलियोनॉरा एक शेफ आहेत ज्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्या Italia 7 मध्ये एक टीव्ही शेफ असून त्यांना त्यांचे ज्ञान इतरांसह शेअर करणे आवडते. त्यांच्या आवडीमुळेच आज त्या त्यांच्या आजी आणि आईच्या पावलांवर पाऊल ठेऊन वाटचाल करत आहेत. परंतु त्या स्वतःला अपडेट ठेवतात. त्या पेस्ट्री शेफ, वाईन आणि फूड पेअरिंगसाठी विशेष प्रशिक्षित आहेतच पण त्या सोबतच त्या प्रशिक्षित पिझ्झायोलो देखील आहेत. त्यांचे पाककलेचे पहिले पुस्तक 2018 मध्ये प्रकाशित झाले.
मेक्सिको सिटीमध्ये राहणाऱ्या नॅचरल डाय युजिंग एन्शीयन्ट टेकनिक्स च्या होस्ट ॲनाबेला देखिल त्यांच्या कौशल्याचे वर्णन उत्तमरित्या करतात:
उदाहरण 2: मी मेक्सिकन टेक्सटाईलची प्रशंसक असून मी बार्सिलोनामध्ये फॅशन डिझाईन आणि फायबर आर्ट्सचा अभ्यास केला आहे. मी काही वर्षांपूर्वी मेक्सिकोला परत आले होते आणि तेव्हा ओक्साकामध्ये नैसर्गिक डायबद्दल शिकण्यास सुरुवात केली. तिथेच मी प्राचीन टेक्सटाईल्सच्या चटकदार रंगांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून मी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केले. त्यात कारागिरांच्या हातांनी बनवलेल्या बॅकपॅक्सचा ब्रँड देखील समाविष्ट आहे. या कार्यशाळेत आपण त्यापैकीच काही साहित्य आणि पद्धतींचा वापर करणार आहोत.
अनुभवाचे होस्टिंग करण्यासाठी तुम्हाला एखाद्या कलेत माहीर असणे आवश्यक आहे का? नाही! केवळ ते युनिक कौशल्य हायलाईट करा जे तुमच्या अनुभवाशी संबंधित आहे.
इनसायडर ॲक्सेस
अनुभवाचे क्षेत्र सामान्य पर्यटन ॲक्टिव्हिटीजच्या पलीकडे असतात आणि त्यात गेस्ट्सना होस्टच्या कम्युनिटीत किंवा संस्कृतीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. उत्कृष्ट अनुभव गेस्ट्सना अशी ठिकाणे किंवा ॲक्टिव्हिटीजच्या संपर्कात आणतात जे सामान्य प्रवासी कदाचित त्यांच्या स्वतःच्या बळावर शोधू शकणार नाहीत.
Airbnb वर पब्लिश होण्याच्या तुमच्या अनुभवाची शक्यता वाढवण्यासाठी तुमच्या गेस्ट्सना एखाद्या विशेष गोष्टीचा ॲक्सेस द्या किंवा एखादी अशी गोष्ट ऑफर करा जी सर्वसाधारण विजीटरला मिळत नाही. तुमचा अनुभव सबमिट करताना, तुम्ही तुमच्या गेस्ट्ससोबत ज्या लोकेशन्सना भेट देणार आहात त्याबद्दल काय खास आहे ते हायलाईट केल्याचे सुनिश्चित करा.
- त्यांच्यासह एखाद्या विशेष जागेची माहिती शेअर करा, जसे की फक्त स्थानिकांना माहीत असणारी मौज-मजेची जागा किंवा आसपासच्या परिसरातली लपलेली बाग.
- गेस्ट्सना अशा लोकांचा, कम्युनिटींचा किंवा ॲक्टिव्हिटींचा परिचय द्या ज्यांचा ॲक्सेस त्यांना नसेल.
- ठराविक किंवा सामान्य पर्यटक ॲक्टिव्हिटी एखाद्या युनिक स्वरूपात किंवा दृष्टीकोनासह ऑफर करा.
लॉस एंजेलिसमध्ये राहणारे मार्विन हनी बी थेरपीचे होस्ट आहेत. ते त्यांच्या स्वत:च्या अंगणाचा आणि स्थानिक कम्युनिटी गार्डन्सचा युनिक ॲक्सेस देतात जिथे गेस्ट्स टूर करताना मधमाश्यांचे पोळे जवळून बघू शकतात.
तुमचा अनुभव सबमिट करताना या लोकेशन्स किंवा कम्युनिटींशी तुमचे स्वतःचे कनेक्शन हायलाईट करण्याचे सुनिश्चित करा. स्वतःला विचारा: ते तुमच्यासाठी खास का आहेत आणि तुमच्या गेस्ट्सनाही ते का आवडेल? या जागांशी संबंधित एखादी अशी गोष्ट शेअर करा जी गेस्ट्सच्या दीर्घकाळ लक्षात राहील.
कनेक्शन
एक चांगला अनुभवी होस्ट नेहमी अर्थपूर्ण मानवीय संबंध बनवू इच्छितात. ते गेस्ट्सना आपलेपणा वाटण्यासाठी आणि त्यांना महत्त्व देण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. ते आपुलकीने आणि विचारपूर्वक काम करून गेस्ट्सच्या मनात भावनिक संबंध तयार करतात. ते गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याच्या संपूर्ण कालावधी दरम्यान ते खास असल्याची भावना निर्माण करतात. जर होस्टने चांगले संबंध तयार केले तर, अनुभव घ्यायला एक अनोळखी व्यक्ती म्हणून आलेले गेस्ट्स मित्र-मैत्रीण म्हणून परततील.
तुमचा अनुभव सबमिट करताना, तुम्ही त्या तपशीलांना हायलाईट करा ज्याद्वारे तुम्ही संपूर्ण अनुभवादरम्यान गेस्ट्सना सुरक्षित ठेवण्याचे आणि त्यांचा सहभाग, उत्साह व रूची कायम ठेवण्याचे सुनिश्चित कराल. यामध्ये गेस्ट्सची काळजी घेणाऱ्या छोट्या कृती जसे की उन्हात जातांना सनस्क्रीन देणे आणि मोठी गोष्टी जसे की तुमच्या गेस्ट्सना कनेक्ट होण्यासाठी सर्वसमावेशक जागा तयार करणे, असू शकतात.
तुम्ही तुमच्या अनुभवाची कल्पना तयार करता तेव्हा स्वत:ला विचारण्यासाठी येथे काही प्रश्न आहेत:
- गेस्ट्सच्या गरजा जसे आहारविषयक बाबी, ॲक्सेसिबिलिटी किंवा सुरक्षा समस्यांची काळजी कशी घेतली जाते?
- हवामानात बदल यासारख्या अनपेक्षित परिस्थिती आल्यास तुम्ही काय करू शकता?
- तुमच्या अनुभवावर तुम्ही गेस्ट्सना एकमेकांशी संपर्क साधण्यात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात कशी मदत कराल?
- तुम्ही विविध संस्कृतीतील गेस्ट्सच्या विस्तृत स्पेक्ट्रमच्या सोईची पातळी कशी विचारात घ्याल?
हे घटक तुमच्या पेजमध्ये समाविष्ट करणे
लक्षात ठेवा, सर्व अनुभवांनी Airbnb मार्केटप्लेसवर येण्यासाठी या गुणवत्तेच्या मानदंडांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तुमच्या अनुभव पेजमधील या प्रत्येक गुणांशी तुम्ही कसे संवाद साधता हे महत्त्वाचे आहे. या विभागांमध्ये युनिक कौशल्य, विशेष ॲक्सेस आणि संबंध काळजीपूर्वक हायलाईट करा:
तुमचा परिचय – हा अनुभव होस्ट करण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम व्यक्ती का आहात, तुमचे कौशल्य ॲक्टिव्हिटीशी कसे संबंधित आहे आणि तुम्ही विचारशील होस्ट कसे आहात हे शेअर करायला विसरू नका.
तुम्ही काय कराल आणि तुम्ही कुठे-कुठे जाणार – तुम्ही तुमच्या गेस्ट्सना ज्या लोकेशन्स किंवा कम्युनिटीजचा युनिक ॲक्सेस देणार त्याचे वर्णन करा—अचूक माहिती द्या! गेस्ट्स जे प्रश्न विचारू शकतात त्याचा पूर्वानुमान लावा आणि त्यांची उत्तरे आगाऊ तयार ठेवा.
मी काय देणार आहे – तुम्ही अनुभवामध्ये समाविष्ट करणाऱ्या कोणत्याही विशेष गोष्टीची माहिती द्या. पेये आणि स्नॅक्सपासून ते गेस्ट्सना इव्हेंटमध्ये प्रवेश देणार्या तिकिटांपर्यंत.
हायलाइट्स
असे काहीतरी ऑफर करा जे गेस्ट्स स्वतःहून सहजपणे करू शकत नाहीत
- तुमचे कौशल्य आणि अनोखा दृष्टीकोन विचारात घ्या
- अर्थपूर्ण मानवीय संबंध बनवण्यात गेस्ट्सना मदत करा
अनुभवांसाठी Airbnb च्या गुणवत्ता स्टँडर्ड्स आणि आवश्यकता जाणून घ्या