विम्याचा सारांश

जपान होस्ट विमा

जपान होस्ट विमा काय आहे?

जपान होस्ट विमा अशा प्रकरणांमध्ये संरक्षण देते जिथे Airbnb प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होम शेअरिंगमुळे इतरांना इजा झाल्याच्या संदर्भात किंवा इतरांच्या प्रॉपर्टीला नुकसान झाल्याच्या संदर्भात होस्टला* दायित्व किंवा इतर खर्च येतात, आणि अशा प्रकरणांमध्ये जिथे गेस्टच्या* वास्तव्यामुळे होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीला हानी झाल्यामुळे होस्टचे नुकसान होते. गेस्ट्सच्या वास्तव्यामुळे होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले अशा प्रकरणांमध्ये, जेव्हा होस्ट आणि गेस्ट यांच्यातील वाद आपसात मिटवता येत नाही आणि होस्ट Airbnb शी संपर्क साधतात तेव्हा विमा संरक्षण लागू होईल.जपान होस्ट विमा हा Sompo Japan Insurance Inc. ने जोखिमांकन केलेला विमा कार्यक्रम आहे.जपान होस्ट विमा कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी होस्ट्सना विम्याचे प्रीमियम्स भरावे लागत नाहीत.कृपया जपान होस्ट विम्याच्या विमा संरक्षणाबद्दल खालील माहिती पहा.

विम्याचा कालावधी

चालू विमा प्रोग्रॅमचा हा विमा कालावधी 31 जुलै 2025 ते 31 जुलै 2026 असा आहे.

व्याप्ती आणि अटी

जपान होस्ट विमासाठी अर्ज करण्याची व्याप्ती आणि अटी
जपान होस्ट विमासाठी अर्ज करण्याची व्याप्ती आणि अटी
होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीची भरपाईलागू नियम, अटी आणि अपवादांच्या अधीन राहून, गेस्टच्या* वास्तव्यामुळे होस्टच्या* मालकीच्या लिस्टिंग* आणि वैयक्तिक प्रॉपर्टीची नासधूस झाल्यास जपान होस्ट विमा संरक्षणाची रक्कम दिली जाईल. होस्टने लीजवर दिलेली आहे किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना सोपवली गेली आहे, अशा लिस्टिंगच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण लगेच खाली वर्णन केलेल्या अतिरिक्त संरक्षणांतर्गत दिले जाऊ शकते.इजा किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी होस्टच्या दायित्वाची भरपाईजपान होस्ट विम्यामध्ये, Airbnb प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह केल्यानुसार लिस्टिंगमधील गेस्टच्या वास्तव्याच्या दरम्यान आणि होम-शेअरिंग बिझनेसमुळे गेस्टला किंवा इतरांना इजा झाल्यास किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास त्यामुळे होस्टवर येणाऱ्या दायित्वासाठीदेखील संरक्षण दिले जाते.*इजा किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या अपघातांचे निराकरण करण्यासाठी होस्टला इतरांना कराव्या लागलेल्या पेमेंट्सची भरपाईगेस्टला किंवा इतरांना शारीरिक इजा किंवा प्रॉपर्टीचे नुकसान झाले आहे अशा अपघाताचे निराकरण करण्यासाठी होस्टला पेमेंट करावे लागल्यामुळे त्यांना आलेल्या खर्चाच्या प्रकरणांमध्ये, होस्टला आलेल्या खर्चाच्या बाबतीत जपान होस्ट विमा लागू होऊ शकतो. संरक्षण लागू होण्यासाठी, हा अपघात होम-शेअरिंग बिझनेसमुळे झालेला असणे तसेच Airbnb प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह केल्यानुसार लिस्टिंगमधील गेस्टच्या वास्तव्याच्या दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे. वर वर्णन केलेले प्रत्येक संरक्षण जपान होस्ट विमा पॉलिसीच्या लागू नियम, अटी आणि अपवादांच्या अधीन आहे.1. संरक्षित निवासजपान होस्ट विम्याच्या अंतर्गत, होम-शेअरिंग बिझनेससाठी होस्टच्या मालकीची, त्याने लीजवर घेतलेली किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे अशी लिस्टिंग संरक्षित केली जाते.(*) लिस्टिंग म्हणजे हॉटेल बिझनेस कायद्यांतर्गत मंजूर झालेल्या, राष्ट्रीय धोरणात्मक विशेष क्षेत्र कायद्यांतर्गत प्रमाणित, किंवा गृहनिर्माण निवास व्यवसाय कायद्यांतर्गत अधिसूचित असलेली सुविधा-स्थळे किंवा जिथे तत्सम निवास बिझनेस संचालित केला जाऊ शकतो अशी इतर सुविधा-स्थळे; तथापि त्यासाठी खालील सर्व आवश्यकता पूर्ण होत आहेत:
  • ही सुविधा-स्थळे होस्टच्या मालकीची आहेत, होस्टने भाड्याने घेतली आहेत किंवा त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे;
  • ही सुविधा-स्थळे Airbnb च्या वेबसाईटवर लिस्ट केली गेली आहेत; आणि
  • सुविधा-स्थळे अशा व्यक्तीने बुक केली आहेत जिने Airbnb च्या सेवेच्या अटींना संमती दिली आहे आणि Airbnb च्या वेबसाईटचा वापर केला आहे. निवास सुविधा-स्थळांमध्ये मोबाईल घरे, बसेस, कॅम्पिंग कार्स, ट्रीहाऊसेस आणि पार्क केलेली आणि निवास सुविधा-स्थळे म्हणून वापरली जाणारी इतर सुविधा-स्थळे समाविष्ट आहेत. बोटी आणि वॉटरक्राफ्ट्स निवास सुविधा-स्थळे म्हणून वापरल्या जात असल्या तर त्याही यात समाविष्ट आहेत.
2. होस्ट/होस्ट्स(*) होस्ट्स म्हणजे होम-शेअरिंग बिझनेसमध्ये गुंतलेल्या अशा व्यक्ती ज्या लिस्टिंग्ज प्रदान करतात आणि ज्यांच्याकडे लागू कायद्यांनुसार तसे करण्याचा परवाना आहे किंवा अन्यथा परवानगी आहे.3. गेस्ट/गेस्ट्स(*) गेस्ट्स म्हणजे होम-शेअरिंग बिझनेसचे युजर्स, ज्यांच्यामध्ये युजरने आमंत्रित केलेल्या आणि होम-शेअरिंग बिझनेस वापरत असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.(*) होम-शेअरिंग बिझनेस म्हणजे हॉटेल बिझनेस कायद्यामध्ये (1948 चा कायदा क्र. 138) स्पष्ट केलेला हॉटेल व्यवसाय, राष्ट्रीय धोरणात्मक विशेष क्षेत्र कायद्यामध्ये (2013 चा कायदा क्र. 107) स्पष्ट केलेला व्यवसाय किंवा गृहनिर्माण निवास व्यवसाय कायद्यामध्ये (2017 चा कायदा क्र. 65) स्पष्ट केलेला गृह निवास व्यवसाय किंवा तत्सम निवास व्यवसाय आणि अशा लिस्टिंगच्या आत किंवा बाहेर होत असलेल्या व वरील सर्व सेवांशी संबंधित असलेल्या कोणत्याही ॲक्टीव्हिटीज.
होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीची भरपाईलागू नियम, अटी आणि अपवादांच्या अधीन राहून, गेस्टच्या* वास्तव्यामुळे होस्टच्या* मालकीच्या लिस्टिंग* आणि वैयक्तिक प्रॉपर्टीची नासधूस झाल्यास जपान होस्ट विमा संरक्षणाची रक्कम दिली जाईल. होस्टने लीजवर दिलेली आहे किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांना सोपवली गेली आहे, अशा लिस्टिंगच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण लगेच खाली वर्णन केलेल्या अतिरिक्त संरक्षणांतर्गत दिले जाऊ शकते.इजा किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीसाठी होस्टच्या दायित्वाची भरपाईजपान होस्ट विम्यामध्ये, Airbnb प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह केल्यानुसार लिस्टिंगमधील गेस्टच्या वास्तव्याच्या दरम्यान आणि होम-शेअरिंग बिझनेसमुळे गेस्टला किंवा इतरांना इजा झाल्यास किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाल्यास त्यामुळे होस्टवर येणाऱ्या दायित्वासाठीदेखील संरक्षण दिले जाते.*इजा किंवा प्रॉपर्टीच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या अपघातांचे निराकरण करण्यासाठी होस्टला इतरांना कराव्या लागलेल्या पेमेंट्सची भरपाईगेस्टला किंवा इतरांना शारीरिक इजा किंवा प्रॉपर्टीचे नुकसान झाले आहे अशा अपघाताचे निराकरण करण्यासाठी होस्टला पेमेंट करावे लागल्यामुळे त्यांना आलेल्या खर्चाच्या प्रकरणांमध्ये, होस्टला आलेल्या खर्चाच्या बाबतीत जपान होस्ट विमा लागू होऊ शकतो. संरक्षण लागू होण्यासाठी, हा अपघात होम-शेअरिंग बिझनेसमुळे झालेला असणे तसेच Airbnb प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह केल्यानुसार लिस्टिंगमधील गेस्टच्या वास्तव्याच्या दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे. वर वर्णन केलेले प्रत्येक संरक्षण जपान होस्ट विमा पॉलिसीच्या लागू नियम, अटी आणि अपवादांच्या अधीन आहे.1. संरक्षित निवासजपान होस्ट विम्याच्या अंतर्गत, होम-शेअरिंग बिझनेससाठी होस्टच्या मालकीची, त्याने लीजवर घेतलेली किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे अशी लिस्टिंग संरक्षित केली जाते.(*) लिस्टिंग म्हणजे हॉटेल बिझनेस कायद्यांतर्गत मंजूर झालेल्या, राष्ट्रीय धोरणात्मक विशेष क्षेत्र कायद्यांतर्गत प्रमाणित किंवा गृहनिर्माण निवास व्यवसाय कायद्यांतर्गत अधिसूचित असलेली सुविधा-स्थळे किंवा जिथे तत्सम निवास बिझनेस संचालित केला जाऊ शकतो अशी इतर सुविधा-स्थळे; तथापि त्यासाठी खालील सर्व आवश्यकता पूर्ण होत आहेत:
  • ही सुविधा-स्थळे होस्टच्या मालकीची आहेत, होस्टने भाड्याने घेतली आहेत किंवा त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे;
  • ही सुविधा-स्थळे Airbnb च्या वेबसाईटवर लिस्ट केली गेली आहेत; आणि
  • सुविधा-स्थळे अशा व्यक्तीने बुक केली आहेत जिने Airbnb च्या सेवेच्या अटींना संमती दिली आहे आणि Airbnb च्या वेबसाईटचा वापर केला आहे. निवास सुविधा-स्थळांमध्ये मोबाईल घरे, बसेस, कॅम्पिंग कार्स, ट्रीहाऊसेस आणि पार्क केलेली आणि निवास सुविधा-स्थळे म्हणून वापरली जाणारी इतर सुविधा-स्थळे समाविष्ट आहेत. बोटी आणि वॉटरक्राफ्ट्स निवास सुविधा-स्थळे म्हणून वापरल्या जात असल्या तर त्याही यात समाविष्ट आहेत.
  • 2. होस्ट/होस्ट्स(*) होस्ट्स म्हणजे होम-शेअरिंग बिझनेसमध्ये गुंतलेल्या अशा व्यक्ती ज्या लिस्टिंग्ज प्रदान करतात आणि ज्यांच्याकडे लागू कायद्यांनुसार तसे करण्याचा परवाना आहे किंवा अन्यथा परवानगी आहे.3. गेस्ट/गेस्ट्स(*) गेस्ट्स म्हणजे होम-शेअरिंग बिझनेसचे युजर्स, ज्यांच्यामध्ये युजरने आमंत्रित केलेल्या आणि होम-शेअरिंग बिझनेस वापरत असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो.(*) होम-शेअरिंग बिझनेस म्हणजे हॉटेल बिझनेस कायद्यामध्ये (1948 चा कायदा क्र. 138) स्पष्ट केलेला हॉटेल व्यवसाय, राष्ट्रीय धोरणात्मक विशेष क्षेत्र कायद्यामध्ये (2013 चा कायदा क्र. 107) स्पष्ट केलेला व्यवसाय किंवा गृहनिर्माण निवास व्यवसाय कायद्यामध्ये (2017 चा कायदा क्र. 65) स्पष्ट केलेला गृह निवास व्यवसाय किंवा तत्सम निवास व्यवसाय आणि अशा लिस्टिंगच्या आत किंवा बाहेर होत असलेल्या व वरील सर्व सेवांशी संबंधित असलेल्या कोणत्याही ॲक्टीव्हिटीज.

    विमा कव्हरेज

    गेस्टच्या वास्तव्यामुळे होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीचे किंवा लिस्टिंगचे नुकसान झाल्यास, जपान होस्ट विमा जास्तीत जास्त ¥30,00,00,000 JPY कव्हरेज देऊ शकतो. गेस्ट किंवा तृतीय पक्षाच्या मालमत्तेचे नुकसान किंवा शारीरिक इजा या संबंधात होस्टची जबाबदारी असते किंवा खर्च येतो तेथेसुद्धा हा विमा ¥10,00,00,000 JPY पर्यंत कव्हरेज देऊ शकतो.

    कव्हरेजमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी

    जपान होस्ट विम्याच्या अंतर्गत समाविष्ट नसलेल्या मुख्य गोष्टी (होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीच्या भरपाईशी संबंधित कलमे)
    लिस्टिंगमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी:
    • चलन, पैसे, सराफा स्वरूपातील मौल्यवान धातू, नोटा किंवा रोखे.
    • जमीन, पाणी किंवा जमिनीवरील इतर कोणताही पदार्थ; तथापि, हे लँडस्केप गार्डनिंग, रस्ते आणि फरसबंदी असलेल्या जमिनीच्या सुधारणांना लागू होणार नाही (परंतु जोडलेल्या कोणत्याही जमिनीवर किंवा अशा प्रॉपर्टीच्या खाली असलेल्या जमिनीवर लागू होईल) किंवा कोणत्याही बंद टाकीमध्ये, कोणत्याही पायपिंग प्रणालीमध्ये किंवा प्रक्रिया करणाऱ्या कोणत्याही इतर उपकरणांमध्ये असलेल्या पाण्याला लागू होणार नाही.
    • पशुधन आणि पाळीव प्राण्यांसह, परंतु त्यांच्यापुरता मर्यादित न राहता प्राणी.
    • उभी झाडे आणि पिके.
    • वॉटरक्राफ्ट, विमाने, अंतराळयान आणि उपग्रह; तथापि, चालवले जात नसलेल्या आणि लिस्टिंग म्हणून वापरले जात असलेल्या कोणत्याही वॉटरक्राफ्टला हे लागू होणार नाही.
    • वाहने; तथापि, चालवले जात नसलेल्या आणि लिस्टिंग म्हणून वापरले जात असलेल्या कोणत्याही वाहनास हे लागू होणार नाही.
    • भूमिगत खाणी किंवा खाणीचे भुयार किंवा अशा खाणी किंवा भुयारातील कोणतीही प्रॉपर्टी.
    • धरण, पाट आणि बंधारे.
    • स्थलांतरित होत असलेली प्रॉपर्टी.
    • लिस्टिंगपासून 305 मीटर्सपेक्षा जास्त अंतरावरील ट्रान्समिशन आणि वितरण लाईन्स.
    • ज्यामध्ये विम्याचे पैसे दिले जात नाहीत अशी मुख्य प्रकरणे:
    • युद्ध, परकीय देशांद्वारे बळाचा वापर, क्रांती, सरकार बळकावले जाणे, गृहयुद्ध, सशस्त्र बंड किंवा तत्सम इतर घटना अथवा दंगली.
    • आण्विक अभिक्रिया किंवा आण्विक इंधन सामग्री अथवा आण्विक स्रोत सामग्रीच्या अणुकेंद्राचा क्षय, किरणोत्सर्गी घटक, किरणोत्सर्गी आयसोटॉप किंवा अशा सामग्रीमुळे दूषित झालेल्या साहित्यामुळे घडणाऱ्या किंवा त्याला कारणीभूत ठरवता येईल अशा अपघातांमुळे होणारे किरणोत्सर्जन, स्फोट किंवा इतर नुकसान यांच्यामुळे होणारी हानी, मात्र यातून वैद्यकीय, वैज्ञानिक किंवा औद्योगिक वापरासाठीच्या रेडियोआयसोटॉप्सची आण्विक प्रतिक्रिया किंवा आण्विक केंद्राचा क्षय वगळले जाते.
    • दहशतवाद.
    • विषारी जैविक किंवा रासायनिक सामग्रीचा प्रत्यक्ष दुर्भावनापूर्ण वापर किंवा वापराची धमकी.
    • Airbnb प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह केलेल्या लिस्टिंगमधील गेस्टच्या वास्तव्याच्या आधी किंवा नंतर झालेले नुकसान.
    • होस्ट्सच्या हेतुपुरस्सर गैरवर्तनामुळे किंवा घोर दुर्लक्षामुळे होणारे नुकसान.
    • इ.

  • ज्यामध्ये विम्याचे पैसे दिले जात नाहीत अशी मुख्य प्रकरणे (होस्टला आलेल्या दायित्व आणि खर्चांच्या भरपाईशी संबंधित कलमे)

    • युद्ध, परकीय देशांद्वारे बळाचा वापर, क्रांती, सरकार बळकावले जाणे, गृहयुद्ध, सशस्त्र बंड किंवा तत्सम इतर घटना किंवा दंगली.
    • आण्विक अभिक्रिया किंवा आण्विक इंधन सामग्री अथवा आण्विक स्रोत सामग्रीच्या अणुकेंद्राचा क्षय, किरणोत्सर्गी घटक, किरणोत्सर्गी आयसोटॉप किंवा अशा सामग्रीमुळे दूषित झालेल्या साहित्यामुळे घडणाऱ्या किंवा त्याला कारणीभूत ठरवता येईल अशा अपघातांमुळे होणारे किरणोत्सर्जन, स्फोट किंवा इतर नुकसान यांच्यामुळे होणारी हानी, मात्र यातून वैद्यकीय, वैज्ञानिक किंवा औद्योगिक वापरासाठीच्या रेडियोआयसोटॉप्सची आण्विक प्रतिक्रिया किंवा आण्विक केंद्राचा क्षय वगळले जाते.
    • होस्ट्सच्या हेतुपुरस्सर गैरवर्तनामुळे होणारे नुकसान.
    • होस्ट्ससह राहणाऱ्या नातेवाईकांना येणारे खर्च किंवा दायित्व. जिथे होस्टने लीजवर घेतलेल्या किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होस्टवर सोपवली गेली आहे अशा लिस्टिंगला झालेल्या नुकसानीसाठी अशा नातेवाईकांना कराव्या लागणाऱ्या आवश्यक पेमेंट्सचे खर्च किंवा दायित्व होस्टला येते अशा प्रकरणांचा अपवाद केला जातो.
    • होस्ट्ससाठी काम करत असताना होस्ट्सच्या कर्मचाऱ्यांना आलेल्या शारीरिक दिव्यांगतेमुळे येणारा खर्च किंवा दायित्व.
    • होस्ट आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये नुकसानीच्या भरपाईच्या संदर्भात विशेष करार झाला असल्यास अशा प्रकरणांमध्ये दायित्व अशा कराराद्वारे निश्चित केले जाते.
    • सांडपाणी किंवा उत्सर्जनामुळे होणारे अपघात किंवा दायित्व यासाठी होणारा खर्च.
    • वकील, नोंदणीकृत परदेशी वकील, प्रमाणित सार्वजनिक अकाऊंटंट, टॅक्स अकाऊंटंट, आर्किटेक्ट, डिझायनर, लँड आणि हाऊसिंग इन्व्हेस्टिगेटर्स, न्यायालयीन लेखक, प्रशासकीय लेखक, पशुवैद्य किंवा तत्सम इतर व्यक्तींनी केलेल्या व्यावसायिक कामांमुळे उद्भवणाऱ्या अपघातांचे किंवा दायित्वाचे खर्च.
    • लिस्टिंगच्या बाहेरील कोणतेही विमान, ऑटोमोबाईल किंवा जहाज किंवा वाहनाशी संबंधित अपघातांसाठी अथवा ते बाळगल्यामुळे, वापरल्यामुळे किंवा त्याच्या व्यवस्थापनातूून उद्भवणाऱ्या दायित्वासाठी येणारे खर्च. लिस्टिंग म्हणून सुविधा-स्थळाबाहेरील ऑटोमोबाईल किंवा जहाज किंवा वाहन वापरत असताना अशा सुविधा-स्थळाबाहेरील ऑटोमोबाईल किंवा जहाज किंवा वाहनाच्या वापरामुळे किंवा व्यवस्थापनामुळे होणाऱ्या नुकसानीस यातून वगळले जाते.
    • होस्टने लीजवर घेतलेल्या किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होस्टला सोपवली गेली आहे अशा लिस्टिंगचा पुनर्निर्माण, विस्तार किंवा ती पाडून टाकणे यासारख्या बांधकामाशी संबंधित अपघात किंवा त्यातून उद्भवणारे दायित्व यांचे खर्च. होस्ट जिथे स्वतःहून अशा कामात गुंतलेला असेल अशा प्रकरणांचा अपवाद केला जातो.
    • होस्टने लीजवर घेतलेल्या किंवा जिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होस्टला सोपवली गेली आहे अशा लिस्टिंगचे भूकंप, उद्रेक, पूर, त्सुनामी किंवा तत्सम नैसर्गिक घटनेमुळे लिस्टिंगच्या विनाशातून होणाऱ्या अपघातांसाठी किंवा त्यातून उद्भवणाऱ्या दायित्वासाठीचे खर्च. आगीमुळे होणाऱ्या नुकसानीचा अपवाद केला जातो.

  • विम्याचे दावे

    अपघाताची नोटीस

    गेस्ट किंवा तृतीय पक्षाला झालेली इजा किंवा प्रॉपर्टीचे नुकसान होस्टच्या लक्षात आल्यास होस्टने Airbnb ला त्वरित कळवावे कारण विमा लागू असू शकतो. त्याचप्रमाणे, जर होस्टच्या मालकीच्या प्रॉपर्टीच्या नुकसानीबाबत होस्टला समजले तर गेस्टशी प्रथम संपर्क झाल्यापासून 72 तासांच्या आत ते आणि त्यांचे गेस्ट यांच्यात निराकरणासंबंधात एकमत न झाल्यास होस्टने Airbnb ला कळवले पाहिजे कारण विमा लागू असू शकतो.

    विमा पॉलिसीच्या डिलिव्हरीसाठी विनंती करा

    या जपान होस्ट विमा सारांशात विमा पॉलिसीचे सर्व नियम, अटी, मर्यादा आणि अपवाद समाविष्ट नाहीत. विमा पॉलिसीच्या प्रतीची विनंती करण्यासाठी, कृपया Aon Japan Ltd. शी संपर्क साधा आणि त्यात तुमच्या Airbnb अकाऊंटची माहिती समाविष्ट करा.

    अंडररायटिंग विमा कंपनी

    Sompo Japan Insurance Inc.