होस्टची लिस्टिंग नजरेत भरण्यात मदत करा
एक उत्कृष्ट लिस्टिंग तयार करण्यासाठी तुम्ही होस्टिंग करताना मिळविलेले ज्ञान शेअर करा. नवीन लिस्टिंग तयार करण्यासाठी किंवा विद्यमान लिस्टिंग अपडेट करण्यासाठी होस्टसह काम करा.
बुक करायचे की नाही हे ठरवताना गेस्ट्स लिस्टिंगचे फोटो, वर्णन आणि गेस्ट रिव्ह्यूजना प्राधान्य देतात.* यशासाठी लिस्टिंग सेट करण्यासाठी या घटकांवर, आणि सुविधा आणि भाड्यावर लक्ष केंद्रित करा.
फोटोज
गेस्ट्स कोणते लिस्टिंग बुक करावे याचा विचार करतात तेव्हा उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमा एक प्रमुख घटक आहे असे वापरकर्ता संशोधनातून दिसून आले आहे. होस्टकडे त्यांच्या जागेचे अलीकडील व्यावसायिक फोटो नसल्यास, फोटोंचे महत्त्व समजावून सांगा आणि फोटोग्राफर किंवा Airbnb प्रो फोटोग्राफी प्रोग्राम ची शिफारस करा.
लिस्टिंगचे वर्णन
होस्ट्सनी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लिस्टिंग प्रभावी बनण्यासाठी तिचे वर्णन हे सर्वात मौल्यवान पैलूंपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाच्या पाम स्प्रिंग्जमधील को-होस्ट जिमी म्हणतात की “प्रत्येक लिस्टिंगचे वर्णन ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते,” म्हणून ते होस्ट्सना त्यांच्या लिस्टिंगचे वर्णन लिहिण्यास मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात.
“मी तथ्यांवर लक्ष केंद्रित करतो, जिमी म्हणतात. “तुमच्याकडे सॉल्ट वॉटर पूल असते किंवा नसते. कम्युनिटी खाजगी असते किंवा नसते? बऱ्याच विशेषणांचा वापर भावना व्यक्त करण्यासाठी होतो आणि ती व्यक्तीच्या अनुभवानुसार वेगवेगळी असू शकतात. म्हणून मग ते वर्णन नेहमी अचूक नसू शकते. तथ्ये मांडल्याने आपल्याला एक सुस्पष्ट चित्र मिळते.”
सुविधा
गेस्ट्स अनेकदा त्यांना हव्या असलेल्या सुविधांसह लिस्टिंग्ज शोधण्यासाठी त्यांचे रिझल्ट्स फिल्टर करतात. टॉप सर्च केलेल्या सुविधांमध्ये पूल, वायफाय, मोफत पार्किंग, किचन, हॉट टब, एअर कंडिशनिंग, वॉशर आणि स्वतःहून चेक इन यांचा समावेश आहे.**
तुम्ही होस्ट केलेल्या लिस्टिंग्जमध्ये काय यशस्वी झाले याचा विचार करा आणि होस्ट्ससोबत तुमची माहिती शेअर करा. यात हे समाविष्ट असू शकते:
- त्यांच्या लिस्टिंगमध्ये त्यांनी ऑफर केलेल्या कोणत्याही सुविधा राहिल्या तर नाहीत याची खात्री करणे
- वायफाय किंवा स्मार्ट लॉक सारख्या सुविधा जोडण्याचे किंवा अपग्रेड करण्याचे महत्व स्पष्ट करणे
- तुम्ही सपोर्ट करत असलेल्या इतर लिस्टिंग्जवरील अपग्रेड्सना गेस्ट्सनी कसा प्रतिसाद दिला याची उदाहरणे देणे
- ते त्यांच्या लिस्टिंगमध्ये आणखी काय जोडू शकतात, हे जाणून घेण्यासाठी होस्ट्ससह सुरक्षा आणि ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांना रिव्ह्यू करणे
भाडे धोरण
होस्ट्सना भाड्याचा अनुभव नसू शकतो. मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही तुमचे स्थानिक कौशल्य आणि Airbnb चे प्राइसिंग टूल्स वापरू शकता. धोरणांमध्ये यांचा समावेश असू शकतो:
- साप्ताहिक किंवा मासिक सवलत देणे
- स्वच्छता किंवा पाळीव प्राण्यांसाठी शुल्क कमी करणे किंवा काढून टाकणे
- हंगामी मागणीसह प्रति रात्र भाडे ॲडजस्ट करणे
करण्याची पद्धत आणि तुमच्याकडे किती नियंत्रण आहे हे निवडण्यासाठी एकत्र काम करा. इंग्लंडच्या कॉर्नवॉलमधील को-होस्ट डॉमिनिक रात्रीचे भाडे सतत ॲडजस्ट करण्याचे सुचवतात.
“दर आठवड्याला किंवा पर्यायी आठवड्यात, मी प्रॉपर्टीजना रिव्ह्यू करेल,” असे ते म्हणतात. "जर ते त्वरित बुक होत असतील, तर हे भाडे यशस्वी ठरणार असल्याचे तुम्हाला कळते. पण जर लोक बघत आहेत आणि बुकिंग करत नाहीत, तर संभाव्यत: ते भाडे खूप जास्त आहे.
गेस्टचे रिव्ह्यूज
अनेक गेस्ट्स त्यांच्या गरजा पूर्ण करणारी लिस्टिंग शोधण्यासाठी रिव्ह्यूज वाचतात. हे समजण्यास होस्ट्सना मदत करा की रिव्ह्यूजना प्रतिसाद देणे त्यांच्यासाठी गेस्ट्सना हे दाखवण्याची संधी आहे की तुम्हाला त्यांच्या अनुभवाची काळजी आहे आणि तुम्ही त्यांच्या सूचना स्वीकारायला तयार आहात.
गेस्ट रिव्ह्यूजना कोण प्रतिसाद देईल ते ठरवा. जर होस्ट हे काम स्वतः करण्यास तयार असतील तर, तुम्ही त्यांना विविध प्रकारच्या फीडबॅकचे उत्तर देण्यासाठी प्रतिसादांचा नमुना देऊ शकता.
- गेस्ट्सना धन्यवाद देणे: “तुमच्या रिव्ह्यूबद्दल धन्यवाद! तुम्ही तुमच्या ट्रिपवर विचार करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.”
- सुधारणा शेअर करणे: “आम्ही दिलगीर आहोत की बेड्स आरामदायक नव्हत्या. तुमची झोप महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही मैट्रेस टॉपर्स जोडले आहेत.”
बर्लिनमधील सुपरहोस्ट असलेले गेस्ट अँड्र्यू म्हणतात, “मला वाटत नाही की कोणत्याही होस्टला 100% चांगल्या रिव्ह्यूज मिळतील.” “मी त्या लोकांशी अधिक प्रभावित आहे जे महत्त्वपूर्ण फीडबॅक गांभीर्याने घेतात.”
तुम्ही किंवा होस्टने जागेमध्ये सुधारणा केल्यावर कधीही लिस्टिंगचे वर्णन आणि फोटोज अपडेट करण्यास विसरू नका.
*नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, दक्षिण कोरिया आणि स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेमध्ये सुमारे 7,000 गेस्ट्ससह केलेल्या Airbnb संशोधनानुसार.
**1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.
को-होस्ट नेटवर्क सध्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, पोर्टो रिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंग्डम (Airbnb Global Services द्वारे समर्थित); कॅनडा, अमेरिका (Airbnb Living LLC द्वारे समर्थित); आणि ब्राझील (Airbnb Plataforma Digital Ltda द्वारे समर्थित) मध्ये उपलब्ध आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.