तुमच्या फीडबॅकमुळे एकंदर होस्टिंग अनुभवातील हरतऱ्हेच्या नवीन वैशिष्ट्यांसाठी प्रेरणा मिळाली. आणि अर्ली ॲक्सेसमुळे तुम्ही आजपासूनच त्यांचा वापर सुरु करू शकता.
आता, सर्व प्राईसिंग टूल्स कॅलेंडरमध्ये आहेत—जेणेकरून तुम्ही एकाच ठिकाणी तुमचे भाडे सहजपणे सेट आणि ॲडजस्ट करू शकता. आमचा अपडेट केलेला भाडे तक्ता पाहून, तुम्हाला गेस्ट्ससाठीचे एकूण भाडे आणि तुम्ही किती कमवाल ते देखील लक्षात येईल.
आता पहिल्यांदाच, तुम्ही आसपास बुक केलेल्या लिस्टिंग्जच्या सरासरी भाड्याशी तुमच्या भाड्याची तुलना करू शकता, ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल.
आता कॅलेंडरमध्ये एकूण कालावधी निवडण्यासाठी तुम्ही मोबाईलवर स्वाइप करू शकता—प्रत्येक तारखेवर वेगवेगळे टॅप करण्याची गरज नाही. शिवाय लवकरच येत आहे नवीन वार्षिक व्हयू, ज्यावर एक दृष्टीक्षेप टाकल्यास 12 महिन्यांचे समग्र चित्र दिसेल.
तुमच्या लिस्टिंगमध्ये चेक आऊटच्या सामान्य सूचना पटकन जोडा आणि कस्टम विनंत्या सहजपणे समाविष्ट करा. गेस्ट्सना निघण्यापूर्वी कामांची आठवण करून दिली जाईल, तसेच चेक आऊट झाल्यावर तुम्हाला सूचित करण्यासाठी टॅप करू शकतात.
तुम्ही आणि तुमचे गेस्ट्स दोघांनाही वाचल्याची पावती मिळेल, जेणेकरून एखादा मेसेज पाहिला गेला की नाही हे तुम्हाला कळेल. तसेच, तुम्ही आता नवीन झटपट उत्तरांचा वापर करून चेक आऊट सूचना लवकर शेअर करू शकता.
नवीन को-होस्ट्सना आमंत्रित करणे सोपे आहे आणि तुम्ही केवळ टॅप करून या को-होस्ट परवानग्या सेट करू शकता — पूर्ण ॲक्सेस, कॅलेंडर आणि इनबॉक्स, किंवा फक्त कॅलेंडर निवडा. तुमच्या को-होस्टसह पेआऊट्स कॉन्फिगर करणे आणि शेअर करणे देखील आता शक्य आहे.
नवीन पद्धतीच्या खाजगी रूम्स—बुक करण्यापूर्वी तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी गेस्ट्सना उपयोगी पडेल असा होस्ट पासपोर्ट आणि तुमची लिस्टिंग उंचावणारे सर्च टूल्स.