आणखी 5-स्टार रिव्ह्यूज मिळवा

वास्तव्याच्या जागा संस्मरणीय कशा तयार होतात ते इंटिरियर डिझायनर आणि सुपरहोस्ट्सकडून जाणून घेऊया.
Airbnb यांच्याद्वारे 26 मे, 2021 रोजी
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
15 ऑग, 2024 रोजी अपडेट केले

बिगिनिंग इन द मिडल चे सुपरहोस्ट्स, उद्योजक आणि इंटेरिअर डिझायनर्स कॅथरीन आणि ब्रायन विल्यमसन यांनी 5 स्टारच्या योग्यतेच्या वास्तव्याच्या जागा तयार करण्याचा व्यवसाय उभा केला आहे. 2,000 पेक्षा जास्त गेस्ट्सना होस्ट केल्यानंतर, ते इथे त्यांची गोष्ट आणि तुमचे घर संस्मरणीय कसे करावे याबद्दलच्या त्यांच्या एक्स्पर्ट टिप्स शेअर करत आहेत.

तुमच्या लिस्टिंगमध्ये सतत सुधारणा करणे

कॅथरीन: "आमच्यासाठी, आमचा Airbnb व्यवसाय आणि डिझाइन फर्म सुरू करणे हा एक हॅपी अॅक्सिडेंट होता. २०१३ मध्ये आम्ही न्यूयॉर्क सिटीहून कोलंबस, ओहायो येथे स्थलांतरित झालो—जिथे ब्रायन मूळतः मोठा झाला. आम्हाला अधिक मोठी जागा हवी होती, तसेच आम्ही अशी जागा शोधत होतो जिथे आम्ही सेटल होऊ शकू आणि स्वतःचे काहीतरी उभे करू शकू.

प्रत्येक गेस्टना आपले स्वागत होते आहे असे वाटण्यात मदत करणे

Airbnb वर होस्ट म्हणून, तुम्ही जगभरातील लोकांसाठी तुमचे दार खुले करता. सातत्य आणि सर्वसमावेशकता असल्यामुळे प्रत्येक गेस्टला आपलेपणा जाणवतो.

  • प्रश्न विचारा. चेक इन पूर्वी काही दिवस “गेस्ट्सचे वास्तव्य अधिक आरामदायी बनवण्यासाठी तुम्ही काही करू शकता का” असे गेस्ट्सना विचारणारा आधी शेड्युल केलेला मेसेज पाठवा. गेस्ट्सना काय हवे आहे हे जाणून घेण्याची इच्छा हे दाखवून देते की तुम्ही त्यांच्या आरामाबद्दल गांभीर्याने विचार करता.
  • लिंग निरपेक्ष भाषा वापरा. तुमच्या Airbnb प्रोफाईलमध्ये सर्वनामे जोडणे, तुम्हाला कसे संबोधित केले जाणे आवडते, हे दाखवते आणि तुम्ही सर्व प्रकारच्या ओळखी असणाऱ्या गेस्ट्सचे स्वागत करत असल्याचे संकेत देते. गेस्ट्सना मेसेज पाठवताना, एखाद्याचे लिंग किंवा रिलेशनशिप स्टेटस यांसारख्या तुम्ही गृहीत धरत असलेल्या कोणत्याही गोष्टी तपासा.
  • ॲक्सेसिबल वैशिष्ट्ये हायलाईट करा. तुमच्याकडे ॲक्सेसिबल पार्किंग स्पॉट, पायऱ्यांशिवाय प्रवेशद्वार, दरवाजे किंवा शॉवर किंवा इतर ॲक्सेसिबल सुविधा आहेत का? गेस्ट्स तुमच्या जागेवर राहू शकतील की नाही हे निर्धारित करण्यात मदत करण्यासाठी आमची ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्याची मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि तुमच्या लिस्टिंगच्या ॲक्सेसिबिलिटी विभागात स्पष्ट फोटो अपलोड करा.
  • तात्काळ बुकिंग चालू करा. गेस्ट्सना आगाऊ बुकिंग ऑफरशिवाय तुमची जागा बुक करण्याची परवानगी दिल्यामुळे तुम्ही तुमच्या बुकिंगच्या निकषांमध्ये बसणाऱ्या कोणालाही होस्ट करण्यास तयार आहात, हे आणखी ठामपणे दिसते.
  • स्वत:हून चेक इन सक्षम करा. गेस्ट्सनी हे शेअर केले आहे की स्वत:ला येऊ देण्याची सोय ओळखीच्या आधारे स्वीकारले जाण्याबद्दलच्या समस्या दूर करण्यात मदत करते.

सर्वसमावेशक होस्टिंग म्हणजे प्रत्येक गेस्टचे स्वागत करण्यासाठी सारख्याच स्टडर्डचा वापर करणे, त्यांनी बुक केल्यापासून ते तुम्ही एकमेकांचा रिव्ह्यू करेपर्यंत. तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास, आणखी सर्वसमावेशक होस्ट कसे व्हावे याबद्दल आमची लर्निंग सिरीज वाचा.

कॅथरीन: "आम्ही आमच्या कर्जाची परतफेड केली आणि अखेरीस आणखी एक घर विकत घेतले. काही वर्षांनंतर फास्ट फॉरवर्ड करा: आम्ही काही घरे फ्लिप केली आहेत आणि विकली आहेत आणि आमची आवडती घरे Airbnb वर ठेवली आहेत. आम्ही आमच्या नोकऱ्या सोडल्या, आमचा इंटिरियर डिझाइन स्टुडिओ (मिक्स डिझाईन कलेक्टिव्ह), आणि आमचा व्हेकेशन रेन्टल ब्रँड (द व्हिलेज होस्ट) तयार केला आणि आमचा ब्लॉग (बिगिनिंग इन द मिडल) सुरू केला."

ब्रायन: "आमच्या बाजूने, आम्ही आमच्या प्रत्येक गेस्टसाठी एक विशेष अनुभव तयार करण्याची खरोखरच काळजी घेतो. आणि आदरातिथ्य करण्याच्या या उत्कटतेने आमच्या आवडीचे आयुष्य उभे करण्यास आम्हाला सक्षम केले आहे. एक होस्ट म्हणून, तुमच्याकडे सर्वात फॅन्सी घरे असोत किंवा नसोत, जर तुम्ही एक विशेष वास्तव्य देऊ शकलात, तर तुम्हाला तुमचे रिव्ह्यूज आणि ऑक्युपन्सी दर वाढताना दिसतील."

*1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सुविधांचे मोजमाप करणाऱ्या Airbnb च्या डेटाप्रमाणे.

Airbnb
26 मे, 2021
हे उपयुक्त ठरले का?