तुमच्या होस्ट पासपोर्टची ताकद वापरून बघा
गेस्ट्सनी आम्हाला सांगितले आहे की त्यांना रूम रिझर्व्ह करण्यापूर्वी हे जाणून घ्यायचे आहे की ते कोणाबरोबर जागा शेअर करणार आहेत. होस्ट पासपोर्ट हा स्वतःची ओळख करून देण्याचा आणि गेस्टच्या अपेक्षांना योग्य दिशा देण्याचा एक मार्ग आहे.
होस्ट पासपोर्ट म्हणजे काय?
होस्ट पासपोर्ट तुमच्या प्रोफाईलमधून महत्त्वाचे तपशील काढून ते रूम्सच्या सर्च रिझल्ट्समध्ये हायलाईट करतो. तुम्ही तुमच्याबद्दल शेअर केलेली प्रत्येक गोष्ट वाचण्यासाठी गेस्ट्स तुमच्या फोटोवर टॅप करू शकतात. किंवा थेट तुमच्या लिस्टिंग पेजवर जाऊन, “तुमच्या होस्टना भेटा” या शीर्षकाखाली त्यांना तशाच प्रकारची माहिती मिळू शकेल.
तुमच्या होस्ट पासपोर्टच्या वरच्या भागात तुमचे नाव, किती वर्ष होस्टिंग करत आहात, स्टार रेटिंग आणि गेस्टच्या रिव्ह्यूजची संख्या यासारखे तपशील दिसतात. त्यानंतर तुम्हाला हवे ते वैयक्तिक तपशील तुम्ही समाविष्ट करू शकता, जसे की तुमचे काम, छंद, तुम्हाला येणार्या भाषा, एखादी मजेदार गोष्टी, तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव आणि तुमच्या येथे राहण्यात काय खास आहे वगैरे.
तुमच्या पासपोर्टमध्ये तपशील जोडण्यासाठी तुमच्या प्रोफाईलमध्ये बदल करा. सुरुवातीलाच चांगला प्रभाव पाडायचा असेल तर फोटो घेण्याच्या या टिप्स वापरून पहा.
माझा पासपोर्ट गेस्ट्सना कसा सपोर्ट करतो?
तुमचा होस्ट पासपोर्ट गेस्ट्ससोबत विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमची आवड, कामाचे स्वरूप किंवा संगीतातील आवड एकसारखी आहे हे कळल्यावर मनात एक आपलेपणाची भावना निर्माण होते.
“होस्ट माझे चांगले मित्र असण्याची गरज नाही, पण ते असे कोणीतरी असावे ज्यांच्याबरोबर जागा शेअर करताना मला छान वाटेल,” असे ओक्लाहोमा सिटीमधील गेस्ट स्टेसी म्हणतात. “होस्ट पासपोर्टमुळे ते एका माणसाच्या रूपात दिसतात आणि भेटीसाठी योग्य वातावरण निर्माण होते.”
आधीच जास्त तपशील मिळाले तर गेस्ट्सना तुमची जागा त्यांच्या प्रवासाच्या गरजांसाठी योग्य आहे की नाही हे ठरवायला मदत होते ज्यामुळे तुमच्या दोघांचा वेळ आणि शक्ती वाचते. “यामुळे एकमेकांना सारखे मेसेजस पाठवायची गरज नाही आणि बुकिंग आणखी सोपं होऊन जातं, कारण आधीच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात,” असे स्टेसी म्हणतात.
जॉर्जियाच्या मॅकॉन शहरातील एक सुपरहोस्ट ख्रिस यांच्या मते, होस्ट पासपोर्ट हा गेस्ट्सबरोबरच्या पहिल्या भेटीतली औपचारिकता कमी करण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे. “माझा स्वभाव भिडस्त आहे आणि होस्ट पासपोर्टमुळे मी अधिक मोकळेपणाने वागू लागलो,” ते म्हणतात. “मी माझे प्रोफाईल मजेदार आणि समर्पक बनवण्याचा प्रयत्न करतो.”
आपल्या होस्ट पासपोर्टमध्ये ख्रिस नमूद करतात की ते एक निवृत्त ॲथलीट आणि सुपरहोस्ट ॲम्बेसेडर आहे. त्यांनी हे देखील शेअर केले आहे की:
ते गोल्फ खेळण्यात खूप वेळ घालवतात
त्यांच्याकडे प्रिन्सेस नावाची एक कुत्री आहे
त्यांचा जन्म 80 च्या दशकात झाला
ते कृष्णवर्णीयांसाठी असलेल्या दोन कॉलेज/युनिव्हर्सिटीजसाठी फुटबॉल खेळले आहेत
त्यांच्या इथे गेस्ट्ससाठी काॅफी बार आहे
तुमची रूम बुक करण्यापूर्वी गेस्ट्सना आणखी थोडी माहिती दिल्यास, तुम्हाला समान सवयी आणि आवडी असलेल्या गेस्ट्सना एकाच वेळी होस्ट करता येऊ शकते.
गेस्ट स्टेसीच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा मी वाचते की होस्ट कराओकेवर गाणी गाण्यात 'खूप वेळ घालवतात', तेव्हा मला कळते की या होस्टच्या गेस्टविषयीच्या अपेक्षा, Netflix चा आनंद घेण्यात 'खूप वेळ घालवणार्या' होस्टपेक्षा वेगळ्या असतील.”
तुमच्या Airbnb प्रोफाईलवर जाऊन आणि “बदल करा” निवडून किंवा खाली दिलेल्या बटणावर टॅप करून तुमचा होस्ट पासपोर्ट भरा.
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.