सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कम्युनिटी धोरण

होस्ट्स आणि त्यांच्या वास्तव्याच्या जागांबद्दल काय अपेक्षित आहे

प्रत्येक होस्टने या स्टँडर्ड्सची पूर्तता केली पाहिजे जेणेकरून त्यांच्या गेस्ट्सना आरामदायक, विश्वासार्ह अनुभव मिळेल.

  • विश्वासार्ह कम्युनिकेशन: होस्ट्स प्रतिसाद देणारे असले पाहिजे आणि गेस्ट्सकडून किंवा Airbnb कडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे वाजवी वेळेत देण्यास तयार असले पाहिजे आणि त्यांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी Airbnb कडून सुचवण्यात आलेल्या कोणत्याही आवश्यक पायऱ्यांचे पालन केले पाहिजे.
  • अचूक लिस्टिंग्जःहोस्टची प्रॉपर्टी, लोकेशन, लिस्टिंगचा प्रकार, प्रायव्हसी लेव्हल आणि सुविधा हे सर्व बुकिंगच्या वेळी लिस्टिंगच्या वर्णनात लिहिल्याप्रमाणेच असायला हवेत. होस्ट्स केवळ गेस्ट्सच्या संमतीनंतरच स्वीकारलेल्या बुकिंगसाठी तपशील अ‍ॅडजस्ट करू शकतात.
  • सुरक्षित वास्तव्याच्या जागा: सुरक्षित लिस्टिंग राखण्यासाठी होस्ट्स जबाबदार आहेत. प्रवेशाच्या सर्व मुख्य मार्गांसाठी किल्ली किंवा ॲक्सेस कोड दिले गेले पाहिजेत.
  • विश्वसनीय चेक-इन: होस्ट्सनी चेक इन करण्याच्या वेळी गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याच्या जागेत ॲक्सेस मिळवण्यासाठी योग्य माहिती (उदा. योग्य ॲक्सेस कोड्स, स्पष्ट दिशानिर्देश) पुरवणे आवश्यक आहे. चेक-इनच्या वेळी गेस्ट्सना भेटण्याचे ठरवणाऱ्या होस्ट्सनी ते ठरलेल्या वेळी उपस्थित असतील याची खात्री करणे आवश्यक आहे. लॉकबॉक्सेस किंवा एंट्री कोड्सचा वापर सुरक्षित असणे आवश्यक आहे (उदा. दोन रिझर्व्हेशन्सच्या दरम्यान कोड्स बदलणे).
  • स्वच्छ वास्तव्याच्या जागा: होस्टची प्रॉपर्टी आरोग्याच्या ज्ञात धोक्यांपासून (उदाहरणार्थ बुरशी, कीटक, व्हर्मीन) मुक्त असणे आवश्यक आहे, स्वच्छतेच्या उच्च मानकांची पूर्तता करणे आणि दोन वास्तव्यांदरम्यान स्वच्छ करणे आवश्यक आहे.
  • सुरक्षित वास्तव्याच्या जागा: त्यांचे लिस्टिंग सुरक्षिततेला असलेल्या संभाव्य धोक्यांपासून (उदा. आगीतून बाहेर पडण्याचे रस्ते बंद असणे, विजेचा धक्का लागण्याची, उंदराचे विष यांची जोखीम असणे,) मुक्त राखणे ही होस्ट्सची जबाबदारी आहे. लिस्टिंगमध्ये अंतर्भूत असलेले धोके (उदाहरणार्थ, जास्त उंचीवर असणे, पाण्याचे स्रोत) लिस्टिंगच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, लागू असलेले सर्व कायदे आणि नियमांचे होस्ट्सनी पालन करणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, लिस्टिंगने लागू असलेल्या फायर कोडच्या आवश्यकतांची पूर्तता केली पाहिजे). लिस्टिंगशी संबंधित सुरक्षा माहितीबद्दलअधिक जाणून घ्या.
  • अधिकृतता: Airbnb चे सर्व होस्ट्स होस्टिंग करण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे आणि होस्ट्सनी लागू असलेल्या सर्व कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. थर्ड पार्टीचा वापर करून हॉटेल किंवा थर्ड पार्टी निवासाचे बुकिंग करणे आणि ते Airbnb वर लिस्ट करणे याला परवानगी नाही. Airbnb वर या प्रकारच्या निवासस्थानांचे लिस्टिंग करायचे की नाही याचा विचार करताना होस्ट्सनी टाइमशेअर किंवा तत्सम निवास प्रकारांसाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
  • पशु कल्याण: प्राण्यांचे शोषण करणाऱ्या वास्तव्याच्या जागा किंवा अनुभवांना आमच्या कम्युनिटीत स्थान नाही (उदा. रस्त्याकडेची प्राणीसंग्रहालये, ट्रॉफी शिकारींशी संबंधित अनुभव). होस्ट्सनी Airbnb च्या पशु कल्याणाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचीपूर्तता करणे आवश्यक आहे. होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांबद्दलअधिक जाणून घ्या.

होस्ट्ससाठीच्या मुख्य नियमांबद्दलअधिक जाणून घ्या .

आम्ही येथे तुमच्या मदतीसाठी आहोत

जर तुम्हाला आमच्या धोरणांविरुद्ध वर्तन होत असल्याचे दिसले किंवा जाणवले तर, कृपया आम्हाला कळवा.

या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये प्रत्येक संभाव्य परिस्थितीचा समावेश नसला तरी, ते Airbnb च्या कम्युनिटी धोरणांविषयी सामान्य मार्गदर्शन देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत.

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

  • लीगल टर्म्स

    Airbnb कायदा अंमलबजावणी पोर्टल डेटा गोपनीयता सूचना

    डेटा प्रायव्हसी नोटिसचा हेतू एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक डेटाच्या विविध पैलूंबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आहे, हा डेटा Airbnb Ireland Unlimited Company यांच्याकडे असतो.
  • नियम • होस्ट

    माझ्या शहराला कोणते नियम लागू होतात?

    आम्ही कायदेशीर सल्ला देत नाही, परंतु आमच्याकडे काही उपयुक्त बाबी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या न्याय क्षेत्रातील कायदे आणि नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करू शकतात.
  • नियम • होस्ट

    अमेरिकेमध्ये जबाबदार होस्टिंग

    आम्ही Airbnb होस्ट्सना होस्टिंगशी निगडीत जबाबदाऱ्यांची ओळख करून घ्यायला मदत करतो आणि विविध कायदे, नियम आणि सर्वोत्कृष्ट पद्धतींविषयी सर्वसाधारण माहिती थोडक्यात देतो.
तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा