प्रायव्हसी
Airbnb मध्ये, आम्हाला असे जग तयार करायचे आहे जिथे कोणालाही सर्वत्र आपलेपणा वाटू शकेल – आणि त्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे मुक्त, आपलेपणा असणारी आणि विश्वासावर आधारित कम्युनिटी तयार करणे हे आहे.
आम्ही तुमची माहिती कशी वापरतो आणि तुमच्या गोपनीयतेच्या मानवी हक्काचे संरक्षण कसे करतो याबद्दल स्पष्ट असणे हे विश्वास मिळवण्याचा एक मूलभूत भाग आहे. आम्हाला माहीत आहे की, कंपन्या तुमची माहिती वापरतात तेव्हा ते भयानक वाटू शकते म्हणून आम्ही प्रत्यक्ष आणि डिजिटल दोन्ही ठिकाणी तुमच्या गोपनीयतेचा आदर करणारी सशक्त धोरणे आणि पद्धती लागू केल्या आहेत.
आमची गोपनीयता तत्त्वे
तत्त्वांच्या संचामध्ये गोपनीयतेची आमची बांधिलकी दर्शवली जाते जी आम्ही तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्यामुळे आम्हाला आमच्या निर्णय घेण्यामध्ये मार्गदर्शन करते.
तुमच्या फायद्यासाठी
तुमच्या अनुभवांना आणखी उत्तम करण्यासाठी आणि तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो. आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कोणालाही विकत नाही.
पारदर्शकता
आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कसा संकलित करतो आणि वापरतो याबद्दल आम्ही पारदर्शक आहोत.
नियंत्रण
आम्ही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक डेटाचे नियंत्रण देतो.
सुरक्षा
आम्ही कडक सुरक्षा उपायांद्वारे तुम्ही आमच्याकडे सोपवलेल्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करतो.
आम्ही संकलित करत असलेला डेटा, आम्ही तो कसा वापरतो आणि तुमच्या डेटा विषयावरील हक्कांचा वापर कसा करायचा यावरील अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया आमच्या गोपनीयता धोरणाचा आढावा घ्या.