तुमची रूम्स लिस्टिंग कशी सेट अप करावी
तुमच्या रूम्सच्या लिस्टिंगच्या माध्यमातून तुम्ही गेस्ट्सना दाखवता की तुमच्या घरात राहण्याचा अनुभव कसा असेल. कोणत्या जागा खाजगी आहे, कोणत्या शेअर केल्या जातील आणि तुम्ही कशा प्रकारे गेस्ट्सशी संवाद साधणे पसंत करता याबद्दल तुम्ही तपशीलवार माहिती देऊ शकता.
तुमच्या लिस्टिंगमध्ये काय समाविष्ट करावे
गेस्ट्सना तुमची जागा शेअर करणे त्यांच्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित आहे की नाही हे ठरवायला मदत करण्याच्यादृष्टीने तुम्ही या लिस्टिंगच्या आणि बुकिंगच्या सेटिंग्जद्वारे माहिती जोडू किंवा अपडेट करू शकता:
लिस्टिंगचे वर्णन. तुमच्या घराच्या वेगळेपणाचे वर्णन करण्यासाठी हा विभाग वापरा. तुम्ही पुरवत असलेली प्रत्येक सुविधा निवडा आणि गेस्ट्सना कोणत्या जागा ॲक्सेस करता येतील, प्रॉपर्टीवर पाळीव प्राणी आहेत की नाहीत आणि तुमचा आजूबाजूचा परिसर कसा आहे यासारखे तपशील नमूद करा.
फोटो आणि कॅप्शन्स. प्रवेशद्वार आणि पार्किंगच्या जागांसह, गेस्ट्सना ॲक्सेस असलेल्या सर्व जागा फोटोत स्पष्टपणे दिसल्या पाहिजे. गेस्टना तुमची रूम त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवायला मदत होईल अशा सर्व गोष्टी हायलाईट करा.
रूम्स आणि जागा. बाथरूम खाजगी आहे की शेअर करावे लागेल, बेडरूमच्या दाराला लॉक आहे की नाही आणि गेस्टच्या वास्तव्यादरम्यान प्रॉपर्टीवर अजून कोण असेल याची माहिती गेस्ट्सना द्या.
घराचे नियम. गैरसमज होऊ नयेत म्हणून तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे ते स्पष्ट करा - जसे की तुमच्याकडे ठराविक वेळी शांतता पाळावी लागते का किंवा गेस्ट्सना पाळीव प्राणी आणायची परवानगी आहे का. गेस्ट्सनी तुमच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे आणि त्यांच्यामुळे समस्या निर्माण झाल्यास त्यांना Airbnb वरून काढून टाकले जाऊ शकते.
काही सोपे, उपयुक्त मार्ग देखील आहेत जे वापरून तुम्ही सर्व गेस्ट्सना आपलेपणाचा अनुभव देऊ शकता. स्पेनमधील होस्ट सल्लागार बोर्डाचे सदस्य डॅनियल आपल्या प्रोफाईलमध्ये लिहितात: “माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत.”
तुमच्या रूममध्ये काय समाविष्ट करावे
अशी जागा तयार करा जी सुखद आणि नीटनेटकी असण्याबरोबरच, तिथे तुमच्या गेस्टना आपले व्यक्तिगत सामान ठेवायला अडचण होणार नाही. प्रवासात तुम्हाला कशा कशाची गरज भासेल याचा विचार करा आणि नंतर त्या गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.
रूम्सच्या होस्ट्सचे म्हणणे आहे की विचार करून काहीतरी वेगळे केल्याने प्रत्येकाच्या वागण्यात एक सहजता येते आणि उत्तम रिव्ह्यूज मिळायला मदत होते. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी जागा. तुमच्या रेफ्रिजरेटर आणि पॅन्ट्रीमधली काही जागा फक्त गेस्ट्ससाठी राखून ठेवा, किंवा गेस्टच्या बेडरूममध्ये किंवा बेडरूम जवळ एक लहान फ्रीज आणि पॅन्ट्री सेट करा.
पेय बनवण्याची सोय. रूममध्ये पाणी, कॉफी, चहासहित कप आणि एक इलेक्ट्रिक केटल असणे सोयीस्कर आहे, खासकरून त्या गेस्ट्ससाठी जे एकटे राहणे पसंत करतात.
साऊंड प्रुफिंग. इयर प्लग्ज, स्लिपर्स, किंवा फॅन किंवा व्हाईट नॉईज मशीनने नको असलेले आवाज कमी करता येतात.
लॉक. बेडरूमच्या दरवाजाला लॉक असावे अशी गेस्ट्सची अपेक्षा असते. तुमच्या रूमला लॉक नसल्यास, एक लॉक बसवा.
ब्राझीलच्या मासेयो शहरात रूम होस्ट करणार्या, होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्य डंडारा म्हणतात, “बेडरूमच्या लॉकमुळे चांगली झोप मिळते आणि अनुभवाचा पूर्ण आनंद घेता येतो.”
गेस्ट्सना रिव्ह्यू देण्यास सांगा आणि त्यांच्या फीडबॅकनुसार बदल करा. बदल केल्यावर तुमची लिस्टिंग अपडेट करा.
या लेखात दिलेल्या माहितीत लेख पब्लिश झाल्यानंतर बदल झाला असल्याची शक्यता आहे.