त्वरित सपोर्ट करून युक्रेनच्या संकटाला तोंड देणे
हायलाइट्स
2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यानंतर काही महिन्यांतच 60 लाख लोक युक्रेनमधून सुरक्षिततेच्या शोधात बाहेर निघाले
Airbnb.org यांनी 1,00,000 लोकांना तात्पुरती घरे देण्याचे कबूल केले होते म्हणून होस्ट्सने त्यांची घरे उघडी करून दिली
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या एक आठवड्यानंतरच परफॉर्मर आणि होस्ट राफाल यांना दक्षिण-पश्चिमी पोलँडमधील त्यांच्या शहर व्रोत्सवामध्येही त्याचा प्रभाव जाणवला. त्यांच्या आसपासच्या परिसरात युक्रेनियन सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर दान केलेल्या वस्तूंच्या पेट्या ठेवण्यात आल्या. त्यांनी युक्रेनियन भाषा रस्त्यांवर आणि दुकानांमध्ये बोललेली ऐकली.
लवकरच युक्रेनमधील एकामागून एक तीन कुटुंबांनी Airbnb वर लिस्ट केलेले त्यांचे घर महिनाभरासाठी बुक केले. राफाल यांना युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांकडून पैसे घेणे योग्य वाटत नव्हते, त्यामुळे त्यांनी Airbnb ग्राहकसेवेशी संपर्क साधला, Airbnb.org त्यांची मदत करू शकते याची माहिती घेतली आणि साइन अप केले.
यूएन मानवाधिकार परिषदेच्या आकड्यांप्रमाणे, फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यानंतर सहा महिन्यांत 70 लाखपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केले. लक्षावधी कुटुंबे संपूर्ण युरोपमधील शहरांमध्ये पोहोचली, त्यांच्या हातांत फक्त काही सूटकेसेस होत्या आणि घरी परत कधी जायला मिळेल याची त्यांना कल्पनाच नव्हती.
संकटाला उत्तर देण्यासाठी Airbnb. org ने त्यांच्या ना-नफा भागीदारांना आणि जगभरातील होस्ट्सच्या कम्युनिटीला आव्हान केले की युक्रेनमधून येणाऱ्या 1,00,000 लोकांना तात्पुरती घरे देण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करू शकता का?
तेव्हापासून, जगभरातील होस्ट्सच्या सपोर्टमुळे, Airbnb.org च्या देणगीदारांमुळे आणि लोकांची खरी मदत करणाऱ्या मानवीय संस्थांच्या कामामुळे Airbnb.org ने हे ध्येय पूर्ण केले आहे.
प्रतिसाद देणाऱ्या लोकांपैकी काही जण राफालसारखेच दीर्घकाळापासून Airbnb होस्ट आहेत आणि ते या संकटाच्या प्रसंगी Airbnb.org च्या माध्यमाने सवलतीवर राहण्याची जागा उपलब्ध करून देतात. बर्लिनमध्ये राहणाऱ्या अमेरिकन डेटा वैज्ञानिक मेरी आणि त्यांच्यासारखे इतर लोक 40,000 नवीन होस्ट्सपैकी होते ज्यांनी निर्वासित गेस्ट्ससाठी Airbnb.org च्या माध्यमाने विनामूल्य किंवा सवलतीवर राहण्याची जागा उपलब्ध करून दिली.
तात्काळ मदत करण्याचा मार्ग शोधणे
राफाल म्हणतात की युक्रेनवरील आक्रमणामुळे पोलँडमध्ये त्यांच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीला धक्का बसला, परंतु युद्धातून पळून येणाऱ्या लोकांना त्यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी किती लवकर प्रतिसाद दिला हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. व्रोत्सवाच्या रेल्वे स्थानकावर लोकांनी अन्न दान केले आणि सामान गोळा करून युक्रेनच्या सीमेवर पाठवले.
त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून पैसे गोळा करण्यासाठी एक संगीताचा कार्यक्रम करायचे ठरवले, पण त्यांना यापेक्षा अधिक लवकर मदत करायची होती. "राहण्याची जागा नसणे, झोपण्याची जागा नसणे, आपली म्हणण्याची जागा नसणे ही सर्वात वाईट गोष्टींपैकी एक आहे," असे ते म्हणतात.
संकटांमुळे बेघर झालेल्या गेस्ट्सचे स्वागत करण्यासाठी राफालचे घर अजूनही Airbnb.org वर लिस्ट केलेले आहे. त्यांनी Airbnb.org च्या वेबिनार चे भाषांतर पोलिश भाषेत करण्यातही मदत केली आहे.
एक सुरक्षित जागा ऑफर करणे
बर्लिन हे व्रोत्सवापासून उत्तरपूर्वेकडे साधारण 215 मैल (350 किलोमीटर) लांब आहे, तिथे मेरी युक्रेनवरील आक्रमणाच्या बातम्या ऐकत होत्या. त्यांनी जेव्हा Airbnb.org चे आव्हान ऑनलाइन पाहिले, तेव्हा त्यांनी त्यांचे अपार्टमेंट विनामूल्य तिथे लिस्ट केले.
ऑर्गनायझेशन फॉर रिफ्यूज, असायलम अँड मायग्रेशन (ORAM) यांच्या एका कर्मचाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक वृत्तवाहिन्यांनी रिपोर्ट केल्याप्रमाणे, युक्रेनमध्ये आणि जवळपासच्या काही देशांमध्ये LGBTQ+ विरोधी वातावरण असल्याने या युद्धामुळे विस्थापित झालेल्या LGBTQ+ लोकांची परिस्थिती आणखीच बिघडलेली आहे. ORAM च्या प्रतिनिधीने मेरीला विचारले की दोन ट्रांसजेंडर लोक त्यांच्या जागेत राहू शकतात का.
LGBTQ+ गेस्ट्सना होस्ट करताना मेरी यांना आनंदच झाला. "मला माहीत होते की माझे अपार्टमेंट त्यांच्यासाठी विशेष सुरक्षित आहे," त्या म्हणतात.
संबंध जोपासणे
मेरीचे पहिले गेस्ट्स निघून गेल्यानंतर लगेचच दोन आठवड्यांसाठी डीमाचे आगमन झाले. विशीतला डीमा समलैंगिक पुरुष होता आणि रशियाने क्यीववर बाँबहल्ला केला त्यावेळी तो तिथे राहत होता. पोलँडमधून बर्लिनपर्यंतचा प्रवास करण्यात डीमा आणि त्यांचा बोका पीच यांची मदत केली सेफबो नावाच्या एका संस्थेने. तिथे आल्यावर ORAM यांनी त्यांच्यासाठी घर शोधले आणि सोशल सेवांसाठी त्यांचे रजिस्ट्रेशन केले.
अनेक अडथळे पार करून आलेल्या डीमासाठी मेरीच्या अपार्टमेंटमध्ये येणे हा फार मोठा दिलासा होता. “त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप भावूक झालो होतो,” ते सांगतात. “मला कळत नाही की माझ्यासाठी काय जास्त महत्त्वाचे होते: एका सुरक्षित जागी राहायला मिळणे किंवा मला किती मोठी मदत मिळत आहे याचा अंदाज घेणे.”
डीमा आल्यानंतर पहिला आठवडा मेरी यांना शहराबाहेर जावे लागले होते. त्या बर्लिनला परतल्यानंतर त्या दोघांचे चांगले जमू लागले. त्यांच्या किचनमधील टेबलावर जेवताना आणि बिअर पीत त्यांनी खूपसा वेळ एकत्र घालवला. डीमा दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये गेल्यावरही त्यांचा संपर्क तुटला नाही.
“माझ्या येथील वास्तव्यासाठी ही खूप मोठी मदत होती,” डीमा सांगतात.
बदल घडवून आणणे
मेरीला सारखे वाटत राहते की होस्टिंग किती सोपे होते. "मी विशेष काही केले नाही," त्या आवर्जून सांगतात. "मला संधी मिळाली. फारतर माझी फक्त थोडी गैरसोय झाली एवढेच."
याची तुलना त्या त्यांच्या गेस्टसच्या अनुभवांसोबत करतात: "जेव्हा मी अगदी अनोळखी ठिकाणी राहण्याबद्दल विचार करते, जिथे मला जायचेच नव्हते, कुटुंबापासून लांब राहवे लागत होते. ही बाब जास्त उल्लेखनीय आहे. हे महाकठीण आहे."
मेरीला वाटले नव्हते की त्यांच्या गेस्ट्ससोबत त्यांची मैत्री होईल, पण एक कम्युनिटी असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांना फार बरे वाटले.
"बरेचदा, आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाहीत," त्या सांगतात. "पण असे करून मी कमीतकमी एका व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते."
हायलाइट्स
2022 मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यानंतर काही महिन्यांतच 60 लाख लोक युक्रेनमधून सुरक्षिततेच्या शोधात बाहेर निघाले
Airbnb.org यांनी 1,00,000 लोकांना तात्पुरती घरे देण्याचे कबूल केले होते म्हणून होस्ट्सने त्यांची घरे उघडी करून दिली