प्रवासासाठी अधिक सुरक्षित परतावा
COVID-19 दरम्यान आणि त्यानंतर
प्रवास सुकर करण्यासाठीच्या नवीनतम सल्ल्यांबाबत अप-टू-डेट रहा.
विकसनशील कार्यक्रम आणि धोरणांसह आम्ही तुम्हाला कसा सपोर्ट करत आहोत ते जाणून घ्या.

तुमच्या भागातील किंवा अंतिम ठिकाणातील होस्ट्स आणि गेस्ट्ससाठीची मार्गदर्शक तत्त्वे रिव्ह्यू करा.

तुमचे कॅन्सलेशन आणि रिफंडचे पर्याय समजून घेणे.

कॅन्सलेशनच्या लवचिकतेसह वास्तव्याच्या जागा फिल्टर कशा कराव्यात ते जाणून घ्या.
सुरक्षा ही सामायिक जबाबदारी आहे
आम्ही Airbnb कम्युनिटीला आमच्या कोव्हिड-19 आरोग्य आणि
सुरक्षा पद्धतींचे पालन करण्यास सांगत आहोत.
मास्क घालणे
गेस्ट्स आणि होस्ट्स यांनी संवाद साधताना मास्क घालण्याशी संबंधित स्थानिक कायदे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

सोशल डिस्टन्सिंग
स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक असताना, होस्ट्स आणि गेस्ट्सनी एकमेकांपासून 6 फूट (2 मीटर) अंतर राखण्यास सहमती दर्शवली पाहिजे.
वाढीव स्वच्छता
हॉस्ट्सनी आमच्या तज्ञांच्या सहाय्याने बनवलेल्या पाच पायर्यांच्या सुधारित स्वच्छता प्रक्रियेचे पालन केले पाहिजे.

प्रत्येक वास्तव्यासाठी उंचावलेली मानके
आमची तज्ञांच्या सहाय्याने बनवलेली पाच पायर्यांची सुधारित स्वच्छता प्रक्रिया मूलभूत स्वच्छतेच्या पलीकडचा विचार करते आणि आमच्या कम्युनिटीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत करण्यासाठी होस्ट्स उचलू शकतात असे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

गर्दीपासून दूर, खाजगी जागा
खाजगी घरे. संपर्कविरहित चेक इन्स. विस्तीर्ण खुल्या बाहेरील जागा. मोकळा श्वास घेण्यासाठी जागा. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या सुविधांनी सज्ज राहण्याच्या जागा शोधा.

तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली
कोणत्या नवीन सुरक्षा आणि स्वच्छता मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे?
सर्व होस्ट्सनी आमच्या कोविड-19 सुरक्षा आणि स्वच्छता पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे. Airbnb सुधारित स्वच्छता याबद्दल अधिक जाणून घ्या. स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असल्यास, सर्व होस्ट्स आणि गेस्ट्सनी व्यक्तिशः संवाद साधताना मास्क किंवा चेहऱ्यावर आवरण घालणे आवश्यक आहे आणि एकमेकांपासून 6 फूट (2 मीटर) अंतर राखणे आवश्यक आहे. आणि अर्थातच, तुम्ही COVID-19 च्या संपर्कात आला असाल किंवा त्याची लक्षणे दाखवत असाल तर होस्ट किंवा प्रवास न करण्याची आम्ही शिफारस करतो. आमच्या वास्तव्याच्या जागांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या आवश्यकता वाचा. तुम्ही Airbnb ॲपमध्ये होस्टशी त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या पद्धतींबद्दल विशिष्ट प्रश्नांसह नेहमी संपर्क साधू शकता.
Airbnb अनुभवांसाठी कोणती कोविड-19 धोरणे तयार केली गेली आहेत?
Airbnb अनुभव अशा देशांमध्ये पुन्हा सुरू करण्यात आले आहेत जिथे त्यांना संबंधित सरकारी नियमांनुसार परवानगी देण्यात आली आहे. गेस्ट्स आणि होस्ट्सनी वैयक्तिक अनुभवांसाठी विशिष्ट सुरक्षा पद्धतींचे पालन करणे अपेक्षित आहे, ज्यात स्थानिक कायदे किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असेल तेव्हा सोशल डिस्टन्सिंग राखणे आणि मास्क घालणे समाविष्ट आहे. आणि अर्थातच, तुम्ही COVID -19 च्या संपर्कात आला असाल किंवा आजारी असाल तर घरीच रहा. आमच्या अनुभवांसाठी आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्हाला केवळ तुमच्या ग्रुपबरोबरच अनुभव घ्यायचा असल्यास, तुम्ही खाजगी बुकिंगचा विचार करू शकता. तुम्हाला समूहांमध्ये एकत्र येण्यास अस्वस्थ वाटत असल्यास किंवा वैयक्तिक अनुभव अद्याप तुमच्या मार्केटमध्ये पुन्हा सुरु झाले नसल्यास, आमचे ऑनलाईन अनुभव पहा.
मी विद्यमान रिझर्व्हेशन कसे बदलू किंवा कॅन्सल करू?
तुम्हाला तुमचे रिझर्व्हेशन बदलायचे किंवा कॅन्सल करायचे असल्यास, तुमच्या सध्याच्या कॅन्सलेशनच्या पर्यायांबद्दल अधिक तपशीलांसाठी Airbnb च्या वेबसाईट किंवा ॲपच्या ट्रिप्स विभागाला भेट द्या. गेस्ट्सना कॅन्सलेशन प्रक्रिया आणि धोरणे नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी आम्ही हे संसाधन तयार केले आहे. याव्यतिरिक्त, COVID-19 ने आजारी असल्यामुळे प्रवास करू न शकणारे गेस्ट्स सपोर्टशी संपर्क साधून संपूर्ण रिफंडसाठी त्यांचे बुकिंग कॅन्सल करण्यास पात्र असू शकतात. आमच्या आपत्कालीन परिस्थितीशी संबंधित धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या.
Airbnb वर कोणत्या प्रकारचे सोयीस्कर बुकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत?
कॅन्सलेशन धोरणे होस्ट्सद्वारे सेट केली जातात आणि लिस्टिंग्जनुसार बदलतात. प्रत्येक लिस्टिंगच्या मुख्य पेजवर तुम्हाला प्रत्येक वास्तव्याच्या जागेच्या कॅन्सलेशनच्या धोरणाबद्दल तपशील मिळू शकतात. तुम्हाला सोयीस्कर कॅन्सलेशनची धोरणे असलेल्या जागा शोधणे सुलभ करण्यासाठी आम्ही एक नवीन सर्च फिल्टर जोडले आहे. नवीन फिल्टरबद्दल अधिक जाणून घ्या.