सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

एक आकर्षक को-होस्ट प्रोफाईल तयार करा

तुमच्या कौशल्यांचा प्रचार करा आणि उच्च-गुणवत्तेचा फोटो घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 16 ऑक्टो, 2024 रोजी
5 जून, 2025 रोजी अपडेट केले
एक आकर्षक को-होस्ट प्रोफाईल तयार करा
सुरुवात करताना
एक आकर्षक को-होस्ट प्रोफाईल तयार करा

तुमची को-होस्ट प्रोफाईल म्हणजे स्वतःचे मार्केटिंग करण्याची संधी. मदत शोधत असलेल्या कोणालाही योग्य अशा स्थानिक को-होस्ट्सच्या प्रोफाईल्स दाखवण्यासाठी को-होस्ट नेटवर्क पर्सनलाइज्ड अल्गोरिदम वापरते.

तुमची को-होस्ट प्रोफाईल भरणे

सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यासाठी तुमची को-होस्ट प्रोफाईल पूर्ण करा. तुमच्या प्रोफाईलमधील माहिती सार्वजनिकरीत्या उपलब्ध असते.

  • नाव: तुम्ही तुमच्या को-होस्ट प्रोफाईल सेटिंग्जमध्ये फक्त तुमचे नाव दाखवणे निवडले नसल्यास, तुमची को-होस्ट प्रोफाईल ऑटोमॅटिक पद्धतीने तुमच्या Airbnb अकाऊंटमधून तुमचे नाव आणि आडनाव वापरते. को-होस्ट नेटवर्कवर दिसण्यासाठी, तुमचे डिस्प्ले नाव—मग ते कायदेशीर असो किंवा पसंतीचे—हे तुमचे वैयक्तिक नाव असले पाहिजे, बिझनेसचे नाव नाही.*
  • प्रोफाईल इन्ट्रो: तुमच्यात काय खास आहे, हे सांगणारे तुमच्या होस्टिंगच्या अनुभवाचे एक छोटेसे वर्णन लिहा. उदाहरणार्थ, “मी एक स्पेअर रूम होस्ट करण्यापासून सुरुवात केली होती. आता, मी इतर होस्ट्सना चांगले रिव्ह्यूज मिळवण्यात आणि त्यांना पूर्ण क्षमतेने कमाई करण्यात मदत करतो.” तुमचा इन्ट्रो सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये एकदम वर दिसून येईल.
  • सेवा: 10 कॅटेगरीजमधून निवडा, जसे की लिस्टिंग सेटअप आणि गेस्ट मेसेजिंग आणि तुमची पद्धत इतरांपेक्षा वेगळी कशी आहे याचे थोडक्यात वर्णन करा. उदाहरणार्थ, “मी माझ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत पाच वर्षांहून अधिक काळ काम केले आहे आणि आम्ही आधीच्या गेस्टच्या वास्तव्याच्या आधी आणि नंतर नियमित गुणवत्ता तपासणी करतो.”
  • भाडे: तुम्ही सततच्या सपोर्टसाठी प्रति बुकिंग किती शुल्क आकारता (आवश्यक) आणि सेटअपसाठी प्रति लिस्टिंग किती शुल्क आकारता (पर्यायी) हे होस्ट्सना सांगा.
  • स्थानिक सेवा क्षेत्र: तुम्ही सुमारे 60 किमी क्षेत्राच्या आत वैयक्तिकरीत्या होस्टिंग सेवा देऊ शकाल असे लोकेशन जोडा.
  • तुमच्याविषयी आणखी माहिती: तुम्ही तुमच्या होस्टिंगच्या प्रवासाबद्दलचे तपशील सांगू शकता, जसे की तुम्ही आदरातिथ्याच्या क्षेत्रात का आलात आणि तुमचा सर्वाधिक अभिमानाचा क्षण कोणता होता.

तुमच्या को-होस्ट प्रोफाईलमध्ये ही माहितीसुद्धा समाविष्ट असते.

  • मुख्य आकडेवारी: तुम्ही किती लिस्टिंग्ज होस्ट करता किंवा को-होस्ट करता, तुम्ही किती वर्षांपासून होस्टिंग करत आहात आणि तुम्ही होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या सर्व लिस्टिंग्जवरील एकूण गेस्ट रेटिंग, या गोष्टी होस्ट्सना दिसतात.
  • हायलाईट्स: तुम्हाला किंवा तुम्ही होस्ट किंवा को-होस्ट करत असलेल्या लिस्टिंग्जना Airbnb वर मिळालेली प्रशंसा होस्ट्सना दिसते, जसे की “8 वर्षे सुपरहोस्ट” किंवा “अलीकडील गेस्ट्सकडून मिळालेली परफेक्ट रेटिंग्ज”.
  • गेस्ट रिव्ह्यूज: तुम्ही होस्ट किंवा को-होस्ट करत असलेल्या लिस्टिंग्जचे रिव्ह्यूज होस्ट्सना दिसतात, ज्यात सुरूवातीला सर्वात अलीकडील रिव्ह्यूज असतात. ते सर्वोच्च रेटिंग किंवा सर्वात कमी रेटिंगद्वारेदेखील फिल्टर करू शकतात आणि कीवर्ड्स वापरून सर्च करू शकतात.
  • तुमच्या लिस्टिंग्ज: तुम्ही सपोर्ट करत असलेल्या सर्व लिस्टिंग्ज आणि प्रत्येक लिस्टिंग तुम्ही किती काळ होस्ट किंवा को-होस्ट केली आहे, हे होस्ट्सना दिसते.

उत्तम प्रोफाईल फोटो काढणे

तुमची को-होस्ट प्रोफाईल तुमच्या Airbnb अकाऊंटमधून ऑटोमॅटिक पद्धतीने प्रोफाईल फोटो घेते. फोटो हाय रिझोल्यूशनचा असणे आवश्यक आहे आणि त्याची फाईल साईझ 100 MB पर्यंत असू शकते आणि तो अस्पष्ट नसावा. फोटोत तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे.*

या गाईडलाईन्सचे पालन करा:

  • एक साधी पार्श्वभूमी आणि नैसर्गिक प्रकाश वापरा.
  • उभा फोटो काढा आणि क्रॉप करायला जागा सोडा.
  • सेल्फीज, फ्लॅश, बॅकलाइटिंग, लोगो आणि इलस्ट्रेशन्स टाळा.
  • पाळीव प्राणी आणि इतर लोक असू नयेत.

*तुम्ही ऑस्ट्रेलिया, युरोपियन इकॉनॉमिक एरिया किंवा युनायटेड किंग्डममध्ये एक बिझनेस म्हणून होस्ट करत असल्यास, ही आवश्यकता लागू होत नाही.

मदत केंद्रामध्ये सर्च अल्गोरिदमबद्दल जाणून घ्या.

को-होस्ट नेटवर्क सध्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, पोर्टो रिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंग्डम (Airbnb Global Services द्वारे समर्थित); कॅनडा, अमेरिका (Airbnb Living LLC द्वारे समर्थित); आणि ब्राझील (Airbnb Plataforma Digital Ltda द्वारे समर्थित) मध्ये उपलब्ध आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

एक आकर्षक को-होस्ट प्रोफाईल तयार करा
सुरुवात करताना
एक आकर्षक को-होस्ट प्रोफाईल तयार करा
Airbnb
16 ऑक्टो, 2024
हे उपयुक्त ठरले का?