या साफसफाईच्या वस्तूंचा साठा करा
हायलाइट्स
स्वच्छता करणे सुरू करण्यापूर्वी याची खात्री करा की तुमच्याकडे गरजेचे सर्व सामान आहे
संरक्षणाचे सामान, स्वच्छतेची उपकरणे आणि रासायनिक द्रव यांचा साठा करून ठेवा, तसेच गेस्ट्सनाही स्वच्छता करण्यासाठी हे सामान उपलब्ध करून द्या
तुमचे काम पूर्ण झाल्यावर सामान पुन्हा भरून ठेवा म्हणजे पुढच्या गेस्टसाठी तुमची तयारी असेल
- सुधारित स्वच्छता प्रक्रिया एक्सप्लोर करण्यासाठी असलेल्या आमच्या संपूर्ण गाईड मध्ये आणखी माहिती मिळवा
तुम्ही तुमच्या स्वच्छतेला आणखी उंचावर नेण्यासाठी तयार आहात का? Airbnb च्या 5 पायऱ्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आम्ही शिफारस केलेल्या सामानाची एक यादी तयार केली आहे, जी स्वच्छता हँडबुक वर आधारित असून त्यात गेस्ट्ससाठी सुरक्षा उपकरणांपासून स्वच्छतेच्या उत्पादनांपर्यंत सर्व माहिती आहे. अधिक प्रभावी स्वच्छता करण्यासाठी या काही वस्तू तुम्ही गोळा करून ठेवू शकता.
प्रोटेक्टिव्ह गियर
साफसफाई करताना तुम्ही खालील उपकरणांचा वापर करून जंतू आणि रसायनांसोबत तुमचा संपर्क कमी करू शकता:
- डिस्पोजेबल हातमोजे (शिफारस केली जाते)
- चेहऱ्यासाठी मास्क किंवा कापडी आवरण (शिफारस केली जाते)
- सुरक्षा चष्मा (ऐच्छिक, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी)
- ॲप्रन किंवा गाऊन (ऐच्छिक)
- शूजचे कव्हरिंग्ज (ऐच्छिक)
- चेहऱ्यासाठी शील्ड (ऐच्छिक)
साहित्य
स्वच्छतेची प्रक्रिया योग्य रीतिने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त काही मूलभूत वस्तूंचीच गरज पडेल. गरजेच्या वस्तू याप्रमाणे आहेत:
- केरसुणी आणि डस्टपॅन
- बादली (गरज असल्यास)
- डस्टर
- कचऱ्यासाठी पिशव्या
- मायक्रोफायबर फडकी
- पोतेरे
- कागदी टॉवेल्स
- घासण्यासाठी ब्रश
- स्क्रब पॅड्स (फक्त किचनसाठी)
- लहान शिडी (गरज असल्यास)
- टॉयलेट ब्रश
- व्हॅक्यूम क्लीनर
- व्हॅक्यूमच्या पिशव्या (गरज असल्यास)
- डिशवॉशर
- वॉशर आणि ड्रायर
उत्पादने
आम्ही फक्त अशी जंतुनाशके आणि सॅनिटायझर वापरण्याची शिफारस करतो जी संबंधित सरकारी एजंसींकडे (उदा. अमेरिकन पर्यावरण संरक्षण एजंसी किंवा युरोपियन केमिकल एजंसी) रजिस्टर केलेली असतील. हे साठवून ठेवा:
- अनेक पृष्ठभागांवर काम करणारे क्लीनर
- अनेक पृष्ठभागांवर काम करणारे जंतुनाशक
- काच स्वच्छ करणारे क्लीनर
- ब्लीच
- लाँड्री डिटर्जंट
- लाँड्री स्टेन रिमूव्हर
- डिशवॉशिंग डिटर्जंट
- कार्पेट क्लीनर (गरज असल्यास)
- फरशीसाठी क्लीनर
- फर्निचर/लाकूड पॉलिश
- ओव्हन क्लीनर (फक्त किचनसाठी)
- ओव्हन डीग्रीझर (फक्त किचनसाठी)
- बुरशी क्लीनर (गरज असल्यास)
जंतुनाशक वापरून सॅनिटाइझ करण्यासंबंधी माहिती
तुम्हाला हा प्रश्न पडणे शक्य आहे की तुम्ही वापरत असलेली उत्पादने बॅक्टेरिया आणि व्हायरस यांसारख्या जंतूंची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत किंवा नाही. आम्ही काही टिपा देत आहोत:
- फक्त मंजूर केलेली जंतुनाशकेच वापरा. मंजुरी मिळालेल्या स्वच्छता साहित्य आणि जंतुनाशकांसाठी कृपया अमेरिकन पर्यावरण संरक्षण एजंसी (EPA) किंवा युरोपियन केमिकल एजंसी यांच्यासारख्या संबंधित सरकारी एजंसीकडून माहिती घ्या. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये EPA ने शिफारस केलेल्या उत्पादनांमध्ये Clorox वाईप्स, Lysol स्प्रे आणि इतर सामान्य वापरातली जंतुनाशके सामील आहेत.
- या उत्पादनाला वाऱ्याने वाळू द्या. जर ओला राहू द्यायच्या वेळेआधीच जंतुनाशकाला पुसून टाकले, तर लेबलवर सांगिलत्याप्रमाणे ते उत्पादन किटाणूंचा नाश करील याची हमी नसते.
- जंतुनाशक वाईप्स चालतील. पृष्ठभागाला बराच वेळ ओले राहू द्या—हा वेळ किती असावा हे त्या उत्पादनावर अवलंबून आहे, म्हणून लेबल तपासा.
- चांगले काम करणे सिद्ध न झालेली जंतुनाशके वापरू नका. स्वच्छता करण्यासाठी व्हिनेगर आणि इसेंशियल ऑइल्स प्रभावी असू शकतात, पण त्यांना नियामक एजंसींकडून जंतुनाशक म्हणून मंजुरी मिळालेली नाही.
- स्वच्छता उत्पादने मिसळू नका. ब्लीच आणि अमोनियासारखी काही उत्पादने आपसात मिसळल्यामुळे विषारी गॅसेस निघू शकतात ज्या श्वासासोबत आत घेणे धोकादायक असू शकते.
गेस्ट्ससाठी साफसफाईच्या वस्तू
अनेक गेस्ट्स आम्हाला सांगतात की तुमच्या जागेमध्ये राहताना त्यांना स्वतः स्वच्छता करण्याची सोय असणे आवडेल. ते वापरू शकत असलेले सामान ठेवून त्यांची मदत करा—जर तुम्ही कुटुंबांना होस्ट करत असलात, तर स्वच्छतेचे सामान लहान मुलांच्या सहज हाती पडू नये याची खबरदारी घ्या. गेस्ट्सना सर्वात जास्त याची गरज पडते:
- डिस्पोजेबल कागदी टॉवेल्स
- अनेक पृष्ठभागांवर काम करणारे क्लीनर
- जंतुनाशक वाईप्स किंवा स्प्रे
- अँटीबॅक्टेरियल हँड सॅनिटायझर
- हात धुण्यासा अतिरिक्त साबण
आमच्या तज्ञांकडून सुरक्षा रिमाइंडर्स
- शिफारस केलेल्या सुरक्षा उपकरणांशिवाय जागेमध्ये प्रवेश करू नका आणि खराब झालेली उपकरण पुन्हा वापरू नका
- सर्व सुरक्षा लेबले नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की स्वच्छता रसायनांचा योग्य वापर कसा करावा
- रासायनिक उत्पादनांना लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवा
- जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून स्वच्छता करताना चेहऱ्याला हात लावू नका
स्वच्छतेचे काम पूर्ण केल्यानंतर याकडे लक्ष द्या की कोणते सामान कमी झाले आहे किंवा कालबाह्यतेच्या तारखेच्या जवळ आलेले आहे—अशाने तुम्ही पुढील स्वच्छतेच्या आधी ते सामान बदलून किंवा भरून ठेवू शकाल.
प्रकाशित झाल्यानंतर या लेखात असलेली माहिती बदललेली असू शकते. 5 पायऱ्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेमध्ये तुमच्या लिस्टिंगला स्वच्छ करण्यासाठी काही सोपी अनिवार्य कामे दिलेली आहेत. त्या पायऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया संपूर्ण Airbnb स्वच्छता हँडबुक पहा. होस्ट असल्यामुळे, तुम्हाला स्वतःचे, तुमच्या टीम्सचे आणि तुमच्या गेस्ट्सचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलावी लागू शकतात आणि तुम्ही नेहमी सर्व संबंधित स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे. या स्वच्छतेच्या प्रक्रियेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही जखमांसाठी किंवा आजारांसाठी Airbnb जबाबदार नाही. तुम्ही जिथे होस्टिंग करता त्या प्रदेशामधील स्वच्छतेच्या विशिष्ट गाईडलाइन्स आणि नियमांसाठी, कृपया या मदत केंद्रातील लेख ला बुकमार्क करा.
हायलाइट्स
स्वच्छता करणे सुरू करण्यापूर्वी याची खात्री करा की तुमच्याकडे गरजेचे सर्व सामान आहे
संरक्षणाचे सामान, स्वच्छतेची उपकरणे आणि रासायनिक द्रव यांचा साठा करून ठेवा, तसेच गेस्ट्सनाही स्वच्छता करण्यासाठी हे सामान उपलब्ध करून द्या
तुमचे काम पूर्ण झाल्यावर सामान पुन्हा भरून ठेवा म्हणजे पुढच्या गेस्टसाठी तुमची तयारी असेल
- सुधारित स्वच्छता प्रक्रिया एक्सप्लोर करण्यासाठी असलेल्या आमच्या संपूर्ण गाईड मध्ये आणखी माहिती मिळवा