जंगलातील आगीसाठी तुमच्या जागेला—आणि गेस्ट्सना—कसे तयार करावे
जगभरामध्ये रेकॉर्ड पातळीवरील जंगलातील आग होस्ट्स आणि गेस्ट्स दोन्हीच्या जीवनावर प्रभाव टाकत आहेत. स्वतःचे, गेस्ट्सचे आणि तुमच्या प्रॉपर्टीचे संरक्षण करण्यासाठी जंगलातील आगपासून बचावाचे प्लॅनिंग करणे पूर्वीपेक्षा आता फार महत्त्वाचे झाले आहे.
Airbnb मध्ये, आम्ही तुमच्या आणि तुमच्या पाहुण्यांच्या सुरक्षेकडे अतिशय गांभीर्याने बघतो. आमच्या नुकत्याच सुरू झालेल्या ट्रस्ट अँड सेफ्टी अॅडव्हायझरी युतीचा एक भाग म्हणून, आम्ही इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फायर चीफ्स (आयएएफसी) यांच्यासोबत जंगलातील आगीपासून सुरक्षित राहण्याबद्दल संसाधने शेअर करण्यासाठी भागीदारी करत आहोत, यामुळे तुम्ही तुमची मालमत्ता सुरक्षित ठेवू शकता आणि तुमच्या गेस्ट्सना अशी महत्त्वाची माहिती देऊ शकता जी आणीबाणीच्या वेळी उपयोगी ठरेल.
जंगलातील वणव्याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता
तुमच्या कम्युनिटीमध्ये जंगलातील आग लागल्यास तुम्ही पुढील योजना आखू शकता. आयएएफसीचा रेडी, सेट, गो! प्रोग्रॅम जंगलाच्या आगीपासून सुरक्षेसाठी फार चांगले संसाधन आहे. हा कार्यक्रम अमेरिकेसाठी असला, तरीही यातील सल्ले जगभरातील कोणासाठीही फायद्याचे असू शकतात.
IAFC च्या काही सूचना याप्रमाणे आहेत:
- तुमचे घर, गॅरेज आणि तुमच्या प्रॉपर्टीवरील इतर इमारतींपासून 30 फूट (नऊ मीटर) अंतराच्या आत असलेली आपोआप उगवलेली झाडे-झुडुपे काढून टाका ज्याने एक सुरक्षित जागा निर्माण होईल.
- घराच्या पायथ्यापासून पाच फूट (दीड मीटर) अंतरापर्यंत कठोर पृष्ठभाग—काँक्रीट, दगड किंवा पेवर ब्लॉक— वापरा.
- तुमच्या घराच्या जवळच्या भागात लावण्यासाठी अग्नि-प्रतिरोधक, कमी उंचीच्या, औषधी वनस्पती वापरा.
- खाली लटकणाऱ्या फांद्या काढून टाका ज्याने गवत, झाडी आणि उंच झाडे यांच्या दरम्यान किमान सहा फूट (दोन मीटर) अंतर तयार होईल.
होस्टिंग करत असताना माहिती मिळवत राहण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या लोकेशनच्या प्रदेशात आणीबाणीचे अलर्ट मिळवण्यासाठी साइन अप करू शकता. बहुतांश माहिती तुमच्या गाव, शहर किंवा राज्याच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे, गेस्ट असताना तुम्ही जवळपास नसलात, तरीही काय घडते आहे याची माहिती तुम्हाला मिळत राहील.
जंगलातील वणव्यासंबंधित सुरक्षिततेबद्दल तुमच्या गेस्ट्सना कसे शिक्षित करावे
काही गेस्ट्स अशा भागांतून येतात जिथे जंगलाची आग प्रभावी नसते, त्यांना यातील जोखमींची कल्पना नसण्याची शक्यता असते. कसेही असले, तरीही तुम्ही तयार राहण्यात तुमच्या गेस्ट्सची मदत करू शकता.
हे सल्ले वापरून पहा रेडी, सेट, गो!:
- तुमच्या घराच्या नियमांमध्ये जंगलातील आगीसंबंधी मूलभूत माहिती द्या, ज्याने बुकिंग करण्यापूर्वी गेस्ट्सना कळेल की येथे जंगलातील आगीचा धोका आहे.
- एखाद्या मोक्याच्या ठिकाणी स्थानिक आपत्कालीन संपर्क माहिती ठेवा, जसे की फ्रिजवर किंवा कॉफी टेबलावर.
- आसपासच्या परिसराचे किंवा प्रदेशाचे प्रचलित नाव द्या (उदाहरणार्थ, कॅलीफोर्नियामधील कॅलाबाससची मलवुड कम्युनिटी). याला तुम्ही घराच्या नियमांमध्ये सामील करू शकता, तसेच आपत्कालीन माहितीच्या यादीमध्येही जोडू शकता.
- तुमच्या गेस्ट्सना तुमच्या भागाचा नकाशा द्या ज्यात तुमच्या प्रॉपर्टीचा पत्ता, जवळपासच्या रस्त्यांची नावे, बाहेर निघण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग आणि गेस्ट्ससाठी संभावित सुरक्षित लोकेशन अशी सर्व माहिती स्पष्टपणे दाखवलेली असेल.
- तुमच्या प्रॉपर्टीच्या भागामध्ये जंगलातील आग सध्या नसली, तरीही गेस्ट्सना स्थानिक आपत्कालीन अलर्टसाठी साइन अप करण्यासाठी आणि आग लागण्याच्या घटनांचे अपडेट मिळवण्यासाठी सांगा.
- तुमच्या गेस्ट्सना सांगा की तिथून निघून जाण्यासाठी त्यांना प्रशासनाकडून घरे रिकामी करण्याच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही, याचे विशेष कारण म्हणजे जर ते या भागात नवीनच आलेले असतील, तर त्यांना रस्ते शोधण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
जंगलातील आगसाठी तयारी करण्यात मदत करणारी संसाधने मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक अग्निशमन विभागाशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही अमेरिकेत असाल, तर तुम्ही रेडी, सेट, गो! वर देखील जाऊ शकता म्हणजे तुम्हाला जंगलातील आगींबद्दल जास्त माहिती मिळवता येईल आणि काय कारवाई करायची ते ठरवता येईल.
कॅन्सलेशन्स हाताळणे
तुम्ही तुमच्या लिस्टिंगसाठी निवडलेले कॅन्सलेशन धोरण सामान्यतः कॅन्सल केलेल्या रिझर्व्हेशन्ससाठी गेस्ट रिफंड्स निश्चित करते, जर तुमचे आणि गेस्ट इतर कशावर तरी एकमत झाले नसेल तर. रिझर्व्हेशन लोकेशनवरील एखाद्या मोठ्या घटनेमुळे रिझर्व्हेशन पूर्ण होण्यास प्रतिबंध झाल्यास किंवा कायद्याने प्रतिबंधित केल्यास, Airbnb चे अडथळा आणणाऱ्या प्रमुख घटनांबाबत धोरण लागू होऊ शकते.
जेव्हा अडथळा आणणाऱ्या प्रमुख घटनांबाबत धोरण लागू होते, तेव्हा तुम्ही शुल्क किंवा प्रतिकूल परिणामांशिवाय रिझर्व्हेशन कॅन्सल करू शकता आणि त्या तारखांसाठी लिस्टिंगचे कॅलेंडर ब्लॉक केले जाईल. ज्या गेस्ट्सची रिझर्व्हेशन्स प्रभावित झाली आहेत तेसुद्धा कॅन्सल करू शकतात आणि संपूर्ण रिफंड मिळवू शकतात. तुम्ही किंवा तुमच्या गेस्ट्सनी या धोरणाने कव्हर केलेले रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यास, तुम्हाला पेआऊट मिळणार नाही.