निसर्गाची शक्ती, कम्युनिटी आणि दयाळूपणा
हायलाइट्स
जेव्हा मारिया चक्रीवादळाने पोर्टो रिकोला धडक दिली, तेव्हा एका आठवड्यानंतर हे वादळ कमी झाले; पण त्याचा परिणाम वर्षानुवर्षे टिकला
कार्मेन एक कम्युनिटी संघटक आणि केअरगिव्हर आहेत. चक्रीवादळ मारियामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले तेव्हा त्या विस्थापित झाल्या
Airbnb.org आणि SBP यांच्यातील भागीदारीद्वारे, कारमेन तिचे घर पुन्हा बांधले जात असताना जवळच्या Airbnb मध्ये राहिली.
कारमेन सुरीएलचे घर हे त्यांचे वैयक्तिक अभयारण्य आहे. हे हिरव्यागार कृष्णाफळाच्या झाडांनी भरलेले आहे, झाडाची पाने आकाशापर्यंत पोहोचत आहेत, समोरच्या गेटमधून ट्रॉपिकल फुले येतात आहेत आणि कोनी, एक कापसासारखा पांढरा ससा शांतपणे कारमेनच्या बागेचे रक्षण करतो आहे.
“त्याला मॉडेलिंग करायला आवडते,” कारमेन गंभीर, पण सुंदर अशा सस्याबद्दल विनोद करतात. मात्र कारमेन देखील एक मॉडेल आहे—एक रोल मॉडेल.
डोमिनिकन रिपब्लीकमध्ये जन्मलेल्या कारमेन वयाच्या 17 व्या वर्षापासून पोर्टो रिकोमध्ये वास्तव्यासाठी आहेत. त्या एक एकटी (नवरा नसलेली) आई आहेत. त्यांचा मोठा मुलगा इमॅन्युएलने आताच डोमिनिकन रिपब्लीकमध्ये परत जाऊन संसार थाटला आहे.
कारमेन वृद्धांची काळजी देखील घेतात, एक अशी भूमिका ज्यामुळे त्या निःस्वार्थ आणि संरक्षणात्मक असल्याचे देखील म्हटल्या जाते. आणि जेव्हा 2017 मध्ये मारिया चक्रीवादळाने पोर्टो रिकोवर धडक दिली, तेव्हा कारमेन आणि त्यांची कम्युनिटी पुन्हा सगळं सावरण्यासाठी आणि बरे होण्यासाठी एकत्र आले.
कार्मेन त्यांच्या कम्युनिटीमध्ये एक युनिफायर म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा कोणी वृद्ध आजारी पडले होते, तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी त्या वृद्ध व्यक्तीसाठी वस्तूंची व्यवस्था केली होती—बेडशीट्स, टॉवेल्स आणि इतर आवश्यक वस्तू. जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांनी त्यांची काळजी घेतली.
त्या म्हणतात की त्यांची कम्युनिटी खालील प्रकारे एकमेकांना नेहमी सपोर्ट करते: शेजारी डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्ससाठी घेऊन जातात, घरातील गोष्टी दुरुस्त करण्यासाठी मदत करतात आणि एकमेकांच्या कारसुद्धा दुरुस्त करतात. “इथे खूप संवेदनशीलता आहे,” कार्मेन हसते. “लोकांना मदत करायला खरोखर आवडते.”
कार्मेन मिरामार, सँटर्समधील एका अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या एका वृद्ध महिलेची काळजी घेत होत्या आणि मारिया चक्रीवादळादरम्यान त्या त्यांच्या सोबत राहिल्या. “मला सात दिवस सतत त्यांच्याबरोबर रहावे लागले, कारण रस्त्यांवर झाडे पडली असल्यामुळे त्यांची काळजी घेणारी दुसरी व्यक्ती कामावर येऊ शकली नाही,” कार्मेनने स्पष्ट केले.जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाणी आणि झाडांचे काही भाग कार्मेन यांच्या रुग्णाच्या बाल्कनीत पडले होते, तेव्हा त्यांनी रुग्णाच्या लक्षात येऊ न देता सर्व साफ करण्याचे सर्वोत्तम प्रयत्न केले. कार्मेनने त्यांना बाहेरच्या वादळाबद्दल कळू न देण्याचे ठरवले होते. पण तरीही त्यांना घरातून घोंगावणाऱ्या भयंकर वार्यांचा आवाज ऐकू येत होता.
“इतके शक्तिशाली चक्रीवादळ मी कधीच पाहिले नाही,” कार्मेन म्हणतात. “लोक तुम्हाला चक्रीवादळांबद्दल सांगतात, परंतु त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणे पूर्णपणे वेगळे आहे. ऐकण्यात आणि अनुभवण्यात खूप फरक असतो.”
कार्मेन घरी परतल्या तेव्हा त्यांच्या घराचे गंभीर नुकसान झाले होते. त्यांच्या घराचे छप्पर कोसळले होते, फ्लोअरबोर्ड पाण्याने भरले होते आणि त्या काही महिने वीजेशिवाय राहात होत्या.
मारिया चक्रीवादळाचा जोर एका आठवड्यात ओसरला, परंतु त्याचे दुष्परिणाम कित्येक महिने टिकले आणि पुढे वर्षानुवर्षे कायम राहिले. आसपासच्या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला, घरे उध्वस्त झाली आणि 3,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक पातळीवरील संस्था आपत्ती प्रतिसाद प्रयत्नांना सपोर्ट करण्यात आणि बेटाची पुनर्बांधणी करण्यात आघाडीवर होत्या.
म्युच्युअल एड ही एका कम्युनिटीद्वारे चालवली जाणार्री सिस्टम असून त्यामध्ये लोक संसाधने, पैसे आणि वेळ शेअर करून एकमेकांना सपोर्ट करतात. म्युच्युअल एडने पोर्टो रिकोच्या पुन्हा उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Airbnb.org भागीदार, SBP, आपत्ती प्रतिकार आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणारी एक सामाजिक प्रभावाची संस्था यांसारख्या ना-नफा संस्थांच्या बाबतीत आजही हे पाहिले जाते.
SBP ही एक ना-नफा संस्था असून ती मोठ्या आपत्तींनंतर घरांची पुनर्बांधणी करते. चक्रीवादळानंतर लगेचच डीप्लॉयमेंट टीम्स पाठवण्यात आल्या होत्या, परंतु पोर्टो रिको शाखेचे अधिकृत काम जुलै 2018 मध्ये सुरू झाले. लोकांच्या घरांचे नूतनीकरण चालू असताना त्यांना राहण्यासाठी जागा मिळणे सुनिश्चित करण्यासाठी SBP आणि Airbnb.org भागीदार म्हणून काम करतात.
आम्ही चक्रीवादळ-प्रवण झोनमध्ये आहोत, त्यामुळे आम्ही यापूर्वी वादळांचा आणि चक्रीवादळांचा अनुभव घेतला आहे. पण मारियाच्या अनुभवाइतका नाही,” SBP पोर्टो रिकोचे कार्यकारी संचालक आणि कारमेनच्या कम्युनिटीचे सदस्य, एडगार्डो मालडोनाडो म्हणतात.
कारमेन यांच्या आसपासचा परिसर ही SBP ने पोर्टो रिकोमध्ये मदत केलेल्यांपैकी पहिली कम्युनिटी होती आणि कारमेन यांचे घर हे एडगार्डोचे 2019 मधले पहिले काम होते. कारमेन यांच्या घरी काम सुरू होईपर्यंत कारमेन यांच्या घरात किती नुकसान झाले आहे याची एडगार्डो आणि SBP कंत्राटदारांना कल्पना नव्हती. त्यांच्या लवकरच लक्षात आले की लाकूड कुजत आहे आणि विद्युत वायरिंग आणि छप्पर बदलणे आवश्यक आहे
आपल्या कम्युनिटीच्या औदार्यामुळे कारमेन आणि त्यांचा कुत्रा एंजेल नावाच्या होस्टसोबत राहू शकले, ज्यांनी आसपासच्या परिसरातच त्यांची आरामदायक जागी राहण्याची सोय केली होती.
“मला वाटते कारमेनना हे कळले तेव्हा खूप आनंद झाला की त्या त्याच कम्युनिटीमध्ये राहणार आहेत,” एडगार्डो म्हणाला. जवळ असल्यामुळे कारमेनना त्यांच्या कुत्र्याला दररोज घरी आणता आले आणि पुनर्बांधणीच्या शेवटी, कारमेननी स्वयंसेवकांना आणि कंत्राटदारांना घर रंगवण्यात मदत केली.
“माझे घर तिथे कोणीही राहत नसल्यासारखे भयाण वाटत होते,” कारमेन म्हणाली. “आता घर छान दिसतं आहे आणि जास्त सुरक्षितही आहे. माझ्या शेजाऱ्यांनाही (इतर संस्थांकडून) काही मदत मिळाली. मला असं वाटतं की हा मदतीचा हात संपूर्ण कम्युनिटीला मिळाला आहे.”
कारमेन त्यांच्या वास्तव्याची आवडीने आणि आनंदाने आठवण काढतात. इतरांचे पालनपोषण करणारी एक केअरगिव्हर म्हणून, आता भूमिकेची अदलाबदल करण्याचा हा क्षण होता. घरात नसून आराम मिळणे; पण घरापासून खूप दूर नसणे, हा त्यांचा आवडता भाग होता. “ओह आणि एअर कंडिशनिंग,” कारमेन हसल्या.
कारमेननी आपला स्वभाव, आपली कम्युनिटी आणि आपल्या घराच्या सामर्थ्यावर विचार करून स्वतःला पुन्हा निसर्गाकडे आणले. “मी खूप संघर्ष आणि अडचणींचा सामना केला आहे. पण शेवटी मी वृश्चिक राशीची आहे,” असे त्या म्हणतात. “राशीचक्रानुसार आम्ही असे एकमेव आहोत ज्यांच्यात या तिघांचेही गुण आहेत: उडणारा पक्षी, सरपटणारा साप आणि विंचू. आम्ही जमिनीखालीसुद्धा जिवंत राहू शकतो.”
हायलाइट्स
जेव्हा मारिया चक्रीवादळाने पोर्टो रिकोला धडक दिली, तेव्हा एका आठवड्यानंतर हे वादळ कमी झाले; पण त्याचा परिणाम वर्षानुवर्षे टिकला
कार्मेन एक कम्युनिटी संघटक आणि केअरगिव्हर आहेत. चक्रीवादळ मारियामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले तेव्हा त्या विस्थापित झाल्या
Airbnb.org आणि SBP यांच्यातील भागीदारीद्वारे, कारमेन तिचे घर पुन्हा बांधले जात असताना जवळच्या Airbnb मध्ये राहिली.