कॅलेंडरपासून ते चेक आऊटपर्यंत, 25 अपग्रेड्स सादर करत आहोत
एडिटरची टीपः हा लेख Airbnb 2023 समर रिलीजचा भाग म्हणून प्रकाशित झाला होता. त्याच्या पब्लिकेशननंतर कदाचित माहितीमध्ये बदल झालेला असू शकेल. अधिक जाणून घ्या आमच्या नवीनतम उत्पादन रिलीजबद्दल.
Airbnb 2023 समर रिलीजमध्ये होस्टिंग अनुभवातील सर्व प्रकारच्या नवीन फीचर्सचा समावेश आहे. अर्ली ॲक्सेसमुळे तुम्ही आजपासूनच त्यांचा वापर सुरु करू शकता.
रीडिझाइन केलेली प्राईसिंग टूल्स
सर्व प्राईसिंग टूल्स आता कॅलेंडरमध्ये आहेत-जेणेकरून तुम्ही एकाच जागी तुमचे भाडे सहजपणे सेट आणि ॲडजस्ट करू शकता. आमच्या अपडेट केलेल्या भाडे विश्लेषणाच्या मदतीने, तुम्हाला गेस्ट्ससाठीचे एकूण भाडे आणि तुम्ही किती कमवाल ते देखील लक्षात येईल.
मिळत्याजुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा
आता पहिल्यांदाच, तुम्ही आसपास बुक केलेल्या मिळत्याजुळत्या लिस्टिंग्जच्या सरासरी भाड्याशी तुमच्या भाड्याची तुलना करू शकता, ज्यामुळे तुम्हाला अधिक स्पर्धात्मक राहण्यास मदत होईल.
स्वाईप-टू-सिलेक्ट आणि वार्षिक व्ह्यू
आता ॲपमध्ये, तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर तारीख श्रेणी निवडण्यासाठी स्वाइप करू शकता-प्रत्येक दिवसावर वेगवेगळे टॅप करण्याची गरज नाही. आणि लवकरच येत आहे, नवीन वार्षिक व्ह्यूसह एका दृष्टीक्षेपात 12 महिन्यांचा आढावा मिळवा.
बिल्ट-इन चेक आऊट सूचना
तुमच्या लिस्टिंगमध्ये चेक आऊटच्या सामान्य सूचना पटकन जोडा आणि कस्टम विनंत्या सहजपणे समाविष्ट करा. गेस्ट्सना निघण्यापूर्वीच्या कामांची आठवण करून दिली जाईल, तसेच त्यांचे चेक आऊट झाल्यावर ते तुम्हाला सूचित करण्यासाठी टॅप करू शकतात.
मेसेज वाचला असल्याच्या पावत्या
तुम्ही आणि तुमचे गेस्ट्स दोघांनाही मेसेज वाचला असल्याची पावती दिसते, जेणेकरून एखादा मेसेज पाहिला गेला की नाही हे तुम्हाला कळते. तसेच, तुम्ही आता नवीन झटपट उत्तरांसह चेक आऊट सूचना शेअर करू शकता.
को-होस्ट परवानग्या आणि पेआऊट्स
नवीन को-होस्ट्सना आमंत्रित करणे सोपे आहे आणि तुम्ही एका टॅपद्वारे को-होस्ट परवानग्या सेट करू शकता. पूर्ण ॲक्सेस, कॅलेंडर आणि इनबॉक्स ॲक्सेस निवडा, किंवा फक्त कॅलेंडर ॲक्सेस निवडा. तुम्ही तुमच्या को-होस्टसह तुमच्या बुकिंग्समधून पेआऊट्स देखील कॉन्फिगर करू शकता आणि शेअर करू शकता.
वरील नवीन वैशिष्ट्ये वापरून पाहणारे पहिले व्हा
अर्ली ॲक्सेसमुळे तुम्ही आजपासूनच या अपडेट्सचा वापर सुरु करू शकता. मग आम्हाला अनुभव उत्तम प्रकारे जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी तुमचा फीडबॅक शेअर करा.
होस्ट्ससाठी अपग्रेड्सची संपूर्ण यादी
एकूण भाडे पहा
गेस्ट्स किती पैसे देतील हे कधीही जाणून घेण्यासाठी तुम्ही अॅपवर तुमचे रात्रीचे एकूण भाडे पाहू शकता.
स्वाइप करून तारखा निवडा
कॅलेंडरमध्ये कालावधी पटकन निवडण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी स्वाइप करा—एकेका दिवसावर टॅप करण्याची आवश्यकता नाही.
बिल्ट-इन चेक आऊट सूचना
नेहमीच्या कामांच्या प्री-सेट लिस्टमधून निवड करून चेक आऊटच्या सूचना आणखी जलद तयार करा.
मेसेज वाचला असल्याच्या पावत्या
तुम्ही आणि तुमचे गेस्ट्स दोघांनाही मेसेज वाचला असल्याची पावती दिसते, जेणेकरून एखादा मेसेज पाहिला गेला की नाही हे तुम्हाला कळते.
को-होस्ट टॅब
एका नवीन टॅबमुळे तुम्हाला सर्व को-होस्ट्स दिसतात आणि त्यांच्या परवानग्या आणि पेआऊट्स मॅनेज करणे शक्य होते.
अर्ली ॲक्सेस
तुम्ही आता नवीन वैशिष्ट्ये वापरून पाहू शकता, नंतर तुमचा फीडबॅक शेअर करून आम्हाला ती अधिक उत्कृष्ट बनवण्यास मदत करा.
भाड्याचे विवरण
अपडेट केलेले भाडे विवरण तुम्हाला गेस्ट्स किती पैसे देतात आणि तुम्ही किती कमावता हे दाखवते.
मिळत्याजुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा
स्पर्धात्मक राहण्यासाठी आसपासच्या मिळत्याजुळत्या लिस्टिंग्जच्या सरासरी भाड्याची तुमच्या भाड्याशी तुलना करा.
भाडे आणि उपलब्धता सेटिंग्ज
सर्व डिव्हाईसमध्ये सातत्यपूर्ण अनुभवासाठी रीफ्रेश केलेली कॅलेंडर टूल्स अपडेट केली गेली आहेत.
साप्ताहिक आणि मासिक सवलती
सवलती सेट करण्यासाठी किंवा अॅडजस्ट करण्यासाठी नवीन स्लायडर वापरा, त्याबरोबरच गेस्ट्स किती भाडे देतील तेही पहा.
मोबाईलवर वार्षिक कॅलेंडर व्ह्यू
लवकरच तुम्ही वर्षभरासाठीची तुमची उपलब्धता आणि प्रत्येक महिन्याचे भाडे एका स्क्रीनवर पाहू शकाल.
कस्टम चेक आऊटचे तपशील
तुमच्या घरासाठी युनिक असलेल्या तुमच्या चेक आऊट सूचनांमध्ये विशिष्ट विनंत्या जोडा.
स्वयंचलित चेक आऊटची माहिती
तुमचे चेकआउट तपशील गेस्ट्सना ते निघण्याच्या एक दिवस आधी ऑटो-सेंड केले जातील.
वन-टॅप चेक आऊट नोटिफिकेशन्स
गेस्ट्स तुम्हाला आता फक्त एका टॅपने तुमच्या जागेतून त्यांनी चेक आऊट केल्याचे कळवू शकतात.
चेक आऊटसाठी झटपट उत्तरे
तुमच्या चेक आऊट सूचना सहजपणे शेअर करण्यासाठी झटपट उत्तरे आणि शेड्युल केलेले मेसेजेस वापरा.
रूम्स होस्ट्ससाठी रिव्ह्यू हायलाइट्स
Airbnb रूम्ससाठीच्या होस्ट प्रोफाईल्स आता होस्टबद्दल उल्लेखनीय कोट्स हायलाइट करतात.
प्रोफाईलमधील मजेदार तथ्ये
हायस्कूलमधील तुमच्या आवडत्या गाण्यासारख्या एखाद्या मजेदार, नवीन तपशीलासह तुमची प्रोफाईल कस्टमाईझ करा.
होस्टच्या प्रवासाचा इतिहास
गेस्ट्सना तुमच्या प्रवासाच्या आवडींची अधिक चांगली माहिती व्हावी यासाठी तुम्ही Airbnb वर घेतलेल्या ट्रिप्स शेअर करा.
होस्टच्या आवडी
गेस्ट्सबरोबरच्या शेअर केलेल्या आवडी शोधण्यासाठी तुम्ही आता प्री-सेट लिस्टमधून छंद निवडू शकता.
अधिक तपशीलवार गेस्ट प्रोफाईल्स
गेस्ट्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये नवीन तपशील जोडू शकतात, त्यामुळे बुकिंग करणाऱ्यांबद्दल तुम्हाला आता थोडी अधिक माहिती मिळेल.
अधिक सोपी को-होस्ट आमंत्रणे
तुमच्या लिस्टिंग्ज मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी को-होस्ट्सना आमंत्रित करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
नवीन को-होस्ट परवानग्या
नवीन परवानग्या सेट करा, यातून निवडा: पूर्ण ॲक्सेस, कॅलेंडर आणि इनबॉक्स, किंवा फक्त कॅलेंडर.
नवीन को-होस्ट पेआऊट्स
तुम्ही आता टक्केवारी किंवा निश्चित रक्कमेच्या स्वरुपात को-होस्टसह पेआऊट्स शेअर करू शकता.
गेस्ट्सचे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन
जगभरातील बुक करणार्या सर्व गेस्ट्सची ओळख पडताळणी केली जाईल.
जगभरातील रिझर्व्हेशनची छाननी
पार्टीजची जोखीम आणि नुकसान कमी करण्यास मदत करणारे तंत्रज्ञान आता जागतिक स्तरावर उपलब्ध आहे.
Airbnb रूम्स: सादर आहे, नवीन होस्ट पासपोर्ट
खाजगी रूम्सच्या फीचर्सवर नव्याने नजर टाकताना, आम्ही होस्ट पासपोर्ट सादर केला आहे, जो गेस्ट्सना बुक करण्यापूर्वी तुमच्याबद्दल जाणून घेण्याची संधी देतो, तसेच तुमच्या लिस्टिंगची क्रमवारी सुधारणारी सर्च टूल्स देखील देतो.
होस्ट पासपोर्ट
तुमचे आवडते छंद, पाळीव प्राण्याचे नाव, मजेदार गोष्टी आणि तुमच्याकडे राहणे कशामुळे विशेष बनते यासारखे तुमच्याबद्दलचे तपशील गेस्ट्सबरोबर शेअर करा.
रीडिझाईन्ड फिल्टर्स
आमच्या अपडेट केलेल्या फिल्टर्समुळे गेस्ट्सना वास्तव्याच्या प्रकारांमध्ये स्विच करणे आणि रूम्स आणि घरांचे सरासरी भाडे सहजपणे मिळवणे सोपे होते.
रूम्स कॅटेगरी
आमच्या होम पेजच्या शीर्षस्थानी दर्शविलेल्या नवीन कॅटेगरीमुळे रूम्सचे लिस्टिंग्ज शोधणे गेस्ट्ससाठी आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे.