आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमची जागा—आणि तुमच्या गेस्ट्सना—तयार करणे
हायलाइट्स
या टिप्स वापरून आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्या जागेची आणि तुमच्या गेस्ट्सची कशी तयारी करून घ्यावी, ते जाणून घ्या
धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स इन्स्टॉल करा आणि CO विषबाधेची चिन्हे जाणून घ्या
घराच्या देखभालीच्या वेळापत्रकाचे नियोजन करा आणि गेस्ट्सना आपत्कालीन पुरवठा द्या
एक होस्ट म्हणून, तुम्हाला खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि जोपर्यंत तुम्ही घराच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. आम्हाला माहीत आहे की बॅटरीज बदलण्यापासून ते तुमच्या गेस्ट्ससह इव्हॅक्युएशनचा प्लॅन शेअर करण्यापर्यंतच्या मूलभूत कामांकडे लक्ष देण्यापासून आग, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहणे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे. आम्ही ग्लोबल डिझास्टर प्रिपेर्डनेस सेंटर, अमेरिकन रेड क्रॉस आणि इतर आरोग्य आणि सुरक्षा संस्थांकडून काही टिप्स संकलित केल्या आहेत; पण तुमच्या प्रदेशासाठी असलेल्या विशिष्ट नियमांशी आणि नियमनांशी स्वतःला परिचित करून घेणे, ही एक चांगली कल्पना आहे.
धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स इन्स्टॉल करा
आगीपासून होणाऱ्या धोक्यांची माहिती तुम्हाला आधीपासून असेल, पण तुम्हाला कार्बन मोनॉक्साइड (CO) च्या धोक्यांची माहिती आहे का? घरातील अनेक सामान्य वस्तूंपासून CO निर्माण होऊ शकते, जसे की गॅस स्टोव्ह, पाणी गरम करण्याची साधने, ओव्हन, फायरप्लेस किंवा कोळशाची शेगडी इत्यादी. हा गॅस दिसत नाही, याला वास आणि रंग नाही आणि यापासून अगदी जिवाचा धोकाही निर्माण होऊ शकतो असे सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) यांचे म्हणणे आहे. योग्य तपासणी आणि वारा खेळण्याची व्यवस्था नसल्याने या उपकरणांपासून हा गॅस मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो ज्यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू सुद्धा होण्याचा संभव असतो.
CDC ने सुचवल्याप्रमाणे, झोपण्याच्या प्रत्येक जागेजवळ अलार्म्स इन्स्टॉल करून कार्बन मोनॉक्साईड विषबाधा रोखण्यात मदत करा. अमेरिकन रेड क्रॉसच्या मते, तुम्ही कमीतकमी तुमच्या जागेच्या प्रत्येक पातळीवर आणि झोपण्याच्या प्रत्येक जागेबाहेर स्मोक अलार्म्स लावून आग रोखण्यात मदत करू शकता. तुम्ही स्मोक आणि कार्बन मोनॉक्साईडसाठी काम करणारे कॉम्बिनेशन अलार्म्सदेखील खरेदी करू शकता. संभाव्य गेस्ट्सच्या सुरक्षेसाठी तुम्ही ही पावले उचलली आहेत हे त्यांना समजण्यासाठी तुमच्या लिस्टिंगच्या वर्णनाचा सुविधा विभाग अपडेट केल्याचे सुनिश्चित करा.
तुमच्या गेस्ट्सना कार्बन मोनॉक्साईड विषबाधा होण्याचा धोका समजून घेण्यात मदत करा
तुम्ही कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स इन्स्टॉल केल्यावर, कार्बन मोनॉक्साईडचे सामान्य स्रोत आणि कार्बन मोनॉक्साईड विषबाधेच्या विशिष्ट चिन्हांशी परिचय करून घेणे चांगले आहे:
- कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेच्या चिन्हांमध्ये डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश आहे. तुम्हाला किंवा तुमच्या गेस्ट्सना याचा अनुभव आल्यास आणि तुम्हाला कार्बन मोनॉक्साईडची विषबाधा झाल्याचा संशय असल्यास, तुम्ही ताबडतोब इमारतीतून बाहेर पडावे आणि 911 वर कॉल करावा अशी CDC ची शिफारस आहे.
- गेस्ट्सनी गॅरेजेस आणि तळघरांसह घराच्या आत ग्रिल किंवा कॅम्प स्टोव्हचा वापर का करू नये, याची आठवण करून देण्यासाठी तुमची सुविधा सूची ही एक उत्तम जागा आहे. तुमच्या गेस्ट्सना उबदारपणासाठी स्टोव्ह्ज किंवा ओव्हन वापरण्याचा मोह होईल अशा हवामानात हे रिमाइंडर विशेषतः महत्त्वाचे आहे. तुम्ही कार्बन मोनॉक्साईडचे धोके स्पष्ट करू शकता आणि उष्णतेचे विश्वासार्ह स्रोत प्रदान करण्याचे सुनिश्चित करू शकता.
- तुमच्या सुविधा सूचीमध्ये, तुम्ही नमूद करू शकता की कार्बन मोनॉक्साईड अलार्म वाजल्यास गेस्ट्सनी शिफारस केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे, उदा. ताबडतोब घराबाहेर जाणे किंवा त्यांना बाहेर पडता येत नसल्यास उघड्या खिडकीजवळ किंवा दाराजवळ जाणे.
- टीपः काही घरांमध्ये इंधन जाळणारी कोणतीही उपकरणे नसतील (उदा. संपूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालणारी घरे) तर त्यांना कार्बन मोनॉक्साईड अलार्मची आवश्यकता असू शकत नाही; पण कन्फर्म करण्यासाठी तुमच्या स्थानिक अग्निशमन विभागाच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधणे, ही चांगली कल्पना आहे.
तुमच्या होस्टिंग नित्यक्रमात देखभाल शेड्युलचा समावेश करा
तुमच्या धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्सची नियमितपणे तपासणी करा. प्रत्येक स्प्रिंग आणि फॉलमध्ये तुमच्या घडाळ्यांतील वेळा बदलताना सोबतच बॅटरीज तपासण्याची किंवा बदलण्याची शिफारस सीडीसी करते. बहुतेक अलार्म दर पाच ते 10 वर्षांनी बदलले पाहिजेत, परंतु उत्पादकाच्या सूचनांचे परीक्षण करा; त्यांचे वय किंवा कालबाह्यता तारीख दर्शविण्यासाठी बऱ्याच युनिट्सच्या मागे टॅग किंवा तारखेचा शिक्का असतो. तुम्ही हे करत असताना, लाकूड आणि कोळसा स्टोव्ह्ज, फायरप्लेसेस, चिमनीजआणि फरनेसेस वर्षातून एकदा व्यावसायिकपणे तपासल्या पाहिजेत आणि साफ केल्या पाहिजेत. वॉटर हीटर्सची दुरुस्ती वर्षातून किमान एकदा केली पाहिजे.
तुमच्या जागेचे आणि गेस्ट्सचे आगींपासून संरक्षण करा
सुरक्षितता लक्षात घेऊन तुमची जागा सेट करा आणि आग लागल्यास काय करावे हे तुमच्या गेस्ट्सना कळवा:
- किचन, गॅरेज आणि शक्य असल्यास प्रत्येक मजल्यावर अग्निशामक उपकरणे इन्स्टॉल करा. अमेरिकन रेड क्रॉसच्या मते, त्यांना उष्णतेच्या स्त्रोतांपासून (ओव्हनसारखे) दूर ठेवा, कारण उष्णता त्यांना कमी प्रभावी बनवू शकते. ते जेथे आहेत तेथे दरवाजे आणि कॅबिनेट्सवर स्टिकर्स लावून आणि त्यांचे लोकेशन तुमच्या सुविधा सूचीमध्ये समाविष्ट करून त्यांना शोधणे सोपे करा.
- निर्वासन योजना तयार करा ज्यात प्रत्येक रूममधून बाहेर पडण्याचे दोन मार्ग आणि बाहेर भेटण्यासाठी पूर्व-ओळखलेले लोकेशन समाविष्ट करा आणि ते तुमच्या सुविधा सूचीमध्ये देखील ठेवा.
- तुमच्या स्टोव्हची जागा स्वच्छ ठेवा आणि आग पकडू शकेल असे जवळपासचे काहीही काढून टाका.
- तुम्ही स्पेस हीटर खरेदी केल्यास, असे मॉडेल निवडा जे मर्यादा ओलांडल्यावर थांबेल.
- गेस्ट्सना वापरात नसताना पोर्टेबल हीटर बंद करण्याची, आत धूम्रपान करणे टाळण्याची आणि मेणबत्त्यांची आठवण करून द्या.
नैसर्गिक आपत्त्यांसाठी आधीच योजना तयार करा
भूकंप आणि चक्रीवादळांपासून ते टायफून्स आणि तीव्र हिवाळ्यातील वादळांपर्यंत, यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी तुम्ही तयारी करू शकता. तुम्ही होस्ट म्हणून कसे तयार होऊ शकता याबद्दल काही टिप्स येथे आहेत:
- अलर्ट्ससाठी साईन अप कराः ग्लोबल डिझास्टर प्रिपेर्डनेस सेंटर त्याच्या इमर्जन्सी ॲप्स द्वारा प्रत्यक्ष त्या वेळी इमर्जन्सी अलर्ट्स आणि इतर नोटिफिकेशन्स देते.
- गेस्ट्सना माहिती मिळत राहण्यात मदत करण्यासाठी त्यांना स्थानिक टीव्ही आणि रेडिओ स्टेशनची माहिती द्या.
- त्यांचे फोन्स पूर्णपणे चार्ज करून ठेवण्याची, सोबत अतिरिक्त रक्कम बाळगण्याची आणि त्यांच्याकडे कार असल्यास तिची इंधन टाकी पूर्ण भरून ठेवण्याची त्यांना आठवण करून द्या.
प्रथमोपचार किट्स आणि इतर आपत्कालीन पुरवठा द्या
तुमच्या गेस्ट्सना आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या सामग्र्यांसह तुमची लिस्टिंग सुसज्ज ठेवा:
- सर्व्हायव्हल किट बनवा किंवा खरेदी करा आणि त्यात पाणी, खराब न होणारे अन्न, फ्लॅशलाइट आणि अतिरिक्त बॅटरी यासारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश करा.
- तुमच्या भागातील धोक्यांशी संबंधित असणारे प्रथमोपचार किट आणि इतर वस्तू जोडा—उदाहरणार्थ, तुमची जागा पूरक्षेत्रात असल्यास लाईफ जॅकेट्स किंवा हिमवर्षावाचा प्रभाव असल्यास उबदार ब्लँकेट्स. इव्हॅक्युएशनच्या घटनेदरम्यान सामान एका सहज कॅरी करता येणाऱ्या बॅगमध्ये ठेवा.
आपत्कालीन माहिती सहज मिळेल अशी ठेवा
Airbnb चे अपडेट केलेले आपत्कालीन गाईड डाऊनलोड करून आणि भरून आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मिळवायची ते तुमच्या गेस्ट्सना कळवा. गाईड तुम्हाला तुमचे स्थानिक पोलिस स्टेशन, हॉस्पिटल आणि अग्निशमन विभागाचा फोन व पत्त्याची माहिती; तुमचे अग्निशामक, प्रथमोपचार किट व गॅस शट-ऑफ वाल्व्ह यासारख्या सुरक्षा सुविधांचे लोकेशन आणि तुमचे आपत्कालीन निर्वासन प्लॅन भरण्यास सूचित करते. आम्ही गाईडच्या किमान दोन आवृत्त्या भरण्याची शिफारस करतोः एक इंग्रजीमध्ये आणि दुसरी तुमच्या मूळ भाषेत. गाईड किचन किंवा प्रवेशद्वारासारख्या सामान्य भागात ठेवा आणि ते तुमच्या सुविधा सूचीमध्ये समाविष्ट करा.
तुमच्या सुविधा सूचीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीचे स्पष्ट दिशानिर्देश समाविष्ट करणे आणि त्यांना सुरक्षितपणे प्रवास करण्यात मदत करण्यासाठी चेक इन करण्यापूर्वी तुमच्या गेस्ट्सना ही सूची पाठवणे देखील उत्तम कल्पना आहे. जर ते अंधार पडल्यानंतर पोहोचणार असतील, तर तुम्ही त्यांच्यासाठी पोर्च आणि आतील लाईट सुरू ठेवण्याचा विचार करू शकता आणि त्यांना लॉकबॉक्स शोधण्यासाठी किंवा आत जाण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती देऊ शकता.
तुमचे प्रथमोपचार किट अपडेट करणे आणि तुमचे स्मोक अलार्म्स तपासणे यासह तुम्हाला जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडण्यास मदत करण्यासाठी, आम्ही एक सुरक्षा चेकलिस्टदेखील तयार केली आहे जी तुम्ही तुमच्या होस्टिंग नित्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रिंट करू शकता, पोस्ट करू शकता आणि त्याचा आढावा घेऊ शकता. तुमची जागा—आणि तुमचे गेस्ट्स—सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची भूमिका बजावल्याबद्दल धन्यवाद.
तुमचे घर सुरक्षित कसे ठेवावे याबद्दल अधिक टिप्ससाठी, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन, ग्लोबल डिझास्टर प्रिपेर्डनेस सेंटर आणि अमेरिकन रेड क्रॉस वर जा. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन, ग्लोबल डिझास्टर प्रीपेर्डनेस सेंटर आणि अमेरिकन रेड क्रॉसने या सामग्रीला किंवा Airbnb ला अधिकृत समर्थन दिलेले नाही.
हायलाइट्स
या टिप्स वापरून आपत्कालीन परिस्थितीसाठी तुमच्या जागेची आणि तुमच्या गेस्ट्सची कशी तयारी करून घ्यावी, ते जाणून घ्या
धूर आणि कार्बन मोनॉक्साईड अलार्म्स इन्स्टॉल करा आणि CO विषबाधेची चिन्हे जाणून घ्या
घराच्या देखभालीच्या वेळापत्रकाचे नियोजन करा आणि गेस्ट्सना आपत्कालीन पुरवठा द्या