Airbnb.org चा 2022 मधील प्रभाव
हायलाइट्स
संकटाच्या वेळी पूर्वीपेक्षा अधिकाधिक लोकांना विनामूल्य, तात्पुरती घरे मिळाली
युक्रेन आणि अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित केले आणि अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील कुटुंबांना देखील मदत केली
हे काम होस्ट्स आणि देणगीदारांच्या उदारतेमुळे शक्य झाले आहे
Airbnb.orgसाठी 2022 हे वर्ष विक्रमी ठरले. जगभरातील होस्ट्स आणि मानवतावादी संस्थांसह काम करून, ना-नफा संस्थेने 1,40,000 हून अधिक लोकांना विनामूल्य तात्पुरत्या वास्तव्याशी जोडले. गेल्या नऊ वर्षांतील एकत्रित आकडेवारीपेक्षाही हा आकडा जास्त आहे.
होस्ट्स आणि देणगीदारांच्या उदारतेमुळे सपोर्ट मिळाला:
- रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधून पळून गेलेले निर्वासित
- अफगाणिस्तानमधील निर्वासित जे उत्तर अमेरिकेत आले
- राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे संपूर्ण लॅटिन अमेरिकेत विस्थापित कुटुंबे
- इयान आणि फिओना चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या अमेरिकेतील कम्युनिटीज
Airbnb.org ही एक ना-नफा संस्था आहे जी Airbnb पासून स्वतंत्रपणे काम करते. याची प्रेरणा 2012 मध्ये सुरू झाली, जेव्हा एका होस्टने सँडी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी त्यांचे घर उघडले. गेल्या दशकभरात, कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देणारे निर्वासित, मदत कर्मचारी, आश्रय शोधणारे आणि आघाडीवर असलेल्या कामगारांना वास्तव्य प्रदान करण्यात मदत करण्यासाठी त्याचे कार्य विकसित झाले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने आक्रमण केल्यानंतर 60 लाखांहून अधिक लोकांनी सुरक्षिततेच्या शोधात युक्रेन सोडले. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील ही सर्वात मोठी निर्वासित चळवळ होती.
त्यापैकी 1,00,000 लोकांना तात्पुरती घरे मिळवून देण्यासाठी Airbnb.org ने पुढाकार घेतला. 95 देशांमधून देणग्या आल्या आणि हजारो होस्ट्सनी विनामूल्य किंवा सवलतीत त्यांच्या राहण्याची सोय करण्यासाठी साईन अप केले. या जबरदस्त समर्थनामुळे Airbnb.org ला निर्वासितांना राहण्याच्या जागांशी जोडण्यासाठी संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेतील संस्थांसह मिळून काम करता आले.
ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित कम्युनिटीजची सेवा करणे
ऐतिहासिकदृष्ट्या उपेक्षित लोकसंख्येवर संकटांचा अधिक गंभीर परिणाम पडतो. 2022 मध्ये, या कम्युनिटीजची सेवा करण्यासाठी Airbnb.org ने त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखले .
उदाहरणार्थ, Black Women for Black Lives आणि Global Empowerment Mission ने युक्रेनमध्ये शिकत असलेल्या आफ्रिकन विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी Airbnb.org सह काम केले. काही सरकारी संस्थांनी परदेशी विद्यार्थ्यांना निर्वासित मानले नाही आणि युक्रेन सोडण्याचा आणि इतर देशांमध्ये संसाधने ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करताना अनेक विद्यार्थ्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला.
आणखी एक भागीदार, Organization for Refuge, Asylum, and Migration (ORAM) ने युक्रेनमधील भेदभावाचा सामना करावा लागलेल्या LGBTQ+ निर्वासितांवर लक्ष केंद्रित केले. बर्लिनमध्ये, ORAM ने कीवमधील गे पुरुष दिमाला बर्लिनमधील अमेरिकन मेरीशी जोडले, मेरीने Airbnb.org च्या माध्यमातून त्यांचे अपार्टमेंट लिस्ट केले होते. जर्मनीमध्ये आल्यावर मेरीने दिमासाठी एक सुरक्षित जागा पुरवली (वरील व्हिडिओमध्ये वर्णन केल्याप्रमाणे).
नाविन्यपूर्ण सपोर्ट प्रदान करणे
इतर अनेक मानवतावादी संस्थांनी त्यांच्या कामाचा भाग म्हणून Airbnb.org ला वास्तव्याच्या जागा ऑफर केल्या, यासहः
इक्वेडोरमधील- HIAS ही संस्था कोलंबियामधील हिंसाचारामुळे पलायन केलेल्या डॅनिएलासारख्या लोकांना मदत करते. HIAS त्यांना मेरीसारख्या होस्ट्सशी जोडते, ज्या बरेच निर्वासित राहत असलेल्या क्विटोच्या परिसरात राहतात. HIAS ज्यांना आघात झाला आहे त्यांना कसे होस्ट करायचे तसेच त्यांच्या वास्तव्यादरम्यान कसे सहाय्य करायचे याचे प्रशिक्षण देते.
- Community Sponsorship Hub, ही पहिली अमेरिकन संस्था आहे जी केवळ निर्वासितांच्या कम्युनिटी स्पॉन्सरशिपचा विस्तार करण्यासाठी समर्पित आहे. स्पॉन्सर सर्कल प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांनी अफगाण आणि युक्रेनियनमधून नवीन आलेल्या लोकांचे स्वागत करण्यासाठी विविध शहरांमध्ये राहणाऱ्या शेजाऱ्यांसह काम केले.
- Insight Ukraine या LGBTQ+ मानवाधिकार संस्थेने हजारो लोकांना युक्रेनमधून बाहेर पडण्यास आणि त्यांचे पुनर्वसन होत असताना राहण्याची सोयीचा, मानसिक आरोग्य सेवेचा आणि LGBTQ+ - समावेशक डॉक्टरांचा ॲक्सेस देण्यास मदत केली.
- Münchner Freiwillige युक्रेनहून म्यूनिखमध्ये येणाऱ्या लोकांसाठी मदत केंद्रांची स्थापना केली, त्यांना घरासह विविध प्रकारच्या सेवा मिळवण्यात मदत केली.
संकटाच्या वेळी आपलेपणाच्या भावनेच विस्तार करण्यासाठी या जागतिक चळवळीत सामील झालेल्या होस्ट्स, देणगीदार आणि भागीदारांना धन्यवाद.
हायलाइट्स
संकटाच्या वेळी पूर्वीपेक्षा अधिकाधिक लोकांना विनामूल्य, तात्पुरती घरे मिळाली
युक्रेन आणि अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रित केले आणि अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेतील कुटुंबांना देखील मदत केली
हे काम होस्ट्स आणि देणगीदारांच्या उदारतेमुळे शक्य झाले आहे