मजबूत स्थानिक उपस्थिती तयार करा
को-होस्ट नेटवर्क बाहेरील लोकांशी कनेक्ट केल्याने तुम्हाला तुमच्या को-होस्टिंग बिझनेसचा विस्तार करण्यात मदत होऊ शकते. तुम्ही होस्ट्सना तुमच्यासोबत काम करण्यासाठी आमंत्रित करता तेव्हा तुम्ही रेफरल रिवॉर्ड्स मिळवण्यास पात्र ठरू शकता.
स्वतःचे मार्केटिंग करा
तुमची स्थानिक उपस्थिती मजबूत करण्यासाठी ऑनलाईन आणि वैयक्तिक मार्केटिंगची संमिश्र पद्धत अवलंबण्याचा विचार करा. सुरुवात करण्यासाठी काही कल्पना:
- तुम्ही उपलब्ध आहात हे तुमच्या नेटवर्कला कळवा. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय, शेजारी आणि सहकाऱ्यांसोबत तुमची प्रोफाईल शेअर करा. Airbnb वर चांगली कामगिरी करेल असे तुम्हाला वाटत असलेली प्रॉपर्टी लिस्ट आणि होस्ट करण्यात त्यांना मदत करा.
- तुमच्या कॉन्ट्रॅक्टर्ससोबत सहयोग करा. तुमचे स्वच्छता कर्मचारी, लँडस्केपर्स आणि देखभाल कर्मचाऱ्यांना विचारा की ते मदतीची गरज असलेल्या होस्ट्ससोबत काम करतात की नाही.
- कम्युनिटी आणि व्हर्च्युअल इव्हेंट्समध्ये सहभागी व्हा. घरमालक, लहान बिझनेसेस आणि पर्यटन क्षेत्रातील लीडर्सना स्वतःचा परिचय करून देऊन तुमचे नेटवर्क वाढवा. काही वाक्यांमध्ये तुमच्या सेवा समजावून सांगण्याची तयारी ठेवा.
पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील को-होस्ट जिमी म्हणतात की त्यांना “प्रामुख्याने फक्त मौखिक प्रचाराने माझ्या स्थानिक भागातील” होस्ट्स मिळाले आहेत. उदाहरणार्थ, त्यांना त्यांच्या पूल क्लीनरच्या ओळखीतून होस्टिंगसाठी दोन नवीन प्रॉपर्टीज मिळाल्या.
स्वतःला इतरांपेक्षा वेगळे बनवणे
अशा कामांचा विचार करा जी तुम्ही करू शकता, परंतु इतर को-होस्ट्स कदाचित करण्यास तयार होणार नाहीत. सुरुवात करण्यासाठी काही कल्पना:
- नवीन होस्ट्सना चेकलिस्ट पुरवा. होस्ट्सना सुविधा, साफसफाईच्या टिप्स, स्टॉकमध्ये ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सामानाचा पुरवठा याबाबत मार्गदर्शन करा.
- होस्टसह तुमच्या सवलती शेअर करा. सेवा प्रदात्यांशी तुमचे चांगले संबंध असल्यामुळे देखभाल, लँडस्केपिंग, कलाकुसर किंवा होम फर्निशिंग यासारख्या गोष्टींवर होस्टचे पैसे वाचू शकत असतील तर त्यांच्याशी परिचय करून देण्याची ऑफर द्या.
- गेस्ट्ससाठी एक वेलकम किट तयार करा. तुम्ही एखादी हस्तलिखित नोट, छान वस्तूंचे बास्केट आणि छापील सुविधा सूची समाविष्ट करू शकता.
- गेस्ट्ससाठी गाईडबुक तयार करा. तुमच्या स्थानिक ज्ञानाचा वापर करून खाण्यापिण्याच्या, शॉपिंगच्या, साईटसीईंगच्या आणि निसर्गरम्य ठिकाणांचा अनुभव घेण्यासाठीच्या जवळपासच्या जागांची होस्ट्सना शिफारस करा. ती त्यांच्या लिस्टिंगमध्ये जोडा आणि ती नियमितपणे अपडेट करा.
रेफरल्स पाठवणे आणि रिवॉर्ड्स मिळवणे
तुम्ही रेफरल लिंक पाठवून होस्ट्सना तुमच्यासोबत भागीदारी करण्यासाठी आमंत्रित करू शकता.
- तुमच्या रेफरल्स पेजवर जाण्यासाठी खालील बटणावर टॅप करा. तुमची युनिक लिंक होस्ट्ससोबत शेअर करून ती तुमच्या को-होस्ट प्रोफाईलवर डायरेक्ट करा.
- होस्ट्सना तुमच्या प्रोफाईलवरून तुम्हाला मेसेज पाठवायला सांगा. त्यांनी तसे केल्यावर, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होऊन सुरुवात करू शकाल.
- होस्ट्सचा फॉलो अप घ्या. तुमच्या डॅशबोर्डच्या विनंत्या टॅबमध्ये त्यांचे स्टेटस ट्रॅक करा.
होस्ट्सनी त्यांचे पहिले पात्र वास्तव्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही रेफरल रिवॉर्ड मिळवण्यास पात्र ठरू शकता. कोणते होस्ट्स पात्र आहेत ते तुमच्या रेफरल्स पेजवर शोधा.
को-होस्ट नेटवर्क सध्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंग्डम (Airbnb Global Services द्वारे समर्थित); कॅनडा, अमेरिका (Airbnb Living LLC द्वारे समर्थित); आणि ब्राझील (Airbnb Plataforma Digital Ltda द्वारे समर्थित) मध्ये उपलब्ध आहे.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.