संकटातून निसटून आलेल्या लोकांच्या होस्टिंगसाठी 7 सल्ले

Airbnb.org ज्यांनी आघात अनुभवला असेल अशा लोकांचे स्वागत करण्यासाठी व्यावहारिक सल्ला शेअर करते
Airbnb यांच्याद्वारे 25 ऑग, 2023 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
25 ऑग, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

जर तुम्ही यापूर्वी Airbnb वर होस्टिंग केलेले असेल, तर तुमच्या जागेमध्ये गेस्ट्सना आपलेसे कसे वाटेल याचा विचार करताना तुम्ही बहुधा अनेक तास घालवले असतील.

जेव्हा तुम्ही Airbnb.org वरून आपत्कालीन वास्तव्यांचे होस्टिंग करता, तेव्हा ज्या गेस्ट्सची मनःस्थिती चांगली नसेल त्यांचे स्वागत कसे करावे यावरही तुम्ही विचार करत असाल.

सुरक्षिततेच्या शोधात ज्या लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत, काही वेळातर अचानक तसे करावे लागले असेल, त्यांच्या अपेक्षा आणि काळज्या सुट्टी घालवणाऱ्या प्रवाशांपेक्षा निराळ्या असू शकतात. युद्ध आणि नैसर्गिक आपदांपासून लांब जाणाऱ्या लोकांची मदत करणाऱ्या ना-नफा संस्थांसोबत Airbnb.org ने भागीदारी केली याचे हे सुद्धा एक कारण आहे. या संस्था कधीकधी तुमच्या गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान मदतीच्या सेवा देतात.

जटिल समस्या उद्भवल्यास Airbnb.org कडे तुमच्यासाठी आणि तुमच्या गेस्ट्ससाठी विशेष प्रशिक्षण मिळालेल्या ग्राहक सपोर्ट टीम आहेत. ते गेस्ट्सना त्यांचे राष्ट्रीयत्व, वंश, वांशिकता किंवा त्यांची ओळख यांची पर्वा न करता मदत करतात.

तुमची जागा व्यवस्थित करण्यासाठी सल्ले

त्रासदायक अनुभवांमधून गेलेल्या कुटुंबांसाठी आरामशीर, सुरक्षित आणि खाजगी जागेचे महत्त्व निराळे सांगण्याची गरज नाही. स्वतःचे घर सोडल्यापासून यापैकी बऱ्याच लोकांकडे असे किचनसुद्धा नव्हते जिथे ते स्वयंपाक करू शकतील किंवा असे लिव्हिंग रूम नव्हते जिथे ते एकत्र बसू शकतील.

तुम्ही येथे दिलेली काही कामे करू शकता ज्यामुळे तुमची जागा अधिक स्वागतपर वाटेल:

  • लोकांना आराम वाटावा यासाठी तुमच्या जागेत उबदारपणा आणि सांत्वनाची भावना निर्माण करा. स्वच्छ बिछाने आणि टॉवेल्स, बाथरूममधील सामान आणि स्वयंपाकघरातील गरजेच्या गोष्टींमुळे लोकांना असे वाटू शकेल की ते फक्त काही दिवसच मुक्काम करत असले तरीही त्यांना कशाची कमतरता नाही.
  • काही गेस्ट्सना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेबद्दल चिंता असू शकते. आत येण्याचा रस्ता आणि दारांमध्ये चांगला प्रकाश आहे याची खात्री करा. सर्व कुलूपे, ब्लाइंड्स आणि पडदे काम करतात याची खात्री करा. जर घरावरून जाणाऱ्या विमानांचे आवाज किंवा पहाटे लवकर येणाऱ्या कचरागाडीचे आवाज येणार असतील, तर त्याबद्दल त्यांना सांगा.
  • त्रास देणारे अनुभव असलेल्या आणि विस्थापित झालेल्या लोकांसाठी कुठलीही माहिती लक्षात ठेवणे कठीण असू शकते. “तुम्ही सरळ विचार करताच येत नाही, तुमच्या डोक्यात काहीच शिरत नाही,” असे कॅलीफोर्नियातील एका मोठ्या आगीच्या वेळी बाहेर काढण्यात आलेल्या एका गेस्टने सांगितले. “अगदी असे होते की तुम्हाला काहीच करता येत नाही आणि तुमचे डोकेच बंद पडण्याची वेळ येते.” व्हिज्युअल एड्समुळे तुमच्या गेस्ट्सची मदत होऊ शकते. तुम्ही तुमच्या गेस्ट्ससाठी लिस्टिंगचा पत्ता आणि आसपासच्या परिसराचा नकाशा प्रिंट करू शकता म्हणजे गरज पडल्यावर ते पाहू शकतील.
  • तुमच्या गेस्ट्सची आणि तुमची भाषा निराळी असल्यास, तुम्ही अशा स्थानिक ना-नफा संस्था किंवा व्यवसायांची मदत घेऊ शकता जे तुमच्या गेस्टच्या भाषेत भाषांतर करू शकतील. Airbnb.org च्या ना-नफा भागीदारांपैकी एखादा केस-वर्कर जर तुमच्या पाहुण्यांची मदत करत असेल, तर ते देखील यात मदत करू शकतात.

तुमच्या गेस्ट्सशी बोलण्यासाठी सल्ले

बऱ्याच होस्ट्ससाठी, गेस्ट्ससोबत वैयक्तिक कनेक्शन निर्माण करणे हाच होस्टिंग करण्याचा एक मोठा रिवॉर्ड असतो. नुकत्याच त्रासातून निघालेल्या गेस्ट्ससोबत संवाद करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी येथे दिल्या आहेत.

  • पारदर्शकता आणि सातत्य फार महत्त्वाचे आहे. घरात किंवा जवळपास कोणी काही काम करण्यासाठी येणार असल्यास गेस्ट्सना अगोदरच सांगून ठेवा आणि तुम्हाला तिथे जाण्याची गरज असल्यास त्यांना अगोदरच कळवा.
  • गेस्ट्ससोबत गप्पा मारताना त्यांनी अनुभवलेल्या त्रासाबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या येथील वास्तव्याबद्दल बोला. युक्रेनमधून पळून गेलेल्या अनेक लोकांना होस्ट केलेल्या मेरीने सांगितले, “मी सामान्य प्रश्न विचारले जसे की ‘तुम्ही कुठून येता आहात?’ आणि ‘तुमचा प्रवास कसा झाला?’” त्यांनी असेही सांगितले की जर तुमच्या गेस्ट्सना त्यांच्या अनुभवांबद्दल बोलायचे असेल, तर ते तुम्हाला तसे सांगतील. त्यांच्या प्रायव्हसीचा मान राखून तुम्ही त्यांना मन शांत करण्यासाठी आणि ताजेतवाने होण्यासाठी संधी देता आहात.
  • पाहुण्यांना तुमच्याशी कसे वागायचे आहे याबद्दलचे संकेत त्यांच्याकडूनच मिळतील. काहींना त्यांच्या कुटुंबाच्या जवळ राहण्याची इच्छा असू शकते. इतरांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा असू शकते आणि तुमच्या माध्यमाने कम्युनिटीमधील लोकांना भेटण्याची इच्छा असू शकते.

तुमच्या सपोर्टमुळे खूप फरक पडतो

तुम्ही तुमची जागा, तुमचा वेळ आणि मनाची दारे उघडी करून दिलीत याबद्दल धन्यवाद. आपत्कालीन वास्तव्यासाठी तयारी कशी करायची याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर रिसोर्स सेंटरमधील Airbnb.org चे होस्टिंग गाईड मध्ये तुम्हाला लेख आणि व्हिडिओ सापडतील.

हायलाइट्स

Airbnb
25 ऑग, 2023
हे उपयुक्त ठरले का?