कोविड -19 महामारीच्या काळात, आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल यांच्या मार्गदर्शनाच्या आधारे, Airbnb लिस्टिंग्जमधील होस्ट्स आणि गेस्ट्स, दोघांसाठी अनिवार्य कोविड -19 सुरक्षा पद्धतींचा एक संच तयार केला आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही कोविड -19 पासून सुरक्षित राहण्यासाठी सामान्य आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांशी परिचित असले पाहिजे, लागू सरकारी प्रवास निर्बंध आणि सल्ल्यांवर लक्ष ठेवणे सुरू ठेवले पाहिजे आणि सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक कायद्यांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
Airbnb ने आरोग्य आणि सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोग्राम्स सादर केले आहेत, परंतु हे उपाय सर्व जोखीम दूर करू शकत नाहीत. तुम्ही उच्च जोखीम कॅटेगरीमध्ये असल्यास (उदा.: 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक किंवा मधुमेह किंवा हृदयरोग यासारखे पूर्व - विद्यमान वैद्यकीय स्थिती असलेले लोक असल्यास), तुम्ही Airbnb वर वास्तव्याची जागा किंवा अनुभव बुक करण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही व्यावसायिक मार्गदर्शन घेण्याची आणि अतिरिक्त खबरदारी घेण्याची शिफारस करतो. Airbnb अनुभवांचे होस्ट्स आणि गेस्ट्स साठी आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांबद्दल अधिक जाणून घ्या.
स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असल्यास, सर्व होस्ट्स आणि गेस्ट्सनी हे करणे आवश्यक आहे:
सर्व होस्ट्स आणि गेस्ट्सनी लागू नियमांनुसार गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान Airbnb ची 5 - पायऱ्यांची सुधारित स्वच्छता प्रक्रिया यासह कोविड -19 सुरक्षा पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे वारंवार उल्लंघन करणारे कोणतेही होस्ट किंवा गेस्ट अकाऊंट सस्पेंशन किंवा कम्युनिटीमधून काढून टाकण्यासह इतर परिणामांना सामोरे जाऊ शकतात.
आमच्या कम्युनिटीच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी, होस्ट्सनी (आणि त्या सर्व लोकांनी जे वास्तव्याच्या आधी किंवा दरम्यान लिस्टिंगमध्ये उपस्थित असू शकतात) त्यांच्या लिस्टिंग्जमध्ये प्रवेश करू नये किंवा त्यांच्या गेस्ट्ससह संवाद साधू नये आणि गेस्ट्सनी खालीलपैकी कोणतेही सत्य असल्यास, लिस्टिंगमध्ये चेक इन करू नये:
कोविड -19 महामारीच्या काळात जबाबदारीने प्रवास कसा करावा याबद्दलच्या अधिक तपशीलांसाठी, आमचा विलगीकरण आणि अलगीकरण वास्तव्यावरील लेख पहा.
तुमचे हात वारंवार धुण्याचे सुनिश्चित करा, विशेषकरून जेव्हा तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनच्या बाहेरच्या लोकांशी संपर्कात असल्यास आणि शेअर केलेल्या जागेत किंवा कॉमन एरियात पृष्ठभाग आणि भांडी स्पर्श करत असल्यास.
जेव्हा तुम्ही कॉमन एरियामध्ये किंवा शेअर केलेल्या जागेत असता (होस्ट किंवा गेस्ट म्हणून), तेव्हा मास्क घालण्याच्या आणि तुमच्या रिझर्व्हेशनचा भाग नसलेल्या कोणत्याही व्यक्तीपासून सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या तुमच्या स्थानिक कायद्यांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. जेव्हा शक्य असेल तेव्हा होस्ट्सनी संपर्क टाळणारा चेक इन देण्याचा विचार केला पाहिजे.
लक्षात ठेवा, तुम्हाला खाजगी रूममध्ये किंवा शेअर केलेल्या जागेत राहणे सोयीस्कर वाटत नसेल तर, त्याऐवजी संपूर्ण जागा बुक करण्याचा विचार करा. तुम्हाला खाजगी रूम किंवा शेअर केलेल्या जागेचे होस्टिंग करण्यास सोयीस्कर वाटत नसेल तर, तुम्ही तुमची संपूर्ण जागा लिस्ट करू शकता किंवा ते शक्य नसल्यास तुमचे होस्टिंग स्थगित करू शकता.
होस्ट्सनी खाजगी रूम्स, शेअर केलेल्या जागेच्या होस्टिंगविषयी आणि लिस्टिंगमध्ये एकत्र येण्याची परवानगी असलेल्या एकूण लोकांच्या संख्येविषयी स्थानिक मार्गदर्शक तत्त्वांचे देखील पालन करणे आवश्यक आहे.
टीप: Airbnb ने Airbnb ने Airbnb लिस्टिंग्जमध्ये सर्व पार्ट्या आणि इव्हेंट्सवर जागतिक बंदी कायम ठेवली आहे. अधिक माहितीसाठी आमचे पार्टी आणि इव्हेंट्स धोरण वाचा.
खाजगी रूम्स किंवा शेअर केलेली जागा असलेल्या लिस्टिंग्जच्या होस्ट्सनी हेदेखील करणे आवश्यक आहे:
काही सरकारे खाजगी किंवा शेअर केलेल्या रूम्सच्या होस्टिंगवर निर्बंध घालू शकतात किंवा त्या जागांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या किंवा आवश्यकता लागू करू शकतात. कृपया तुमच्या स्थानिक न्याय क्षेत्रातील सरकारी आणि/किंवा आरोग्य प्राधिकरणाच्या कोणत्याही अतिरिक्त सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मार्गदर्शनाचा आढावा घेणे आणि त्याचे पालन करणे सुनिश्चित करा.
तुमची अलीकडील कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली असल्यास किंवा कोविड -19 ची कोणतीही लक्षणे दिसू लागली असल्यास, वैद्यकीय व्यावसायिकांशी संपर्क साधा आणि संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, त्या सर्वांना माहिती देण्याचा विचार करा जे यामुळे प्रभावित झाले असतील किंवा तुमच्या संपर्कात आले असतील.