सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कसे-करावे

Airbnb सेवा शुल्क

Airbnb सहजपणे चालवण्यात मदत करण्यासाठी आणि 24/7 ग्राहक सपोर्टसारख्या सेवांचा खर्च कव्हर करण्यासाठी, बुकिंग कन्फर्म झाल्यावर आम्ही सेवा शुल्क आकारतो.

वास्तव्यासाठी 2 भिन्न शुल्क संरचना आहेत: विभाजित शुल्क आणि केवळ-होस्ट शुल्क.

1. विभाजित-शुल्क

ही शुल्क संरचना सर्वात सामान्य आहे आणि होस्ट आणि गेस्ट यांच्यात विभाजित आहे.

होस्ट शुल्क

बहुतेक होस्ट्स 3% शुल्क देतात, परंतु काही होस्ट्स जास्त पैसे देतात, ज्यात इटलीमध्ये लिस्टिंग्ज असलेल्या काही होस्ट्सचा समावेश आहे. हे शुल्क बुकिंग उप-बेरीज मधून मोजले जाते (बुकिंग उप बेरीजमध्ये रात्रीचे भाडे आणि होस्टने आकारलेले कोणतेही अतिरिक्त शुल्क समाविष्ट असते, परंतु गेस्ट सेवा शुल्क आणि कर वगळले जातात) आणि होस्ट पेआऊटमधून आपोआप वजा केले जाते.

बुकिंगसाठी असलेल्या होस्ट सेवा शुल्काचा आढावा घ्या

डेस्कटॉपवर होस्ट सेवा शुल्क शोधा

  1. आज > मेनू > कमाई वर क्लिक करा
  2. रिझर्व्हेशन कोड निवडा
  3. होस्ट पेआऊट अंतर्गत, होस्ट सेवा शुल्क
    शोधा

गेस्ट सेवा शुल्क

गेस्ट सेवा शुल्क, भाडे विवरण मध्ये तुमचे रिझर्व्हेशन बुककरण्यापूर्वी मिळू शकते.

टीपः 1 एप्रिल 2024 पासून, आम्ही खाली वर्णन केल्याप्रमाणे क्रॉस-करन्सी बुकिंग्जसाठी आमच्या गेस्ट सेवा शुल्कामध्ये अतिरिक्त रक्कम समाविष्ट करतो.

बहुतेक गेस्ट सेवा शुल्क बुकिंग उप-बेरीजच्या 14.2% पेक्षा कमी असतात (बुकिंग उप बेरीजमध्ये रात्रीचे भाडे आणि होस्टने आकारलेले कोणतेही अतिरिक्त शुल्क समाविष्ट असते, परंतु गेस्ट सेवा शुल्क आणि कर वगळले जातात). गेस्ट सेवा शुल्क विविध घटकांवर आधारित बदलते आणि बुकिंगच्या आधारावर जास्त किंवा कमी असू शकते. 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या काही वास्तव्यांसाठी गेस्ट सेवा शुल्क कमी केले जाते.

ज्या बुकिंग्जसाठी, होस्टने त्यांच्या लिस्टिंगसाठी सेट केलेल्या चलनाऐवजी वेगळे चलन वापरून गेस्ट पैसे देतात, त्यासाठी आम्ही आमच्या गेस्ट्सना देत असलेल्या मूल्यासमान आमचे शुल्क ॲडजस्ट करतो. या क्रॉस-करन्सी बुकिंग्जसाठी, गेस्ट सेवा शुल्कामध्ये अतिरिक्त रक्कम समाविष्ट असेल, परिणामी बुकिंग उप-बेरीजच्या 16.5% पर्यंत गेस्ट सेवा शुल्क असू शकेल.

2. केवळ-होस्ट शुल्क

या संरचनेसह, संपूर्ण शुल्क होस्ट पेआऊटमधून वजा केले जाते. हे सहसा 14 -16% असते, पण अत्यंत कठोर कॅन्सलेशन धोरण असलेले होस्ट्स जास्त पैसे देण्याची शक्यता असते आणि 28 रात्री किंवा त्याहून अधिक रात्रींच्या वास्तव्यासाठी शुल्क कमी असू शकते.

पारंपारिक आदरातिथ्य लिस्टिंग्ज–जसे की हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट्स इ. तसेच सॉफ्टवेअर-कनेक्ट केलेल्या होस्ट्ससाठी हे शुल्क अनिवार्य आहे (जर त्यांच्या बहुतेक लिस्टिंग्ज यूएसए, कॅनडा, बहामास, मेक्सिको, अर्जेंटिना, तैवान किंवा उरुग्वेमध्ये नसतील तर).

व्हॅट शुल्क

लागू न्यायक्षेत्रातील कायद्यांनुसार, वरील शुल्कासाठी व्हॅट लागू होऊ शकतो. सेवा शुल्क, जेथे लागू असेल तेथे, व्हॅटसह आहे.

आम्ही कोणत्याही वेळी आमच्या सेवा शुल्कामध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवतो आणि कोणतेही बदल आमच्या सेवेच्या अटींनुसार केले जातील.

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

  • कसे-करावे • गेस्ट

    सेवा शुल्काचे रिफंड्स

    सर्व निकषांची पूर्तता होत असल्यास सेवा शुल्क रिफंड केले जाऊ शकते. रिफंड मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • कसे-करावे • गेस्ट

    भाडे कसे ठरवले जाते

    रिझर्व्हेशनचे एकूण भाडे कसे मोजले जाते
  • कसे-करावे • होस्ट

    तुमच्या पेआऊटचा हिशोब करणे

    गेस्टच्या वास्तव्यासाठी तुम्हाला मिळणारे पेआऊट म्हणजे तुमचे प्रति रात्रीचे भाडे अधिक तुमचे ऐच्छिक अतिरिक्त शुल्क (जसे की स्वच्छता शुल्क) वजा होस्ट सेवा शुल्क.
तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा