संकटाच्या वेळी आपत्कालीन वास्तव्यास तुम्ही कसे सपोर्ट करू शकता
जेव्हा नैसर्गिक आपत्ती किंवा मोठ्या प्रमाणात होत असलेल्या संघर्षांमुळे लोकांना त्यांचे घर-दार सोडून पलायन करणे भाग पडते, तेव्हा त्यांच्या सर्वात तातडीच्या गरजांपैकी एक असते ती म्हणजे राहण्यासाठी एक जागा शोधणे. अल्पकाळासाठी मिळणार्या वास्तव्यामुळे त्यांना इतर अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष केंद्रित करून पुढच्या मोठ्या योजना बनवण्याची संधी मिळते. तुम्ही आपत्कालीन वास्तव्ये होस्ट करून किंवा Airbnb.org ला देणगी देऊन बदल घडवू शकता.
Airbnb.org म्हणजे काय?
Airbnb.org एक U.S. 501(c)(3) ना-नफा संस्था आहे जी Airbnb पासून स्वतंत्र राहून काम करते. याचे काम 2012 मध्ये सुरू झाले जेव्हा ब्रुकलिन, न्यूयॉर्कमधील होस्ट शेलने सँडी चक्रीवादळातून बचावलेल्या लोकांसाठी तिची जागा विनामूल्य दिली. Airbnb ने त्या भागातील इतर लोकांकडे मदत मागितली आणि 1,000 हून अधिक स्थानिक होस्ट्सनी वादळाचा तडाखा बसलेल्या लोकांसाठी आपल्या घराची दारे उघडली.
शेलच्या कृतींपासून प्रेरित होऊन, Airbnb ने एक प्रोग्रॅम विकसित केला ज्यामुळे संकटाच्या वेळी जगभरातील होस्ट्सना त्यांच्या जागा देणे शक्य झाले. 2020 मध्ये या प्रोग्रॅमचे रूपांतर Airbnb.org या ना-नफा संस्थेमध्ये झाले, ज्याचे स्वतःचे मिशन आणि संचालक मंडळ आहे.
आज, Airbnb.org जगभरातील सरकारे, स्वयंसेवी संस्था आणि मानवतावादी संस्थांबरोबर काम करून लोकांसाठी राहण्याच्या तात्पुरत्या जागांची व्यवस्था करण्याचे काम करत आहे. ही संस्था देणगीच्या आधारावर चालवली जात असून, Airbnb चा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आणि जगभरातील होस्ट्स कम्युनिटीचा वापर करून नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये ती प्रतिसाद देऊन पावले उचलते.
2012 पासून, Airbnb आणि Airbnb.org ने युक्रेनमधील निर्वासित तसेच तुर्की आणि सीरियामधील भूकंपांमुळे विस्थापित झालेल्या लोकांसह, सुमारे 3,00,000 लोकांसाठी आपत्कालीन वास्तव्यांची व्यवस्था केली आहे. गेल्या तीन वर्षांत, 189 देशांमधील 91,000 हून अधिक होस्ट्सनी गरजू गेस्ट्स होस्ट करण्यासाठी साइन अप केले आहे. मदतीची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मी Airbnb.org ला देणगी कशी देऊ शकतो?
तुमच्याकडे होस्ट करण्यासाठी जागा असो किंवा नसो, तुम्ही एकदा देणगी देऊ शकता. तुम्ही Airbnb वर नियमितपणे होस्ट करत असल्यास, प्रत्येक पेआऊटमधील ठराविक टक्के देणगीच्या रूपात देऊ शकता. कोणत्याही प्रकारे देणगी दिली तरी, तुमच्या देणगीचा 100% हिस्सा आपत्कालीन वास्तव्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी वापरला जातो (Airbnb.org च्या ऑपरेशनल खर्चासाठी नाही).
मला Airbnb.org होस्ट कसे होता येईल?
तुम्ही Airbnb होस्ट असल्यास, तुम्ही सध्याची लिस्टिंग वापरू शकता किंवा एखाद्या वेगळ्या प्रॉपर्टीला नवीन लिस्टिंग बनवू शकता. तुमच्याकडे Airbnb.org च्या माध्यमातून विनामूल्य किंवा सवलतीमध्ये तुमची जागा देण्याचा पर्याय आहे.
तुम्ही केवळ Airbnb.org च्या माध्यमातून होस्ट करण्यासाठी साइन अप करू शकता, म्हणजेच तुम्ही केवळ आपत्कालीन वास्तव्याची आवश्यकता असलेल्या गेस्ट्सनाच होस्ट कराल. अशा वेळी तुम्ही आपली जागा फक्त विनामूल्य देऊ शकता.
Airbnb. org च्या गेस्ट्सना तिथे राहण्याचे भाडे द्यावे लागत नाही. बुकिंगसाठी देणगीतून निधी दिला जातो. तुमची जागा विनामूल्य किंवा सवलतीमध्ये देऊन, तुम्ही देणग्यांचा अधिक व्यापक उपयोग करण्यात मदत करू शकता आणि जास्त लोकांसाठी आपत्कालीन वास्तव्यांची सोय करू शकता.
Airbnb.org च्या वास्तव्यांसाठी Airbnb ने आपले सर्व सेवा शुल्क माफ केले आहेत. रिझर्व्हेशन्सना होस्ट्ससाठी AirCover चे संरक्षण आहे.
Airbnb.org गेस्ट्स कोण असतात?
बर्याचदा संकटकालीन व्यवस्थापन आणि निर्वासितांच्या पुनर्वसनात तज्ज्ञ असणार्या संस्था Airbnb.org च्या गेस्ट्सना रेफर करतात किंवा त्यांची मदत करतात. गेस्ट्स आपत्कालीन वास्तव्यासाठी थेट Airbnb.org द्वारे अर्ज करू शकत नाहीत.
आपत्कालीन वास्तव्यासाठी पात्र असलेले गेस्ट्स आहेत:
मोठ्या आपत्तींनी बाधित लोक आणि या आपत्तींमध्ये अधिकृतरित्या मदतकार्यात गुंतलेले कर्मचारी.
निर्वासित, किंवा आश्रय, स्पेशल इमिग्रेशन व्हिसा, किंवा समान मानवतावादी हेतूने इतर इमिग्रेशन स्टेटस मिळवण्याच्या प्रक्रियेत असलेले लोक.
पात्र गेस्ट्सना आपत्कालीन वास्तव्य बुक करण्यासाठी Airbnb.org क्रेडिट मिळू शकते किंवा एखादी ना-नफा भागीदार संस्था गेस्टच्या वतीने बुकिंग करू शकते आणि होस्टशी संवाद साधू शकते.
संकटाच्या काळात तुमची जागा लोकांना दिलासा देऊ शकते. Airbnb.org चे बर्लिनमधील गेस्ट दिमा यांनी 2022 मध्ये युक्रेन सोडले. “त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी खूप भावूक व्हायचो,” असे दिमा सांगतात. “मला माहीत नाही माझ्यासाठी काय जास्त महत्त्वाचे होते: एका सुरक्षित जागी राहायला मिळणे किंवा मला किती मदत मिळत आहे हे समजून घेणे.”
मी Airbnb.org सपोर्टर आहे हे गेस्ट्सना कळेल का?
होय. आपत्कालीन वास्तव्ये विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात देण्यासाठी साइन अप केल्याने किंवा पेआऊट्समधून नियमित देणग्या देण्याची सोय केल्याने, तुमच्या होस्ट प्रोफाईलवर तुम्हाला Airbnb.org सपोर्टर बॅज मिळतो.
जगभरातील लाखो लोकांना संघर्ष आणि आपत्तीमुळे त्यांचे घर सोडावे लागले आहे. आपत्कालीन वास्तव्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही तुमच्या घराची दारे उघडून किंवा देणगी देऊन निर्वासितांच्या, संकटातून बचावलेल्या लोकांच्या आणि मदतकार्यात गुंतलेले कर्मचार्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकता.