मागणी कमी असताना यश मिळवणे

मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा, अल्पकालीन वास्तव्यांना परवानगी द्या आणि फोटो टूर तयार करा.
Airbnb यांच्याद्वारे 6 जाने, 2025 रोजी
4 मिनिटांचा व्हिडिओ
19 मार्च, 2025 रोजी अपडेट केले

सर्वात लोकप्रिय लिस्टिंग्जमध्येसुद्धा कमी मागणीच्या काळात कमी बुकिंग्ज होतात. इथे Airbnb होस्टिंग टूल्स वापरण्याचे काही असे मार्ग दिले आहेत ज्यांचा उपयोग केल्यास तुम्हाला कमी गर्दीच्या काळात गेस्ट्सना आकर्षित करण्यात मदत होईल.

स्पर्धात्मक भाडे ठेवा

तुमचे भाडे नियमितपणे ॲडजस्ट केल्याने तुम्हाला स्पर्धात्मक राहण्यास मदत होऊ शकते. तुमच्यासाठी योग्य असलेल्या शेड्युलवर पुढील गोष्टी करण्याचा विचार करा:

  • कस्टम वीकेंड भाडे जोडा. तुम्ही रोज रात्री एकसारखे भाडे ऑफर करत असल्यास, तुम्ही वीकडेजचे भाडे शुक्रवार आणि शनिवार रात्रींच्या भाड्यांपेक्षा वेगळे सेट करू शकता. रात्रींच्या आधारे वेगवेगळे भाडे ठेवल्यास तुमच्या बुकिंग्ज वाढण्यात मदत होऊ शकते.
  • मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जची तुलना करा. जवळपासच्या मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जपेक्षा कमी भाडी असलेल्या लिस्टिंग्जना सर्च रिझल्ट्समध्ये सहसा वरची रँकिंग मिळते. तुमचे प्रति रात्र भाडे तुमच्या भागातील बुक केलेल्या आणि बुक न केलेल्या लिस्टिंग्जच्या तुलनेत ॲडजस्ट करण्याचा विचार करा.

तुमच्या लिस्टिंगच्या कॅलेंडरवर जा आणि तुमच्या भागाच्या नकाशावर मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जचे सरासरी भाडे पाहण्यासाठी 31 दिवसांपर्यंतची तारखेची श्रेणी निवडा. कोणत्या प्रॉपर्टीज मिळत्या-जुळत्या आहेत हे ज्या घटकांवरून ठरवले जाते त्यांच्याध्ये लोकेशन, आकार, वैशिष्ट्ये, सुविधा, रेटिंग्ज, रिव्ह्यूज आणि गेस्ट्सनी तुमच्या लिस्टिंग्जचा विचार करताना बघितलेल्या इतर लिस्टिंग्ज समाविष्ट असतात.

लेक अ‍ॅरोहेड, कॅलिफोर्नियामधील होस्ट सल्लागार बोर्डाच्या सदस्या आणि सुपरहोस्ट केटी म्हणतात, “मी माझ्या लिस्टिंग्जशी मिळत्या-जुळत्या लिस्टिंग्जवर लक्ष ठेवते, जेणेकरून मी माझे भाडे स्पर्धात्मक असल्याची खात्री करू शकेन,”. “तुम्हाला खरोखरच लोकांना तुमच्या लिस्टिंगकडे आकर्षित करायचे असल्यास, कमी गर्दीच्या काळात लवचीक असणे महत्त्वाचे आहे.”

दीर्घकालीन आणि अल्पकालीन वास्तव्यांना आकर्षित करा

सात रात्री किंवा त्याहून अधिक कालावधीच्या वास्तव्यांवर सवलती दिल्यास सर्चमधील तुमचे रँकिंग आणखी चांगले होण्यात आणि चेक आऊटनंतरची तयारी कमी वेळा होण्यात मदत होऊ शकते, तर लहान वास्तव्यांमुळे तुमच्या कॅलेंडरमधील रिकाम्या जागा भरण्यात मदत होऊ शकते.

  • साप्ताहिक सवलत जोडा. गेस्ट्सना सर्च रिझल्ट्समध्ये आणि तुमच्या लिस्टिंग पेजवर 10% किंवा त्याहून अधिक सवलतींकडे लक्ष वेधून घेणारा एक विशेष कॉलआऊट दिसतो. तुमचे सवलत दिलेले भाडे तुमच्या मूळ भाड्याच्या बाजूला दिसते, ज्यावर काट मारलेली असते.
  • तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कमी करा. तुम्ही आठवड्याच्या दिवसानुसार तुमचा ट्रिपचा किमान कालावधी कस्टमाईझ करू शकता. वीकेंड्सना मागणी जास्त असल्यास, तुम्ही आठवड्याच्या मधल्या दिवसांत एक रात्रीची वास्तव्ये करण्यास परवानगी देऊ शकता पण जेव्हा गेस्ट्स शुक्रवारच्या किंवा शनिवारच्या रात्री बुक करतात तेव्हा नाही.

ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील सुपरहोस्ट फेलिसिटी म्हणते, “मी कमी गर्दीच्या काळात वास्तव्याच्या किमान रात्री नक्कीच कमी करेन आणि त्यामुळे मला अशा लोकांना आकर्षित करण्यात मदत होईल जे कदाचित कमी रात्रींसाठी येणार आहेत.”

फोटो आणि चेक आऊट ऑप्टिमाईझ करा

तुमच्या लिस्टिंगचे तपशील अप-टू-डेट ठेवल्यामुळे काय अपेक्षा ठेवाव्यात हे स्पष्टपणे समजण्यात मदत होते आणि गेस्ट्सचा तुमचे घर बुक करण्याबद्दलचा आत्मविश्वास वाढतो, विशेषतः कमी गर्दीच्या काळात.

  • एक फोटो टूर तयार करा. Airbnb ची टूल्स तुमच्या अपलोड केलेल्या इमेजेसची रूमनुसार आपोआप क्रमवारी लावतात जेणेकरून गेस्ट्सना तुमच्या घराचा लेआऊट समजण्यात मदत होते. तुम्ही फोटो हलवू शकता, काढून टाकू शकता आणि जोडू शकता, प्रत्येक रूमचे तपशील जोडू शकता आणि प्रत्येक फोटोसाठी कॅप्शन लिहू शकता.
  • चेक आऊटच्या स्पष्ट सूचना जोडा. गेस्ट्सनी जाण्यापूर्वी काय करणे आवश्यक आहे ते स्पष्ट करा, जसे की लॉक करणे. कोणीही या सूचना बुक करण्याआधी वाचू शकतात, आणि चेक आऊट सूचना असलेल्या लिस्टिंग्जना जास्त गेस्ट्स बुक करतात. गेस्ट्सनी आम्हाला सांगितले आहे की त्यांना छोटी चेक आऊट लिस्ट पसंत पडते, त्यामुळे त्यात कमीतकमी कामे ठेवण्यावर विचार करा.

स्थानिक होस्ट क्लब मध्ये सामील व्हा

जगभरातील शेकडो होस्ट क्लब्ज Airbnb होस्ट्सना एकमेकांशी कनेक्ट होण्यात आणि एकमेकांकडून शिकण्यात मदत करतात. आम्हाला असे दिसून आले आहे की या स्थानिक क्लब्जचे सदस्य हे क्लबचे सदस्य नसलेल्या होस्ट्सपेक्षा दुप्पट कमाई करतात* आणि ते सुपरहोस्ट्स होण्याची शक्यता जवळपास तिप्पट असते.**

क्लबच्या लोकप्रिय अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • एकमेकांना कमाई वाढवण्यास मदत करणारे होस्टिंगचे सल्ले देणे
  • अल्पकालीन रेंटलच्या नियमांवर चर्चा करणे
  • विश्वसनीय स्थानिक सेवा शेअर करणे, जसे की क्लीनर्स आणि प्लंबर्स
  • नेटवर्किंगसंबंधी विशेष कार्यक्रमांना उपस्थित राहणे

*Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार, सप्टेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत, संपूर्ण जागतिक होस्ट लोकसंख्येच्या तुलनेत जागतिक Airbnb होस्ट क्लब सदस्यांची सरासरी कमाई आणि सरासरी रेटिंग्जची तुलना करताना. कमाईचा डेटा लोकेशन, हंगाम आणि लिस्टिंगचा प्रकार याप्रमाणे बदलतो.

**जुलै 2023 ते जुलै 2024 या कालावधीत सामील झालेल्या होस्ट्सच्या सुपरहोस्ट स्टेटसवरील Airbnb च्या अंतर्गत डेटानुसार.

तुमची भाडी आणि इतर सेटिंग्ज नेहमी तुमच्याच नियंत्रणात असतात. तुम्हाला मिळणारे रिझल्ट्स वेगळे असू शकतात.

होस्ट्सना मुलाखतींमध्ये भाग घेतल्याबद्दल पैसे देण्यात आले होते.

होस्टिंग टिप्स स्थानिक कायद्याच्या अधीन आहेत.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

Airbnb
6 जाने, 2025
हे उपयुक्त ठरले का?