Airbnb मध्ये ॲक्सेसिबिलिटी
आमच्याबरोबर प्रवास करणे आम्ही असे सोपे करत आहोत.
सुलभ कॅटेगरी
घर, बेडरूम आणि बाथरूममध्ये पायरी - विरहीत मार्ग असलेली व्हेरिफाईड अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसह अनोखी घरे शोधा. या श्रेणीतील प्रत्येक घराचा त्याची ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये कन्फर्म करण्यासाठी तपशीलवार 3D स्कॅन केला जातो ज्यात दरवाजाच्या रुंदीसारख्या बारीक तपशीलांचे प्रदर्शन केले जाते.

सुधारित शोध फिल्टर्स
आणखी चांगला शोध अनुभव देण्यासाठी आम्ही आमचे ॲक्सेसिबिलिटी फिल्टर्स सुलभ केले आहेत.

ॲक्सेसिबिलिटी रिव्ह्यू
वास्तव्याच्या जागेच्या होस्ट्सने अचूकतेसाठी सबमिट केलेल्या प्रत्येक ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याचा आम्ही रिव्ह्यू करतो.

होस्ट्ससह 1:1 मेसेजिंग
त्यांच्या वास्तव्याच्या किंवा अनुभवाच्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांविषयी अधिक माहितीसाठी होस्ट्सशी थेट बोला.


आम्ही Airbnb ला अधिक ॲक्सेसिबल कसे बनवत आहोत
स्वतंत्र टीम्स
Airbnb मध्ये अशी टीम आहे जी सर्वजण वापरू शकतील अशी उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. आमची उत्पादने ॲक्सेसिबिलिटी लक्षात घेऊन तयार केली गेली आहेत हे सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी या टीम्स संपूर्ण कंपनीतील अभियंते, डिझाइनर आणि इतरांसह काम करतात.
संशोधन आणि समर्थन
आम्ही ॲक्सेसिबिलिटीच्या गरजा असलेल्या लोकांशी बोलून संशोधन करतो आणि कम्युनिटीमधील तज्ञांसह काम करतो.
डिजिटल ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड्स
आम्ही वेब कंटेंट ॲक्सेसिबिलिटी मार्गदर्शक तत्त्वांद्वारे ठरवलेल्या डिजिटल ॲक्सेसिबिलिटी स्टँडर्ड्सच्या दिशेने काम करत आहोत. आम्हाला अधिक समस्या शोधण्यात मदत करण्यासाठी आम्ही स्वयंचलित चाचणी साधनांमध्ये देखील गुंतवणूक करत आहोत.