रूम्सच्या गेस्ट्सना स्थानिकांप्रमाणे प्रवास करण्यात मदत करणे
प्रवाशांना दुसऱ्याच्या घरात राहण्याचा परवडण्याजोगा पर्याय देण्याच्या दृष्टीने Airbnb ची सुरुवात झाली. ही कल्पना उचलून धरल्या गेली कारण यामुळे जगभरातील होस्ट्स आणि गेस्ट्सना अस्सल स्थानिक संस्कृतीच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होण्याचा मार्ग मिळाला आहे.
रूम्सची संकल्पना या परंपरेला प्रोत्साहन देत आहे. आता पहिल्यापेक्षा कितीतरी होस्ट्स, गेस्ट्सना स्थानिकांप्रमाणे प्रवास करता यावा म्हणून त्यांना मदत करत आहेत. ते असे अनेक प्रकारे करत आहेत, मग ते कुठे जायचे याविषयी सल्ला देणे असो किंवा अनपेक्षित क्षणांची जादू अनुभवणे असो.
जाणून घ्या तीन होस्ट्सनी कशा प्रकारे अविस्मरणीय संबंध निर्माण केले आहेत.
तुमचे आवडते स्थानिक स्पॉट्सची माहिती शेअर करणे
तुमच्या लिस्टिंगसाठी एकगाईडबुक तयार करून तुम्ही गेस्ट्सना तुमच्या भागाची ओळख करून देऊ शकता. गेस्ट्सबरोबर शिफारशी शेअर करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. गाईडबुक्स असलेल्या होस्ट्सना अधिक बुकिंग्ज मिळतात.
बरेच होस्ट वैयक्तिकरित्या शिफारशी देखील करतात. फिलाडेल्फियामध्ये आपल्या पत्नीसोबत रूम होस्ट करणारे रीड गेस्ट्सना रविवारी डिनरसाठी आमंत्रित करतात. ते त्यांच्यासाठी स्ट्यू बनवतात आणि मग विचारतात की त्यांना काय करायला आवडेल. मग ते “पारंपरिक नसलेल्या मस्त जागांविषयी,” सांगतात, जसे की जवळच पुस्तकांच्या भिंती असलेले कॅफे.
कधीकधी रीड गेस्ट्सना डान्ससाठी आमंत्रित करतात, कारण डान्स करणे हा त्यांचा आवडता विरंगुळा आहे. “थोडी मजा-मस्ती करण्यासाठी आम्ही काही गेस्ट्सबरोबर एका लॅटिन डान्ससाठी गेलो होतो,” ते सांगतात. पुढे ते असेही म्हणतात की आमच्यासाठी काही गेस्ट्स, “आता आमच्या मुलांसारखे झाले आहेत.”
गेस्ट्सना घरी असल्यासारखे वाटू देणे
गेस्ट्स तुमची रूम बुक करू शकतात कारण तुमचा होस्ट पासपोर्ट एक ओळखीची भावना निर्माण करतो, ज्यामुळे त्यांना तुमच्यासोबत राहण्यात संकोच वाटत नसावा.
ऑस्ट्रेलियातील फिट्झरॉय शहरात रूम होस्ट करणार्या निकोला सांगतात की त्यांना नवीन संस्कृती आणि कुझिन्स यांची आवड आहे. त्यांचा असा अनुभव आहे की काही गेस्ट्सना “एकत्र वेळ घालवणं आवडतं आणि त्यांना हे आपलंच घर असल्यासारखं वाटतं”.
त्या आणि त्यांचा भाऊ, जे मेलबर्नमधील एक प्रसिद्ध शेफ आहेत, कधीकधी गेस्ट्सना एकत्र जेवण बनवण्याविषयी सुचवतात. “आमच्याकडे एक कमर्शियल किचन आहे, त्यामुळे ते पास्ता किंवा पनिनी ब्रेड्स बनवू शकतात,” त्या सांगतात.
एका ग्रुपला इतके छान वाटले की त्यांनी निकोलाच्या लिव्हिंग रूममध्ये योगा केला. “त्यांनी जागेचा पुरेपुर आनंद घेतला हे पाहून मस्त वाटले,” असे त्या म्हणतात. व्यायामाची त्यांची आवड लक्षात घेऊन निकोला त्यांना जवळच्या एका पार्कमध्ये घेऊन गेल्या, जिथे त्यांनी झाडांवर चढण्यात आणि एक्सप्लोर करता येतील अशा इतर ठिकाणांबद्दल चर्चा करण्यात दुपार घालवली.
अनपेक्षित गोष्टी स्वीकारणे
तुम्हाला कशा प्रकारे गेस्ट्सशी संवाद साधायचा आहे याचा विचार करा आणि त्यांना आपली पसंत कळवा. तुम्हाला लोकांमध्ये मिसळणे पसंत असेल, तर तुमच्या मनमोकळेपणामुळे अर्थपूर्ण संबंध जोडले जाऊ शकतात.
न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये रूम होस्ट करणारे गार्थ म्हणतात की गेस्ट्सच्या येण्यामुळे त्यांना प्रवास न करता इतर संस्कृतीतील लोकांसोबत जास्त वेळ घालवता येतो. त्यांनी विचार केला, “लोकांनाच माझ्याकडे घेऊन आलो तर?”
फ्रान्सवरून आलेल्या गेस्ट्ससोबत घडलेला एक किस्सा, होस्ट म्हणून गार्थच्या आयुष्यातल्या सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक होता. एका मुलाच्या आईने गार्थना विचारले की तिच्या मुलाने त्यांच्यासोबत गॅरेजमध्ये वेळ घालवला तर चालेल का. “मी जे काही करत होतो ते त्याला मस्त वाटत होते,” असे गार्थ म्हणतात.
मग गार्थच्या डोक्यात दोघांनी मिळून एक प्रोजेक्ट करायचा विचार आला. “आम्ही एक लहान बोट बनवली आणि तिला रंग दिला,” ते म्हणतात. “फारच छान अनुभव होता तो, कारण त्याला इंग्रजी बोलता येत नव्हतं, पण आम्ही करत असलेल्या कामाची भाषा एकच होती.”
तुम्ही तुमच्या स्थानिक होस्टिंग क्लबमध्ये सामील होऊन होस्टिंगशी संबंधित आणखी काही किस्से जाणून घेऊ शकता आणि टिप्स मिळवू शकता. हे क्लब्ज होस्ट्सद्वारे आणि होस्टससाठी चालवले जातात, आणि इथे प्रत्यक्ष व व्हर्च्युअल मिटिंग्ज आयोजित केल्या जाता, निरंतर मदत केली जाते आणि Airbnb शी संबंधित बातम्या आणि प्रॉडक्ट अपडेट्स दिले जातात.
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.