तुमच्या स्वतःच्या अटींवर कमवा

होस्टिंगमध्ये मदत हवी असलेल्या होस्ट्ससह भागीदारी करा.
Airbnb यांच्याद्वारे 16 ऑक्टो, 2024 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
3 मार्च, 2025 रोजी अपडेट केले

अनुभवी को-होस्ट्स हे स्थानिक आहेत जे इतर होस्ट्सची जागांचा सांभाळ करण्यात मदत करतात. तुम्ही कोणत्या सेवा ऑफर करता आणि तुम्ही किती शुल्क आकारता ते तुम्ही निवडा. 

होस्ट्सना कशासाठी मदत हवी आहे याची

काही उदाहरणे म्हणजे लिस्टिंग तयार करणे, कॅलेंडर आणि किंमत अपडेट करणे, गेस्ट्सशी संवाद साधणे, बुकिंग्ज हाताळणे, गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्यादरम्यान सपोर्ट करणे, रिव्ह्यूज लिहिणे, चेक-इन आणि चेकआउट करण्यामध्ये मदत करणे आणि साफसफाई व देखभाल करणे.

तुम्ही या सेवा ऑफर करू शकता

तुमच्या को-होस्ट प्रोफाईलमध्ये तुम्ही तुमच्या कौशल्यांची जाहिरात करता आणि तुम्ही देत असलेल्या सेवांविषयी तपशील जोडता. को-होस्टिंग सेवांच्या यादीतून निवडा:

  • लिस्टिंग सेटअप
  • भाडे आणि उपलब्धता सेट करणे
  • बुकिंग विनंती मॅनेजमेंट
  • गेस्टसोबत मेसेजिंग
  • ऑनसाइट गेस्ट सपोर्ट
  • स्वच्छता आणि देखभाल
  • लिस्टिंगची फोटोग्राफी
  • इंटिरिअर डिझाइन आणि स्टायलिंग
  • लायसन्सिंग आणि होस्टिंगचे परमिट

लँडस्केपिंग, बिझनेस ॲनालिसिस आणि आदरातिथ्यासाठी मार्गदर्शन यासारख्या तुम्ही ऑफर करत असलेल्या कोणत्याही अतिरिक्त सेवांचेसुद्धा तुम्ही वर्णन करू शकता.

तुमच्या भागात सपोर्ट शोधत असलेले होस्ट्स प्रश्न विचारू शकतात आणि तुमच्या सेवांसाठी विनंती करू शकतात. होस्ट्सना त्यांच्या लिस्टिंग्जसाठी योग्य को-होस्ट शोधण्यात मदत करण्यासाठी नेटवर्कचा सर्च अल्गोरिदम गुणवत्ता, सहभाग आणि लोकेशन यासह अनेक घटक विचारात घेतो.

सामील होण्यासाठी काय आवश्यक आहे

को-होस्ट नेटवर्कमध्ये सामील होण्यासाठीच्या आवश्यकता या आहेतः

  • तुमच्याकडे होस्ट म्हणून किंवा संपूर्ण ॲक्सेस किंवा कॅलेंडर आणि मेसेजिंगच्या ॲक्सेससह को-होस्ट म्हणून एक ॲक्टिव्ह लिस्टिंग आहे.
  • तुम्ही गेल्या 12 महिन्यांमध्ये Airbnb वर—10 किंवा त्यापेक्षा जास्त वास्तव्ये—किंवा एकूण किमान 100 रात्रींसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वास्तव्ये होस्ट किंवा को-होस्ट केली आहेत.
  • गेल्या 12 महिन्यांत, तुम्ही होस्ट करत असलेल्या किंवा संपूर्ण ॲक्सेससह अथवा कॅलेंडर आणि मेसेजिंगच्या ॲक्सेससह को-होस्ट करत असलेल्या सर्व लिस्टिंग्जसाठी तुम्ही गेस्ट्सकडून सरासरी 4.8 स्टार्स किंवा त्याहून अधिक रेटिंग कायम राखले आहे.
  • तुमच्या नियंत्रणाबाहेरील विशिष्ट वैध कारणांमुळे केलेल्या कॅन्सलेशनचा दर 3% पेक्षा कमी आहे.
  • तुमचे Airbnb अकाऊंट चांगल्या स्थितीत आहे. तुमच्या ओळखीचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे आणि नेटवर्कवर दाखवण्यासाठी तुम्ही नाव आणि फोटोच्या आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

तुमच्यासाठी कोणते स्थानिक नियम लागू होतात हे जाणून घेणे आणि सर्व आवश्यक लायसन्सेस, परवानग्या आणि रजिस्ट्रेशन्स असणे, ही तुमची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, काही भागांमध्ये तुमच्या सेवांनुसार रिअल इस्टेट ब्रोकर लायसन्सेसची आवश्यकता असू शकते.

*Slack हे तांत्रिक साधन नाही आणि ते ऐच्छिकरीत्या पुरवले जाते. अनुभवी को-होस्ट सेवा प्लॅटफॉर्मने Airbnb धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या अनुभवी को-होस्टचा ॲक्सेस काढून घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि वापर देखील Slack च्या लागू असलेल्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणाच्या अधीन आहे.

Airbnb Living LLC, Airbnb Global Services Limited आणि Airbnb Plataforma Digital Ltda द्वारा समर्थित ही प्लॅटफॉर्म सेवा आहे आणि Luckey प्लॅटफॉर्म हा Luckey SAS ने ऑफर केलेला आहे.

या लेखामध्ये दिलेली माहिती प्रकाशनानंतर कदाचित बदललेली असेल.

Airbnb
16 ऑक्टो, 2024
हे उपयुक्त ठरले का?