फ्रंटलाइन वास्तव्याच्या जागांनी 3 कोविड-19 मदत कर्मचार्‍यांना कशी मदत केली

राहण्याच्या जागांसाठी Airbnb होस्ट्स बनलेल्या या नर्सेसकडून प्रेरणा घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 7 जुलै, 2020 रोजी
4 मिनिटांचा व्हिडिओ
3 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • फ्रंटलाईन वास्तव्ये प्रोग्राम कोविड-19 मदत कर्मचाऱ्यांना जागा प्रदान करतो, ज्यांना अन्यथा राहण्यासाठी जागा शोधण्यात अडचण येऊ शकते

  • इटलीमधील एक नर्स म्हणते की तिला घराच्या रुपाने एक “सुरक्षित बंदर” मिळाले जिथे ती रिचार्ज होते

  • मिसिसिपीची एक प्रवासी परिचारिका मिशिगनमध्ये काम करत असताना तिच्या होस्टशी कनेक्ट झाल्याबद्दल कृतज्ञ होती

Open Homes आता Airbnb.org आहे

Airbnb च्या Open Homes आणि फ्रंटलाईन वास्तव्ये प्रोग्राम्सचे नाव बदलून Airbnb.org झाले आहे, जी एक नवीन 501(c)(3) ना-नफा संस्था आहे. आमच्यासोबत Open Homes कम्युनिटी तयार केल्याबद्दल आभारी आहोत. या नवीन अध्यायाचा भाग बनण्यासाठी आम्ही तुमच्याबद्दल खूप उत्सुक आहोत.

अनेक होस्ट्स आमच्या फ्रंटलाईन वास्तव्ये प्रोग्रामद्वारा कोविड-19 च्या प्रसाराशी लढण्यात मदत करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचारी आणि प्रथम मदत कर्मचाऱ्यांना राहण्याच्या जागा देत आहेत. येथे तीन कोविड-19 मदत कर्मचाऱ्यांच्या प्रेरणादायक कहाण्या आहेत ज्यांना त्यांचे महत्त्वपूर्ण काम पार पाडताना राहण्यासाठी घरे सापडली.

रोममध्ये काम करत असताना राहण्याची एक आरामदायी जागा

चियारा ही इटलीतील एक परिचारिका आहे जी देशातील संकट त्याच्या शिखरावर असताना रोमला गेली होती. शहर अक्षरशः रिकामे पाहून तिला आश्चर्य वाटले. जेव्हा ती पूर्वी रोमला गेली होती, तेव्हा ते एक गजबजलेले आणि जिवंत शहर होते—आणि आता ते एक भुताळी शहर झाले होते.

परंतु ती पर्यटक म्हणून तिथे आली नव्हती तर—कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात काम करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी आली होती.

तिने यापूर्वी अनुभवलेल्या कोणत्याही कामापेक्षा हे काम वेगळे होते आणि कामाच्या लांब तासांमुळे मानसिक त्रासही होत होता. ती सतत संसर्ग होण्याबद्दल आणि रूग्णांची काळजी घेण्याबद्दल चिंतेत होती आणि रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमधील दुवा म्हणून भावनिक पातळीवरही काम करत होती.

थकवणाऱ्या दिनक्रमानंतर चियाराला विश्रांतीसाठी जागा हवी होती आणि अशी जागा तिला Airbnb वर सापडली. “Airbnb च्या ह्या उपक्रमाने मलाच नव्हे तर या आपत्कालीन परिस्थितींशी लढा देणाऱ्या इतर अनेक व्यावसायिकांनादेखील मदत केली,” चियारा सांगते. “या क्षणी घर हे माझ्यासाठी एक सुरक्षित आसर्‍याचे ठिकाण आहे, अशी एक जागा जिथे मी पूर्ण दिवस कठोर परिश्रम केल्यानंतर परत येऊ शकते.”

ती घरी येते, शांत होते आणि स्वतःला रिचार्ज करते जेणेकरून ती पुढील दिवशी कामावर परतण्यासाठी अधिक खंबीर होऊ शकेल. “जे लोक आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी आपली घरे उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहेत त्यांना मी म्हणेन की 'हे करा' कारण आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला राहण्याची जागा आणि डोक्यावर छप्पर हवे आहे—हे महत्वाचे आहे.”

कॅनडामध्ये स्वतःला एकांतात ठेवण्यासाठी एक शांत जागा

जी कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियामध्ये तिच्या वृद्ध आईवडिलांसह राहते, जे तिच्या मुलीची देखभाल करण्यात मदत करतात. तिने आपल्या कुटुंबापासून स्वतःला वेगळे ठेवण्यासाठी परवडणार्‍या घराच्या पर्यायांच्या शोधात अनेक रात्री न झोपता घालवल्या आहेत. हा निर्णय कठीण होता; पण तो योग्य होता हे तिला माहीत होते.

जी म्हणते की ज्या प्रमाणे आरोग्यसेवकांना रुग्णांची काळजी घेताना व्यावसायिक कर्तव्य असतात तसे “त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे अतिरिक्त धोक्यांना सामोरे जाण्याचे कर्तव्य नसते.” म्हणून रुग्णालयातील कठीण कामाव्यतिरिक्त, तिला आपल्या कुटुंबापासून दूर कसे रहावे याची चिंता होती, जेणेकरून ते आजारी पडू नयेत—विशेषकरून तिचे वडील, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली होती. बाहेर पडणे हा सर्वात चांगला पर्याय होता.

ती दिवसेंदिवस जास्त हताश होत चालली होती आणि ती तिच्या कारमध्ये राहण्याचा विचार करत असताना तिला Airbnb च्या प्रोग्रामबद्दल कळले. तिने कोविड-19 आघाडीवरील नर्स म्हणून स्वतःचे स्टेटस व्हेरिफाय केल्यानंतर लवकरच तिला Airbnb वर स्वतःचे घर म्हणता येईल अशी एक जागा मिळाली. तिचे निवासस्थान हॉस्पिटलच्या जवळ होते, शिवाय तिथल्या होस्टने तिला गरज पडल्यास 24/7 सपोर्ट दिला.

“माझ्या होस्टनी मला त्यांचे वस्तू आणि पदार्थांनी चांगले भरलेले, सुरक्षित आणि शांत असे सुंदर घर वापरण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे जितके आभार मानेन तितके कमीच आहेत,” जी सांगते. “मी शांतपणे आराम करू शकते आणि असे वाटते की मी माझ्या प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी आणि सकारात्मक भावनेने कामावर जाण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करत आहे.”

मिशिगनमध्ये घरापासून दूर असलेले एक घर

ब्रांडी ही मिसिसिपीमधील एक व्यावसायिक थेरपिस्ट आहे. महामारीपूर्वी, तिने वैद्यकीय आघात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा क्रॉनिक रोगातून पुनर्वसन करून रुग्णांना कार्यात्मक स्वावलंबनापर्यंत पोहोचण्यात मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले.

आताही ती तशाच प्रकारच्या रूग्णांना मदत करते आहे—परंतु असे रुग्ण ज्यांना कोविड-19 देखील झाला आहे आणि ज्यांच्या बाबतीत हा आजार गंभीर स्वरूप धारण करण्याचा धोका आहे. ती सुरुवातीच्या टप्प्यातील त्यांच्या मोबिलिटीसह त्यांच्या रिकव्हरीमध्ये देखील मदत करते—आणि तिच्याकडे हे कौशल्य असल्यामुळे ती रूग्णांना मदत करण्यासाठी प्रवास देखील करते.

ब्रांडी, मिसिसिपीमधील एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट.

ती मिशिगनमध्ये राहण्याची जागा शोधत होती, जिथे ती कामासाठी जात होती; परंतु तिने अशा आरोग्यसेवा कर्मचार्‍यांबद्दल ऐकले होते ज्यांना फ्रंटलाइनवर काम करत असल्यामुळे राहण्याची जागा नाकारली गेली होती. Airbnb च्या फ्रंटलाईन वास्तव्ये प्रोग्रामला ॲक्सेस मिळाल्याबद्दल तिला कृतज्ञ वाटत होते, जिथे तिला पटकन तिचा होस्ट जॉनशी कनेक्ट करण्यात आले, ज्याने तिला “स्वच्छ वातावरण आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा” प्रदान केली.

ब्रांडी इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांना फ्रंटलाईन वास्तव्ये वापरण्यासाठी प्रोत्साहित करते कारण “तुमच्याकडे तुमच्या कामाच्या ठिकाणाच्या जवळचे अनेक पर्याय आहेत… आणि होस्ट्स तुमचे खुल्या मनाने स्वागत करतील.”

गरजेच्या वेळी शेअर करण्याची क्षमता असणाऱ्या या वाढत्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा.

पब्लिश झाल्यानंतर या लेखात असलेल्या माहितीमध्ये कदाचित बदल झालेला असू शकेल.

हायलाइट्स

  • फ्रंटलाईन वास्तव्ये प्रोग्राम कोविड-19 मदत कर्मचाऱ्यांना जागा प्रदान करतो, ज्यांना अन्यथा राहण्यासाठी जागा शोधण्यात अडचण येऊ शकते

  • इटलीमधील एक नर्स म्हणते की तिला घराच्या रुपाने एक “सुरक्षित बंदर” मिळाले जिथे ती रिचार्ज होते

  • मिसिसिपीची एक प्रवासी परिचारिका मिशिगनमध्ये काम करत असताना तिच्या होस्टशी कनेक्ट झाल्याबद्दल कृतज्ञ होती

Airbnb
7 जुलै, 2020
हे उपयुक्त ठरले का?