रोममधील आसपासच्या परिसरातील शेजार्यांकडून त्याच्या नवीन घरात एका निर्वासिताचे स्वागत कसे केले गेले
हायलाइट्स
रोममध्ये राहणारी एक बेल्जियन स्त्री या नात्याने, एल्सला एकदा तिला मिळालेले इटालियन आदरातिथ्य पुढे नेण्याची इच्छा होती
Airbnb च्या Open Homes प्रोग्रामद्वारे, तिला नुकतेच निर्वासित दर्जा मिळालेल्या एका तरुण फोडच्या होस्टिंगबद्दल संपर्क साधला गेला.
त्याच्या वास्तव्यादरम्यान, फोड आणि एल्स अनोळखी लोक न राहता एक कुटुंब बनले
Open Homes आता Airbnb.org आहे.
Airbnb च्या Open Homes प्रोग्रामचे नाव बदलून Airbnb.org केले गेले आहे, जी एक नवीन 501(c)(3) ना-नफा संस्था आहे. आमच्यासोबत Open Homes कम्युनिटी तयार केल्याबद्दल आभारी आहोत. या नवीन अध्यायाचा भाग बनण्यासाठी आम्ही तुमच्याबद्दल खूप उत्सुक आहोत.
जेव्हा रोममधील एक सुपरहोस्ट असलेल्या एल्सने Airbnb वर Open Homes प्रोग्रामबद्दल वाचले, तेव्हा तिला उत्सुकता वाटली आणि तिने साईन अप करण्याचा निर्णय घेतला. तिने जगभरातील प्रवाशांचे तिच्या घरी स्वागत केले आहे; परंतु निर्वासितांना त्यांच्या नवीन कम्युनिटीमध्ये स्थायिक होताना राहण्याची तात्पुरती जागा ऑफर करणे हा एक विशेष होस्टिंग अनुभव असेल हे तिला माहीत होते.
जेव्हा Refugees Welcome Italia ने माली, पश्चिम आफ्रिकेतील फोड - एक तरुण माणूस होस्ट करण्याबद्दल एल्स शी संपर्क साधला, ज्याला नुकतेच निर्वासित स्टेटस मिळाले होते - तेव्हा एखाद्याच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या संधीबद्दल ती उत्साहित झाली. हा अनुभव दोघांसाठी परिवर्तनकारी ठरला.
एल्सला फोडला होस्ट करण्याबद्दल नर्व्हस आणि उत्तेजित वाटत होते. रोममध्ये राहणारी एक बेल्जियन स्त्री म्हणून, एका अनोळखी ठिकाणी एक नवीन जीवन सुरू करणे कसे असते हे तिला माहीत होते, आणि तिला मिळालेले इटालियन आदरातिथ्य ती पुढे देऊ इच्छित होती. Refugees Welcome Italia च्या सारा या केस वर्करच्या मदतीने, तिने काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत याविषयी तिची तयारी झाली होती आणि तिला माहित होते की या मार्गातील प्रत्येक पायरीवर सारा तिला सपोर्ट करण्यासाठी उपलब्ध असेल.
जेव्हा एल्स फोडला भेटली, तेव्हा त्यांच्यामध्ये एक बाँड निर्माण झाला. फोड एल्सच्या मुलाच्याच वयाचा आहे आणि जेव्हा त्याने तिच्याबरोबर आपली कहाणी शेअर केली तेव्हा तिला त्याच्याप्रती "आईची माया" वाटली. फोडच्या वास्तव्यादरम्यान, ते अनोळखी लोक न राहता एक कुटुंब बनले. तिचे शेजारीही फोडच्या जीवनाचा भाग बनले. एल्सने बेल्जियममधून स्थलांतर केल्यानंतर जसे त्यांनी तिला त्यांच्यात सामावून घेतले होते, तसेच आदरातिथ्य आणि प्रेम त्यांनी फोडलाही दिले. जेव्हा एल्स घरी नसे, तेव्हा फोड बर्याचदा वरच्या मजल्यावरील शेजार्यांसह वेळ घालवत असे; इटालियन पदार्थ चाखत ते एकमेकांच्या संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेत असत.
फोड सांगतो की, तो इटलीला आल्यापासून एल्ससोबत राहणे हा सर्वात आनंददायी अनुभव होता. या सर्व इटालियन लोकांना त्याची काळजी घेताना पाहून तो आश्चर्यचकित झाला; असे करणे त्यांना बंधनकारक नव्हते—परंतु ते करण्याची त्यांना इच्छा होती. नवीन आयुष्य सुरू करणे कठीण आहे, परंतु एखाद्या माणसाच्या दयाळूपणामुळे मोठा फरक पडू शकतो. या अनुभवाने एल्स आणि फोड या दोघांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पाडला.
गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करण्याची क्षमता असणाऱ्या वाढत्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा.
Refugees Welcome Italia बद्दल
Refugees Welcome Italia (RWI) ही एक ना - नफा संस्था आहे जी Airbnb च्या Open Homes प्रोग्राममध्ये भागीदारी करते. RWI स्थापना डिसेंबर 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय शरणार्थी स्वागत नेटवर्कचा भाग म्हणून स्थानिक लोकांशी (कुटुंबे, जोडपे, एकल) शरणार्थींशी जुळण्यासाठी केली गेली होती ज्यांना त्यांना तात्पुरते होस्ट करायचे आहे.
या लेखात दिलेल्या माहितीमध्ये पब्लिकेशननंतर कदाचित बदल झालेला असू शकेल.
हायलाइट्स
रोममध्ये राहणारी एक बेल्जियन स्त्री या नात्याने, एल्सला एकदा तिला मिळालेले इटालियन आदरातिथ्य पुढे नेण्याची इच्छा होती
Airbnb च्या Open Homes प्रोग्रामद्वारे, तिला नुकतेच निर्वासित दर्जा मिळालेल्या एका तरुण फोडच्या होस्टिंगबद्दल संपर्क साधला गेला.
त्याच्या वास्तव्यादरम्यान, फोड आणि एल्स अनोळखी लोक न राहता एक कुटुंब बनले