तुमच्या प्रॉपर्टीमध्ये पार्टीज होऊ न देण्यासाठी काही उपयुक्त सल्ले

जागतिक पार्टी बंदी आणि समस्या टाळण्याच्या धोरणांबद्दल तपशील मिळवा.
Airbnb यांच्याद्वारे 1 जुलै, 2020 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
25 जुलै, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • Airbnb चे पार्टी आणि इव्हेंट्स धोरण एखाद्या गेस्टचा पार्टीचा हेतू आहे याचा तुम्ही पुरावा दिल्यास, तुम्ही परिणामांशिवाय कॅन्सल करू शकता

  • अपेक्षा निर्धारित केल्यास आणि संवादात स्पष्टपणा ठेवल्यास समस्या टाळण्यात मदत होऊ शकते

होस्ट्स आणि गेस्ट्सना सुरक्षित राहण्यात मदत करणे हे Airbnb च्या प्राधान्यांपैकी एक आहे. Airbnb वर लिस्ट केलेल्या प्रॉपर्टीजमध्ये अनियंत्रित वर्तन रोखण्यात मदत करण्यासाठी, आम्ही खुल्या आमंत्रण असलेल्या मेळाव्यांसह व्यत्यय आणणाऱ्या पार्ट्या आणि इव्हेंट्स प्रतिबंधित करतो.

आमच्या जागतिक पार्टी आणि इव्हेंट्सवरील बंदी मुळे, ऑगस्ट 2020 मध्ये अंमलबजावणी झाल्यापासून पार्टी झाल्याच्या रिपोर्ट्सच्या दरात वर्ष-दर-वर्ष 44% घट झाली आहे. याला होस्ट्स, कम्युनिटी लीडर्स आणि निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे.

तुम्ही शेकडो वेळा होस्ट केले असो किंवा तुम्ही नुकतीच सुरुवात करत असलात तरी, तुमच्या जागेमध्ये गेस्ट्सचे स्वागत करणे तुम्हाला आरामदायक वाटावे अशी आमची इच्छा आहे. पार्ट्यांना परावृत्त करण्यासाठी आणि काही संबंधित जोखीम कमी करण्यासाठी तुम्ही ही सहा पावले उचलू शकता.

1. बंदी कशी काम करते ते जाणून घ्या

समस्या सुरू होण्यापूर्वी ती थांबवण्यात मदत करण्यासाठी, आम्ही तुम्हाला आमची पार्टी आणि इव्हेंट्स धोरणे वाचण्यासाठी प्रोत्साहित करतो. काही महत्त्वाचे मुद्दे:

  • व्यत्यय आणणाऱ्या पार्ट्या आणि इव्हेंट्स आणि खुले निमंत्रण असलेले मेळावे यांना परवानगी नाही.
  • काही देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये, आम्ही ज्यांना नकारात्मक रिव्ह्यूज मिळाले आहेत किंवा तीनपेक्षा कमी पॉझिटिव्ह रिव्ह्यूज मिळाले आहेत अशा 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गेस्ट्सद्वारे संपूर्ण घराच्या लिस्टिंग्जच्या काही स्थानिक बुकिंग्जवर निर्बंध लादले आहेत.
  • आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये 16 लोकांची ऑक्युपन्सी मर्यादा काढून टाकत आहोत—जी आम्ही 2020 मध्ये प्रामुख्याने कोविड-19 शी संबंधित सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांना प्रतिसाद म्हणून लागू केली होती.
  • बुटीक हॉटेल्ससारख्या पारंपारिक आदरातिथ्य स्थळांचे होस्ट्स त्यांच्या विवेकबुद्धीनुसार योग्य कार्यक्रमांना परवानगी देऊ शकतात.
  • आमच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या मेळाव्याला होस्ट्स परवानगी देऊ शकत नाहीत.

आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या गेस्ट्स आणि होस्ट्सवर Airbnb कारवाई करू शकते.

2. गेस्ट्सनी कशाची अपेक्षा करावी हे सेट करा

गेस्ट्सनी बुक करण्यापूर्वी काय अपेक्षा करावी हे कळावे यासाठी तुमचे लिस्टिंगचे वर्णन आणि घराचे नियम अपडेट करणे चांगले असते. तुमच्या रिझर्व्हेशनमध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्याही गेस्ट्सना तुम्ही आवारात परवानगी देता की नाही हे स्पष्ट करा, विशेषकरून जर तुमची जागा बऱ्याच लोकांना सामावून घेऊ शकणारी असेल किंवा तिथे स्विमिंग पूल किंवा मोठे मैदानी क्षेत्र असेल तर.

3. तुमच्या गेस्ट्सबद्दल जाणून घ्या

तुम्ही स्वतःला, तुमच्या प्रॉपर्टीला आणि तुमच्या कम्युनिटीला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकण्यासाठी तुमच्या गेस्ट्सशी स्पष्टपणे संवाद साधणे हा एक मार्ग आहे. तुम्हाला रिझर्व्हेशनची विनंती किंवा बुकिंगचे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर, गेस्टच्या माहितीचा आढावा घ्या आणि त्यांच्या भेटीबद्दल काही मूलभूत पाठपुरावा करणारे प्रश्न विचारा, जसे की:

  • तुमच्या ट्रिपचा उद्देश्य काय आहे?
  • तुमच्याबरोबर आणखी कोण-कोण राहणार आहेत?
  • तुम्ही घराचे नियम वाचले आहेत हे कन्फर्म करू शकता का?

गेस्ट्सनी लक्षात ठेवावे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये असे तुम्हाला वाटत असलेल्या कोणत्याही गोष्टीची आठवण करून देण्याची देखील ही एक संधी आहे, जसे की शांतता राखण्याची वेळ. तुम्ही आवाज, पार्किंग आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित स्थानिक कायदे किंवा निर्बंध शेअर करू शकता.

4. चांगले शेजारी बना

तुम्ही गेस्ट्स होस्ट करत आहात हे तुमच्या शेजाऱ्यांना सांगा. तुमची संपर्क माहिती एक किंवा अधिक विश्वासपूर्ण शेजाऱ्यांकडे ठेवा आणि काही अनपेक्षित समस्या आल्यास त्यांना तुमच्याशी संपर्क साधण्यास सांगा.

त्यांना चिंता असल्यास, तुम्ही त्यांना खात्री देऊ शकता की बहुसंख्य गेस्ट्स कोणत्याही समस्या निर्माण करत नाहीत. खरं तर, Airbnb वर 2021 मध्ये जगभरातील 99.92% रिझर्व्हेशन्समध्ये सुरक्षेशी संबंधित समस्यांचा कोणताही रिपोर्ट नव्हता.*

5. स्वत: ला गेस्ट्ससाठी उपलब्ध ठेवा

तुम्ही स्वतःहून चेक इनऑफर केले तरीही तुम्ही तुमच्या गेस्ट्सना तुम्ही उपलब्ध असल्याचे दाखवू शकता. चेक इन करण्यापूर्वी, त्या दरम्यान आणि त्या नंतर तुम्ही हे करू शकता:

  • आपत्कालीन परिस्थितीत तुमच्याशी फोनवरून कसा संपर्क साधावा हे गेस्ट्सना सांगून ठेवा. तुम्ही कोणतीही घटना अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकाल आणि जलद प्रतिसाद मिळाला हे गेस्ट्सना आवडेल.
  • गेस्ट्सना काही हवे असल्यास—मी येऊ का असे विचारा—किंवा एखाद्याला पाठवा. तुम्ही जवळपास राहत नसल्यास, आवश्यक असेल तेव्हा वैयक्तिकरित्या गोष्टी हाताळू शकणारा प्रॉपर्टी मॅनेजर किंवा को-होस्ट नियुक्त केल्यास बरे होईल.

6. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटत असल्यास कृती करा

एखाद्या गेस्टचा पार्टी देण्याचा हेतू आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही परिणामांशिवाय चेक इन करण्यापूर्वी रिझर्व्हेशन कॅन्सल करू शकता. आम्ही तुम्हाला तुमच्या निर्णयाला सपोर्ट करणारे पुरावे देण्यास सांगू, जसे की तुमच्या गेस्टचे मेसेजेस आणि इतर डॉक्युमेंटेशन.

उदाहरणार्थ, समजा, तुमच्या जागेजवळ राहणारा एखादा गेस्ट वीकेंडला शेवटच्या क्षणी, एक-रात्रीचे वास्तव्य बुक करतो. ते तुम्हाला मेसेज करतात आणि अनेक मित्र-मैत्रिणींसाठी अतिरिक्त स्ट्रीट पार्किंगबद्दल विचारतात—आणि तुम्ही पार्टीचा उल्लेख असलेल्या दुसऱ्या होस्टने दिलेला गेस्टबद्दलचा रिव्ह्यू वाचता. तुम्ही गेस्टचा मेसेज आणि त्यांचा रिव्ह्यू आमच्यासोबत शेअर केल्यास, तुम्ही परिणामांशिवाय रिझर्व्हेशन कॅन्सल करू शकता.

तुम्ही ऑनलाईन कॅन्सल करू शकता जर तुम्ही तात्काळ बुकिंग चालू केले असेल आणि वर्षाला तीन कॅन्सलेशन्सची मर्यादा ओलांडली नसेल. गेस्टची चेक इन वेळ 24 तासांच्या आत असल्यास, रिझर्व्हेशन कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल.

होस्टिंगसाठी सुरक्षा आणि अपेक्षांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आमची कम्युनिटी धोरणे वाचा.

*1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान Airbnb च्या अंतर्गत डेटाच्या आधारे.

या लेखात दिलेली माहिती लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

हायलाइट्स

  • Airbnb चे पार्टी आणि इव्हेंट्स धोरण एखाद्या गेस्टचा पार्टीचा हेतू आहे याचा तुम्ही पुरावा दिल्यास, तुम्ही परिणामांशिवाय कॅन्सल करू शकता

  • अपेक्षा निर्धारित केल्यास आणि संवादात स्पष्टपणा ठेवल्यास समस्या टाळण्यात मदत होऊ शकते

Airbnb
1 जुलै, 2020
हे उपयुक्त ठरले का?