तुमच्या रूम्सच्या गेस्ट्सशी संवाद साधणे

तुम्हाला गेस्ट्ससह किती मिसळायचे आहे हे त्यांना सांगा.
Airbnb यांच्याद्वारे 10 ऑग, 2023 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
10 ऑग, 2023 रोजी अपडेट केले

काही गेस्ट्स Airbnb वर रूम्स बुक करतात कारण त्यांना नवीन लोकांना भेटायला आवडते, तर काही एकटे राहणे पसंत करतात. तुम्हाला लोकांशी संवाद साधायला किती आवडते? तुम्ही तुमच्या लिस्टिंगच्या सेटिंग्जद्वारे गेस्ट्सना ही गोष्ट कळवू शकता.

तुमचे प्राधान्य सेट करणे

तुमच्या लिस्टिंगच्या सेटिंग्जमध्ये या चार प्रत्यक्ष संवादाच्या प्राधान्यांपैकी एक निवडा:

  • मला गेस्ट्सबरोबर मिळून-मिसळून राहणे आणि वेळ घालवणे आवडते.

  • मला गेस्टना प्रत्यक्ष भेटून त्यांचे स्वागत करायला आवडते पण इतर वेळी मला एकटे राहणे पसंत आहे.

  • मी प्रत्यक्ष उपस्थित नसेन आणि अ‍ॅपद्वारे संवाद साधणे पसंत करेन.

  • मला काहीही चालेल. मी गेस्ट्सच्या इच्छेनुसार करेन.

तुम्ही तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनात काही गोष्टी स्पष्ट करणारा तपशील देखील लिहू शकता, जसे की गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान त्यांना मदतीची गरज भासल्यास तुम्ही साधारणपणे कधी उपलब्ध असता.

गेस्ट्सशी संवाद साधणे

टोरोंटो शहरामध्ये रूम होस्ट करणार्‍या रिचर्डना गेस्ट्ससाठी आपल्या घराची दारे उघडी करायला आवडते. “हे फक्त विटा आणि सिमेंटचं घर नाही, त्याहून जास्त काहीतरी आहे,” ते म्हणतात. “इथे गेस्ट्सबरोबर अर्थपूर्ण संवाद साधला जातो - खुल्या मनाने लोकांचे म्हणणे ऐकले जाते.”

गेस्ट्स चेक इन करतात तेव्हा रिचर्ड त्यांचे मुख्य दरवाज्यात स्वागत करतात आणि त्यांना त्याच्या जागेची टूर करवतात. “मला वाटते की आपण सर्वजण आयुष्यात एका मानवीय घटकाच्या शोधात असतो,” असे ते म्हणतात. “मी त्यांना बाल्कनीपासून बार्बेक्यूपर्यंत सर्व गोष्टींचा ॲक्सेस देतो, त्यामुळे त्यांना आपल्या घरापासून दूर राहून देखील घरासारखे वाटते.”

रिचर्डना त्यांच्या गेस्ट्सना शहर दाखवायला देखील आवडते. “मला त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्यायला आवडतं,” असे ते म्हणतात. “मग मी त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि म्हणतो, ‘नेहमीच्या सिटी टूरमध्ये नसतील अशी काही विशेष आकर्षणे मी तुम्हाला दाखवतो.’ माझ्यामते प्रवासाइतका चांगला शिक्षक दुसरा कोणी नाही.”

स्वतःपुरते ठेवणे

पर्थ, ऑस्ट्रेलिया येथील होस्ट रूथ यांना गेस्ट्सचे स्वागत करायला आवडते. मग ती त्यांना तीन बेडरूम्स, दोन खाजगी बाथरूम्स आणि लिव्हिंग रूम यांचा सुईट दाखवते आणि हे सर्व मिळून त्यांची रूम तयार होते.

एका छोट्याशा टूरनंतर रूथ आपली जागा गेस्ट्सच्या हवाली करतात. लाँड्री करायची असते तेव्हाच त्या घराच्या त्या भागात जातात.

“मला वाटते पहिली भेट महत्त्वाची असते,” रूथ म्हणतात. “काही लोकांना अजिबात संवाद साधायचा नसतो, पण काहींना असतो, आणि अशा लोकांशी संवाद साधून फारच आनंद मिळतो. हे सुख अनपेक्षितपणेच मिळालं आहे”.

गेस्ट्सच्या लीडचे अनुसरण करणे

ब्राझीलमधील मासेयो शहराच्या होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्य डंडारा, गेस्ट्सनाच ठरवू देतात की त्यांना लोकांशी किती संपर्क ठेवायचा आहे. त्या म्हणतात की जेव्हा त्या गेस्ट्सना आपले घर दाखवतात तेव्हा ते किती बोलके आहेत यावरून त्या अंदाज बांधायचा प्रयत्न करतात. 

त्या नेहमीच टूरचा शेवट आपल्या बाल्कनीत करतात, जिथून त्या गेस्ट्सना आपल्या आवडत्या जागा दाखवू शकतात आणि काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे देऊ शकतात. त्या म्हणतात की कालांतराने गेस्ट्स खुलतात असा त्यांचा अनुभव आहे आणि काही इतके जवळ येतात की ते आता “कुटुंबाचा भाग” झाले आहेत.

डंडारा यांना वाटते की ब्रेकफास्टसाठी जेव्हा त्या आणि त्यांचे गेस्टस् एकत्र येतात तेव्हा त्यांच्या गप्पा रंगतात. प्रत्येकाचे काही ना काही योगदान असतं, जसे की फळं आणि केक्स. त्या म्हणतात की, “आणि मग काय - आपण एका जादुई क्षण साक्षीदार झालेलो असतो.”

या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.

Airbnb
10 ऑग, 2023
हे उपयुक्त ठरले का?