5-स्टार वास्तव्य तयार करा
विचारपूर्वक तयारी हीच पंचतारांकित वास्तव्याचा पाया आहे. सुरुवात करण्यासाठी या पाच-पायऱ्यांच्या मार्गदर्शकाचा वापर करा.
पायरी 1: अपेक्षा ठरवणे
तुम्ही काय ऑफर करता याबद्दल प्रामाणिक राहून तुमची लिस्टिंग आकर्षक बनवा.
गेस्ट्सना काय मिळेल याबद्दल पारदर्शक रहा. तुमची जागा चांगली आहे की नाही हे ठरवण्यात गेस्ट्सना मदत करण्यासाठी, तुमच्या आसपासचा परिसर आणि सुविधांविषयी तपशीलवार माहिती द्या.
लिस्टिंग जसजशी बदलते तसतसे अपडेट करा. यामध्ये नवीन सुविधा जोडणे आणि तुमचे अलीकडचे फोटो ठेवणे सामील आहे. काही होस्ट्स हंगामाशी जुळवून घेण्यासाठी त्यांचे फोटोदेखील अपडेट करतात.
सॅन फ्रान्सिस्कोमधील सुपरहोस्ट, निक्की म्हणतात,“प्रामाणिक आणि स्पष्ट अशा प्रकारे तुमच्या प्रॉपर्टीच्या विलक्षण गोष्टींविषयी वर्णन करा.” “खरे तर हा सहानुभूतीचा एक सराव आहे. तुमच्या गेस्ट्सना त्यांना हवी असलेली प्रॉपर्टी निवडण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही पुरेशी पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.”
पायरी 2: चेक इन आणि चेक आऊट सोपे करणे
गेस्ट्सना सुलभ आगमन आणि निर्गमन अपेक्षित असते.
चेक इनच्या स्पष्ट सूचना लिहा. प्रक्रियेचे स्टेप-बाय-स्टेप स्पष्टीकरण द्या आणि फोटो किंवा ॲरोजसह नकाशा, यासारख्या उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही तपशीलांचा समावेश करा.
कमीत कमी चेक आऊट कार्ये ठेवा. तुमच्या सूचनांचे पालन करण्यासाठी कमी प्रयत्न किंवा बिलकुल प्रयत्न नाही करावे लागले पाहिजेत. गेस्ट्सना बाहेर जाताना दरवाजा कसा लॉक करायचा ते सांगा.
नवी दिल्लीतील होस्ट सल्लागार बोर्डचे सदस्य आणि सुपरहोस्ट केशव म्हणाले की,“आम्ही आमची चेक आऊट प्रक्रिया शक्य तितकी सोपी ठेवतो.” “क्लीनर आत येतो आणि सर्वकाही करतो, म्हणून गेस्ट्सना कशाचीही चिंता करावी लागत नाही.”
पायरी 3: प्रेमळ स्वागताची तयार करणे
गेस्ट्स तुमच्या जागेमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना कसे वाटेल आणि ते निघून गेल्यानंतर त्यांना काय लक्षात राहील याचा विचार करा.
आरामदायक जागा डिझाईन करा. उश्या आणि थ्रो ब्लँकेट्स यासारख्या माणसांना आरामदायी वाटणाऱ्या गोष्टींचा समावेश करा. गेस्ट्सना त्यांच्या मालकीच्या वस्तू ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा ठरवा.
तुमची कम्युनिटी दाखवा. स्थानिक कलेने सजावट करण्याचा किंवा प्रादेशिक खाद्यपदार्थ देण्याचा विचार करा. गाईडबुकमधील तुमच्या आवडत्या जागा शेअर करा.
स्वत:ला उपलब्ध ठेवा. गेस्ट्सना कळवा की ते तुमच्याशी कधीही संपर्क साधू शकतात. गेस्ट्स मेसेजेस पाठवतात तेव्हा तुम्हाला अलर्ट देण्यासाठी तुमच्या नोटिफिकेशन्स सेट करा.
“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेस्ट्सना असे वाटावे की जागा त्यांची आहे,” कोलंबस, ओहायोमधील सुपरहोस्ट कॅथरीन म्हणतात. “गेस्ट्सना ते इतर कोणाच्या घरात असल्यासारखे वाटू शकेल अशी कोणतीही गोष्ट हटवण्यासाठी वेळ काढा.”
पायरी 4: अनपेक्षित परिस्थितीसाठी तयारी करणे
वास्तव्यादरम्यान उद्भवू शकणाऱ्या गेस्ट्सच्या अनेक समस्यांना कसे हाताळावे याचा विचार करा.
आपत्कालीन पुरवठा स्टॉक करा. तुमच्या जागेवर अग्निशामक किट, प्रथमोपचार किट आणि फ्लॅशलाईट ठेवा. गेस्ट्सना मदतीसाठी आवश्यक असणारे आपत्कालीन फोन नंबर्स शेअर करा.
तुम्हाला कसे संरक्षित केले जाते, हे समजून घ्या. होस्ट्ससाठी AirCover हे नेहमी समाविष्ट केले जाते आणि नेहमी विनामूल्य आहे, जे सर्व गोष्टींसाठी संरक्षण प्रदान करते.
- एक सपोर्ट टीम तयार करा. देखभाल कर्मचाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करा. गेस्ट्सना प्रतिसाद देण्यासाठी नेहमीच कोणीतरी उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी को-होस्ट जोडा.
पायरी 5: रिव्ह्यूज देणे आणि रिव्ह्यूज मिळवणे
रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज तुम्ही काय ऑफर करता ते तुम्हाला सुधारण्यात आणि गेस्ट्समध्ये विश्वास निर्माण करण्यात मदत करू शकतात.
- तुमच्या गेस्ट्सना रिव्ह्यू द्या. ही कृतज्ञता व्यक्त करण्याची, फीडबॅक शेअर करण्याची आणि तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी गेस्ट्सना आठवण करून देण्याची संधी आहे. चेक आऊटनंतर एकमेकांना रिव्ह्यू करण्यासाठी होस्ट्स आणि गेस्ट्सकडे 14 दिवसांचा वेळ असतो.
- स्टार रेटिंग्जकडे लक्ष द्या. गेस्ट्स त्यांच्या एकूण वास्तव्याला रेट करू शकतात आणि तुम्हाला स्वच्छता, अचूकता, चेक इन, कम्युनिकेशन, लोकेशन आणि मौल्यवानसाठी स्टार्सदेखील देऊ शकतात.
- रिव्ह्यूजना प्रतिसाद द्या. तुम्ही सुधारणा करण्यासाठी तयार आहात, हे दाखवण्याची संधी म्हणून याचा वापर करा. तुम्ही गेस्टच्या सार्वजनिक रिव्ह्यूला उत्तर दिल्यास, तुमचा प्रतिसाद त्याच्या बरोबर खाली दिसेल.
“रिव्ह्यूज मनाला लावून घेणे महत्त्वाचे आहे,” न्यू मेक्सिकोच्या सांता फेमधील सुपरहोस्ट सेडी म्हणतात. “पाच स्टार्स मिळविण्यासाठी गेस्ट्स खरोखरच तुमचा मार्गदर्शक ठरतात.”
तुम्हाला तुमची पहिली बुकिंग अद्याप मिळाली नसल्यास, तुम्ही सुपरहोस्टकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळवू शकता. ते Airbnb वरील टॉप रेटिंग असलेले आणि सर्वात अनुभवी होस्ट्स आहेत.
पब्लिकेशननंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.