मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जच्या सरासरी भाड्यांची तुलना कशी करावी

तुमच्यासारख्या जागांचे सरासरी भाडे दाखवणारा मॅप झटपट ॲक्सेस करा.
Airbnb यांच्याद्वारे 7 ऑग, 2024 रोजी
वाचण्यासाठी 1 मिनिट लागेल
11 नोव्हें, 2024 रोजी अपडेट केले

होस्ट्सनी आम्हाला सांगितले की किती भाडे आकारावे हे जाणून घेणे कठीण असू शकते. मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करणारे टूल तुम्हाला जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जच्या सरासरी भाड्यांशी तुमच्या भाड्याची तुलना करू देते.

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्य आणि सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात, “माझे भाडे स्पर्धात्मक आहे की नाही हे मी नेहमीच तपासत असते, म्हणून मला पाहायचे आहे की माझ्या भागातील इतर होस्ट्सना प्रति रात्र किती भाडे मिळत आहे”. “हे वैशिष्ट्य एक गेम चेंजर आहे.”

मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी:

  1. तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरमधील भाडे टॅबवर जा.
  2. 31 दिवसांपर्यंतची तारखेची रेंज निवडा.
  3. मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्ज पहा वर टॅप करा.

तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे दिसेल. नकाशावरील बटणे वापरून तुम्ही बुक झालेल्या किंवा न झालेल्या लिस्टिंग्ज पाहू शकता.

नकाशावर दाखवलेली भाडी निवडलेल्या तारखांसाठी प्रत्येक लिस्टिंगचे बुक केलेले किंवा बुक न केलेले सरासरी भाडे दर्शवतात. कोणत्या लिस्टिंग्ज मिळत्या-जुळत्या आहेत हे ठरवणाऱ्या घटकांमध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना गेस्ट्सने बघितलेल्या इतर लिस्टिंग्ज समाविष्ट असतात.

ही माहिती तुम्हाला स्थानिक भाडी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. ती तुम्ही कधीही तुमचे भाडे सेट करत असताना किंवा अपडेट करत असताना वापरू शकता.

भाडी सर्च रिझल्ट्सवर मोठा प्रभाव टाकू शकतात. जवळपासच्या इतर मिळत्या-जुळत्या सुविधा आणि गेस्ट क्षमता असलेल्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडी असणाऱ्या लिस्टिंग्ज अधिक उच्च रँकिंगवर असतात. तुमचे भाडे अ‍ॅडजस्ट केल्याने तुम्हाला गेस्ट्सपर्यंत पोहोचण्यात आणि अधिक कमाई करण्यात मदत होऊ शकते.

पब्लिश केल्यानंतर या लेखातील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.

Airbnb
7 ऑग, 2024
हे उपयुक्त ठरले का?