गर्दीच्या सीझनची परिपूर्ण तयारी करणे
गर्दीचा सीझन येत आहे. गेस्ट्सकडून मागणी सर्वाधिक असणाऱ्या कालावधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याकरता, तुम्ही Airbnb होस्टिंग टूल्स कशी वापरू शकता याचे काही मार्ग येथे दिले आहेत.
तुमचे कॅलेंडर अप टू डेट ठेवा
तुमच्या कॅलेंडरमध्ये अतिरिक्त रात्री खुल्या करून, तुमच्या भागातील गर्दीच्या सीझनची तयारी करा. यामुळे तुमची लिस्टिंग अधिक सर्च रिझल्ट्समध्ये दिसण्यात मदत होते आणि तुमची कमाई वाढवू शकते.
तुमच्या कॅलेंडरमध्ये रात्री खुल्या करताना, तुमच्या ट्रिपच्या किमान कालावधीचा विचार करा. तुम्हाला तुमच्या किमान कालावधीच्या आत राहावे लागेल किंवा तुमचा ट्रिपचा स्टँडर्ड किमान कालावधी कमी करावा लागेल. तुम्ही खुल्या केलेल्या विशिष्ट रात्रींसाठी तुम्ही ट्रिपचा कस्टम कालावधीदेखील तयार करू शकता.
“विशेषतः व्यस्त सीझनमध्ये कॅलेंडर खुले आहे याची खात्री करणे महत्वाचे आहे,” लिटिल रॉक, अर्कान्सासमधील सुपरहोस्ट मिरांडा म्हणतात. “दोन गेस्ट्सच्या दरम्यान काही दिवसांची सुट्टी घेण्याऐवजी, मी त्या हंगामात माझे शेड्युल अधिक लवचिक असल्याचे सुनिश्चित करते, जेणेकरून मी अधिक गेस्ट्सना होस्ट करू शकेन.”
तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि ब्लॉक केलेल्या रात्री पहा, ज्या राखाडी रंगात दिसतात. तुम्ही होस्ट करू शकता अशा कोणत्याही ब्लॉक केलेल्या रात्री खुल्या करा.
तुमचा उपलब्धतेचा कालावधी तीन महिन्यांच्या किमान कालावधीपेक्षा जास्त वाढवल्यास गेस्ट्सना आणखी आधी बुकिंग करता येते. तुम्ही तुमचे कॅलेंडर दोन वर्षे आधीपासून खुले करू शकता. तुमची लिस्टिंग जास्त सर्च रिझल्ट्समध्ये दिसून येईल—आणि त्या वेळी कमी जागा उपलब्ध असल्यास, रिझल्ट्सच्या आणखी छोट्या लिस्टमध्येसुद्धा दिसून येईल.
तुमचा उपलब्धतेचा कालावधी काहीही असो, तुमचे कॅलेंडर एका वेळी एक दिवस या आधारावर खुले होते. उदाहरणार्थ, तुमचा कालावधी 12 महिने असल्यास, गेस्ट्स तुमची जागा आजच्या तारखेपासून एक वर्ष पुढेपर्यंत बुक करू शकतात.
“मागणी जास्त असताना फायदा करून घ्या,” पाम स्प्रिंग्ज, कॅलिफोर्नियामधील सुपरहोस्ट जिमी म्हणतात. “इतर होस्ट्स कदाचित तयार नसतील आणि त्यांची कॅलेंडर्स खुली नसतील. सक्रिय राहून पुढाकार घेतल्यास, तुम्ही त्या जास्त मागणीच्या कालावधींचा फायदा करून घ्याल.”
स्पर्धात्मक भाडे ठेवा
गर्दीच्या सीझनमध्ये स्पर्धात्मक राहण्यासाठी, तुमच्या भागातील मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची भाडी तपासा आणि तुमचे प्रति रात्र भाडे ॲडजस्ट करण्यावर विचार करा. तुम्ही प्रत्येक रात्रीसाठी एकसारखे भाडे ऑफर करत असल्यास, मागणीतील बदलांशी जुळवून घेण्यासाठी वीकडेज आणि वीकेंड्सची भाडी वेगवेगळी ठेवण्यावर विचार करा. भाडी मागणीनुसार बदलती ठेवल्यास तुम्हाला जास्त बुकिंग्ज मिळण्यात आणि कमाई वाढवण्यात मदत होऊ शकते.
मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करण्यासाठी, तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि 31 दिवसांपर्यंतच्या तारखेची श्रेणी निवडा.
तुम्हाला तुमच्या भागाच्या नकाशावर जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची सरासरी भाडी दिसतील. नकाशावरील बटणे वापरून तुम्ही बुक झालेल्या किंवा न झालेल्या लिस्टिंग्ज पाहू शकता. कोणत्या लिस्टिंग्ज मिळत्या-जुळत्या आहेत हे ज्या घटकांवरून ठरवले जाते त्यांच्यामध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि गेस्ट्सनी तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना बघितलेल्या इतर लिस्टिंग्जचा समावेश होतो.
जवळपासच्या इतर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडी असलेल्या लिस्टिंग्जना सर्च रिझल्ट्समध्ये सहसा वरची रँकिंग मिळते.
सिडनी, ऑस्ट्रेलियामधील सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणतात, “गर्दीचा सीझन असूनही जर आम्हाला बुकिंग्ज मिळत नसतील, तर मी माझ्या भागातील प्रॉपर्टीज पुन्हा एकदा तपासून पाहीन.” “माझे भाडे स्पर्धात्मक असायलाच हवे.”
सवलत जोडा
सवलती जोडणे हा तुमच्या गर्दीच्या सीझनमध्ये गेस्ट्सच्या नजरेत भरण्याचा आणखी एक मार्ग आहे. तुम्ही या सुविधा ऑफर करून वेगवेगळ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करू शकता:
- साप्ताहिक आणि मासिक सवलती. सात किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी साप्ताहिक सवलती आणि 28 किंवा त्याहून जास्त रात्रींच्या वास्तव्यांसाठी मासिक सवलती ऑफर करण्यावर विचार करा. यामुळे तुमचे सर्चमधील रँकिंग आणखी चांगले होण्यात, तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या तारखा भरण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा करावी लागण्यात मदत होऊ शकते.
- अर्ली बर्ड सवलत. चेक इनच्या 1 ते 24 महिने आधी केलेल्या बुकिंग्जसाठी अर्ली बर्ड सवलत जोडल्याने तुम्हाला आधीपासून प्लॅन करणाऱ्या गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होऊ शकते.
गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर 10% किंवा त्याहून अधिकच्या साप्ताहिक किंवा मासिक सवलतींकडे तसेच 3% किंवा त्याहून अधिकच्या अर्ली बर्ड सवलतींकडे लक्ष वेधून घेणारा एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.
स्मार्ट रेट चालू केल्यावर अर्ली बर्ड सवलत उपलब्ध नसते आणि वास्तव्याच्या कालावधींनुसार सवलती देताना स्थानिक कायदे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते याची नोंद घ्या.
“मी माझे कॅलेंडर पूर्ण वर्षासाठी सेट करत असते तेव्हा मी अर्ली बर्ड सवलत वापरते,” टारागोना, स्पेनमधील सुपरहोस्ट अॅन म्हणतात. “यामुळे माझे कॅलेंडर लवकर भरले जाते आणि ज्या लोकांना सवलत मिळते ते सहसा कॅन्सल करत नाहीत.”
चेक इन आणि चेक आऊट करणे सोपे करा
तुमच्या गेस्ट्सचे येणे आणि जाणे सोपे करण्याचे मार्ग शोधा. चेक इनच्या दिशानिर्देशांचा समावेश करा, जेणेकरून गेस्ट्सना तुमची जागा कशी शोधायची आणि ते आल्यावर समोरचा दरवाजा कसा अनलॉक करायचा हे समजण्यात मदत होईल.
- महत्त्वाचे तपशील जोडा. तुम्ही तुमच्या आगमन गाईडमध्ये तुमची चेक इन पद्धत, वेळ आणि दिशानिर्देश सेट आणि ॲडजस्ट करू शकता. गेस्ट्सना स्मार्ट लॉक, कीपॅड किंवा लॉकबॉक्ससह स्वतःहून चेक इन करण्याची सुविधा दिल्यास ते रात्री उशिरा पोहोचले तरीही एक कोड वापरून प्रवेशद्वार अनलॉक करू शकतात.
- आत कसे जायचे ते दाखवा. त्या प्रक्रियेची कल्पना करण्यात गेस्ट्सना मदत करण्यासाठी फोटोज किंवा व्हिडिओ समाविष्ट करा. तुमच्या सूचना स्पष्ट आहेत याची खात्री करण्यासाठी तुमच्या एखाद्या मित्राला त्या तपासायला सांगा.
असे समजा की चेक आऊट म्हणजे तुमच्या गेस्ट्सच्या मनावर तुमच्या जागेबद्दलची शेवटची छाप पडणार आहे. ते सोपे ठेवल्यास त्यांचे वास्तव्य किती उत्तम होते ते त्यांच्या लक्षात राहणार आहे.
- चेक आऊटच्या स्पष्ट सूचना द्या. तुमच्या आगमन गाईडमधील कामांच्या लिस्टमधून निवड करा. गेस्ट्सनी जाण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे ते स्पष्ट करा, जसे की उपकरणे बंद करणे आणि लॉक करणे. बुक करण्याआधी कोणीही या सूचना वाचू शकतात.
- शक्य तितके सोपे करा. गेस्ट्सना काही कामे करणे आवश्यक आहे की नाही याचा विचार करा, जसे की वापरलेले टॉवेल्स गोळा करून ठेवणे आणि कचरा फेकणे.
“गेस्ट्स तुमच्या प्रॉपर्टीमधून जात असल्यामुळे त्यांना फक्त एक किंवा दोन सोप्या सूचना दिल्या जाणे महत्त्वाचे आहे,” असे नेल्सन, कॅनडामधील सुपरहोस्ट कॅरेन म्हणते. “त्यामुळे तो अनुभव खूप सोपा होतो.”
तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.
होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.
होस्टिंग टिप्स स्थानिक कायद्याच्या अधीन आहेत.
या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.