तुमची कहाणी कशी विणावी
हायलाइट्स
तुमची कथा शोधणे, तयार करणे आणि शेअर करणे ही गेस्ट्सशी कनेक्ट होण्याचा एक मार्ग आहे
तुमच्या घरातील किंवा भागातील अशा अनुभवांचा विचार करा जे गेस्ट्सना इतरत्र कुठेही मिळू शकत नाही
तुमच्या घरासाठी सोशल मीडियावरील उपस्थिती वाढवा
प्रत्येक अडथळा शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी म्हणून पहा
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका
सुपरहोस्ट्स टेरेसा आणि डेव्हिड कथाकथनाचे सामर्थ्य चांगलेच जाणून आहेत. पालक, पर्यावरणवादी, सर्जनशील दिग्दर्शक, प्रकाशित लेखक आणि एल्कहॉर्न, विस्कॉन्सिनमधील कॅम्प वांडावेगाचे मालक या नाते ते शिकले की कथा गुंफून लोकांना एकत्र आणता येते. टेरेसा म्हणतात, “जसे-जसे आम्ही कॅम्पच्या इतिहासाचे तपशील शोधणे आणि पोस्ट करणे सुरू केले—जसे की 1920 मध्ये ते एक अवैध दारूचे दुकान होते, गुन्हेगारी टोळक्यांचे भेटण्याचे एक ठिकाण होते, एक वेश्यागृह होते, लाटवियन शरणार्थी कम्युनिटीसाठी उन्हाळी शिबिर घेण्याचे एक स्थळ होते आणि आता आमचे स्वतःचे त्यासह नाते होते—तसे-तसे आम्हाला आढळले की लोक खरोखरच त्याच्याशी प्रभावित होऊन जोडले जात आहेत.”
येथे, ते तुमच्यासह शेअर करत आहेत की तुम्ही तुमच्या घराचीची माहिती कशी शोधायची आणि कथा कशी गुंफायची.
1. लोकांना गुंतवून ठेवणारी तुमची गोष्ट शोधा
टेरेसा: “जरी तुमची जागा शतकानुशतके जुनी ऐतिहासिक नसली तरी तुम्ही तिची एक कथा तर नक्कीच सांगू शकता. तुमची कथा शोधण्यासाठी, अशी सुरुवात करा:
- तुमच्या घराचा इतिहास काय आहे?
- तुमच्या शहरामध्ये गेस्ट्सना असे कोणते अनोखे अनुभव मिळतील जे इतरत्र कुठेही मिळू शकत नाही?
- अशा कोणत्या रोचक आणि रंजक गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही सहजपणे दुर्लक्ष करता?
अशा गोष्टी शोधून काढा आणि त्या तुमच्या लिस्टिंगमध्ये सामील करा.”
डेव्हिड: “बेडरूम्स आणि बाथरूम्सच्या किती आहेत, केवळ हेच न सांगता तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये बरेच काही शेअर करू शकता. लोकांना माहीत करून घ्यायचे असते की त्यांना उत्तम कॉफी कुठे मिळू शकेल, त्यांना तुमच्या आवडत्या ठिकाणांबद्दल जाणून घ्यायचे असते—म्हणून तुम्ही देत असणाऱ्या अनुभवात कोणत्या अनोख्या गोष्टी तुम्ही शेअर करणार आहात ते सांगा. गेस्ट्स मानवी जिव्हाळा आणि भावनिकरित्या गुंतून राहण्याचे कारण शोधत असतात आणि कथा आम्हाला एकत्र आणण्यास मदत करतात.”
2. परफेक्शनच्या मागे लागू नका
डेव्हिड: “खूप आधीच आम्हाला कळले होते की आम्हाला वेळेपूर्वी लोकांच्या अपेक्षा मॅनेज करणे आवश्यक आहे कारण आम्हाला त्यांना कोणत्याही परिस्थितीत निराश करायचे नव्हते. म्हणून आम्ही आमचा कमी अपेक्षांचा जाहीरनामा तयार केला. ही गावाच्या जीवनाचा परिचय करून देण्याची आमची एक मजेदार पध्दत आहे. लोकांनी काय अपेक्षा करावी हे त्यात सांगितले आहे—जसे इथे कीटक असतील, वन्यजीव असतील आणि एअर कंडिशनिंग तर अजिबात नसेल—जर तुम्हाला मऊ इजिप्शियन चादरी किंवा आधुनिक सोयी-सुविधा हव्या असतील तर ही जागा तुमच्यासाठी नाही.”
टेरेसा: "आमच्या जागेत उगाच चमक-धमक नाही, खोटेपणा दाखवणारी नाही. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जागेचे वर्णन करण्यासाठी त्याच सरळ, सच्चेपणाच्या भाषेचा वापर करतो. आम्ही जनतेशी थेट प्रामाणिक संवाद साधण्याचा निर्णय घेतला. आमच्या भाषेची शैली गमतीशीर आहे, पण त्यात कडवट सत्य देखील आहे. आम्ही अतिशयोक्तीचा वापर केला आहे हे नक्की पण तेच तर आम्हाला विनोदबुद्धी देते आणि त्याच कारणाने लोक आमच्याशी अधिक मैत्रीपूर्ण संवाद साधू शकतात, असे मला वाटते. आणि संपर्क करण्यायोग्य होण्यासाठी तुम्हाला कॉपीरायटर असण्याची गरज नाही—तुम्ही तुमच्या जागेचे साधे सोपे वर्णन करू शकता.”
डेव्हिड: “मी Airbnb सर्फिंग करत असतो तेव्हा त्यांच्या जागेचे वर्णन करताना एखाद्याचे व्यक्तिमत्त्व दिसून येते तेव्हा मला ते खूप आवडते. खासकरून जर आपण एखादी जागा शेअर करणार असलो तर मला हे जाणून घ्यायचे असेल की तुमच्याकडे विनोदबुद्धी आहे का आणि तुम्ही अशी व्यक्ती आहात का जिच्याशी मला गप्पा मारायला आवडेल. आकाशातून चंद्र-तारे तोडून आणण्यासारख्या अशक्य गोष्टी बोलू नका. एखाद्या गोष्टीत आपण जगातले सर्वोत्तम असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त प्रामाणिक आणि खरे आणि मजेदार रहा कारण लोकांना तुमच्या जागी वास्तव्य करण्यासाठी आल्यावर त्यांना तणावरहित रहायचे असते.”
3. सोशल व्हा
टेरेसा: “तुमच्या घराचे आकर्षण आणि बुकिंग्ज वाढवण्यासाठी त्याचे सोशल मीडियावर खूप प्रचार करा. बहुतेक लोक आम्हाला सर्वात आधी सोशल मीडियावर बघतात, हे अगदी खरे आहे. ते आमच्या इमेजेस किंवा आमच्या Instagram फीडद्वारे आमच्याशी परिचित होतात—आपला स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग तयार करण्याचा हा खरोखर एक चांगला मार्ग आहे आणि मग त्यांना आमच्या कॅम्पमध्ये येण्याच्या अद्भुत शक्यता आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आमंत्रित करू शकतो. काही सल्ले:
- जीवनातील असे क्षण शेअर करण्याचा प्रयत्न करा जे लोकांना थेट स्वतः जगावेसे वाटतील. तुम्हाला बेडच्या बाजूला असलेले ते पुस्तक हवे आहे, गरमा गरम कॉफीचा कप आणि खिडकीच्या बाहेरचे दृश्य—हे सर्व हवे आहे.
- व्हिज्युअल कथाकथनसाठी चांगली स्टाईल आणि उत्तम फोटोग्राफी खूप महत्त्वाचे आहे. ती लक्षवेधी आणि सुंदर बनवा!”
डेव्हिड: “जेव्हा लोक वांडावेगाला भेट देतात, तेव्हा लोक मला किती तरी वेळा सांगतात की त्यांनी Instagram वर कोणता एक फोटो पाहिला आहे आणि तो क्षण स्वतः जगण्यासाठी त्यांना तिथे धावत सुटायचे असते. Instagram जीवनात पूर्ण करावयाच्या क्षणांची बकेट लिस्ट—आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या जागेचे व्हिज्युअल प्रिव्ह्यू बनते. हे बरेचदा तुम्हाला बुकिंग मिळण्यामागचे कारण बनते.”
4. “अपफेलिंग” करत राहा
डेव्हिड: “सुरुवातीला आम्ही अनेक चुका केल्या. पण आम्ही आमच्या अपफेलिंगमधून म्हणजेच अपयशातून शिकून पुढे जात आहोत आणि जीवन अव्यवस्थित असते, हे स्वीकार करत पुढची वाटचाल करत आहोत. उदाहरणार्थ, कथाकथन करताना, आम्हाला कळले की गरजेपेक्षा जास्त शेअर करणे आधी-कधी चुकीचे असू शकते. लोकांना वेश्यागृहाच्या मॅडम, माफिया आणि खून याबद्दल ऐकायला तर आवडते—पण ते नेमके कोठे घडले हे त्यांना जाणून घ्यायचे नसते—विशेषकरून त्यांना जिथे झोपायचे आहे त्या जागेवर घडलेल्या अशा गोष्टींबद्दल तर नक्कीच नाही. कालांतराने तुम्हाला कळायला की कोणत्या गोष्टी काम करतात, कोणत्या करत नाही आणि तुमच्या प्रेक्षकांना काय आवडते.”
टेरेसा: “आमच्यासाठी अपफेलिंग म्हणजे प्रत्येक अडथळा प्रगतीची संधी म्हणून बघणे आहे. तुम्ही असेच शिकत जाता.”
5. प्रवास शेअर करा
टेरेसा: “जेव्हा आम्ही या कामाला सुरुवात केली होती तेव्हा मला आमचे ‘आधीचे‘ फोटोज शेअर करायला प्रचंड भीती वाटत होती. मला वाटले की कोणालाही आमच्याबरोबर राहण्याची इच्छा होणार नाही कारण ते फोटोज अत्यंत भयानक दिसत होते. पण प्रत्यक्षात ‘आधी आणि नंतर’ च्या फोटोजमुळे लोकांचा सहभाग मिळत गेला.
डेव्हिड: “लोकांना प्रामाणिकता आवडते. त्यांना ही प्रक्रिया पाहायची आहे. मला पुन्हा हेच सांगायचे आहे की लोक वैयक्तिक जिव्हाळा शोधत असतात—म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनाचे काही भाग शेअर करण्यास घाबरू नका. प्रामाणिक राहा आणि तुमची अनोखी कहाणी सांगा.“
हायलाइट्स
तुमची कथा शोधणे, तयार करणे आणि शेअर करणे ही गेस्ट्सशी कनेक्ट होण्याचा एक मार्ग आहे
तुमच्या घरातील किंवा भागातील अशा अनुभवांचा विचार करा जे गेस्ट्सना इतरत्र कुठेही मिळू शकत नाही
तुमच्या घरासाठी सोशल मीडियावरील उपस्थिती वाढवा
प्रत्येक अडथळा शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी म्हणून पहा
- तुमच्या होस्टिंगचा स्तर उंचावण्यासाठी आमचे संपूर्ण गाईड वाचून अधिक शिका