तुमचे स्वागत आहे Airbnb सिटी पोर्टलवर

Airbnb सह भागीदारी करणाऱ्या शहरांसाठी अशा प्रकारचा पहिलाच उपाय.

स्थानिक प्रवासाच्या ट्रेंड्समधील इनसाईट्स आणि अल्पकालीन रेन्टलचे नियम विकसित करण्यात आणि अंमलात आणण्यात मदत करणारी साधने यांच्या आधारे सिटी पोर्टल, कम्युनिटीजना पर्यटनाचे आणि होम शेअरिंगचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्यास सक्षम करते.

तुम्ही सरकारी अधिकारी किंवा पर्यटन संस्था असून Airbnb सह भागीदारी करण्याचा विचार करत आहात का? तुमच्या स्वतःच्या सिटी पोर्टलसाठी विनंती करण्यासाठी खालील लिंक वापरा.

सिटी पोर्टलच्या आत


होम शेअरिंग तुमच्या कम्युनिटीला बळकट करते याची खात्री करण्यासाठी डेटा-आधारित माहिती आणि रिसोर्सेस एक्सप्लोर करा.

स्थानिक डेटा आणि इनसाइट्स

Airbnb चा तुमच्या कम्युनिटीवर होणारा आर्थिक परिणाम, स्थानिक प्रवासाचा कल आणि बरेच काही चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डेटा ॲक्सेस करा.

विश्वास आणि सहकार्याची साधने

न्याय असलेले, संतुलित अल्पकालीन रेंटल धोरणे विकसित करण्यात आणि अंमलात आणण्यात मदत करण्यासाठी उद्योगा-प्रथम साधने आणि संसाधने वापरा.

सपोर्ट आणि कम्युनिकेशन

तुमच्या कम्युनिटीमधील समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी Airbnb टीमच्या वैयक्तिक सपोर्टचा लाभ घ्या.

आमच्या पार्टनर्सकडून


सिटी पोर्टल वापरण्याबद्दल आमच्या काही पार्टनर्सना सर्वात जास्त काय आवडते ते ऐका.

आमचे अल्पकालीन रेन्टलचे कायदे अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यात शहराला मदत करेल असे एक साधन तयार करण्यातील Airbnb चे सहकार्य आणि सक्रियता या दोन्हीसाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत.
Darrell Steinberg
सॅक्रेमेन्टोचे महापौर
सिटी पोर्टल हे एक अमूल्य साधन आहे जे पर्यटकांच्या वर्तणुकीच्या ट्रेंड्सबद्दल मौल्यवान इनसाईट्स प्रदान करते...प्रभावी सार्वजनिक धोरणे आणि प्रभावी प्रचार मोहिमेची आखणी करण्यात ही समृद्ध माहिती महत्त्वपूर्ण आहे.
Mauricio Arceo
पर्यटन सचिव · कॅम्पेचे मेक्सिको
दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणारे शहराचे नियम टिकवून ठेवण्यास सिटी पोर्टलची साधने मदत करतात.
Alicia Fong
निवास सुरक्षा व्यवस्थापक · इंगलवुड, कॅलिफोर्निया

आमच्या कामाबद्दल अधिक काही


जगभरातील सरकारांसोबत काम करण्याच्या आणि जबाबदार पर्यटनाला सपोर्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नांबद्दलचे नवीनतम अपडेट्स जाणून घ्या

तुमच्या प्रश्नांची उत्तरे


सिटी पोर्टलबद्दल नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्वरीत शोधा.

वर्षानुवर्षे जगभरातील सरकारांसोबत केलेल्या कामाच्या अनुभवातून स्थानिक प्रशासने आणि पर्यटन संस्थांसाठी 2020 मध्ये Airbnb सिटी पोर्टल सुरू करण्यात आले, ते या प्रकारचे प्रथम संसाधन होते. 1,00,000 हून अधिक शहरे आणि नगरांमध्ये असलेल्या होस्ट्ससह, होम शेअरिंग सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या कम्युनिटीजा बळकट करण्यासाठी सरकारबरोबर काम करणे हे Airbnb च्या प्राधान्यांपैकी एक आहे. या बांधिलकीचा एक भाग म्हणून, स्थानिक सरकारे आणि पर्यटन संस्थांना त्यांच्या भागातील Airbnb लँडस्केप आणि पर्यटनाचा कल चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या अल्पकालीन रेन्टलचे कायदे अंमलात आणण्यात मदत करण्यासाठी त्यांना साधने देऊ करण्यासाठी आम्ही सिटी पोर्टल तयार केले आहे.
सिटी पोर्टलचा वापर शेकडो स्थानिक सरकारे आणि पर्यटन संस्था त्यांच्या भागातील Airbnb लँडस्केप आणि प्रवासाचा कल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तसेच अल्पकालीन रेन्टलचे कायदे विकसित करण्यात आणि अंमलात आणण्यात मदत करण्यासाठी करतात.
सिटी पोर्टलचा वापर करण्यासाठी तुम्ही सरकारी अधिकारी असणे किंवा एखाद्या पर्यटन संस्थेबरोबर काम करत असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या न्याय क्षेत्रासाठी सिटी पोर्टलची विनंती करायची असल्यास, खालील "सुरुवात करा" बटणाचा वापर करा. तुमच्या सरकारचे किंवा संस्थेचे आधीच स्वतःचे सिटी पोर्टल असल्यास आणि त्यांना ॲक्सेस द्यावा असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया cityportal-support@airbnb.comवर ईमेल पाठवा.
नाही! जगभरातील शेकडो सरकारी आणि पर्यटन संस्था सिटी पोर्टलद्वारे Airbnb बरोबर भागीदारी करतात.

पुढच्या पायरीवर जा

तुमच्या स्थानिक कम्युनिटीसाठी सर्वोत्तम उपाय शोधण्याकरीता Airbnb तज्ञाशी बोला.

संपर्क करा