तुमच्या रूमचे भाडे ठरवण्यास मदत करण्यासाठी टूल्स आणि टिप्स
Airbnb वर रूम्स बुक करण्यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण हे आहे की त्या गेस्ट्सना परवडण्यासारख्या असतात. 2022 मध्ये जगभरातील 80% पेक्षा जास्त रूम्सचे प्रति रात्र भाडे $100 पेक्षा कमी होते, आणि त्यांचे सरासरी प्रति रात्र भाडे $67 इतके होते.*
तुमच्या भाड्यावर कायम तुमचेच नियंत्रण असते. Airbnb तुम्हाला असे टूल्स देते जे वापरून तुम्ही तुमचे भाडे सेट आणि ॲडजस्ट करू शकता.
जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करणे
तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे समजून घेणे म्हणजे तुमच्या लिस्टिंगचे योग्य भाडे ठरवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्यासारखे आहे.
जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी तुमच्या होस्टिंग कॅलेंडरवर जा. तारीख किंवा तारखेचा कालावधी निवडा, त्यानंतर तुमच्या प्रति रात्र भाड्यावर टॅप किंवा क्लिक करा. त्याखाली, मिळत्याजुळत्या लिस्टिंग्ज निवडा म्हणजे तुमच्यासारख्या लिस्टिंग्जची सरासरी भाडी दाखवणारा एक नकाशा दिसून येईल. तुम्ही निवडलेल्या तारखांना बुक झालेल्या किंवा बुक न झालेल्या जागा बघू शकता.
डाऊनटाऊन टोरोंटोमध्ये रूम होस्ट करणार्या रिचर्ड यांनी सुरुवात करताना लवकर गेस्ट्स मिळवण्यासाठी “स्पर्धकांपेक्षा थोडे कमी भाडे” आकारले. त्यांची ही कल्पना यशस्वी ठरली: ते म्हणतात की त्यांचे पहिले तीन महिने जवळजवळ पूर्णपणे बुक झाले होते.
“माझे भाडे अजूनही थोडे कमीच आहे, परंतु मला काय हवंय हे मला माहीत आहे,” असे रिचर्ड म्हणतात. “मी वेळोवेळी माझे भाडे थोड्या थोड्या प्रमाणात वाढवण्याचा विचार करत आहे.”
तुमचे लोकेशन विचारात घेणे
तुमच्या भागातील प्रवासाच्या ट्रेंड्सविषयी थोडेसे जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या जागेचे वाजवी भाडे ठरवण्यास मदत होऊ शकते. वीकेंडला येणारे प्रवासी, सीझनमध्ये येणारे प्रवासी, अस्थायी कर्मचारी आणि इतर प्रकारचे गेस्ट्स यांच्यासाठी “परवडणारे” या शब्दाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
फिलाडेल्फियामधील एक सुपरहोस्ट रीड यांनी पहिल्यांदा आपल्या तिसऱ्या मजल्यावरील फर्निश्ड बेडरूमचे भाडे ठरवताना स्थानिक बाजाराचे सर्वेक्षण केले. ते युनिव्हर्सिटीज आणि हॉस्पिटल्सजवळ राहत असल्याने, त्यांनी त्यांच्या रूमचे भाडे कमी बजेटवर येणार्या विद्यार्थी आणि इंटर्न्सच्या दृष्टीने ठरवले. “आम्ही संशोधन किंवा वैद्यकीय इंटर्नशिप करणार्या अनेक लोकांना होस्ट केले आहे आणि त्यांना अनेक आठवड्यांसाठी राहायला जागा हवी होती,” असे ते सांगतात.
रीड म्हणतात की भाडे कमी ठेवल्याने आणि दीर्घकालीन वास्तव्ये स्वीकारल्याने त्याचे कॅलेंडर पूर्णपणे बुक असते आणि त्यामुळेच वेळेआधी त्यांना आपले कर्ज फेडता आले आहे. “माझ्याकडे बुकिंग जास्त असते पण सारखी सारखी लिस्टिंगची साफसफाई करावी लागत नाही,” असे ते म्हणतात. “मी जास्त काम करण्याऐवजी हुशारीने काम करतो.”
सवलत जोडणे
दीर्घकालीन वास्तव्यांमध्ये स्वारस्य असणारे गेस्ट्स सवलती असलेल्या जागा शोधतात. रीड गेस्ट्सना बुकिंग करायला प्रोत्साहन देण्यासाठी साप्ताहिक आणि मासिक सवलती देतात. “आमच्या रूमकडे आकर्षित होणार्या बहुतांश लोकांना इथे कमीत कमी दोन आठवड्यांसाठी राहायचे असते,” असे ते म्हणतात.
तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती वापरून बघू शकता. हे पर्याय तुमच्या कॅलेंडरवरील भाडे टॅबमध्ये उपलब्ध असतील:
नवीन लिस्टिंगचे प्रमोशन. हे प्रमोशन तुमच्या पहिल्या 3 बुकिंग्जसाठी तुमच्या प्रति रात्र भाड्यावर 20% ची सूट देते. हे प्रमोशन वापरल्याने तुम्हाला गेस्ट्सचे रिव्ह्यूज लवकर मिळण्यात आणि होस्ट म्हणून तुमचा नावलौकिक होण्यात मदत होऊ शकते.
अर्ली बर्ड सवलत. ही सवलत काही काळ आधी बुक केलेल्या रिझर्व्हेशन्सवर लागू होते. किती आधी हे तुम्ही ठरवता, तुम्ही चेक इनपूर्वी एक महिना ते 24 महिन्यांपर्यंतचा कालावधी निवडू शकता. अर्ली बर्ड सवलती आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सचे लक्ष वेधून घेऊ शकतात.
अखेरची सवलत. ही सवलत जवळजवळ शेवटच्या क्षणी होणार्या रिझर्व्हेशन्सवर लागू होते. किती शेवटी हे तुम्ही ठरवता, तुम्ही चेक इनच्या आधी एक दिवस ते 28 दिवसांपर्यंतचा कालावधी निवडू शकता. रूम्समध्ये राहणारे गेस्ट्स हे अनेकदा सोलो प्रवासी असतात, आणि जोडपी किंवा कुटुंबांंच्या तुलनेत ते प्रवासाच्या तारखेच्या आसपास बुकिंग करण्याच्या बाबतीत अधिक लवचिक असतात.
साप्ताहिक आणि मासिक सवलती. साप्ताहिक सवलती 7 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या बुकिंग्जवर लागू होतात, आणि मासिक सवलती 28 किंवा त्याहून अधिक रात्रींच्या रिझर्व्हेशन्सवर लागू होतात. यामुळे तुमचे कॅलेंडर भरायला मदत होते आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागते.
वास्तव्याचा किमान आणि कमाल कालावधी सेट करताना नेहमी स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करण्याची खात्री करा. त्यानुसार तुम्ही तुमचा कमाल वास्तव्याचा कालावधी तुम्हाला वास्तव्याच्या जितक्या कालावधीसाठी सवलत जोडायची आहे, किमान तितक्या रात्रींसाठी अॅडजस्ट करू शकता.
*1 जानेवारी पासून 31 डिसेंबर 2022 पर्यंत शुल्क आणि टॅक्ससह प्रति रात्रीचे भाडे
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.